वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.
५१ वर्षापूर्वी २५ एप्रिल १९७० रोजी गीतांजली पिक्चर्सचा खामोशी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते.
राजकीय पक्षांनीच आपले उमेदवार निवडताना त्याचा त्या मतदारसंघाचा अभ्यास, त्याचा जनसंफ, मतदारसंघातील प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाण आणि विकासाबद्दलची त्याची तळमळ या गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी द्यायला हवी. सगळ्याच राजकीय पक्षांनी हे पथ्य पाळले तर निवडून येणारा उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघाचा योग्य प्रतिनिधी ठरेल; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये सुरू असलेले युत्या-आघाड्यांचे राजकारण आता जवळपास शेवटाला गेले आहे.
भगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
उन्हाची काहिली सुरु झाली,
वसंताची चाहूल पक्षांना लागली !
झाडं पालवीने हिरवीगार झाली,
रंगीबेरंगी फुलाने बहरली !
वसंतात तू सुंदर गातोस,
गाणे ऐकून कावळा लाजतो !
हाकुठला गायक, म्हणतो कावळा
नओळखण्याइतपत मी काय बावळा !
इंग्रज देश सोडून गेले,
तुझी आठवण नाही विसरले !
कवी वुड्सवर्थ आणि किपलिंगनी
प्रेमाने तुझ्यावर काव्ये लिहिली !
तू कुहूकुहूने आसमंत भरतोस,
माझी प्रेमाने विनवणी करतोस !
मीही तेवढीच महा बेरकी,
ऐकून न ऐकल्यासारखे करी !
कुहूकुहूने माझी फसगत होते,
अशीच मोबाईलची रिंगटोन वाजते !
वाटते काहीतरी रोमँटिक कर,
मला फेसबुकवरून प्रपोज कर !
न लागे तुझी गोड कुहूकुहू,
आंबे पिकती रसायनाने हळूहळू !
आता कळलेना तुला सगळे,
आताशा आंब्याला मोहर येतनाही कुहूकुहूने !
मी वेडी मंजुळ कुहूकुहूची वाट बघते,
तुझ्यावर जीव आवळून टाकते !
जगदीश पटवर्धन
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥
आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात,
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात.
ब्रह्माण्डभाण्डोदरी- या संपूर्ण ब्रह्मांडांचा पसारा जिच्या उदरात राहतो, अर्थात जिच्या उदरातून जन्माला येतो त्या विश्वजननीला ब्रह्माण्डभाण्डोदरी असे म्हणतात.
लीलानाटकसूत्रभेदनकरी- या संपूर्ण जगाच्या संचालनासाठी जसा एखादा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा आपल्या हातातील दोऱ्यांचा वेगवेगळ्या उपयोग करतो. हालचाली करतो. भेद म्हणजे बदल करतो. त्यानुसार खालील बाहुल्यांना आपल्या तालावर नाचवतो. त्याप्रमाणे विश्वाचे संचालन करणारी.
विज्ञानदीपाङ्कुरी- विज्ञान अर्थात विशेष ज्ञान. ब्रह्मज्ञान. त्याचा दीपाचा अंकुर असणारी. अर्थात जिच्या आधारावरच ब्रह्मज्ञान उजळते अशी. समाधीदायक कुंडलिनी शक्ती स्वरूपिणी.
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी- भगवान श्री विश्वनाथांच्या मनाला अत्यंत आनंद प्रदान करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती, ज्ञान,वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥
आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत.
अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी असे दोन सामान्य अर्थ होतील. पण एकत्रित पाहिले तरच वेगळा अर्थ कळू शकतो.
अन्न हा मानवी जीवनाचा आधार. त्यालाही ब्रह्म म्हटले. पण ते सामान्य अन्ना बाबत. ते अन्न चार-पाच दिवसावर टिकत नाही. सदैव टिकणारे ते खरे अन्न. ते तोंडाने घेता येत नाही. ते श्री गुरुमुखातून कर्णात पाझरते. त्या शास्त्रज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला शाश्वत अन्न म्हणतात. ते प्रदान करणारी जी तिला साद आहे, "अन्नपूर्णे सदापूर्णे. "
शङ्करप्राणवल्लभे- ती भगवान शंकरांची प्रिया आहे. ते शंकर आहेत तर ही शांकरी. कल्याणकारिणी.
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं- ना देवी अन्नपूर्णा सामान्य आहे ना तिला मागितलेले अन्न. मागणी ज्ञानवैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. त्याच भिक्षेची मागणी आहे. कोणाला? तर पार्वतीला. आत्तापर्यंत अन्नपूर्णा म्हणत होते. आताच पार्वती का? तर त्या शब्दातच खेळ आहे.
कधी काळी जी सती होती ती शंकरांना सोडून दक्षयज्ञात गेली. शेवटी जळाली. नष्ट झाली. का? तर शंकरांना सोडून गेली. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिली नाही. मग नष्ट झाली.
दुसऱ्या जन्मात पार्वती झाली. पर्वत कन्या. अचला, अविचला झाली.
माझी वृत्ती ईशचरणी अशीच अविचल राहो हीच भिक्षा मागायची आहे. त्या सदैव आनंददायी, ज्ञानवैराग्य सिद्धिदायिनी भिक्षेसाठी पार्वतीला मागणे...
भिक्षां देहि च पार्वति !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे.

गेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते.
विहीर, ओहोळ, नदी, झरे ही पाण्याची महत्त्वाची उगमस्थाने होत. या प्रत्येक उगमस्थानातील पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. कठीण, मृदू, खनिजयुक्त पाणी हे पाण्याचे काही रासायनिक गुणधर्म आहेत. पाण्यात साबणाला कमी फेस नाही तर ‘कठीण पाणी’ आणि भरपूर फेस आला तर ‘मृदू पाणी’ होय.
Copyright © 2025 | Marathisrushti