वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आम्ही स्वस्ताई साठी मतदान केलंच नव्हतं. आम्ही मत गव्हर्नन्ससाठी दिलंय …अछ्छे दिन म्हणजे फक्त स्वस्ताई नव्हे …
August 9, 2014
लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. १२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले.
September 11, 2010
२१ व्या शतकातही हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही शतकांमध्ये जग आमुलाग्र बदलले असताना, भगवान हनुमानाचे गुण, जसे की शक्ती, धैर्य, भक्ती आणि निस्वार्थीपणा, हे अजूनही महत्त्वाचे आहेत. हे गुण आपल्यात बाणवण्याचा श्रद्धाळू लोक प्रयत्न करतात.
April 6, 2023
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् ।
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥
आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी.
वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण त्यांनाही आनंद देणारे , आकर्षित करणारे असे आईचे हास्य आहे. किती सहज शब्दात आचार्यश्री आई जगदंबेचे लोकोत्तर स्वरूप वर्णन करीत आहेत. सामान्य माणूस आकर्षित झाला तर आश्चर्य काय? वैराग्य शिरोमणी असणारे भगवान शंकर आपली सहजसमाधी अवस्था सोडून आईच्या हास्याचा आनंद घेतात. वेगळ्या शब्दात आईचे हास्य समाधीच्या आनंदाच्या समतुल्य आहे.
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् - आईने देखील आपल्या, मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्या चंद्राने जिने आपल्या नीलवर्णीय अलकभार म्हणजे केश संभाराला अलंकृत केले आहे केले आहे अशी.
स्निग्ध अर्थात तेल लावलेल्या, काळ्याशार केसांवर अत्यंत तेजस्वी असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला तर त्या काळ्या रंगाच्या ऐवजी तेथे किंचित निळी छटा पसरते. आचार्य श्रींचे हे सूक्ष्म निरीक्षण किती मनोहारी आहे.
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां- इंद्र म्हणजे देवराज इंद्र. उपेंद्र म्हणजे भगवान विष्णू. आदी म्हणजे अन्य सर्व देवतांच्या द्वारे जिच्या चरणकमलांची अर्चना केली जाते अशी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - अशा कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 30, 2020

रामाने श्री लंकेवर चढाई करण्यासाठी समुद्रावर सेतू बांधायचे ठरवले तेव्हा एका इवल्याश्या खारीने आपल्या तोंडातून त्यात वाळू भरण्याचे काम केले. ती फक्त मूठभर वाळू सेतूमध्ये भरू शकली. तिने संदेश दिला की प्रत्येकाने स्वतःच छोटं योगदान दिलं तरी सामूहिकपणे मोठं यश मिळवता येतं. वरवर पाहता खार वेडी वाटते. अशीच काही वेडी माणसे आहेत, जे स्वतःच इवलंसं योगदान देऊन देश घडवत आहेत. त्यांची ओळख करून देत आहेत निरेन आपटे.
March 22, 2026
दाजीपूर….राधानगरीचा …. फोंडा …. भिरवंडे … हरकूळ … नरडवे … सांगवे … कनेडी …… हा सहयाद्रीच्या घाटमाथ्याचा … पायथ्याचा महा मातब्बर मुलुख …घनदाट अरण्याचा… आकाशाला स्पर्श करणाऱ्या सहयकडयांचा…कल्पनेपलिकड़े कोसळणाऱ्या पावसाचा… कडेकपाऱ्यांतून ….
July 30, 2019
बिशनसिंग बेदी जेथे जातील तेथे लोकप्रिय होत असत. शेष विश्वसंघातर्फे १९७-७२ च्या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाला गेले असता तेथे त्यांच्याबद्दल कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाले होते. तेथील महिलांच्या मासिकांमध्ये त्यांच्या मुलाखती छापून आल्या होत्या.
August 30, 2021
जम्मु काश्मीर राज्यामधील हंडवारा शहरात असलेले लष्कराचे तीन बंकर हटविण्यात आले. हंडवाडा येथील स्थानिक नागरिकांनी हे बंकर हटविण्यात यावेत, अशी मागणी केली होती. मात्र या बंकरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भूमिका लष्करातर्फे घेण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी बंकरच्या दिशेने जोरदार दगडफेकही केली होती.
May 18, 2016
नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे सूक्ष्म कण श्वाीसामार्फत सरळ शरीरात जाऊ नयेत यासाठी नाक या अवयवाची रचना केलेली आहे. नाकाच्या आतील बाजूला चिकट अस्तर असते, यामध्ये हवेतील अशुद्धता, बारीक कण अडकून राहू शकतात व आत जाण्यापासून थोपविले जाऊ शकतात. नाकाच्या मध्यभागी असणाऱ्या मांसल पडद्यावर अतिसूक्ष्म व खूप मोठ्या संख्येने रक्तलवाहिन्या असतात, यामुळे श्वा्सावाटे आत जाणारी हवा किंचित दमट व उबदार बनविली जाते. वासाचे ज्ञान करविणाऱ्या विशेष ग्रंथी नाकाच्या वरच्या एक तृतीयांश भागात असतात व तेथून गंधाचे ज्ञान मेंदूपर्यंत पोचवले जाते. नाक खाली घशाशी व वर सायनसच्या मार्फत डोळ्यांशी जोडलेले असते, तसेच त्याच्याही वर मेंदूशी संबंधित असते. म्हणूनच नाकाची नीट काळजी घेणे अत्यावश्यजक असते.
गवती चहाचा काढा
नाकाशी संबंधित सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेला त्रास म्हणजे नाक चोंदणे व सर्दी होणे. वरवर पाहता साधा वाटला तरी यामुळे व्यक्तीक बेजार होऊन जाऊ शकते. वारंवार सर्दी-पडसे होणे हे शरीराची रोगप्रतिकारशक्तीह कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. अशा वेळी दीर्घ काळपर्यंत उपचार घ्यावे लागतात. साध्या सर्दीवर मात्र लवकरात लवकर सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह घेणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, गवती चहाचा काढा घेणे यासारखे उपाय करता येतात. गवती चहाचा काढा पुढीलप्रमाणे बनवता येतो.
पाणी - दोन कप
गवती चहा - दोन पाती
किसलेले आले - अर्धा चमचा
दालचिनी - एक इंच तुकडा
तुळशीची वा पुदिन्याची पाच-सहा पाने
हे सर्व एकत्र करून मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. एक कप उरल्यावर त्यात चवीपुरती साखर टाकून गरम गरम पिण्याने सर्दीची लक्षणे कमी होतात, तापासारखे वाटत असल्यासही बरे वाटते.
नाक चोंदत असल्यास दोन-तीन थेंब पातळ केलेले साजूक तूप नाकात टाकणे चांगले. यामुळे सहसा लगेच नाक मोकळे होते व श्वा स घेणे सोपे होते.
नाकाभोवतीच्या पोकळ्यांमध्ये सर्दीमुळे किंवा अन्य जंतुसंसर्गामुळे अवरोध तयार झाल्याने कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. यालाच सायनोसायटिस असे म्हटले जाते. यावर गरम पाण्याचा वाफारा घेणे, ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे, रुईच्या गरम पानाने शेकणे यासारखे उपाय करता येतात. दालचिनी, लवंग, चंदन, केशर वगैरे द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप सायनसवर लावण्यानेही आराम मिळू शकतो.
घोळणा फुटला तर
नाकातून रक्तट येणे अथवा घोळणा फुटणे हे लक्षणही बऱ्याचदा आढळते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षण अधिक प्रमाणात आढळते. मात्र उन्हाळ्यात, शरद ऋतूत, पित्त वाढले असताही नाकातून रक्ती येणाऱ्या व्यक्तीध असतात. वारंवार नाकाचा घोळणा फुटत असल्यास त्वरेने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, मात्र प्राथमिक उपचारात व्यक्तीअला आडवे झोपवणे, नाकावर, कपाळावर व डोक्या वर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे यासारखे उपाय करावे लागतात. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद, धात्री रसायनसारखे शीतल रसायन घेणे, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, हे उपायही प्रभावी होत.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नाकाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे नाकाद्वारा करता येणारे नस्य. औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे नस्य हा रोज करावा असा उपचार होय. ज्यायोगे नुसते नाकाचीच नव्हे, तर मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता टिकविण्यास, वाढण्यास मदत होते.
घसा हासुद्धा शरीरातील एक महत्त्वाचा भाग होय. अन्न-पाणी शरीरात घेणे, बोलणे, श्वारसोच्छ्वास वगैरे अनेक क्रिया घशाशी संबंधित असतात. घसा अतिशय संवेदनशील अवयव असतो. मसालेदार पदार्थ, तिखट, थंड किंवा गरम पदार्थ, तंबाखू वगैरेंचा घशावर दुष्परिणाम होत असतो. टॉन्सिल या रोगप्रतिकारशक्तीणशी संबंधित ग्रंथीसुद्धा घशातच असतात. शरीरात जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून या ग्रंथींची घशात योजना केलेली असते, मात्र टॉन्सिल्स सुजल्या की घसाही दुखू लागतो, खाणे-पिणे-बोलणे वगैरे क्रिया अवघड होत जातात. घशाचे आरोग्य टिकवायचे असेल तर टॉन्सिल्सची काळजी घेणे आवश्यंक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ सकाळ
January 5, 2017
या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे.
April 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti