(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आनंदाचे उगमस्थान

    आपल्यापैकी प्रत्येकालाच सुखाची आकांक्षा असते. सुख-साधने सर्वांनाच हवी. असतात, परंतु सर्व सुखसाधने सर्वांनाच कुठे ‘मिळतात? याचे कारण एकच असते ते म्हणजे आनंदाचा उगम कुठे आहे, हेच आपणास ठाऊक नसते. एखादी वस्तू कुठे मिळेल हेच माहीत नसेल तर ती मिळणार तरी कशी? आनंदाच्या शोधात आपण इकडे-तिकडे भटकतो.

      August 2, 2023


  • कौल आणि इस्लाम

    श्रद्धेची चिकित्सा करू नये. मलाही करायची नाही. मला या लेखात ‘कौल’च्या योग्यायोग्यतेबद्दल बोलायचं नाही. मला तसा अधिकारही नाही, कारण मी कधी कौल लावला नाही व कुणी लावताना तिथं हजरही नव्हतो. मला तुम्हाला सांगायचंय ते ‘कौल’ या शब्दाबद्दल, या शब्दाच्या जन्माबद्दल…!

      July 27, 2017


  • शेतकरी; बंदुका आणि शरद जोशी

    शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकऱ्यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा पुन्हा एकदा अक्षरश: बाजार मांडला आहे. त्यांचे कोणतेही आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी कधीच नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून शेतकऱ्यांचे हित साधल्या गेले नाही. ऐन निर्णायक क्षणी पेटलेले आंदोलन मागे घेऊन त्यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला.

      January 29, 2006


  • माझा समर्थ मठात नाही, तो माझ्यात आहे.

    गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची एक गोष्ट

      July 9, 2017


  • इन्सुलिन रेजिस्टन्स

    इन्सुलिन रेजिस्टन्स ही एक शारीरिक अवस्था असून ज्यात शरीरातील पेशी इन्सुलिन तयार करतात पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यास त्या अयशस्वी ठरतात. ह्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनसाठी प्रतिरोधक (रेजिस्टन्स) बनतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी व शरीरातील किटोन बॉडिजचे प्रमाण वाढू न देण्यासाठी २०० किवा त्यापेक्षा जास्त इन्सुलिनची मात्रा आवश्यक असते अशीही इन्सुलिन रेजिस्टन्स ची व्याख्या करतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये आवश्यक तपासण्या - फ़ास्टींग शुगर (उपाशी पोटीची साखर), फ़ास्टींग इन्सुलिन (उपाशी पोटीचे इन्सुलिन), सी रिअॅक्टीव प्रोटिन (सिरपी), लिपिड प्रोफाईल (रक्तातील चरबी), पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पिसिओस) असलेल्या स्त्रियांनी इन्सुलिन टॉलरन्स टेस्ट आणि क्वानटिटेटिव्ह इन्सुलिन सेन्सिटिव चेक इंडेक्स (QUICKI) - हे एक गणिती सूत्र असून ह्यात रक्तातील साखर व इन्सुलिन ह्यांचा तपासण्यांचा वापर करण्यात येतो.

    ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो अश्या व्यक्तींमध्ये साखर ही शरीरातील पेशींमध्ये शोषण्याऐवजी रक्तातच मिसळलेली राहते. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखर पेशींमध्ये शोषण्यासाठी शरीरातील पॅनक्रीयाज मधील बीटा सेल (पेशी) जास्त इन्सुलिनची निर्मिती करतात. जो पर्यंत ह्या पेशी जास्त इन्सुलिनची निर्मिती करू शकतात तोपर्यंत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात ह्या पेशी यशस्वी ठरतात पण कालांतराने ह्या पेशी योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाहीत. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढलेले रहाते. इन्सुलिनची अयोग्य निर्मिती आणि वाढलेली साखर ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणुन आपणास मधुमेह (डायबेटिस), प्रिडायबेटिस तसेच शरीराला जास्त अपाय करणारे रोग होण्याची शक्यता बळावते. प्रयोग असे दाखवतात कि टाइप २ डयबेटिस होण्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा एक महत्वाचा घटक आहे. असे असूनही मधुमेह होईपर्यंत बऱ्याच जणांमध्ये ह्या अवस्थेची तपासणी केलेली आढळत नाही.

    ब्रेन (मेंदू) फोगीनेस - एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे, रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण, पोट फुगणे, सुस्ती येणे अणि मुख्यत्वे जेवल्या जेवल्या सुस्ती येणे, भूक जास्त लागणे, वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, रक्तदाब वाढणे, ट्रयग्लिसरेइड नावाची रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, प्रो एन्फ़्लमेटरि सायटोकायनेज नेराश्या किवा खिन्नता विषःणता जाणवणे (डिप्रेशन), अकांथोसीस निग्रीकंस (AN) - जसे कि मानेवरची अक्झीला (बखोट) येथील त्वचा काळसर व जाडी दिसणे, त्यावर दोरी सारखे वळ दिसणे, यकृतामध्ये चरबी जमा होणे, स्त्रियांमध्ये प्रजनन दोष निर्माण होणे, मुलांमध्ये वाढ योग्य प्रमाणात न होणे ह्या सारखी लक्क्षणे इन्सुलिन रेजिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यासाठी विविध करणे आहेत पण अनुवंशिकता हे एक सबळ कारण ठरू शकते. प्रयोगाअंती अति कॅलरीजचे सेवन आणि शारीरिक हालचालीची कमतरता ह्यांचा जवळचा संबंध आहे असे सिद्ध झाले आहे. शारीरिक हालचालीची कमतरता, एखादे इन्फेक्शन (रोगाची लागण) किवा एखादा गंभीर आजार, मेटबोलिक सिंड्रोम, वाढलेले वजन मुख्यत्वे पोटाचा घेर वाढणे, गर्भावस्था, काही औषधांचे सेवन उदाहरणार्थ स्टिरोइड तसेच तणाव ह्या सगळ्यांमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याची शक्यता बळावते. लेप्टिन रेजिस्टन्स असल्यास जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची चटक लागते व ती वाढतही जाते.

    अति कॅलरीज, अति फॅट, मुखत्वे सॅचुरेटेड फॅटचे सेवन, मिठाचे अतिसेवन तसेच फास्ट फूडचे अतिसेवन आणि जास्त प्रमाणात नॉन-व्हेजचे सेवन अशा काही चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे शरीरात चरबीच्या पेशीत वाढ होते आणि त्यामुळे वजन वाढण्याचा वेग वाढतो. वाढलेल्या वजनामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सच्या प्रमाणात वाढ होते.

    न्युट्रिशनल मोडुल्येशन ओफ इन्सुलिन रेजिस्टन्स ह्या विषयावर पुनर अवलोकानातील लेखात असे आढळले आहे कि पोटाच्या भागातील जमा झालेली चरबी हे इन्सुलिन रेजिस्टन्स व डायबेटीस साठी महत्वाचे कारण ठरू शकते आणि वजन घटल्यास आणि त्यातूनही पोटाच्या भागातील चरबी घटवल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यास व उलटवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यात व बरा करण्यात जीवनशैली महत्वाची कामगिरी करते त्यामुळे जर आपणास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळावयाचा असेल तर किवा तुम्ही जर ह्या व्याधीने ग्रस्त असाल आणि ती तुम्हाला आटोक्यात आणावयाची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. वाढलेले वजन कमी करणे, शरीरिक हालचालीत वाढ करणे जरुरीचे आहे.

    अन्नातील तंतुमय पदार्थ भूक कमी करण्यास मदत करतात आणि भूक मंदावण्यास मदत झाल्यामुळे आपला आहार (कॅलरीजचे सेवन) कमी होते. ह्यामुळे वजन घटायलाही मदत होते. रक्तातील साखर व रक्तातील चरबी घटवण्यासही मदत करतात. तळकट पदार्थ, गोड पदार्थ, खारट पदार्थ, फास्ट फूड, मीठ, साखर ह्यांचे सेवन केल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळण्यास किवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल

    आहारात कोणता व कसा बदल करायचा हे तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्सच्या करणावर तसेच तुमच्या सर्व चाचण्यांवर अवलंबून असेल.

    डॉ. शीतल म्हामुणकर
    आहारातज्ज्ञ

      March 2, 2015


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम्- ८

    ध्यात्वा चित्ते शिवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो
    हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः ।
    नो तप्तं गाड्गतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥८॥

    आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे मी काय काय केले नाही यांची सूची देण्याच्या निमित्ताने खरेतर आचार्यश्री आपण काय काय करायला पाहिजे ते सांगत आहेत.
    त्या सूचीत ते पुढे म्हणतात,
    ध्यात्वा चित्ते शिवाख्यं - मनामध्ये भगवान शंकरांचे नामस्मरण करीत करीत,
    प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो - मी कधी ब्राह्मणांना भरपूर धन दिले नाही. अर्थात कधीही सत्पात्री दान केले नाही.
    हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः - मी कधीही बीज मंत्रांनी लाखोच्या संख्येत अग्नीमध्ये आहुत्या दिल्या नाहीत.
    यात बीज मंत्र म्हणतांना सर्वात लहान संख्येचा मंत्र असा भाव आहेत. तोदेखील कधी केला नाही. अर्थात तो दहा वीस वेळा किंवा एखादी माळ करून उपयोग नाही हे सांगण्याकरता आचार्य श्री लाखोच्या संख्येचा विचार करतात. किंवा मी इतके भव्यदिव्य विधान केले नाही. असा देखील अर्थ.
    नो तप्तं गाड्गतीरे - मी कधीही गंगा नदीच्या तीरावर तप केले नाही. व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः - व्रत,जप इत्यादींची संबंधित नियमांचे पालन करून ना कधी रुद्र जप केला, ना कधी वेदांचा अभ्यास.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंकरा ! यापैकी काहीही न करता आयुष्य वृत्ता घालवले या अपराधाकरिता मला क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 27, 2020


  • डोक्यावरचा व्रण आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ

    महाराष्ट्राचे अर्थकारण हे मुंबईशी निगडीत आहे; ६० वर्षापूर्वी या अर्थकारणाशी तात्कालीन मुंबई राज्याचा मोठा प्रदेश व देशाचे अर्थकारणही थेट संबंधित होते.

      September 28, 2010


  • बाळक्रीडा अभंग क्र.३०

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 10, 2018


  • मिठास जागा, मिठावर जगू नका

    श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस.

    का...........य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही केल्या शांत होईना. शेवटी कृतीने दाखविण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर, श्रीकृष्ण पुढे काही न बोलता तिथून निघून गेले.

    ते तडक भटारखान्यात गेले, सर्व आचाऱ्याना सक्त ताकीद दिली, कि आज पासून कोणत्याच खाद्य पदार्थात मीठ टाकायचे नाही, हे ऐकून भटारखान्यातील सर्व कर्मचारी स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक जेवण होते, राज्यातील, थोर लोक या खास भोजनास आमंत्रित होते. सर्व पंच पक्वान्ने करण्यात आचाऱ्यांनी कोणतीच कमतरता दाखवली न्हवती.

    श्रीकृष्ण रुक्मिणीला सर्वाना जेवणाचा आग्रह करण्यासाठी विनंती करून दुसऱ्या कक्षात निघून गेले. सर्व पाहुणे जेवायला बसले, परंतु पहिला घास तोंडात घालताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. साक्षात महाराणी सर्वांच्या समोर जातीने हजार होत्या, पण कुणालाही जेवण घशाखाली उतरत न्हवते. हळूहळू पाहुण्यांनी कुजबुज सुरु केली, व मीठ मागण्यास सुरवात केली. वाढपी सर्व जिन्नस वाढायला तयार होते, पण मीठ कोणीच द्यायला तयार न्हवते. रुक्मिणीच्या काय होतंय समजेना, कुणीही स्पष्ट बोलेना व नीट जेवताना दिसेना.

    शेवटी रुक्मिणी स्वतः भटारखान्यात जाऊन पदार्थांची चव घेऊ लागल्या, तर लक्षात आले, कशातही मीठ न्हवते. मुख्य आचाऱ्याला याचे कारण विचारता, त्यांनी महाराजांची तशी ताकीद आहे असे सांगून, मीठ वाढणार नाही असे स्पष्ट सांगितले.

    रुक्मिणी तडक श्रीकृष्ण बसलेल्या कक्षात गेल्या, व त्यांच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. काय हे मिळमिळीत जेवण बनवायला सांगितले आहे, कोणत्याही पदार्थात मीठ नाही, कोणीही आनंदाने जेवत नाही, आणि तुम्ही त्या सर्वांच्या समोर मला धाडून इथे आराम करत आहात. श्रीकृष्ण तिला पाहून गालातल्या गालात हसत होते, म्हणाले कसले जेवण म्हणालीस, परत म्ह......ण. हो......हो मी म्हणत आहे मि...ळ...मि.....ळी....त, चव रहित जेवण का बनवायला सांगितले?

    श्रीकृष्ण म्हणाले मी उत्तम स्वयंपाक बनवायला सांगितला होता, सर्व उच्च प्रतीचे मसाले बनवून स्वयंपाक केला आहे, त्या मुळे स्वयंपाक चांगला झालेला आहेच, यात कोणतीच शंका नाही. हं, मी फक्त कशातही मीठ टाकू नका इतकेच सांगितले, पण त्याने काय फरक पडतो, इतके सुरेख मसाले, उच्च प्रतीचे धान्य, व राज्यातील नामवंत आचारी जर जेवण बनवत असतील तर फक्त मीठ ते हि चिमूटभर न टाकल्यामुळे जेवण का मिळमिळीत होणार आहे?

    आता तुला समजले असेलच मिठाचे महत्व, जेवणात मीठ नसेल तर सर्व मिळमिळीत लागणार यात शंका नाहीच, हे सिद्ध करायचे होते म्हणून हा घाट घातला. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काल मी तुला मिठासारखी आहेस म्हणालो, तर तू रागावलीस, रुसून बसलीस, मग तुझे माझ्या जीवनातील महत्व काय आहे हे समजविण्यासाठी, मला हे सर्व करावे लागले. माझ्या जीवनात सर्व काही उदात्त आहे, पण तू मिठासारखी असल्यामुळे या जीवनाला एक उत्तम चव आलेली आहे, व त्याचा आनंद मी उपभोगतो आहे. जाऊ...दे, आपले संवाद नंतरही सुरु राहतील, आधी आचाऱ्याना बोलाव, मी सर्व पदार्थात मीठ टाकायला सांगतो, पाहुणे मला नावे ठेऊदेत, पण त्या अन्नाला नको, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.

    रुक्मिणी आता वरमली, म्हणाली नाथ काल मी जे रागावले ती माझी चूक झाली. असो, मीठ अन्नात हवेच पण ते चवी पुरते... हे मला पूर्ण उमगले..असे म्हणत भटारखान्यात निघून गेली.

    आपल्या जीवनातही आपले वागणे चिमूटभर मिठासारखे असावे, मुलीच्या किव्वा मुलाच्या आई वडिलांनी चवीपुरते मुलांच्या संसारात लक्ष घालावे. आई वडिलांनी मुलांच्या संसारात अती लक्ष घातल्यामुळे ते मोडकळीस आलेले आज दिसून येतात, याचे कारण अती लुडबुड हि मिठाच्या खड्यासारखी खारटपणा आणते, त्याने मुलांचे जीवन बेचव होते, हीच गोष्ट सर्वांच्या जीवनाला लागू होते.

    आता आरोग्याबाबतही मिठाचे महत्व अनन्यसाधारण आहे, अती तिथे माती हे मिठास योग्य तर्हेने लागू होते. अती मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो, हे लक्षात ठेवा, जेवणात वरून मीठ शक्यतो टाळाच.

    मिठास जागा, मिठावर जगू नका.....

    विजय लिमये
    (9326040204)

      March 13, 2017


  • विध्वंसाचे जीन्स!

    पुराणात प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या त्रिशंकू राजाची कथा आहे. साक्षात सृष्टी नियंत्या ब्रह्याला आव्हान देणाऱ्या या त्रिशंकूची अवस्था अखेर काय झाली हे सगळ््यांनाच माहीत आहे. त्या त्रिशंकूचेच आधुनिक अवतार आता विज्ञानाच्या शिडीचा वापर करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

      April 2, 2006