(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हे राम , नथुराम

    या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :

      March 29, 2017


  • निरंजन – भाग ५७ – शपथ तुला श्रीरामनामाची…!

    श्री राम आणि माता सीता जेव्हा अयोध्येचे राज्य सोडून १४ वर्षे वनवासासाठी जातात, तेव्हा त्या वनवासामध्ये अश्या अनेक प्रसंगाना तोंड देऊन आनंदाने आपला संसार सुरु करतात. त्याच वेळी घडलेली ही घटना….

      November 18, 2025


  • कॅन्सरच्या नवीन उपचार संशोधनांतील आयुर्वेदीय सिद्धांत !!

    कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या उपचारांत वा त्याला आळा घालण्यात किंवा त्याला रोखण्यात काही भूमिका बजावतो का?

    आपल्याला आश्चर्य वाटेल पण कॅन्सरच्या क्षेत्रातील तुलनेत ताजे मात्र परिणामकारक संशोधन हे आयुर्वेदीय सिद्धांतांवर आधारलेले आहे! या नव्या दालनाला Immunotherapy असे म्हणतात. या संशोधनातर्गत वापरण्यात आलेल्या औषधांना आता अमेरिकेत एफडीए चे प्रमाणपत्र मिळून त्यांचा उपचारांत वापरदेखील होऊ लागला आहे.

    Immunotherapy म्हणजे काय?

    थोड्क्यात सांगायचे झाल्यास; या प्रकारात रोगावर थेट औषध न देता आपल्या शरीरातील पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी तयार करण्यावर भर दिला जातो. आपल्या रक्तातील टी सेल्सना कॅन्सरच्या प्रोटीन्स आवरणाचे रूप बदलणाऱ्या पेशींना ओळखण्यास इंजेक्शनमार्फत काही औषधे देऊन प्रशिक्षित केले जाते. या संशोधनाने कॅन्सरच्या उपचारांत एक संपूर्ण नवा आयाम निर्माण केला असून हेच या उपचारांचे भविष्य असू शकते असे मतही जागतिक पातळीवरील कित्येक मान्यवर कॅन्सर उपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

    आयुर्वेद काय सांगतो?

    आपल्यापैकी कित्येकांना हे माहिती नसेल; पण रोगप्रतिकार शक्ती अथवा 'व्याधीक्षमत्व' हा शब्द जगाला सर्वप्रथम आयुर्वेदाने सांगितला आहे. पुन्हा त्याचेही दोन उपप्रकार आणि त्यांचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. रोगावर थेट हल्ला न करता शरीराची एकंदरीत परिस्थिती अशा प्रकारे सुधारणे की जेणेकरून तो रोग शरीरात घर करूच शकू नये असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. आयुर्वेदात 'स्वभावोपरम वाद' या शीर्षकाखाली हा विषय सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.

    आता आपल्या लक्षात आले असेल की नेमका हाच आयुर्वेदीय सिद्धांत वापरून सध्या आधुनिक वैद्यकाची वाटचाल सुरु असून; त्यांना याविषयी मोठा आधार वाटू लागला आहे. कॅन्सरचे रुग्ण आयुर्वेदीय पद्धतीने हाताळणारे शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न वैद्यगण याच सिद्धांताच्या आधारे उपचार करत असतात. (या क्षेत्रात आयुर्वेदाच्या नावाखाली भलत्याच लोकांकडून केली जाणारी लूटमार समोर असल्यानेच 'शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न' हे शब्द निवडले आहेत.) अर्थात; रोगाची अवस्था लक्षात घेऊन आणि क्वचित काही अपवाद वगळता बहुतांशी आधुनिक वैद्यकाच्या जोडीने हे उपचार दिले जातात. मात्र या संशोधनाने आयुर्वेदीय विचारसरणीला नव्याने बळकटी दिली आहे.

    अर्थात; लगेच आयत्या बिळावर नागोबा बनायचेदेखील कारण नाही. कारण हा सिद्धांत आणि संकल्पना आयुर्वेदाची असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. जोवर सध्या आयुर्वेदात सुरु असलेल्या संशोधनांच्या आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या परिस्थितीत आपदतलमस्तक बदल होऊन आयुर्वेदीय परिभाषा व सिद्धांतानुसार रिसर्च प्रोटोकॉल तयार होत नाही किंवा या संशोधनांची क्षमता कित्येक पटीने अधिक वाढत नाही तोवर या क्षेत्रात सध्याच्या युगात अधिकारवाणीने भाष्य करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला नसेल. अर्थातच; हे एकट्या- दुकट्याचे काम नसून त्याकरता शासकीय पातळीवरूनच बदल करावा लागेल. अन्यथा तिथेही अमेरिका वा जर्मनीसारखे आयुर्वेदाचे महत्व जाणणारे देश आहेच. आज या दोन्ही देशांत आयुर्वेदावर मुबलक संशोधने सुरु आहेत. आमच्या देशात मात्र एक वर्ग आयुर्वेद म्हणजे भंपकपणा हा मूर्ख समज (जाणूनबुजून) कवटाळून बसला आहे तर दुसरा वर्ग आयुर्वेद हा अमक्या- ढमक्या पण्यजीवी व्यक्तींमुळेच सर्व लोकांपर्यंत कसा पोहचला या मिथ्या स्वप्नरंजनात दंग आहे. प्राप्त परिस्थितीत उद्या या देशांतील 'वैद्य' आपल्या हिंदुस्थानात येऊन 'अष्टांगहृदय' वा 'चरकसंहिता' शिकवू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      November 2, 2016


  • आर्त

    हे आर्तपण मला वळणावळणावर भेटलंय. काही वर्षांपूर्वी ग्रेसची कॅसेट आणली होती. नंतर “निवडुंग ” ची भेट. पण त्याआधी सदर कॅसेट. तिथे एक आर्त काव्य भेटलं-

      March 5, 2022


  • १९७१ ची रोमांचक युद्धगाथा

    १९७१ ची रोमांचक युद्धगाथा

    १९७१ ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.

    १९७१ ची रोमांचक युद्धगाथा

    लेखकःसुरेन्द्रनाथ निफाडकर

    पृष्ठसंख्याः 112 ; किंमतः 100 रू.

    नचिकेत प्रकाशन, नागपूर

     

      December 5, 2011


  • ब्रिटिशकालीन गॅझेटिअर

    ब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक प्रशासन सुकर व्हावे, तत्कालीन जिल्हाधिकार्‍याला या भूप्रदेशाची पूरेशी माहिती असावी आणि येथील जाती, जमातीचे तपशिल ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी म्हणून ज्ञात व्हावे हा मुख्य हेतू मनात ठेवून येथील जास्तीत जास्त महसूल वसुलीच्या दृष्टीने आवश्यक तपशील पुरवणारा ग्रंथ म्हणून जिल्हा गॅझेटिअर्सची निर्मिती झाली.

      August 24, 2012


  • रामजन्मभूमी इतिहास आणि न्याय

    सर्वोच्च न्यायालयाचा  निकाल लागला आणि श्री रामांना एकदाचा मानवी जगात, मानवी न्यायालयात न्याय मिळाला पण श्री रामानी स्वतः च्याच जन्मभूमी मध्ये जेथे त्यांनी कधी काळी राज्य केले होते . त्यांचे मंदिर बांधान्या साठी त्यांच्या भक्तांना न्यायालयात याचिका दाखल करून खटला का लढावा लागला ?त्याचा पूर्व इतिहास काय? याचा उहापोह आज या लेखात मी करणार आहे.

      November 19, 2019


  • घरातच फुलवा बाग

    घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.

      January 11, 2011


  • आरएनए म्हणजे काय?

    प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक ॲसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते.

      November 15, 2023


  • महाराष्ट्रातला सेवा हमी कायदा

    महाराष्ट्रात आता 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.

    तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
    महाराष्ट्र सरकारची वेबसाईट www.aaplesarkar.maharashtra.gov.in वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत.

    या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...

    महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.

    या सेवांचा आहे समावेश....

    • वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
    • मिळकतीचे प्रमाणपत्र
    • तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
    • ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
    • पत दाखला
    • सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
    • प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
    • अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
    • भूमिहीन प्रमाणपत्र
    • शेतकरी असल्याचा दाखला
    • सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
    • डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
    • जन्म नोंद दाखला
    • मृत्यु नोंद दाखला
    • विवाह नोंदणी दाखला
    • रहिवाशी प्रमाणपत्र
    • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
    • हयातीचा दाखला
    • ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
    • निराधार असल्याचा दाखला
    • शौचालयाचा दाखला
    • विधवा असल्याचा दाखला
    • दुकाने आणि अस्थापना नोंदणी
    • दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
    • कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
    • कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
    • कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
    • नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
    • सेवानियोजकाची नोंदणी
    • शोध उपलब्ध करणे
    • मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
    • दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

    ...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड

    'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.

    सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.

    -- यशोधन कामत

      November 7, 2016