वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जीवनचक्र - संक्षिप्त मराठी सुची
१) Pre Erythrocytic Schizogony
(तांबड्या रक्त पेशीत शिरण्याच्या आधीची परोपजीवांची स्थिती)
२) Erythrocytic Schizogony and Gametogony (clinical Attack)
(तांबड्या रक्त पेशीत वाढणारे परोपजीवी (रुग्णाला ताप येताना दिसणारी स्थिती)
३) Exo Erythrocytic schizogony (Clinical Cure)
(परोपजीवी रक्तातून नाहिसे होण्याची स्थिती म्हणजेच रूग्ण तापमुक्त होण्याची स्थिती)
४) Exo Erythrocyti Schizogony and Gametogony (Relapse)
(तांबड्या रक्त पेशीतील परोपजीवी स्थिती (उलटणारा मलेरिया)
५) Infection of Mosquito
(डासाच्या शरीरात शिरणारे परोपजीवी)
६) Completion of Gametogony
(डासाच्या शरीरात पूणर्णपणे वाढलेले परोपजीवी)
७)Cycle of sporogony
(डासाच्या सोंडेतून बाहेर पडण्यास सज्ज असलेले परोपजीवी)
८) Infection of Man
(माणसाला डासाच्या चावण्यावाटे शिरणारे परोपजीवी)
मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र
सजीव कीटक, प्राणी वा माणूस यांच्या शरीरातील घटकांवर जो स्वत:ची वाढ करुन घेतो त्याला परोपजीवी अस (Parasite) म्हणतात. या त्याच्या वैशिष्ट्यामुळे तो जंतूंपासून (Bacteria) वेगळा आहे. हे परोपजीवी मनुष्य, कीटक व प्राणी यांच्या शरीराच्या आश्रयाने रहतात. या आश्रयदात्यांना (Host) असे म्हणतात.
मलेरिया परोपजीवांच्या जीवनचक्रात डास हा प्राथमिक आश्रयदाता (Primary Host) व माणूस हा दुय्यम स्थानावरील आश्रयदाता (Secondary Host) असतो. मलेरियाच्या परोपजीवांच्या जीवनचक्राचे ढोबळ स्वरूप खालीलप्रमाणे असते.
मलेरिया झालेल्या रुग्णाला जेव्हा डास चावतो, त्यावेळी डासाच्या शरीरात माणसाच्या रक्ता बरोबर मलेरियाचे परोपजीवीही शिरतात. डासाच्या शरीरात त्यांची वाढ पूर्णत्वाच्या दिशेने घडत असते. नंतर हेच डास निरोगी माणसाला चावल्यावर त्या डासांच्या लाळेतून वाढ होत असलेले परोपजीवी निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. तेथे त्यांची वाढ पूर्ण होते व मलेरियाची लक्षणे त्या निरोगी माणसात दिसू लागतात. अर्थातच आता तोच मलेरियाचा रुग्ण बनतो.
परोपजीवाच्या जीवनचक्रामध्ये क्रमाक्रमाने घडणाऱ्या स्थित्यंतराचा अभ्यास सामान्य वाचकांना कठीण व गुंतागुंतीचा वाटण्याची शक्यता आहे. तरीही जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना यातून मलेरियाच्या रोगासंबधी अधिक माहिती मिळावी असा प्रयत्न येथे केला आहे.
डास व माणूस यांच्यामधील परोपजीवांमध्ये घडून येणाऱ्या अवस्थांची नांवे खालीलप्रमाणे आहेत.
डासांमधील अवस्थांचा क्रम
१) Male and Female Gametocyte
२) Zygote
३) Oocyst
४) Sporocyst
५) Sporozoites
माणसामधील अवस्थांचा क्रम
१) Sporozoites
२) Schizont
३) Merozoites
४) Trophozoites (Ring and amoeboid forms)
५) Male and Female Gametocytes
डासांच्या शरीरात चालणारे जीवनचक्र
परोपजीवांच्या नर व मादी यांच्या संयोगामुळे घडणारे जीवनचक्र
१) परोपजीवांच्या नर व मादी या स्थितीला गॅमेटोसाईटस् म्हणतात. ही त्यांची अवस्था मलेरिया झालेल्या रुग्णाच्या रक्तात झालेली असते. अशा रुग्णाला जेव्हा डास चावतो, तेव्हा रुग्णाच्या रक्तामधून हे गॅमेटोसाईटस् व इतर सर्व अवस्थांमधील परोपजीवींचे लटांबर डासामध्ये प्रवेश करतात परंतु आता या ठिकाणी निसर्गाची किमया किती अगाध आहे हे लक्षात येईल. परोपजीवांचे जीवनचक्र चालू राहण्यासाठी फक्त गॅमेटोसाईटस (नर व मादी) यांची गरज असते, त्याच्याबरोबर आलेल्या लटांबराची नाही ही वस्तुस्थिती असल्याने ते डासांच्या शरीरात नष्ट होतात. या लटांबरामधील परोपजीवांमुळेच मलेरिया रोगाची लक्षणे (उदा. ताप येणे वगैरे) मनुष्यात दिसून येतात. डासांच्या शरीरात मात्र यांची विल्हेवाट लावल्याने डासात मलेरियाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत व ते मलेरियामुळे मरतही नाहीत. त्यांचे जिवंत राहणे परोपजीवांचे जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी आवश्यक असल्याने ती काळजी निसर्गाकडून घेतली जात असावी. आता फक्त एक किंवा दोन गॅमेटोसाईटस् Per Cubic Milimeter डासात शिरून उपयोगाचे नसते; तर रुग्णाच्या रक्तात निदान बारा गॅमेटोसाईटस असे प्रमाण असणे गरजेचे असते व त्यातही मादी गॅमेटोसाईटसची संख्या नर गॅमेटोसाईटस पेक्षा जास्त असावी लागते. तरच संयोग प्रक्रिया पूर्णत्वास जाऊ शकते. इथूनच मग जीवनचक्राचा पुढील टप्पा सुरू होतो अन्यथा हे चक्र पूर्ण थांबून जाते. हा प्रयोग वारंवार फसत नाही आणि म्हणूनच परोपजीवी डासांमध्ये वाढत असतात.
२) डासांच्या शरीरात शिरलेल्या नर व मादी गॅमेटोसाईटस्ची वाढ त्याच्या जठरात पूर्ण होते. आता नर व मादी यांचे मीलन वा संयोग आकर्षण पद्धतीने होते.
नर हा मादीकोशाच्या फुगीर भागात घुसतो व त्यातून Zygote निर्माण होतो. डासाने रूग्णाचे रक्त शोषून घेतल्यानंतर २० मिनिटे ते २० तासात ही क्रिया पुरी होते.
३) तयार झालेले Zygote वेगाने गोलाकार फिरत डासाच्या जठराच्या पोकळीतून जठराची भिंत भेदून बाहेर येतात व त्याच्या बाह्य आवरण पापुद्र्याला चिकटतात. Zygote च्या भोवती जाड कवच (cyst wall) तयार होते. त्यांचा आकार ६ ते १२u (मायक्रोन) म्हणजे एका बारीक टिंबाहूनही लहान असतो. हळूहळू त्यांचा आकार वाढत ६०॥ पर्यंत जातो व त्यात काळपट रंगाचे बारीक कण दिसू लागतात, या अवस्थेला oocyst म्हणतात. रॉसला डासांच्या विच्छेदनात हेच दिसल्याने त्याची पूर्ण खात्री झाली होती की हेच मलेरियाचे परोपजीवी असून ते डासांमधून पुन्हा माणसाच्या शरीरात शिरतात.
४) या oocyst ची वाढ होते असताना त्याच्या आतील पोकळीत विळ्याच्या आकाराचे असंख्य बारीक तंतू निर्माण होतात, ज्यांना sporozoites म्हणतात.
साधारणत: डासांच्या जठराच्या बाह्य आवरणाला २० ते ३० oocysts घट्टपणे चिकटलेले असतात. दहा दिवसात त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांना sporocysts असे म्हणतात. हे sporocysts एखाद्या ताणलेल्या फुग्यासारखे दिसू लागले की एका क्षणाला फुटतात. व त्यातून शेकडोंच्या संख्येने तयार झालेले sporozoites डासांच्या संपूर्ण शरीरभर पसरतात. या ठिकाणी अपवाद फक्त स्त्री पिंडाचा असतो. ज्यामध्ये ते शिरत नाहीत. हळूहळू हे sporozoites मार्ग शोधीत लाळग्रंथीत जमा होतात. लाळग्रंथीतील द्रावात त्यांची वाढ पूर्ण होते व तेथून लाळनलिकेत ते आपले ठाण मांडतात. मलेरिया परोपजीवी माणसात पसरविण्यासाठी लागणारी तयारी आता झालेली असते. अखेर फक्त एक चावा आपले काम फत्ते करणार असतो.
माणसाच्या शरीरात मलेरिया परोपजीवांचे जीवनचक्र कसे चालते हे समजण्यासाठी प्रथम आपल्याला त्यांच्या विविध गटांची व अवस्थांची माहिती असणे आवश्यक आहे.
मलेरियाच्या परोपजीवांना Plasmodium या नावाने ओळखले जाते. यामध्ये अनेक उपगट असून त्यांच्यामधील विविध अवस्थांच्या रचनेत फरक आढळतो, ज्यावरून ते विविध उपगटांच्या नावाने ओळखले जातात.
जगभरामध्ये माणसात मुख्य चार प्रकारच्या गटांच्या परोपजीवांमुळे मलेरिया या रोगाची लक्षणे दिसून येतात. त्यांची नांव
१) Plasmodium Vivax
२) Plasmodium Falciparum
३) Plasmodium Malaria
४) Plasmodium Ovale.
माणसांप्रमाणे उच्च श्रेणीतील एप्स माकडे, विविध तऱ्हेचे पक्षी, (कावळे, चिमण्या, बदके इत्यादी) वटवाघळे तसेच थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी उदा. साप, पाली वगैरे या सर्वांमध्ये मलेरिया परोपजीवी आढळतात व त्यांनाही मलेरिया सदृश लक्षणे दिसतात.
या सर्वांचा विचार करताना दोन मुख्य गटांचे डास मलेरिया पसरवितात असे आढळते. माणूस व माकडे यांच्यात मादी अॅनॉफेलीस तर पक्षात मादी क्युलेक्स डास जबाबदार असतात. मनुष्य व प्राणीमात्रात परोपजीवींचे जीवनचक्र साधारणपणे एकाच पद्धतीने होत असते. भारतात मुख्यत: Plasmodium Vivax व Plasmodium Falciparum हे दोनच मुख्य परोपजीवी गट आढळतात.
सबंध पुस्तकात याच दोन गटांना अनुसरून विषयाची मांडणी केली आहे.
-– डॉ. अविनाश वैद्य
October 14, 2022
ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।।
महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।1।।
ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ।।
कोटीसुरजपकाश ऐसी छब तेरी ।।
गंडस्थल-मदमस्तक झुले शशिबिहारी ।।2।।
ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।
भावभगतसे कोई शरणागत आवे ।।
संतती संपती सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।3।।
ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।
गायक - श्री.सुधीर गोरे.
गायीका - सौ. वृक्षाली घाणेकर
October 15, 2015
“श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २
May 29, 2022
13 रविवार,जानेवारी 2008
प्रशासनाने आश्वासन देऊनही आपली मागणी मान्य झाली नाही म्हणून एका महिलेने चंद्रपूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेने बरीच खळबळ माजली. त्या अधिकाऱ्याच्या कक्षात उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने समयसूचकता दाखवित वेळीच त्या महिलेला रोखल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
January 13, 2008
एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी, मेंदूला जबर धक्का बसल्याने त्याचे वाचणे कठीण असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तरीही शेवटचे प्रयत्न म्हणून सोलापूरचे डॉक्टर त्या लहानश्या जीवाला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अखेर शिवपार्थला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. खेळायच्या अगोदर ‘ सांग ना आई, मी कसा खेळतो ...!’ विचारले होते. ती धाय मोकलून रडत होती. ममता तडफडत होती. तिचा बाळ रुग्णालयाच्या खाटेवर निजला होता. मोकळं ढाकळ बोलणारा त्यांचा शिवपार्थ त्यांना सोडून गेला होता. त्यामातेची अवस्था कशी झाली असेल. विचार करा. बाप मात्र ती स्थिती बघून हबकला होता. कळवलेले डोळे मूक रडत होते. फक्त चेहर्यावर दिसत नव्हते. पण तो बाप त्याचा खोलखोल रुतत चाललेला स्वर दुर्दैवी घटनेचे मनावर प्रहार सहन करीत होता. मुलाच्या सुंदर आठवणींनी मन सैरावैरा धावू लागले होते.
काय केले रे देवा..! म्हणून समस्त नातेवाईक देखील अश्रू ढाळू लागले होते. रुग्णालय गर्दीने भरले होते. कटू वास्तव्याचे हलाहल पूर्णत: पचविले अन दु;खित अ:तकरणाने बाप जागेवरून उठला आणि रडत असलेल्या बाळाच्या आईला म्हणाला. शिवपार्थच्या आठवणी जपायच्या असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्याने आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय बोलून दाखवला. आईने देखील होकार दर्शविला. डॉक्टरांना निर्णय सांगितला गेला. सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले. शिवपार्थचे चार अवयव .... हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड काढण्यात आली. हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर आणि नोबेल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका इंजिनिअरींग शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आले. जो दोन वर्षापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसीस वर जीवन कंठत होता.
एक जीव गेल्याचे दु:ख नक्कीच पण त्या जीवामुळे चार जीवांना जीवनदान मिळाले ते केवळ शिवपार्थच्या आई वडिलांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे. डॉक्टरांची तत्परता दाखविलीच शिवाय अनेक हात या निर्णयासाठी मदतीला पुढे आले. ते पोलीस असो वा समस्त सोलापुरी माणसं. त्यांना सलाम करायला हात उत्सुक आहेत. एक विचारसरणी बदलणारी ही घटना. त्या मायबापावर अकस्मात ओढवलेल्या संकटाने व्यथित होऊनही अन्य चार जणांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा खरा आकार दिला.
दान ही आपली संस्कृती तर भोग ही प्रकृती. श्रध्देने दिलेले दान किंवा ऐपतीनुसार केलेलं दान. अनेकजण देहाची विटंबना नको म्हणून माघारी परतले असते. असो ... शंभरात एक शूर जन्माला येतो. तर सहस्त्रामध्ये एक ज्ञानी असतो. तर दशसहस्त्रामध्ये एक वक्ता निर्माण होतो. पण शिवपार्थच्या वडिलांसारखा दाता हा क्वचितच लाभतो. दानी म्हटले की, त्या पुरुषाचे हात वर असतात तर याचक याचे हात नेहमीच खाली असतात.
देशात आजच्या घडीला लाखो हृदयरोगी आहेत. पण हृदयदाते प्रमाण अल्प आहे. तर दीड ते दोन लाख मूत्रपिंडाचे रुग्ण आहेत पण केवळ 5000 शस्त्रक्रिया झाल्याचं निदर्शनास आले आहे. यकृतरोगींचा आकडा 30000 असताना केवळ 1000 यकृत रोग्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले आहे. गरजे इतके दाते आज तरी मिळत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्यावर शस्त्रक्रिया होत नाहीत ते कसेबसे आयुष्य जगत आहेत. वेळ आली की, जगाचा निरोप घेत आहेत. शिवपार्थच्या बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस नाही. पण त्यांनी दाखविलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. शिवपार्थच्या देहाचे त्यांनी खरोखर सार्थक केले. त्यासाठी मनापासून त्यांना सलाम करावासा वाटत आहे.
अशोक भेके
घोडपदेव समूह
April 20, 2017
काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्यांसचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात. साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत. महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात.
रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात.
एका बादलीत पाणी घेऊन त्या पाण्यात पेपरमींट ऑईल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टस्चा सुद्धा वापर होऊ शकतो. अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल.
रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.
अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते.
उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.
भरपूर पाणी प्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 12, 2017
मराठी चित्रपटनिर्मितीचा वेग वाढत असतानाच आवश्यक त्या प्रमाणात चित्रपटगृहे उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली जाते.
मुख्यतः मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट ‘प्राईम टाईम’मध्ये प्रदर्शित केले जावेत अशी निर्मात्यांची अपेक्षा असते. मात्र, याबाबत
मल्टीप्लेक्सचालक सहकार्य करत नाहीत, असा सर्वसाधारण सूर आहे. या परिस्थितीत मल्टीप्लेक्सचालक आणि निर्माते या दोघांचेही आत्मपरिक्षण गरजेचे ठरते.
September 10, 2010
सरकार केंद्रातले असो की राज्यातले घोषणा करून लोकांना लॉलीपॉप देण्याचे निव्वळ नाटक करीत असते.
September 5, 2010
आत्मविस्मृत दक्ष प्रजापतींना आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेल्या या पुराणात एकूण नऊ खंड आहेत. आपल्याच आठ विद्यमान विकारांना आपल्याच आत विद्यमान विनायकांनी नियंत्रित करण्याची साधना आहे श्रीमुद्गलपुराण.
September 5, 2019
१९४० च्या दशकापर्यंत घरगुती स्वरूपाची, नवरा-बायको मिळून चालवणारी किरकोळ किराणामालाची दुकाने ठायी ठायी असायची. या दशकाच्या उत्तरार्धात खाद्य संस्कृतीच्या किरकोळ विक्रीच्या अंगाचे खर्या अर्थाने व्यापारीकरण सुरू झाले. निरनिराळ्या सुपर मार्केट्सच्या शाखा, मोठ्या आणि मध्यम वस्तीच्या शहरा-गावांमधे उघडू लागल्या. १९७० सालापर्यंत अनेक छोट्या स्थानिक सुपर मार्केट्सचं एकत्रीकरण होऊन त्यांच्या मोठमोठ्या देशव्यापी साखळ्या झाल्या होत्या.
ही प्रक्रिया ९० च्या दशकाच्या सुरवातीच्या काही वर्षांपर्यंत अनिर्बंध चालू होती. वॉलमार्टने तोपर्यंत किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामधे आपले अढळ स्थान निर्माण केले होतेच. आपल्या प्रचंड मोठ्या पसार्याचा अचूकपणे फायदा उठवीत, अल्पावधितच वॉलमार्टने ‘अमेरिकेतील सर्वात मोठे किरकोळ अन्नाचे विक्रेते’, हा किताब आरामात पटकावला. याला प्रत्युत्तर म्हणून, इतर मोठमोठ्या देशव्यापी सुपरमार्केटच्या साखळ्यांनी, छोट्या छोट्या स्थानिक साखळ्यांना विकत घेऊन किंवा इतर मोठ्या साखळ्यांशी हातमिळवणी करून, स्वत:चा मार्केटमधला हिस्सा वाटण्याचा सपाटा लावला. याचा परिणाम म्हणजे आज अमेरिकेतले निम्म्याहून अधिक खाद्यपदार्थांचे नियंत्रण फक्त सहा अवाढव्य साखळ्या करत आहेत.
अशाच स्वरूपाची प्रक्रिया “घरापासून दूर” (away from home) या खाद्य संकल्पनेच्या क्षेत्रात झाली. आता ठायी ठायी दिसणार्या मॅकडोनल्डच्या सोनेरी कमानींचा, १९५० च्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षांमधे प्रसार वाढू लागला. हळू हळू त्यांनी स्थानिक रेस्टॉरंट्सचा व्यवसाय काबीज करायला सुरुवात केली. पिझ्झा हट आणि कॆंटकी फ्राईड चिकन (KFC) सारख्या प्रतिस्पर्ध्यांनी फारसा वेळ न गमावता, मॅकडोनल्डच्या पावलावर पाऊल ठेवून ठिकठिकाणी आपले झेंडे रोवायला सुरुवात केली. या प्रकारच्या रेस्टॉरंट्सचे पेव फुटायला हातभार लावला तो गृहिणींनी ! त्यासुमारास ‘चूल आणि मूल’ हे आपलं परंपरागत कार्यक्षेत्र सोडून, महिला मोठ्या प्रमाणात कामानिमित्त घराबाहेर पडायला लागल्या होत्या. घराबाहेर पडून विविध कार्यक्षेत्रांची वाट चोखाळू पहाणार्या आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू पहाणार्या या महिला वर्गाने या नवीन प्रकारच्या रेस्टॉरंट्सना मोठाच आश्रय दिला. आज अमेरिकेत अन्नावर खर्च होणार्या एकूण डॉलर रकमेपैकी निम्मी रक्कम ही अशा ‘घरापासून दूर’ खाल्लेल्या अन्नावर खर्च होते. त्यातही विशेष म्हणजे या ‘घरापासून दूर’ अन्नावर खर्च केलेल्या रकमेपैकी, अर्धीअधिक रक्कम ही फास्ट फूडवर खर्च होते. ‘घरापासून दूर’ या अन्न संकल्पनेच्या क्षेत्रात देखील काही मोजक्याच मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी दिसून येते. उदाहरणार्थ Yum! Brands Inc ही कंपनी, पिझ्झा हट , KFC, टाको बेल, लॉंग जॉन सिल्व्हर्स आणि A & W रेस्टॉरंट अशा पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सच्या साखळ्या नियंत्रित करते. अशाप्रकारे शेकडो, हजारो रेस्टॉरंटसवर नियंत्रण ठेवणार्या कंपन्या किती प्रभावशाली असतील याची कल्पनाच केलेली बरी!
-- डॉ. संजीव चौबळ
December 9, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti