(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फेब्रुवारी २४ – बेटी विल्सनचा दुहेरी पराक्रम : शतक आणी दहा बळी

    एकाच कसोटी सामन्यात किमान दहा गडी बाद करणे आणी शतकही काढणे (एका डावातच) ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमण्याआधी एका महिला खेळाडुने केलेली आहे ! ‘लेडी डॉन’ (किंवा ‘फिमेल ब्रॅडमन’) या टोपणनावाने ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची बेटी विल्सन (एलिझबेथ रिबेका विल्सन) ही ती खेळाडू.

      February 24, 2011


  • आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार ?

    निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं.

      February 6, 2017


  • रेल्वेसिग्नल्स

    रेल्वेप्रवास विनाअपघात सुरू राहण्यात सिग्नलची व्यवस्था अपरिहार्य असते.

    जेव्हा इ.स. १८०६ च्या सुमारास दगडीखाणी असलेल्या जागांजवळ घोडे व गाढवे यांच्याद्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या मालगाड्या प्रथम वापरण्यास सुरुवात झाली, तेव्हा रखवालदार रेल्वेलाईनवर उभं राहून हातानं सिग्नल दाखवीत. अशा वेळी काळोखामध्ये मिणमिणत्या कंदिलांचा उपयोग केला जात असे.

    जगातील पहिली इंजिन लावलेली प्रवासी गाडी डार्लिंग्टन ते स्टॉकटोन या अंतरात जेव्हा प्रथम धावली, त्यावेळी त्या मार्गावर रेल्वेसिग्नलस् नव्हते. घोड्यावर आरूढ झालेल्या पोलिसांनी गाडीपुढे धावत मार्ग मोकळा करून दिला होता. हळूहळू ठरावीक अंतरावर ऐटबाज पोलीस उभे राहून मार्ग खुला ठेवीत. पुढे खांबावर फिरणाऱ्या हाताच्या आकाराच्या विविध रंगांच्या चकत्यांचा वापर करून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. रात्रीच्या वेळी स्टेशनवर मेणबत्तीच्या उजेडात गाडीला मोकळा मार्ग दाखविला जात असे.

    जसजशी गाड्यांची संख्या वाढू लागली, तसतशी सुरक्षिततेची गरज अधिकाधिक जाणवू लागली. गाड्यांचा वेग वाढला. त्यातून आंतरबद्ध प्रणालीमुळे (इंटरलॉकिंग सिस्टीममुळे) एका वेळी एकच गाडी जात असे. याकरता जाड वायरने सांधे हलविले जात. हे काम पाँईंटमन करीत. पुढील काळात स्टेशन येण्याच्या आधी व नंतर उंचावर केबिन बांधण्यात आल्या. या जागेवरून पाँईंटमन प्रचंड मोठा लोखंडी दांडा हातानं हलवून सांधे बदलू लागले व गाडीला झेंडा दाखविण्याचं काम केबिनमन करू लागले.

    दोन स्टेशनांमधील संवाद वायरलेसनं साधता येऊ लागल्यावर, पुढच्या स्टेशनची परवानगी असल्याशिवाय आधीच्या स्टेशनातून गाडी पुढे सोडलीच जात नसे.

    जिथे एकेरी मार्ग होता त्या स्टेशनवर इंजिन ड्रायव्हरला 'नील्स बॉल टोकन' मिळत असे. या टोकनमधून पुढील मार्गांची संपूर्ण माहिती दिली जात असे.

    यानंतरच्या काळात तांबडा, पिवळा व हिरवा ह्या तीन मुख्य रंगांचे प्रखर उजेड असलेले सिग्नल्स सुरू झाले. तांबड्या रंगाचा सिग्नल म्हणजे पूर्णपणे थांबणे, पिवळा रंग म्हणजे गाडी सावकाश, खबरदारी घेत हळूहळू पुढे नेणे; तर हिरव्या रंगाचा सिग्नल म्हणजे गाडी सुखरूप पुढे जाण्यास परवानगी आहे अशी ही सिग्नल्सच्या रंगांची आजही सुरू असलेली गृहीतकं तेव्हाही प्रचलित होती.

    सिग्नल्सचं संपूर्णपणे विद्युतीकरण झाल्यामुळे आणि पूर्णतः स्वयंचलित यंत्रणा असणारे सिग्नल्स सुरू झाल्यामुळे मात्र खरी क्रांती झाली. गाडीचा पहिला डबा सिग्नल ओलांडून गेल्यावर लागलीच तांबडा दिवा लागतो. (Track Circuiting). केबिनमधील 'सेंट्रल कंट्रोल पॅनल'वर जाणाऱ्या व येणाऱ्या या सर्व गाड्या छोट्या दिव्यांच्या स्वरूपांत दिसतात. एखाद्या गाडीने चुकीमुळे लाल सिग्नल ओलांडला तर ड्रायव्हरला धोक्याची सूचना मिळते; परंतु तरीही गाडी थांबविली नाही, तर मात्र गाडीला ब्रेक लागत ती हळूहळू थांबते. या यंत्रणेमुळे गाडीची सुरक्षितता जवळजवळ शंभर टक्के नक्की झाली आहे.

    मुख्य शहराच्या बाहेर गेल्यावर, रेल्वेमार्गाची संपूर्ण जबाबदारी मधल्या, स्टेशन्सवरील स्टेशनमास्तर, केबिनमन, त्याचा मदतनीस पाँईंटमन यांच्यावर असते. रात्रीच्या वेळी केबिनमन केबिनच्या खिडकीतून हिरवा किंवा लाल प्रखर दिवा दाखवितो.

    -डॉ. अविनाश वैद्य

      August 11, 2022


  • श्री गणेशाचे निर्गुण स्वरुप

    एकच तत्व सर्वास प्रत्यक्ष होणारे आहे.तेच तत्व सर्वाचे पालन करीत आहे. प्रत्यक्ष होणारे, अनुभवाला येणारे, या विश्वामध्ये दुसरे तत्वच नाही. आकाराला आलेल्या सर्व नाशिवंत पदार्थात ओतप्रोत भरलेले जे सक्ष अविनाशी तत्व आहे ते गणपतीच आहे.

      June 4, 2010


  • नैवेद्य भाग ५

    अकाल मृत्युहरणम
    सर्वव्याधिविनाशनम,
    विष्णु पादोदकं तीर्थं
    जठरे धारयाम्यहम् ।।

    तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं.
    त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा.

    तसेच
    अच्युतानंद गोविंद
    नामोच्चरण भेषजात ।
    नश्यन्ति सकला रोगाः
    सत्यम् सत्यम् वदाम्यहम् ।।

    हा श्लोकदेखील म्हणतात.
    अन्न असो वा औषध, देवाचं नाव घ्यावं आणि निश्चिंत व्हावं.
    मी परत परत खात्रीनं सांगतोय, असं श्लोककर्ता वारंवार बजावून सांगतोय, पण नाही पटत.

    औषधं सर्व रोगानाम्
    श्रद्धया हरिसेवनम असं वाग्भटाचार्यदेखील म्हणतात.

    काही गोष्टींची कारणमिमांसा केली तरी बुद्धीच्या स्तरावर उत्तरे मिळत नाहीत. अनेक औषधे तयार करत असताना काही विशिष्ट श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणावेत, म्हणजे औषधाची कार्यकारी क्षमता वाढते.
    याला अनुभवाशिवाय दुसरा वैज्ञानिक पुरावा काय देता येणार.

    मी घेत असलेले अन्न किंवा औषध हे ईश्वरीय इच्छेने घेत आहे, माझे कर्तृत्व शून्य आहे. अशी मनाला सम किंवा शून्य स्थितीत आणून ठेवणारी अवस्था निर्माण करून जेव्हा अन्न वा औषध सेवन केले गेले तर त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात, असे आजचे मानसोपचार तज्ज्ञ देखील म्हणतात.

    हे केवळ भारतीय लोकच म्हणतात, असंही नाही, होमीयोपॅथीमधे पण आय ट्रीट, ही क्युयर्स असंच म्हणतात ना !
    अगा म्या नाही केले असे माऊलींचे शब्द आहेत. असो.

    अन्न सेवन करत असतानाची भावना महत्वाची असते. म्हणून अन्नसेवन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा.
    यात आणखी एक भाव असतो, तुझेच तुजला अर्पण !
    तूच तुझ्या शक्तीने तयार केलेले, तुझे अन्न मी तुला अर्पण करतो.

    ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवाला आम्हीच बनवले आहे, आम्हीच निवृत्त केले आहे, अश्या विचारसरणीच्या मंडळींनी देखील त्या अज्ञात शक्तीला शरण जावे, आपण घास घेण्यापूर्वी हा विचार जरूर मनात निर्माण करावा.

    आता नैवेद्यातील कर्मकांड.
    वाढलेल्या पानाभोवती पाणी हातात घेऊन, ताटाभोवती डावीकडून ऊजवीकडे गोलाकार फिरवावे. आणि ताटातील चार सहा शीते बाहेर काढून ठेवावीत. पाण्याची ही गोलाकार रेषा ही ताटात येणाऱ्या सूक्ष्म जीवांसाठी जणुकाही लक्ष्मणरेषा तयार झाली. आता बाहेरील जीव ताटात येणार नाहीत, पण त्यांना सुद्धा आपल्यातील अन्नाचा भाग मिळावा, पाण्याच्या काढलेल्या रेषेवरून, अन्न शोधत येणार्‍या जंतुना पटकन अन्न मिळावे. म्हणून चित्राहुती.
    असंही असू शकेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    11.09.2016

      September 11, 2016


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ४

    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
    पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥

    बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
    कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
    मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
    आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
    पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
    रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
    वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
    त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
    प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
    भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 23, 2020


  • आदत आणि मदत

    एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. नंतर काही दिवसांनी त्याच तरुणाने त्या श्रीमंत गृहस्थाकडे येऊन नवीन उद्योगासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली. ही विनंती त्या श्रीमंत गृहस्थाने तात्काळ मान्य केली आणि तशी मदतही दिली.

    तरुणाने त्याला आश्चर्याने विचारले, 'या आधी मी मामुली रकमेची मागणी केली ती तुम्ही नाकारलीत पण आता मात्र त्याहून 'कितीतरी अधिक रक्कम दिली असे का?'

    तेव्हा त्या श्रीमंत गृहस्थाने सांगितले या आधी तू जे पैसे मागितले होतेस, ते तुला देऊन तुझी समस्या दूर होणार नव्हती. ते पैसे खर्च झाल्यावर तू आणखी कोणाकडे तरी हात पसरले असतेस. पण आता तू स्वत:चा व्यवसाय करतो आहेस. अशा वेळी तुला मदत केली तर तुझ्यावर इतरांकडे हात पसरण्याची वेळ कधीच येणार नाही.

    मदत करताना नेहमी हा विचार करावा की, आपल्या मदतीचा समोरच्याला खरोखरच आधार होणार आहे, का त्यामुळे तो आणखी अपंग होणार आहे? दान सत्पात्री असावे असे म्हणतात, ते याच अर्थामुळे. आर्थिक किंवा वस्तुरूपाने केलेल्या मदतीमुळे त्या माणसाचे तत्कालीन प्रश्न, समस्या झटपट दूर होतात. पण त्या समस्येचं कारण तसेच राहिल्याने, नवीन समस्या निर्माण होऊ शकते. लातूर किंवा कच्छमधील भूकंपाच्या वेळी ही गोष्ट सिद्ध झाली आहे. भूकंपग्रस्तांना पैसे, कपडे वाटून किंवा नवीन घरे देऊन त्यांची समस्या संपली नाही भावनिक आधार देऊन, त्यांचे मनोधैर्य पुन्हा उंचावणे आणि मदत कार्यात त्यांनाही सहभागी करून घेणे, या मार्गांनीच त्यांचे आयुष्य काही प्रमाणात पूर्ववत करता आले.

    एखाद्याला तुम्ही मदत केलीत वा दान दिलेत म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही. तुमच्याजवळ जे अधिक आहे, मग ते पैसा, ज्ञान, वेळ, कला, श्रम- काहीही असो, त्याचा लाभ इतरांनाही व्हावा या भावनेतून मदत करायला शिका. मदत करणे म्हणजे कर्ज देणे नव्हें, त्यामुळे मदत करताना परतफेडीची अपेक्षा मनात ठेऊच नका. लोकांनी आपली निगा राखावी, आपल्याला पाणी घालावे म्हणून एकही झाड सावली देत नाही. सावली देणे हा जसा झाडाचा सहजधर्म आहे तितक्याच सहजपणे दुसर्‍याला मदत करायला शिका. मात्र या सहजपणातही जागरुकता हवीच. आपल्या मित्राला मदत म्हणून एखादा हुशार विद्यार्थी परीक्षेत त्याला उत्तरे सांगू लागला तर ते योग्य ठरणार नाही. मित्राला खरोखरच मदत करायची असेल तर त्याने परीक्षेपूर्वी मित्राला विषय शिकवून त्याची चांगली तयारी करून घ्यावी.

    मदत कोणाला करावी याबरोबरच कशासाठी करावी यालाही महत्त्व आहेच. तुमचे कार्य, उद्देश, सकारात्मक असेल, विधायक असेल, समाजहिताचा असेल तर त्याला मदत करणारे अनेक हात समाजातून पुढे येतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील आझादहिद सेनेपासून ते आजच्या काळातील कारगील युद्धापर्यंत, देशांच्या सैनिकांना, समाजाच्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारची मदत कशी मिळाली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशी अनेक उदाहरणे वेगवेगळ्या क्षेत्रात आढळतील, कारण एकमेकांविषयी सहानुभूती बाळगून एकमेकांना मदत करणे, हाच खरा मानवाचा धर्म आहे. एखादी मुंगी जर तुम्ही उचललीत तर कडकडून चावते कारण तो तिचा धर्म आहे. मुंगीसारखा सुक्ष्म जीव आपला धर्म सोडत नाही. मग माणसासारखा श्रेष्ठ जीव आपला आपला मदतीचा धर्म कसा बरे सोडेल?

    चिंतामणी कारखानीस.

      February 12, 2016


  • टिनेजर (TEENAGER)

    रोजचा दिवस काहीतरी शिकवून जातोच. असंच कालच्या दिवशी मला इंग्रजी TEENAGER या शब्दाचा उगम कळला व कालचा अवघा दिवस सार्थकी लागला..

      December 6, 2016


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ५

    जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की मी त्या एकदंतांचे सदैव चिंतन करीत असतो. त्यांच्या त्या दिव्यशक्तित्वाचे चिंतन करतो.

      January 5, 2020


  • अल्पायुषी कडी

    शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत.

      May 31, 2023