वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पर्यटन विशेषांकासाठी संस्कृत साहित्यातील मेघाचा रामगिरी ते अलका व्हाया उज्जैन असा प्रवास किंवा रघुवंशातील रामाने सीतेसह वानर आदींचा घडलेला लंका ते अयोध्या प्रवास या दोन विषयांबाबत काही लिहाल का? अशी विचारणा झाली. त्याला पूर्वी कधीतरी मीच उल्लेख केलेल्या डॉ. भावे आणि डॉ. सोहोनी यांच्या सदीप व्याख्यानाच्या स्मृतीची पार्श्वभूमी होती पण मग मी म्हटलं, त्या प्रवासांवर स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली आहेत
August 17, 2023
जहाज ट्युनिशिया देशातील ला बिझर्ते आणि ला गुलेट या दोन पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करून काळया समुद्राकडे निघाले होते. ला गुलेट आणि ला बिझर्ते या पोर्ट प्रमाणेच ट्युनिशिया या देशाचे नाव सुद्धा त्या देशात जाईपर्यंत कधी ऐकले नव्हते. तस पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश बऱ्यापैकी मोठा आहे पण ज्याप्रमाणे गरीब, निरुपद्रवी आणि शांत लोकांबद्दल जसं कोणाला काही माहिती नसतं किंवा त्यांच्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही किंवा चर्चा करत नाही असा प्रकार ट्युनिशिया सारख्या अनेक देशांबद्दल घडत असावा याची जाणीव झाली.
November 24, 2019
“हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उच्चांक मांडले होते.
April 26, 2022
…किवींच्या इंग्लंड दौर्यातील तिसर्या कसोटीचा दुसरा दिवस. बदकावर परतणार्या एका खेळाडूला मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील प्रेक्षक उभे राहून मानवंदना देत होते. ते साधेसुधे ‘बदक’ नव्हते. 52 चेंडू त्या बदकाच्या पोटात होते.
August 5, 2010
२१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.
गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.
आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 21, 2017
भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी 'अनमॅन्ड एरिअल व्हीइकल' (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले आहेत. या उपकरणाच्या मदतीने हत्तींच्या कळपांची हालचाल 'सेंट्रल रेल ट्रॅक कंट्रोल सिस्टिम'ला कळवली जाईल. तिथून इंजिन ड्रायव्हरला ती माहिती वॉकी-टॉकीवर कळवली जाईल. खबर मिळताच ते गाडीचा वेग कमी करतील व हत्तींच्या बळी पडण्याची शक्यता कमी होईल. ज्या विशिष्ट जंगलातील भागांतून हत्तींची हालचाल जास्त असते, त्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या खालून रस्ते काढण्यात आले आहेत. ज्यावरून हत्ती पलीकडील बाजूला जाऊ शकतील.
सौराष्ट्रातील गीर जंगलाच्या बाजूनं जाणाऱ्या रेल्वेमार्गाजवळून गाडी जात असताना सिंहांची कुटुंबं दिसू शकतात. हा रेल्वेमार्ग पिपाव्ह बंदराकडे जातो. एकदा एका मालगाडीच्या धक्क्याने दोन सिंहिणी तत्काळ मरण पावल्या व त्या मालगाडीबरोबर खेचल्या जाऊन पुढे मार्गाजवळ पडलेल्या आढळल्या. त्यांच्याबरोबर असलेले सिंहाचे ३ बछडे मात्र वाचले होते.
गीर जंगल सिंहांकरता जगप्रसिद्ध आहे. त्या जंगलाच्या बाजूनं एक रेल्वेमार्ग जातो. काही वेळा रात्रीच्या अंधारात सिंह आणि त्यांचे बछडे थेट रेल्वेमार्गावर येतात व त्यावेळी येणाऱ्या गाडीच्या धक्क्याने मरण पावतात. अशा घटना ३ ते ४ वेळा घडल्या आहेत. अशा घटनेत सिंहांचा बळी जाणे योग्य नाही हे लक्षात घेऊन या मार्गावर रात्री ७ ते सकाळी ७ या काळात गस्त घालण्याकरता जवळच्याच खेड्यातील दोन सिंहप्रेमी तरुण काठ्या, टॉर्च व वॉकीटॉकी घेऊन रेल्वेमार्गावर गस्त घालतात. तिथेच आडवे होण्याकरता एक छोटे मचाण बांधण्यात आले आहे. रात्रभरात ५ ते ६ मालगाड्या जात असतात. या वेळात जर सिंहाची डरकाळी ऐकू आली किंवा त्यांची हालचाल दिसली तर जवळच्या स्टेशनमास्तरला ताबडतोब कळविलं जातं, जरूर पडल्यास टॉर्चच्या उजेडाने इंजिन थांबविलं जातं व योग्य तो सल्ला इंजिनड्रायव्हरला दिला जातो. या तरुणांना अंदाजे प्रत्येकी ६०००रु. महिना असा भत्ता दिला जातो. सिंहांवरील प्रेमापोटी रात्रभर जागत राहण्याचं हे काम ते तरुण मनापासून आवडीने करत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
November 27, 2022
महिला विश्वचषक स्पर्धा
January 13, 2011
प्रेक्षकांच्या गरजा ध्यानात घेऊन चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती. सामान्य प्रेक्षकांना परवडतील असे दर ठरवून आसनव्यवस्थेची वर्गवारी करण्यात आली होती.
September 21, 2021
१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.
January 5, 2019
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti