वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दरवर्षी वाढणारे दहिहंडीचे थर, गोविंदांची सुरक्षा, त्यांचे किमान वय, वेगवेगळ्या थरावरून पडून विकलांग झालेले शरीरी किंवा एखादा शरीराचा भाग, मृत्यू आणि कुटुंबावर आलेले आर्थिक आणि मानसिक संकट व त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड, आर्थिक ओढाताण अशा अनेक मुद्द्यावर सध्या समाजात चर्चा सुरू आहे.
August 12, 2014
आपल्या देशात काय चालले आहे? टुंडा अथवा यासिन भटकळ यांना झालेली अटक, त्यांनी दिलेल्या कबुल्या, त्यातून पाकिस्तानविरुद्ध पुरावे हे सारे प्रसार माध्यमांचा टिआरपी वाढवण्यासाठी ठीक आहे, पण दहशतवादाचा कर्करोग त्यातून संपणार नाही. दहशतवादविरोधी लढाई लांब पल्ल्याचे युद्ध आहे. यासिन भटकळ आणि ‘टुंडा’ यांना अटक हे सुरक्षा यंत्रणेचे यश नक्कीच प्रशंसनीय आहे.
September 14, 2013

इजिप्त हा देश पुरातन संस्कृतीच्या निदर्शक असणाऱ्या, विविध रचनांबद्दल प्रसिद्ध आहे. या रचनांतील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अर्थातच पिरॅमिड. परंतु पिरॅमिडबरोबरच तिथली जी आणखी एक लक्षवेधी रचना सुप्रसिद्ध आहे, ती म्हणजे गिझाचा ‘ग्रेट स्फिंक्स’. गिझाच्या सुप्रसिद्ध ‘ग्रेट पिरॅमिड’च्या जवळच, दक्षिण दिशेला वसलेला हा स्फिंक्स म्हणजे एक भव्य अश्मशिल्प आहे.
November 22, 2023
१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास, प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख…
January 26, 2024
आता सर्वसामान्य माणसाचा आर्थिकस्तर उंचावल्याने आणि नोकरदारांची अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवास पर्यटनासाठी आर्थिक सवलती देत असल्याने लोकांचा विविध प्रकारच्या पर्यटनाकडे ओढा वाढलाय. गतिमान, यांत्रिक जीवनात आपली बॅटरी चार्ज होण्यासाठी लोकांनाही एक सुखद बदल म्हणून प्रवासाला जाण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे चार सहा दिवस वेगळ्या वातावरणातील पर्यटनाला जाण्यासाठी त्यांचा मनोदय असतो.
May 18, 2023
उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात.
December 29, 2017
S5 0014+81 हे मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर आहे. हे मानवाला २०२१ ला सापडले . याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ४० अब्जपट असून (वर्षाला ४००० सूर्यांच्या वस्तुमानाइतका पदार्थ गिळतं हे कृष्ण विवर) हे कृष्णविवर सातत्याने पदार्थ गिळंकृत करत असल्याने या कृष्णविवराभोवती अत्यंत तेजःपुंज अशी तबकडी तयार झाली आहे ,असे संशोधनाद्वारे दिसून येते . हे तेज आपल्या सूर्याच्या तेजाच्या ३०० पद्मपट (१ पद्म = १००० अब्ज) अधिक आहे किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांचं तेज एकत्रित पकडलं, तर त्या तेजाच्या २५००० पट अधिक तेजःपुंज आहे या कृष्णविवराची तबकडी.
August 5, 2022
ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे.
December 5, 2019
सध्या सर्वत्र सोशल मेडियाचा धुमाकुळ आहे. त्यातल्या त्यात व्हॉटस एप चा बोलबाला आहे.
सोशल मेडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे, म्हणतात सोशल मेडियामुळे जग जवळ आले आहे. हे काही अंशी खरे ही आहे, मात्र चांगल्या फायेदेशीर बाबींचा गैरवापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सएप आहे.
* या व्हॉट्सएप मुळे लोकांची क्रय शक्ती कमी झाली.
* काम-व्यवसाय सोडून सर्व जण दिवसातील आपला बहूमोल वेळ व्हॉटसएप चाटींग मध्ये खर्ची घालतात.
* लोकांना व्हॉट्सएप चे व्यसन लागले आहे.
* तंबाखू - दारू पेक्षाही हे व्हॉट्सएप चे व्यसन जास्त घातक आहे.
* या व्हॉट्सएप मुळे मनाची बेचैनी वाढली आहे.
* या व्हॉट्सएप मुळे अस्वस्थपणा वाढला आहे.
* एक - दोन तास जरी व्हॉटस एप सुरु नसेल तर मनाची घालमेल व्हायला सुरुवात होते.
* जेवणाच्या ताटावर - शौचालयाच्या कमोड वर - गाडी चालविताना - एका हातात अभ्यासाचे पुस्तक दुसरया हातात व्हॉटसएप वापरणारे महाभाग आपणास सर्वत्र दिसतील.
* कुठेही जा, कोणत्याही दुकानात-ऑफिसमध्ये जा लोक या व्हॉट्सएप वरच दिसतील.
* चार - चौघे एकत्र बसून गप्पा मारण्याचे दिवस दुर्मीळ झाले आहेत, चार- चौघे एकत्र असतील तर चौघांच्या ही हातात व्हॉट्सएप दिसेल.
* त्या व्हॉटसएप मुळे अतिरिक्त काम करायला कंटाळा यायला लागला आहे, जागेवरून उठणे नकोसे वाटायला लागले आहे.
* रात्री उठून सुध्दा बेचैनीमुळे लोक व्हॉट्सएप चेक करतात.
* हा व्हॉट्सएप म्हणजे प्रत्येक आई-बापाच्या जीवाला ताप झाला आहे, मुलं-मुली अभ्यास न करता तासन् तास लपून छपून व्हॉट्सएप वर चाट करत असतात.
* या व्हॉटसएप वर सर्व जातीचे- धर्माचे वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहेत, त्या ग्रुप मध्ये जातीयता-कट्टरता वाढविण्याचे छुपे संदेश दिले जातात. अश्लिल चाटिंग चे, होदौस, भडास सारखे ग्रुप तयार झाले आहेत.
* आजीबाईच्या बटव्यासारख्या विविध ग्रुप वर गुळ खा मधुमेह कमी होते असे मेसेज फिरतात. तेथे सर्वजण डॉक्टर झालेले असतात, माझ्या मुलाला खुप जुलाब होत आहेत काय उपाय करु असे प्रश्न असतात.
* रिकाम्या व हौसी लोकांनी विविध ग्रुप बनवून त्यात लोकांना अडकवून ठेवण्याचे काम सुरु आहे.
* परिस्थिती अशी झाली की एका ग्रुप मधून बाहेर पडा - लगेच कोणी तरी दुसरया गूप मध्ये एड करते. समाजात ज्याचे नाव आहे, ज्यांच्या भरपूर ओळखी आहेत, ज्यांचा मोबाईल नंबर सर्वत्र गेला आहे, त्यांना तर व्हॉटसएप चा काहीही फायदा होत नाही, तासाला हजारच्या वर मेसेज येतात. शक्य आहे का हे मेसेज वाचणे ??
* सतत व्हॉट्सएप वापरल्यामुले मेंदू मध्ये बधीरता यायला लागली आहे.
* सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे मेंदूंमध्ये मुंग्या येत आहेत की काय असे जाणवायला लागले आहे. डोके गरगरल्या प्रमाणे वाटणे-डोके जड वाटणे असे व्हायला लागले आहे.
* झोप कमी व्ह्यायला लागली आहे.
* सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे डोळ्यांना अपरिमित हानी होत आहे, डोळ्यामध्ये आग होणे, डोळे जळजळ करणे, डोळ्यांना कमी दिसने असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत.
सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे कित्येकांमध्ये एकाकीपणा यायला लागला आहे.
*वरील सर्व मुद्दे सत्य आहेत-यात कोठेही अतिशयोक्ति नाही, मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझे कडे मागील ४-५ महिन्यात आलेल्या शेकडो रुग्णांना चौकशी करुन ही सर्व माहीती संकलित केली आहे, तुम्ही स्वता व्हॉटस एप वापरत असाल तर व्हॉतसएप पासून दुर रहा, व्हॉट्सएप चा एक टक्का फायदा आहे तर ९९ टक्के नुकसान आहे*
-- डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
लातूर (महाराष्ट्र)
मो. ०९३२६५११६८१
माहीती आवडली असेल तर लेखकांचे नाव न कापता ती इतरांना पाठवून त्यांना व्हॉटसएपच्या भयंकर दुष्परीणामाची माहीती द्या
October 22, 2017
सरकार, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता घासून घासून गुळगुळीत झाला आहे. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवून लाचखोरी करणाऱ्यावर वचक बसावा यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, विविध कायदे आणि नियम आणल्या गेले. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हा मुदा जनआंदोलनातून बहुतांश राजकीय पक्षांच्या मॅनिफेस्टो मध्ये आला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने काहींना ‘महात्मा’ बनविले, तर काहींसाठी सत्तेच्या राजकारणाची दारे उघडी केली. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी निवडणुका जिंकल्या. मात्र, प्रशासन भ्रष्टाचारमुक्त असावे, ही जनसामन्यांची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.
December 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti