(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चीनबरोबर व्यापार युध्द जिंकण्यासाठी बहुआयामी उपाययोजना जरुरी

    गेल्या वीस वर्षांपासून चीनचे आपल्या बाजारपेठेवर सुरू असलेले धोरणात्मक आक्रमण थांबविण्याकरिता एखाद्या वर्षाचे प्रयत्न पुरेसे होणार नाहीत. देशभक्त नागरिकांना किमान काही वर्षे ही लढाई निर्धाराने करावी लागणार आहे. मिळणाऱ्या संकेतांप्रमाणे या लढाईत विजय निश्चित मिळू शकतो. आपल्या निर्धाराची कसोटी मात्र येणारा काळ निश्चित बघणार आहे.

      August 21, 2017


  • भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडर

    गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. इंग्रजी कॅलेंडर आपल्या हाडी-मासी इतकं खिळलं आहे की आपण गुढीपाडवा केव्हा आहे असे विचारतो. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा ही तिथी. पण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जे कॅलेंडर रोज वापरतो त्या कॅलेंडरच्या भाषेत हवं असतं. ६ एप्रिलला गुढीपाडवा आहे असं म्हटलं की आपली पेटते !

      April 1, 2019


  • विळखा दहशतवादी कारवायांचा : आय.एस.आय. वर नियंत्रण करण्याची गरज

    हिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने २,०००-२,५०० अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी नाग्रोटा येथे २६ जुलैला केला.पाकमध्ये, ३०-३५ छुप्या अतिरेकी-प्रशिक्षण-केंद्रांतून प्रशिक्षण देणे सुरूच आहे.

      August 1, 2014


  • नोटबंदीची पाच वर्ष

    २०१५-१६ ला जे काही कागदी चलन भारतात होते, त्यातील ९५ टक्के चलन हे उच्च मूल्याच्या नोटांच्या रुपात होते. (१००० च्या नोटा- ३८ टक्के, ५०० च्या नोटा- ४५ टक्के आणि १०० च्या नोटा- १० टक्के) याचा अर्थ ३० टक्के नागरिक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असताना एकूण चलनाचे ९५ टक्के मूल्य अशा तीन मोठ्या नोटांत होते. त्यामुळे पैसा फिरत नव्हता आणि त्याचे एक दुष्टचक्र तयार झाले होते.

      November 8, 2021


  • नोव्हेंबर ०२ – व्हिक्टर ट्रम्पर आणि फ्रेड बेक्वेल

    १८७७ : ब्रॅडमनपूर्व ऑस्ट्रेलियातील सर्वश्रेष्ठ फलंदाजाचा जन्म.

    १९०८ : विचित्र पवित्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेड बेक्वेलचा जन्म.

      October 29, 2010


  • नटसम्राट- नटसम्राज्ञी

    …. आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो.

      July 28, 2022


  • बॅड बॉसेस

    तुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण.

      July 31, 2024


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेहेतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

    बाबा सांगतात...

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    अष्टांग ह्दय या ग्रंथातील सूत्रस्थानातील चौथ्या अध्यायातील सर्वात शेवटच्या या श्लोकाचाच एक भाग म्हणून त्याअगोदर काही कायिक वाचिक मानसिक पथ्यापथ्ये सांगितलेली आहेत. जी "आई सांगते" या धर्तीवर आधारलेली होती.

    समाजात वावरताना कसे वागावे, याचे काही ढोबळमानाने नियम ठरवून दिले आहेत. जे आजही योग्य वाटतात. हे नियम आईच समजावून सांगू शकते. जसे ग्रंथकार म्हणतात, रस्त्याने जाताना आपल्याकडे इतरांचे लक्ष असते, तेव्हा आपले कपडे नीटनेटके असावेत. जुने, मळलेले, लालभडक रंगाचे, फाटलेले कपडे घालू नयेत.
    (वासोनधारयेत जीर्णम् मलिनं रक्तम् उल्बणम् )
    दुसऱ्याने वापरलेले कपडे आपण वापरू नयेत, केवळ कपडेच नव्हेत तर फुले, पुष्पमाला, कंठहार, दागिने, अंगठ्या, चप्पल इ.इ. वापरू नये.
    काय चुकले हो आईचे ? हे आज सांगण्याची काय आवश्यकता आहे, असे काही जणांना वाटेल.

    आज पहा काय चालले आहे, जीन्सची पॅन्ट विकत घ्यायची ती पण मळकट, कळकट, मुद्दाम फाटलेली, जेवढी मळकी तेवढी म्हणे फॅशन.

    एखाद्याचा सुरू असलेला मोबाईल काॅल जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा तो चार वेळा पुसुन घेतो, कशासाठी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून! हे आपल्याला कळते, पण ओढणी, रुमाल, नेलपेंट, साबण, इयरींग, टिकल्या इ. वस्तु आपण सहजपणे एकमेकांच्या वापरत असतो. असे करू नये. असेच ग्रंथकार देखील सांगत आहेत. ते मी फक्त आईच्या तोंडी घातले एवढेच.

    आता या मागील अध्यायामधे वर्णन केलेली काही सूत्रे पाहूया. त्यांना आपण बाबा सांगतात, या मथळ्याने अभ्यासूया.

    सुखार्थाः सर्व भूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः।
    सुखंच न विना धर्मात् तस्मात धर्मपरो भवेत् ।

    सर्व प्राण्यांचे एकंदर उद्योग सुखाकरीता चालले आहेत.आणि सुख तर धर्मावाचून नाही. म्हणून निरंतर धर्मपर असावे.

    हे असे सर्व वर्णन आयुर्वेदात सांगितलेले आहे का, असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यांच्यासाठी खास हे ससंदर्भ सदर.

    आई जे सांगत होती, ते सुद्धा सुखासाठीच होते. फक्त तिथे व्यष्टी होती. बाबा काही सुखप्राप्तीच्या गोष्टी सांगताना समष्टीचा विचार करतात. शब्द वेगळे असतील पण भाव तोच आहे. काळ बदलला, पण सुखाची व्याख्या तीच आहे.

    अनुकुल वेदनीयम् सुखम्
    प्रतिकुल वेदनीयम दुःखम्

    अशा अनुभूती ज्यांने अनुकुलता म्हणजे बरे वाटणे, असे अनुभवता येते, ते सुख.
    आणि अशा अनुभूती, ज्यांनी प्रतिकुल म्हणजे बरे वाटत नाही, अशी संवेदना निर्माण होण्याला दुःख असे म्हणतात.

    इंग्रजी भाषेत वर्णन करायचे झाल्यास फीलींग वेल इज सुख आणि नाॅट फिलींग वेल इज दुःख ! नाॅट फिलींग वेल म्हणजे रोग. आणि फिलींग वेल म्हणजे निरोग.

    म्हणजेच निरोगी असणे हेच सुख आणि रोगी अवस्था म्हणजे दुःख.

    म्हणजेच आपली धडपड निरोगी रहाण्यासाठी चाललेली आहे. आणि त्यासाठी शास्त्रकार सांगतात, धर्मपर रहा. हिंदीत सांगायचे झाल्यास, नेकीसे रहो।
    काही जणांना धर्म शब्दाचीच अॅलर्जी आहे. त्यांच्यासाठी हिंदीतील अर्थ सांगितला.

    धर्म म्हणजे विशिष्ट रंग अपेक्षित नाही. सरळ सांगायचे झाल्यास हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन बौद्ध असे न म्हणता आपले विहित कर्म करणे म्हणजे धर्म होय.

    धारणात धर्मः अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे. पण आम्ही व्याख्या आणि व्याकरण सुद्धा मानणार नाही, असे म्हणणाऱ्या मंडळींना काय म्हणावे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 22, 2017


  • II समर्थांची प्रार्थना II

    समर्थ रामदासा ,
    प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत !
    मला शक्ती दे, सामर्थ्य दे !
    मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे !

      October 28, 2022


  • स्पेशल एक्स-रे (एच.एस.जी / फिसच्युलोग्राफी)

    स्पेशल एक्स-रे (एच.एस.जी / फिसच्युलोग्राफी)

    या सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय.

      October 14, 2010