(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फॅक्स मशीन

    आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले.

      August 20, 2023


  • पार्ले टिळक विद्यालयाची १०० वर्षे

    ‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

      July 12, 2021


  • पुरुष – प्रकृती

    सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो.

      December 21, 2021


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – अंबाडी

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – अंबाडी

    ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात.हि भाजी चवीला आंबट असते काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात.

    हि भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते.

    हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो.

    चलातर मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?

    १)डोक्यात खवडे झाल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस डोक्यावर लावून २ तास ठेवावा व मग केस धुवावे.

    २)हातापायांना आग होऊन जळजळ होत असेल तर अंबाडीच्या पाल्यात मीठ टाकून त्या पाण्याने वाफ द्यावी व गरम पाला हातापायांना बांधावे.

    ३)तेलकट पदार्थाचे अजीर्ण झाले असल्यास अंबाडीची भाजी व तांदूळ एकत्र शिजवून केलेला भात खावा.

    ४)मार लागून सूज आल्यास अंबाडीच्या पानांचा पोटास रूईच्या पानात गुंडाळून बांधावे.

    ५)वारंवार उल्ट्या होत असल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस ४ चमचे +खडीसाखर १ चमचा+१/४ चमचा वेलचीपूड हे मिश्रण दर १/२ तासाने चाटायला द्यावे.

    अंबाडीची भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास एॅसीडीटी होते व पित्ताचे विकार होतात.

    (कृपया हा फोटो चुकिचा असल्यास कळवावे व ख-या भाजीचा फोटो माझ्या पर्सनल अकाऊंट वर पाठवावा हि वाचकांना नम्र विनंती आहे )
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 25, 2016


  • करंटेपणाची कमाल!

    प्रकाशन दिनांक :- 09/01/2005

    सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुनामी लाटांनी दक्षिण आशियाई देशांना हादरविले. प्रचंड प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली. सगळ्याच प्रसारमाध्यमात केवळ सुनामीच्या विध्वंसाचीच चर्चा होती.

      January 9, 2005


  • थ्री जी तंत्रज्ञान

    सेलफोन म्हणजे मोबाईलमध्ये तंत्रज्ञानाची जी स्थित्यंतरे आली त्यात थ्री-जी तंत्रज्ञान हे एक आहे. थ्री-जी याचा अर्थ थर्ड जनरेशन असा आहे. थोडक्यात मोबाईल ज्याच्या आधारे चालतो त्या तंत्रज्ञानाची तिसरी आवृत्ती सध्या भारतात वापरली जात आहे.

      September 10, 2023


  • संकटकाळात नेतृत्वाची कसोटी !

    संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य  होईल. कृतीसाठी सामुहिक  स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो.

      May 28, 2021


  • “हॅण्ड व्हिडिओ गेम्स”

    १९९३-९४ च्या सुमारास भारतात डिजिटल क्रांती वाढू लागली घराघरात “इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे पेव फुटू लागले. खेळणी देखील याला अपवाद नव्हती. अर्थात चावी फिरवून डोलणार्‍या बाहुल्या, बाहुले, रॉबट्स तर एव्हाना खूप जुने झालेले, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुद्धा अॅनिमेशन बर्‍यापैकी रुळलेली, त्यामुळे कार्टुन्सचा आनंद ही तेव्हांच्या लहानग्यांना घेता येत असे.

      September 7, 2013


  • रेल्वेतील बदलत गेलेल्या सोयी-सुविधा

    स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व वर्गांच्या डब्यांमध्ये सोयी-सुविधा वाढीस लागल्या. तृतीय श्रेणी शयनयान ही त्यातली मोठी झेप होती.

      April 28, 2023


  • कोरडा खोकला

    कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.

    कारणे

    श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.

    लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो.
    कर्करोगासाठी घशाची 'आतून' आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा लागतो. उपचाराने कोरडा खोकला 10-15 दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे पाठवावे.

    उपचार

    कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.

    आयुर्वेद

    अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.

    आयुर्वेदिक घरघुती उपचार

    फुफ्फुसाशी निगडीत दमा, खोकला, अॅलर्जी, सायनस, आदींना दूर ठेवण्यासाठी काही दैनंदिन वापरात येणाऱ्या आयुर्वेदिक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. काही पदार्थ आपल्या घरातच असतात.पण आपल्याला त्यांचा वापर कसा करावा, हे माहित नसते.

    • आले – आले – सुंठ हे फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले असते. सुंठ उगाळून खडीसाखर घालून आणि शिजवून तयार केलेले चाटणाचे पाक खोकला असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास बरे वाटते. वारंवार सर्दी होणाऱ्यांना आणि दमा असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर केल्यास फुफ्फुसासाठी चांगले असते.

    • ज्येष्ठमध - ज्येष्ठमध फुफ्फुसासाठी उत्कृष्ट औषध आहे. ज्येष्ठमधाचा काढा घेतल्याने खोकला बरा होतो.

    • तुळस – तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीती भरलेला कफ सुटण्यास मदत होते.तुळशीची पाने चावून खाल्ल्यास श्वसनाचे आरोग्य सुधारते.

    • लवंग – लवंग चघळण्याने दम लागत नाही. लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते.

    • गवती चहा – गवती चहा, ज्येष्ठमध,दालचिनी, तुळस, पुदीना यांचा काढा थोडीशी साखर घालून पिण्याने ताप, खोकला,सर्दी कमी होतो.श्वासाशी संबंधित असलेले त्रास होत नाहीत.

    • रुईची पाने – रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे, श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. दम लागत असल्यास, छातीत कफ भरला असल्यास अगोदर ताल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात आणि कफ दोष संतुलित होतो.

    • ओवा – ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो.
    अशाप्रकारे आयुर्वेदिक घरघुती उपचार केल्यास आजर किंवा व्याधीदूर होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

    -- विनीत मासावकर यांनी लिहिलेली ही पोस्ट आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन घेतली आहे.

      January 3, 2017