वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१४ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटमधील पहिलेवहिले प्रथमश्रेणी शतक देवधरांनी काढले होते, तेही आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध. हे पहिले भारतीय कसोटी शतकही ठरले असते पण तोवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळच अस्तित्वात नसल्याने हा मान त्यांच्या नावे लागू शकला नाही. महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला तेव्हा देवधरच कर्णधार होते. सातत्याने मोठमोठ्या सांघिक धावा करणार्या महाराष्ट्र संघाने आणि नभोवाणीवरून सामन्यांची वर्णने करणार्या बॉबी तल्यारखानांनी भारतात रणजी स्पर्धा लोकप्रिय केली असे खुद्द देवधरांनीच आपल्या ‘शतकाकडे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.
January 14, 2019
योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥
आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत.
योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने या सर्व योगांचा आनंद तीच प्रदान करते. रिपुक्षयकरी- रिपू अर्थात शत्रूंचा नाश करणारी. शास्त्रात आळसालाच शरीरातील सगळ्यात मोठा शत्रू म्हटले आहे. अन्न भक्षणातून उत्साह येतो. आळस निघून जातो. पर्यायाने या महाशत्रूचा ती विनाश करते. धर्मैकनिष्ठाकरी- धर्मावर साधकाची अविचल एक निष्ठा निर्माण करणारी.
चन्द्रार्कानलभासमानलहरी- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य, अनल म्हणजे अग्नी, त्यांची भा म्हणजे तेज. त्याच्या समान जिच्या तेजो मंडळातील लहरी आहेत अशी.
त्रैलोक्यरक्षाकरी- स्वर्ग मृत्यु आणि पाताळ या तीनही लोकांचे रक्षण करणारी.
सर्वैश्वर्यकरी- साधकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणारी.
तप:फलकरी - त्यांच्या तपाचे फळ प्रदान करणारी. काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्ण! मला ज्ञान भक्ती वैराग्य रूपी भिक्षा प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
February 29, 2020
ह्यालाच बोली भाषेत गोडे काष्ठ असे म्हणतात व बाळ औषधी मध्ये देखील ह्याचा समावेश असतो.ह्याचे १-५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते.मुळ लांबट व लालसर पिवळे किंवा धुरकट असते.मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाची व धाग्यांनी युक्त गाभा असतो.मुळ व काण्डापासून शाखा प्रशाखा निघतात.पाने संयुक्त असतात व पर्णदल अंडाकार असतात.पर्ण दलाच्या ४-७ जोड्या असतात.ह्याला गुलाबी किंवा वांगी रंगाची मंजिरी स्वरूपात फुले येतात.फळ सुमारे २.५ सेंमी लांब व चपट्या शेंगांच्या स्वरूपात असतात.प्रत्येक शेंगेत २-३ वृक्काकार बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग मुळ आहे.ह्याची चव गोड असून हे थंड गुणाचे व गुरू व स्निग्ध असते.ज्येष्ठमध वातपित्तनाशक व कफकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)केस गळणे व पिकण्याची तक्रार असल्यास ज्येष्ठमधाच्या काढ्याने केस धुतात.
२)पित्तामुळे होणाऱ्या उल्टीत ज्येष्ठमधाचा काढा देतात ह्याने आमाशय दाह कमी होतो.
३)दमा,खोकला ह्या ज्येष्ठमध वापर करतात कारण त्याने कफ सुटून मोकळा होण्यास मदत होते.अशा वेळी ज्येष्ठमधाचा तुकडा तोंडात ठेऊन चघळणे अथवा चुर्ण वापरणे फायदेशीर ठरते.
४)ज्येष्ठमध सिद्ध हिम अथवा ज्येष्ठमध सिद्ध दुध हे रस,रक्त व मांसगत पित्ताचे शमन करून उत्तम दाहशामक म्हणून कार्य करते.
५)ज्येष्ठमध चुर्ण मध व तुपासह घेतल्याने मांसधातुचे पोषण होते व नवीन मांसांकुर उत्पन्न होतात व जखम लवकर भरते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 28, 2017
सन २०१० छत्तीसगढ मधील बस्तर गावात ७६ जवानांची जाळून केलेली क्रूर हत्या ! ही एक सत्य घटना!! आपल्या वाचनात आलीच असेल . छत्तीसगढ मधील एका साध्या इमारतीत सी आर पी एफ चे जवान विश्रांती घेत आहेत .
December 31, 2024
विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
November 17, 2010
त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते.
November 27, 2022
शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.
हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!
चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!
१)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.
२)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.
३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.
५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 21, 2016
मोबाईलवरचा फोटो माझ्या संकटविमोचक मुलीला सेंड करुन ” पोळपाटावरचा जिन्नस झुम करुन पहा आणि कसा खायचा ते सांग ” असे कळवले. ताबडतोब तिचा फोन आला आणि आळीपाळीनी तिच्या इंन्स्ट्रक्शन घेत घेत आम्ही सिझलरला गिळंकृत केल.
June 29, 2019
व्ही. शांताराम प्रॉडक्शन निर्मित ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर मराठी सिनेरसिकांच्या मनात कायमचं घर करून बसला आहे. अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत.
September 23, 2021

तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत करता येईल, अशी खात्रीशीर भूकंपपूर्व ‘लक्षणं’ संशोधकांना सापडलेली नाहीत. त्यामुळे भूकंपाच्या पुरेसा वेळ अगोदर, भूकंपाचं भाकीत वर्तवणं अजून तरी शक्य झालेलं नाही.
August 21, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti