वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काल रात्रीच भूपेंद्र सिंग यांच्या जाण्याची बातमी वाचली. इतकं आगंतुक आणि न सांगता -सवरता जाणं वाटलं की खूप वेळ मी अस्वस्थ होतो. नुक्तीच त्यांच्या आणि सुवर्णा माटेगावकरांच्या “बिती ना बिताई ” वर मी पोस्ट लिहिली होती.
July 20, 2022
चौथ्या डावात ५३६ धावा काढून गेल्या वर्षी पश्चिम विभागाने जिंकलेला दुलीप चषकाचा अंतिम सामना. युसूफ पठाण नाबाद २१०.
February 6, 2011
पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.
March 12, 2012
अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!
पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
भोगिसी त्या सकळा !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
सदानंदाचा येळकोट !!!
येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!
-- चिंतामणी कारखानीस
February 18, 2016
ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात.हि भाजी चवीला आंबट असते काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात.
हि भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो.
चलातर मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)डोक्यात खवडे झाल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस डोक्यावर लावून २ तास ठेवावा व मग केस धुवावे.
२)हातापायांना आग होऊन जळजळ होत असेल तर अंबाडीच्या पाल्यात मीठ टाकून त्या पाण्याने वाफ द्यावी व गरम पाला हातापायांना बांधावे.
३)तेलकट पदार्थाचे अजीर्ण झाले असल्यास अंबाडीची भाजी व तांदूळ एकत्र शिजवून केलेला भात खावा.
४)मार लागून सूज आल्यास अंबाडीच्या पानांचा पोटास रूईच्या पानात गुंडाळून बांधावे.
५)वारंवार उल्ट्या होत असल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस ४ चमचे +खडीसाखर १ चमचा+१/४ चमचा वेलचीपूड हे मिश्रण दर १/२ तासाने चाटायला द्यावे.
अंबाडीची भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास एॅसीडीटी होते व पित्ताचे विकार होतात.
(कृपया हा फोटो चुकिचा असल्यास कळवावे व ख-या भाजीचा फोटो माझ्या पर्सनल अकाऊंट वर पाठवावा हि वाचकांना नम्र विनंती आहे )
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 25, 2016
सर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश’ या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती.
May 24, 2024
जग एकविसाव्या शतकात दाखल झाले आहे, असे आपण अभिमानाने म्हणत असतो. या अभिमानाच्या मागे असते मानवाने वैज्ञानिक, तांत्रिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे पाठबळ. गेल्या शे-दीडशे वर्षात मानवाने शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीची शिखरे अतिशय झपाट्याने सर कलीत, यात काहीच शंका नाही.
February 8, 2004
भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाला जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज वंदन करीत आहेत.
August 14, 2020
स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं
मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् |
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं
पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖
भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात.
आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत नाही. जिथे अन्य सर्व शक्तींचा लय होतो असे सिंहासन. परमसत्ता.
मनोहारि- अत्यंत आकर्षक अशा, सर्वांगरत्नोरुभूषम् - उरु म्हणजे विपुल, प्रचुर, श्रेष्ठ, मूल्यवान. तशा रत्नांनी बनविलेली आभूषणे ती रत्नोरुभूष. भगवंतांनी सर्व अंगावर अशी आभूषणे धारण केली आहेत.
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं- या शब्दामध्ये जटा,अहि,इंदु, गंगा, अस्थि, शम्याक आणि मौली अशा शब्दांचे एकत्रीकरण आहे.
जटा म्हणजे तुमच्या वर बांधलेले केस. अहि म्हणजे सर्प. इंदू म्हणजे चंद्र.गंगा. अस्थि म्हणजे नरमुंडक्यांची माला. शम्याक म्हणजे बहाव्याच्या फुलांची माळ. या सगळ्या गोष्टी मौली म्हणजे मस्तकावर, गळ्यात धारण केल्या आहेत असे. यातील गंगा, चंद्र, सर्प या थंड वस्तू , समुद्रमंथनातून निघालेले हालाहल प्राशन केल्याने होणारा भयानक दाह शमविण्यासाठी भगवान धारण करतात.
पराशक्तिमित्रं - पराशक्ती जगदंबेचे स्नेहपात्र. तिच्या सोबत सर्व वेदांतरहस्य उलगडून दाखविणारे.
नमः पंचवक्त्रम् - अशा पंचमुखधारी भगवान श्रीशंकरांना नमस्कार असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 12, 2020
2015 मध्ये तो सर्वात जास्त एकदवसीय सामन्यात धावा काढणारा खेळाडू होता त्याने एकूण त्या वर्षी 1,489 धावा काढल्या त्या 32 सामन्यात त्यामध्ये त्याने 4 शतके आणि 8 अर्धशतके काढली.
September 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti