(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नरसोबावाडीला श्रीगुरुंचे वरप्रदान

    श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज राजाधिराज असल्याने त्याचे आगमन व काही काळ वास्तव्य येथे होणार या कल्पनेनेच इ.स. १०३४ मध्ये प.प. श्रीरामचंद्र योगी हे या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करण्याआधी ४०० वर्षे येऊन वास्तव्य करु लागले. ज्यांच्या आगमनाच्या वार्तेनेच भूमी शेकडो वर्षे पावन झाली आहे.

      August 24, 2023


  • निरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती

    मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे.

      November 18, 2019


  • गांव, मौजे, खुर्द, बुद्रुक इत्यादी इत्यादी..

    गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली..

      July 30, 2016


  • डिसेंबर २९ : किरी ऊर्फ सय्यद किरमानी

    तुळतुळीत टक्कल आणि दोन पुनरागमनांसाठी प्रसिद्ध असलेला सय्यद किरमानी.

      December 28, 2010


  • अमेरिकेतील धार्मिकता – भाग ५

    इंग्लंड आणि इतर उत्तर युरोपियन देशांतले लोक, अमेरिकेच्या पूर्व / ईशान्य किनारपट्टीवर (न्यू इंग्लंड) वसाहती स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना, सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, स्पॅनिश मुसाफिरांनी (explorers) अमेरिकेचा बहुतांश दक्षिण आणि नैऋत्य भाग धुंडाळून काढला होता. सोन्या चांदीच्या लालसेने काढलेल्या या मोहीमा हात हलवत परत फिरल्या होत्या. या धाडसी मुसाफिरांनंतर, काही काळातच, स्पॅनिश कॅथलिक मिशनरी अमेरिकेतल्या दक्षिण भागात पोहोचू लागले. अमेरिकेतल्या रेड इंडीयन लोकांच्या टोळ्यांना आपल्या ख्रिश्चन धर्मात ओढण्याचा चंग बांधून, हातात बायबल आणि ओठांवर येशुचा संदेश घेऊन, हे मिशनरी येऊ लागले. अमेरिकेत येऊन त्यांनी आपले मठ (missions) बांधायला सुरुवात केली. त्याकाळी जमिनीवरचा बहुतेक प्रवास पायी चालतच होत असल्यामुळे, साधारणपणे एका दिवसात कापता येईल एवढ्या अंतरावर त्यांनी हे मठ बांधायला सुरुवात केली. सध्या जो भाग फ्लोरिडा म्हणून ओळखला जातो, त्या प्रदेशात सुरू झालेली ही मठांची मालिका, पश्चिमेकडे सरकत सरकत, सध्याच्या टेक्सास, अ‍ॅरीझोना, न्यू मेक्सिको राज्यांपर्यंत पसरली. सन १७६९ मधे, कॅलिफोर्नियामधला पहिला स्पॅनिश कॅथलिक मठ सुरू झाला. त्या मठाच्या ठिकाणी पुढे जे शहर वसलं, ते शहर आजही त्या मठाचं नाव मोठ्या अभिमानाने मिरवत आहे – सॅन डियॅगो.

    या सार्‍या मठांचा एक ठरावीक साचा असायचा. मठाच्या आत छोट्या छोट्या इमारती असायच्या. त्यात मिशनरींची त्याच प्रमाणे स्थानिक रेड इंडियन लोकांची देखील रहाण्याची व्यवस्था असायची. मठाच्या आवारात चर्चच्या जोडीलाच शाळा, कार्यशाळा (work shop), दवाखाना देखील असायचे. आवाराच्या भोवती चांगली दगडी भिंत बांधून सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असायची. मठाच्या प्रांगणाच्या बाहेर रेड इंडियन्स शेती भाती करायचे. मठाच्या आत त्यांना अन्न, वस्त्र, निवार्‍याबरोबरच कॅथलिक पंथाचे बाळकडू मिळायचे. बरेचदा मठांच्या दिमतीला असलेला शस्त्रसज्ज फौजफाटा हे देखील एक आकर्षण असायचे. त्यामुळे मठाच्या आश्रयाला आलेल्या रेड इंडियन लोकांच्या टोळ्यांना, प्रतिस्पर्धी टोळ्यांपासून आपसूकच संरक्षण मिळायचे. अमेरिकेतील रेड इंडियन्स, जुन्या जगातील लोकांच्या कधीच संपर्कात आले नसल्यामुळे, कित्येक रोगांपासूनदेखील ते पूर्णपणे सुरक्षित होते. त्यामुळे युरोपियनांच्या आगमनाबरोबर आलेल्या रोगराईला, रेड इंडियन टोळ्यांकडे काही उत्तर नव्हते. त्यामुळे या युरोपियन रोगराईवर काही वैद्यकीय उतारा मिळावा ही देखील मठाकडून अपेक्षा असायची. परंतु स्पेनची तशी अमेरिकेवर कधीच घट्ट पकड नव्हती. एवढ्या मोठ्या पसरलेल्या प्रदेशाचा ताबा ठेवणे त्यांना कठीण जाऊ लागले. रोगराईला बळी पडणार्‍या रेड इंडियन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. काही मठांवर आसपासच्या लोकांचे हल्ले वाढू लागले होते. हळू हळू या त्रासामुळे हे मठ बंद पडू लागले आणि एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बहुतेक सारे मठ बंद झाले होते.

    ख्रिश्चन धर्मातल्या अनेक पंथांपैकी एक म्हणजे मॉरमन्स. जोसेफ स्मिथ नावाच्या एकोणीसाव्या शतकातल्या एका गुरुचे हे अनुयायी. सुरवातीच्या काळात यांच्यात असलेल्या बहूपत्नीकत्वाच्या चालीमुळे, या लोकांना समाजात थारा मिळेनासा झाला. त्यामुळे आपल्या अनुयायांना घेऊन जोसेफ स्मिथ भटकत भटकत युटाह राज्यातल्या सॉल्टलेक सिटीला पोहोचला. तिथे त्यांना विशेष त्रास झाला नाही आणि मग हा पंथ तेथेच विसावला. आज देखील तेच त्यांचे प्रमुख वसतिस्थान आहे.

    आम्ही सू सेंटरला रहायला आल्यावर काही दिवसातच आमची जीम आणि क्रिस्तीन व्हाईट नावाच्या अमेरिकन कुटुंबाशी ओळख झाली. त्यांचं आणि आमचं थोड्या दिवसांतच चांगलं जमलं. त्यांची तीन मुलं आणि सिद्धार्थ एकाच वयोगटातले असल्यामुळे, आमचं एकमेकांकडे बरच जाणं येणं व्हायचं. हे कुटुंब आयोवातल्याच दुसर्‍या एका गावाहून सू सेंटरला आले असल्यामुळे, त्यांची देखील गावात फारशी कुणाशी ओळख नव्हती. त्यामुळे हा समसमा संयोग झाला असावा अशी आमची समजूत होती. क्रिस्तीनने एकदोनदा सुरवातीलाच “आम्ही मॉरमन्स आहोत”, असं सांगून सूतोवाच केलं होतं. आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. त्यांची मैत्री हीच आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती. पण पुढे पुढे हे कुटुंब इतर अमेरिकन लोकांच्या फारसं जवळ जात नाही, असं आमच्या लक्षात आलं. कधी तरी ऑफिसमधे बोलताना, त्यांचा उल्लेख करताना, मी ते मॉरमन्स आहेत असं म्हणालो. आजूबाजूंच्या लोकांचे चेहरे लगेच बदलले. शेवटी शारलेटने जणू सगळ्यांच्या भावनांना शब्द दिले, “मॉरमन लोकांची सावली देखील आम्ही आमच्या दरवाज्यात पडू देत नाही”. हे ऐकून मी तर सर्दच झालो. हे मॉरमन्स म्हणजे अमेरिकेतले अस्पृश्य वगैरे आहेत की काय, असा मला प्रश्न पडला. आता अर्थातच त्यांच्यात बहूपत्नीकत्वाची चाल खूपच कमी झाली आहे.

    पुढे मग २००८ साली, टेक्सास राज्यातल्या अशाच एका पंथाची टी.व्ही.वर खूपच मोठी बातमी आली होती. या पंथात देखील बहुपत्नीकत्वाची चाल होती आणि चौदा पंधरा वर्षांच्या लहान मुलींचं मोठमोठ्या माणसांशी लग्न लावलं जायचं. या पंथाच्या तथाकथित गुरुची आपल्या अनुयायांवर जबरदस्त जरब होती. सारा समुदाय एखाद्या मेंढ्यांच्या कळपासारखा एका बंदिस्त आवारात जगत होता आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जायची.

    -- डॉ. संजीव चौबळ

      April 29, 2016


  • श्रमाची प्रतिष्ठा!………………

    ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही.

      October 8, 2006


  • महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ – श्री रेणुकामाता माहूरगड

    महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ – श्री रेणुकामाता माहूरगड

    महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .

    या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.

    या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.

    भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्‍वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्‍वासू, बृहद्‌भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
    रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.

    पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.

    या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.

    -- निखिल आघाडे

      October 7, 2016


  • नियोजनांचा दुष्काळ

    सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाचा अनियंत्रित वर्षाव सुरू आहे. अनियंत्रित एवढ्याचसाठी की, कुठे मुसळधार पावसाने बंधारे फुटून पाणी गावात शिरल्याने लोकांचा बळी जात आहे, तर कुठे भर आषाढात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एरवी मोसमी पाऊस सार्वत्रिक असतो.

      July 17, 2005


  • चष्मा का लागतो?

    अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. कारण त्यांना लांबून टीव्ही दिसत नाही. म्हणजे जवळून टीव्ही बघितल्यामुळे चष्मा लागतो, असे म्हणता येत नाही. तर चष्म्याचा नंबर असल्यामुळे टीव्ही जवळून बघितला जातो. एकदा त्यांना चष्मा लावायला दिला, की ते व्यवस्थित अंतरावरून टीव्ही बघतात. सिद्ध झालेले नसले तरी बहुतेक नेत्रतज्ज्ञांच्या मते- आधुनिक बैठी जीवनशैली आणि चष्मा यांचे नाते असू शकेल. सिंगापूर व जपानमध्ये झालेल्या पाहणीत काही वर्षांपूर्वीच्या मानाने तेथील सध्याच्या मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यांत घरात राहून बैठे खेळ खेळणे, कुठल्यातरी स्क्रीन (टीव्ही-कॉम्प्युटर)समोर नजर सतत खिळवून ठेवणे, या अशा शहरी जीवनशैलीचा परिणाम असण्याची शक्यलता सांगितली आहे. ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी निश्चि तच चांगले असते; परंतु चष्म्याचा नंबर ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत नाही. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांवर इतर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कितीही पालेभाज्या खाल्ल्या, गाजर खाल्ले तरी चष्म्याचा नंबर कमी होत नाही. काही लोकांमध्ये असाही एक गैरसमज असतो, की सारखा चष्मा वापरला, की चष्म्याचा नंबर कमी होतो; परंतु असे काही नसते. चष्मा वापरणे व नंबर कमी अथवा जास्त होणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चष्मा कायम घातला तरी नंबर जर वाढायचा असेल, तर वाढतोच.

    नंबरांचे वर्गीकरण
    चष्म्याच्या नंबरांच्या प्रकाराचे वर्गीकरण ऱ्हस्वदृष्टिदोष, दीर्घदृष्टिदोष व चाळिशीनंतर लागणारा चष्मा, असे करता येईल.
    ऱ्हस्व दृष्टिदोष - अशा रुग्णांचा डोळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघतो, त्याची प्रतिमा डोळ्याच्या रेटिनाच्या पुढे तयार होते. या रुग्णांना लांबचे दिसत नाही; जवळचे मात्र दिसते. लांबचे न दिसल्यामुळे हे रुग्ण टीव्ही जवळ जाऊन बघणे, पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघणे, असे करतात. ऋण (मायनस) नंबरचा चष्मा अथवा कॉन्टॅक्टय लेन्स वापरून या रुग्णांची नजर सुधारते. सर्वसामान्यपणे लहान वयात ऱ्हस्वदृष्टी चष्मा लागल्यावर शरीराची वाढ होते; त्या प्रमाणात नंबरही वाढत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर नंबर वाढण्याचे प्रमाणही थांबते; परंतु काही रुग्णांमध्ये त्यानंतरही नंबर वाढू शकतो. त्यांच्या आधीच्या पिढीतील नातेवाइकांचा नंबर कसा व किती आहे, यावर बरेचसे अवलंबून असते.

    काही ऱ्हस्वदृष्टिदोष असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचा रेटिना नावाचा भाग काही ठिकाणी झिरझिरीत झालेला आढळून येतो. जास्त जाड चष्मा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. झिरझिरीत- पातळ झालेल्या भागात जर भोक पडले, तर त्यातून नेत्रपटल अथवा रेटिना आपल्या जागेवरून सरकण्याची शक्यळता असू शकते. असे झाल्यास एकाएकी दृष्टी एकदम कमी होते किंवा नजरेसमोर पडदा आल्यासारखे वाटून फक्त वरच्या भागातले दिसणे किंवा कुठल्या तरी एकाच भागातले दिसणे, असे होऊ शकते. उदाहरणार्थ- समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचे फक्त डोके व मान दिसते. खालचा भाग दिसत नाही किंवा फक्त खालचे शरीर दिसते; वरचा भाग दिसत नाही. एखाद्या रुग्णाला कपबशीतील फक्त कप दिसतो; बशी दिसत नाही, असे घडते. नेत्रपटल जागेवरून सरकलेले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे असते.

    जाड चष्मा असलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याचा रेटिना वर्षातून एकदा तपासून घ्यावा. त्यात जर काही झिरझिरीत अथवा भोके असलेला भाग दिसला, तर त्यावर लेझर उपचार करून पुढील संभाव्य धोका व त्यावरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. ज्यांच्या कुटुंबांमध्ये (आई-वडील-बहीण-भाऊ इत्यादी) असा प्रकार आधी झालेला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. असे घडल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया ही जवळ जवळ तातडीची शस्त्रक्रियाच समजली जाते; जितक्या् लवकर करू, तेवढी ती यशस्वी होण्याची शक्य्ता वाढते. जाड मायनस नंबरचा चष्मा असलेल्या रुग्णांनी त्यांना जर डोळ्याच्या आत वीज चमकल्यासारखी वाटली, तर डॉक्ट.रना लगेच दाखवावे. रेटीनाला भोक पडले असल्यास, असे होऊ शकते. अशा वेळी आधी सांगितल्याप्रमाणे लेझर उपचार केल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो.

    डोळ्यांच्या उपचारांमध्ये लेझर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. लेझर म्हणजे फक्त काही विशिष्ट पद्धतीचे लाईटचे किरण डोळ्यातील हव्या त्या भागावर केंद्रित करतात. अगदी पाच ते दहा मिनिटांत हे काम होते. कुठल्याही प्रकारचे इंजेक्शकन, शस्त्रक्रिया यात नसते.

    दीर्घदृष्टिदोष या रुग्णांचा डोळा आकाराने लहान असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघायचे तिची प्रतिमा रेटिनाच्या मागच्या भागात तयार होते. प्रत्यक्ष रेटिनावर धूसर प्रतिमा दिसते. या रुग्णांना मुख्यत्वे जवळचे बघायला त्रास होतो. लांबचे चष्मा न लावल्यासही दिसते; परंतु जास्त नंबर असल्यास डोके दुखणे - डोळे दुखणे असे होऊ लागते. त्यामुळे लांबचे बघतानासुद्धा चष्मा लावावा. ऱ्हस्वदृष्टिदोषाप्रमाणे दीर्घदृष्टिदोषाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या वाढीनुसार नंबर वाढत नाही. रेटिनाही बहुतांश रुग्णांत चांगला असतो. त्यामुळे त्यामानाने नेत्रपटल सरकण्याचा प्रकार कमी असतो.

    प्रेसबायोपिया म्हणजेच चाळिशीनंतर येणारा चष्म्याचा नंबर! चाळिशीआधी आपल्या डोळ्याचे स्नायू लवचिक असतात. त्यामुळे डोळ्यापासून जवळच्या अंतरावर, लांब अंतरावर व त्यामधील कुठल्याही अंतरावर आपल्याला नजर केंद्रित करता येते; परंतु चाळिशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते, त्यामुळे लांबची नजर फारशी खराब होत नाही. मात्र जवळचे अंधुक दिसू लागते. पेपर जरा लांब धरल्यावर चांगला दिसतो. वयाप्रमाणे काही प्रमाणात हा नंबर वाढतो. त्यामुळे चाळिशीनंतर बायफोकल अथवा प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा लांबचा व जवळचा वेगवेगळा, असे दोन चष्मे करावे लागतात. ज्यांना आधीपासून मायनस नंबरचा चष्मा आहे, त्यांना लांबचा चष्मा काढून जवळचे चांगले वाचता येते; परंतु तरीही जवळचा नंबर वेगळा काढणे व त्यानुसार वेगळा चष्मा करणे चांगले. कॉम्प्युटरवर ज्यांना जास्त वेळ काम करावे लागते, त्यांना कॉम्प्युटरच्या अंतरासाठी वेगळा नंबर वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.
    सिलिंड्रिकल नंबरचा चष्मा असणे बऱ्याच रुग्णांची सिलिंड्रिकल नंबर आहे म्हटल्यावर ‘काही तरी भयंकर आजार आहे’, अशी भावना होते. खरे असे काहीच नाही. नंबरचा तो एक प्रकार आहे, एवढेच. कॉनियाचा पृष्ठभाग सर्व भागांत सारखाच गोलाकार नसेल, तर सिलिंड्रिकल नंबर लागतो. उदाहरणार्थ- उभा भाग जास्त गोलाकार असणे किंवा तिरपा भाग (१४० अंश-१२० अंश इत्यादी) जास्त गोलाकार असणे, असे. अशावेळी सर्व भागांत सारखाच गोलाकार असणारा नंबर देता येत नाही. सिलिंड्रिकल नंबरची काच हव्या त्या भागात कमी-जास्त गोलाकार करून घेता येते. सिलिंड्रिकल नंबर प्लस किंवा मायनस किंवा दोन्हींचे मिश्रणही असू शकतो. हा फारसा वाढत नाही; मात्र चष्मा न घातल्यास पेशंटना डोळे दुखणे, डोके दुखणे असे त्रास सुरू होतात. कोणता का नंबर असेना, डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा वापरणे हितावह आहेच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.- संतोष शेणई

      January 8, 2017


  • पोलिस दलाच्या सक्षमीकरणाकरता काही उपाययोजना

    येत्या २०१८ – २०१९ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे शक्य नाही.

      September 5, 2018