वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
May 23, 2021
घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत.
गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या दर्जाविषयी सतर्क असतात. भारतीय ग्राहकही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच देशात अनेक ग्राहक ते वापरत असलेली उत्पादनं पर्यावरणपूरक असावीत असा आग्रह धरताना दिसतात. या सर्वांचा परिणाम असा झालाय की देशासह जागतिक पातळीवर घराचा पेण्ट आणि कोटिंगशी संबंधित उद्योगही आपली उत्पादनं जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असतील असा प्रयत्न करत आहेत. आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम थोड्या - फार प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, आपल्या घरातल्या अंतर्भागात वापरल्या जाणाऱ्या रंगांचा प्रतिकूल परिणाम होत असतो. आपण घरात अधिक वेळ घालवत असतो आणि रंगांतली विषारी द्रव्यं, क्षोभकं, अॅलर्जीकारक घटक आणि वायूचा सामना करत असतो. म्हणूनच हे टाळण्यासाठी चांगल्या म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला पाहिजे. तसंच खालील गोष्टी केल्या पाहिजे.
घरात भरपूर मोकळी हवा राहिल, अशी उपाययोजना करा.
आर्द्रता आणि पाण्यामुळे भिंती किंवा रंगांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.
विषारी द्रव्यांशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी खबरदारी घ्या.
घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नूतनीकरण व रिमॉडेलिंगमध्ये आपल्या नकळत होणारी हानी टाळण्यासाठी देखरेख पद्धतीत बदल घडवून आणा.
घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करा. उदा. ओलावा काढून टाकण्यासाठी आणि आर्द्रता कमी करण्यासाठी प्रत्येक बाथरूम आणि किचनला एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या.
आरोग्याची हानी टाळण्यासाठी घराची नियमित तपासणी करा.
घरातल्या हवेचा दर्जा राखणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या हवेचा तुमच्या आरोग्यावर थेट आणि दीर्घ परिणाम होत असतो. बऱ्याच घरांमधली हवा घराबाहेरच्या हवेपेक्षा २२०० पटीने अधिक प्रदूषित असते, असं एका संशोधनात आढळून आलं आहे. अशा प्रदूषित हवेमुळेच श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवणं, डोळे आणि त्वचा जळजळणं असे त्रास होतात. म्हणूनच घरातली हवा प्रदूषित असेल तर ती सायलेण्ट किलर असते.
घरातल्या भिंतींसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांशी रंगांची निर्मिती ही व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउण्ड्स (व्हीओजीस)पासून केली जाते. पण या घटकांमुळे हवेचा दर्जा खालावतो आणि ती आरोग्यासाठी धोकादायक बनते. या घटकांना न्यूरोटॉक्सिन्स असं म्हणतात. व्हीओसींमुळे बाळांना फुफ्फुसाशी संबंधित विकार, अॅलर्जी, पाणावलेले आणि लाल डोळे, वाहतं नाक, कफ, घशाचा संसर्ग अशा समस्या जाणवतात. तसंच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
मुलं दिवसातला भरपूर वेळ घरातच असतात. अशा परिस्थितीत मुलांचा संपर्क हवेतल्या प्रदूषकांशी येत असेल तर त्यामुळे त्यांच्या रक्तातलं शिशाचं प्रमाण वाढणं तसंच दमा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. घराच्या रंगांमध्ये व्हीओसीजचं प्रमाण अत्याधिक असेल तर त्याची झळ प्रौढांनाही बसू शकतो. त्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.
आजचे ग्राहक जागरूक असून ते आरोग्यदायी आणि सुरक्षित घरांना प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करायला हवा. हे रंग घरात असतील तर डोकं दुखणं, मळमळणं, श्वसनविकार, चक्कर येणं, छातीत दुखणं, फुफ्फुसात जळजळणं, नाक, घसा आणि डोळ्यात जळजळ होणं आदी समस्या सहसा जाणवत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 18, 2017
अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं !पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् !!
प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं !
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् !!४!!
अकिंचनार्तिमार्जन- किंचन म्हणजे थोडेसे, अल्प, किंचित. ते देखील त्यांच्याजवळ नाही ते अकिंचन. व्यवहारातील सुखाची, आनंदाची थोडीही साधने ज्यांच्याजवळ नाहीत ते अकिंचन. अध्यात्मिक भूमिकेतून ज्यांच्याजवळ साधना, उपासना नाही ते अकिंचन. त्यांनीदेखील प्रार्थना केल्यावर त्यांची आर्तता म्हणजे दुःख दूर करतात ते अकिंचनार्तिमार्जन.
चिरंतनोक्तिभाजन- चिरंतन अर्थात शाश्वत, अक्षय, अविनाशी. उक्ती अर्थात वचन. जे शाश्वत वचन, चिरंतन कथन ते चिरंतनोक्ती.
अशी आहेत वेद,शास्त्र उपनिषदे. त्यात संगीतलेले ज्ञान शाश्वत आहे. त्यांचे कथन चिरंतन आहे.
अशा वेद,शास्त्रांचे भाजन अर्थात वर्ण्य विषय, सांगण्याचा मूळ सिद्धांत ते चिरंतनोक्तिभाजन.
पुरारिपूर्वनंदन- पुर म्हणजे नगर. ज्याच्याजवळ तीन पुर होते तो त्रिपुर. त्या त्रिपुरासुराचे शत्रू म्हणजे भगवान शंकर हे पुरारी.
त्यांचे पूर्वनंदन अर्थात मोठे चिरंजीव. श्रेष्ठ चिरंजीव. हा सामान्य अर्थ. तर भगवान शंकरांच्या देखील पूर्वी विद्यमान असणारे आनंदतत्व हा अधिक सुंदर अर्थ. हे आनंद तत्व, हा आत्माच पुत्र रुपात प्रगट होतो असे शास्त्र सांगते.
सुरारिगर्वचर्वण- सुर म्हणजे देवता. त्यांचे अरी म्हणजे शत्रू अर्थात दैत्य. त्या सगळ्या राक्षसांच्या गर्वाचा जे चावून चोथा करतात, अर्थात तो गर्व पूर्णपणे नष्ट करून टाकतात ते सुरारिगर्वचर्वण.
प्रपञ्चनाशभीषण- जे या भीषण प्रपंचाचा विनाश करतात किंवा जे या प्रपंचातील भीषणत्वाचा विनाश करतात त्यांना प्रपञ्चनाशभीषण असे म्हणतात.
धनंजयादिभूषण- आपल्या शरीरात प्राण, अपान इत्यादी मुख्य वायू सह नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे पाच उपप्राण असतात. यापैकी धनंजय हा मस्तकात रहात असून तो कधीही शरीर सोडत नाही. त्या धनंजयाला भूषण करणारे ते धनंजयादिभूषण. अर्थात यांच्या कृपेने या शरीरात चैतन्य तत्व शेवटपर्यंत स्थिर राहते ते धनंजयादिभूषण.
कपोलदानवारण- हा शब्द गजमस्तकाशी संबंधित आहे. हत्तीच्या सोंडेवर समोर जे अलंकृत कापड सोडतात त्याला कपोलदान असे म्हणतात. ते धारण केलेला वारण म्हणजे हत्ती.
असा सजवलेला हत्ती हे सर्वोच्च समृद्धीचे प्रतीक आहे.भगवान गणेश अशा सर्वोच्च वैभवाने अलंकृत असल्याने त्यांचे नाव आहे कपोलदानवारण.
पुराणवारण- वारण शब्दाचा आणखी एक अर्थ आहे अदृश्य. पुराण वारण याचा अर्थ पुराणांमध्ये अदृष्य स्वरूपात असणारे. कोणत्याही ग्रंथात शब्द हे दृश्य असतात तर अर्थ अदृश्य असतात. सगळ्या पुराणांचा अंतिम अर्थ, अंतिम कथनीयतत्व, अंतिम सिद्धांत ते पुराणवारण.
अशा भगवान गणेशांची मी भजन करतो, आराधना करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
January 4, 2020
श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!!
January 28, 2012
जागतिक तापमानवाढीचा महाराक्षस समोर उभा ठाकल्यावर माणसाला जाग आली आणि जगभर हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हल्ली बाजारात आलेली विद्युत ऊर्जेवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने हा त्या प्रयत्नांचाच एक भाग होय. पण, हे आता जमिनीवरील वाहनांपुरते मर्यादित राहिले नाहीये, तर जहाजे आणि विमानेसुद्धा विद्युत ऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जहाजांच्या बाबतीतील या प्रयत्नांचा आढावा घेणारा हा लेख…
October 27, 2023
आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोत. यंत्राप्रमाणे घाई घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहे. शारीरीक श्रम कमी झाले, जीवन आरामातजगणे सोपे व सुकर झाले, सर्व सोई -सुविधा उपलब्ध झाल्या. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट कायमचीच हरवून गेली, ती म्हणजे मन:शांती होय ! आजआपल्याकडे मन:शांती सोडून सर्व काही आहे.
July 31, 2018
यश चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने अमिताभ यांना खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली.
January 24, 2022
१८५३ मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली तरी पुणं गाठणं कठीणच होतं. याचं कारण होतं, मधला अजस्र खंडाळा घाट. त्या काळात बग्गीतून किंवा घोड्यावर बसून मुंबई-पुणे प्रवास ३-४ दिवसांत पुरा केला जाई. सन १८३१ मध्ये मुंबई-पुणे पत्रं पाठविण्याची पोस्टाची सोय होती. या प्रवासास ४८ ते ७२ तास लागत. घोडे व बैलगाड्यांच्या मदतीनं भारतभर पत्रे पाठविण्याची सोय असे. त्यांना काही महिने लागत.
हळूहळू मुंबई ते कंपोली (खोपोली) व पुणे ते खंडाळा अशी रेल्वेसेवा सुरू झाली. मधला घाटाचा प्रवास तहूने केला जात असे. या संपूर्ण प्रवासाचं भाडं असं होतं.
• पुणे ते खंडाळा १० ।। आणे
• खंडाळा ते खोपोली, तट्टू १२ आणे
• खोपोली ते मुंबई १८ आणे
हा प्रवास म्हणजे एक दिव्यच असे. यावर एक आर्याही प्रसिद्ध झाली होती.
१४ जून १८५८ मध्ये पुण्यातील 'ज्ञानप्रकाश' अंकात मुंबई पुणे आगगाडीच्या प्रवासाविषयी एक बातमी छापण्यात आली होती. ती बातमी अशी होती: 'आमचे वाचणारास आगीच्या गाडीचा रस्ता पुण्यापासून खंडाळ्यापर्यंत सुरू होणार या विषयी आशा देता देता आम्ही थकलो व आमचे लिहिणे वाचतांना कंटाळा आला असेल असे वाटते, परंतु आज रोजी आगीची गाडी पुण्याहून खंडाळ्यापर्यंत सुरू होणार आहे. अद्यापि दर, दाम यांचे जाहिरनामे, वगैरे काही एक व्यवस्थेचा प्रकार प्रसिद्धीस आला नाही, पण पुण्याहून आगीची गाडी सकाळी साडेसहा वाजता व सायंकाळी साडेतीन वाजता निघत जाईल येवढे मात्र तूर्त कळले आहे.'
'चाऊ चाऊ' या पुस्तकाच्या लेखिका लेडी फॉक्लंड यांनी लिहिले आहे, 'पुण्यातील एका प्रवाशाने कंपनीला लिहिले, की हिंदू सोडता इतर धर्मांच्या व्यक्तींन शिवाशिवीच्या भीतीमुळे मी गाडीत बसू शकत नाही, आपल्यासाठी गाडीत १..ळे बसण्याची व्यवस्था करावी.' रेल्वेने या मागणीचा साफ इन्कार केला; तेव्हापासूनच रेल्वेत जातपातीला मुठमाती मिळाली.'
खंडाळा घाटाची यशस्वी बांधणी १८७५ पर्यंत पूर्ण होऊन, १८८० पासून मुंबई-पुणे धुराची गाडी ८ तासांत हे अंतर कापू लागली. हा प्रवास देशातील सर्वोत्कृष्ट प्रवासातील एक म्हणून मानला जाऊ लागला . भारतीय रेल्वे इतिहासातील बांधलेला ' सर्वांत अवघड मार्ग ' म्हणून या मार्गाची जगात प्रसिद्धी झाली . थोड्याच वर्षांत रेल्वेची डेक्कन क्वीन ( दख्खनची राणी ) ही गाडी या मार्गावर दिमाखात धावू लागली . कवि वसंत बापटांनी यावर ' दख्खनची राणी ' ही सुरेख कविता लिहिली . नुकतेच दख्खनच्या राणीने ८७ व्या वर्षांत पर्दापण केलं . चित्तरंजन कारखान्यात बनलेलं इलेक्ट्रिक इंजिन ' लोकमान्य ' नावाने डेक्कन क्वीनला लागत असे . संपूर्ण दक्षिण भारत मुंबईशी या रेल्वेमार्गांनं जोडला गेला . आज या मार्गावर १०० ते १२५ प्रवासीगाड्यांची २४ तास ये जा चालू असते . आता हे अंतर इंटरसिटी एक्सप्रेस फक्त पावणे तीन तासात पार करते . थोड्याच वर्षांत एका तासाच्या आत हे अंतर कापले जाण्याकरता महत्त्वाकांक्षी योजना आखलेल्या आहेत . भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा मार्ग म्हणजे मानाचा मुकुट आहे.
-–डॉ. अविनाश वैद्य
November 9, 2022

सपुष्प वनस्पतींच्या मध्ये फुलांचे वेगवेगळे आकार, प्रकार, रंग, वास, अधिवास असतात. अगदी टाचणीच्या टोका पासून १-२ मीटर व्यास असणारी रेफ्लेशिया सारखी फुले बघायला मिळतात. त्यामध्ये ऑर्किडच्या फुलांची रंगविविधता, फुलांची आकर्षक रचना, मन मोहित करते. ऑर्किड फुलांची सौंदर्य, जटिलता आणि अविश्वसनीय विविधता वनस्पती जगात अतुलनीय आहे. या विदेशी सुंदरतेमध्ये पृथ्वीवरील फुलांच्या रोपांच्या सर्वात मोठ्या कुटूंबाचा समावेश आहे, त्यामुळे उच्चभ्रू लोकांच्या समारंभांमध्ये आवर्जून भेट देण्यात येणारे पुष्पगुच्छ असोत, पंचतारांकित हॉटेलमधील सजावट असो किंवा घरगुती गणपतींच्या मखरांमध्येही ऑर्किडच्या फुलांचा वापर वाढला आहे.
आपल्याकडील पश्चिम घाट ऑर्किडने समृद्ध असून, तेथे शंभरहून अधिक जंगली ऑर्किडच्या प्रजाती आढळतात. भारतात सर्वात ज्यास्त संख्येने ऑर्किड्स मेघालय व अरुणाचल प्रदेशात मिळतात.
सपुष्प वनस्पतींच्या ऑर्किडेसी या कुलातील ऑर्किड (आमर) ही एक वनस्पती आहे. अंटार्क्टिका तसेच वाळवंट सोडून सर्व वनप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात. उष्णकटिबंधात यांच्या अनेक जाती आढळत असून त्या अपिवनस्पती (दुसर्या वनस्पतींच्या आधारे वाढणार्या वनस्पती) आहेत. मात्र, त्या परजीवी नाहीत. समशीतोष्ण भागात ही वनस्पती जमिनीवर वाढते. काही ऑर्किड मृतोपजीवी असून त्या पर्णबुरशीसारख्या मृत सेंद्रिय पदार्थांवर वाढतात. अपिवनस्पती प्रकारातील या जातीची हवाई मुळे (roots) आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. ऑर्किडच्या जमिनीवर वाढणार्या जातींमध्ये आभासी कंद आढळतात. बहुतेक ऑर्किड वनस्पतींना लहान फुले येतात.
निसर्गाने निर्माण केलेल्या अनेक अद्भूत रहस्यांमध्ये फुलांचे विश्व नेहमीच मन आकर्षून घेते. रंगाने, आकाराने चटकन लक्ष वेधून घेणारी ही फुले म्हणजे निसर्गाचा चत्मकारच आहे. पावसाळ्यानंतर बहरणाऱ्या फुलांच्या ताटव्यांबद्दल लेखक, कवींनी विपुल लेखन केले आहे. अनेक नामवंत चित्रकारांची सुरुवात फुलांच्या चित्रांपासून झाली, अलीकडे हौशी फोटोग्राफरना विविधरंगी फुले म्हणजे हक्काचे ऑब्जेक्ट वाटते. ही मंडळी फुलांसाठी नवनवीन कल्पना लढवतात. पुराण काळापासून फुलांना धार्मिक महत्त्व असून, ती शुभकार्याचे प्रतीक मानली जातात. देशात फुलांच्या बाजारपेठेतील उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यात ऑर्किड फुलांचा फार मोठा वाटा आहे. सध्या यांची निर्यातही करण्यात येते. ही पण मोठी संधी आहे.
स्थानिक भाषेत ऑर्किडला आमरी म्हणतात. महाराष्ट्र राज्यात ११० पेक्षा जास्त आमरींची नोंद झाली असून, दर काही वर्षांनी नवीन जाती सापडतात. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये वनसंपदेतील प्रचंड वैविध्य पहायला मिळते. सह्याद्रीच्या या पट्ट्यात ९० हून अधिक प्रकारची जंगली ऑर्किड पाहायला मिळतात. महाराष्ट्रात एंडेमिक (दुसरीकडे न आढळणाऱ्या) ४१ प्रजाती ह्या ३० जातीमध्ये विभागलेल्या आहेत. याशिवाय हबेनारिया च्या २० प्रजाती, डेंड्रोबियमच्या ११, प्रजाती आहेत. पावसाळा सुरू झाला की ऑर्किडचा हंगाम सुरू होतो आणि थंडीच्या अखेरपर्यंत ही फुले उपलब्ध होतात.
पारंपरिक फुलांच्या बरोबरीने गेल्या दहा ते बारा वर्षांत ऑर्किडच्या फुलांनी ग्राहकांच्या मनात घर केले आहे. रंगाने आकर्षक आणि अतिशय नाजूक अशी ही फुले ग्राहकांच्या चटकन नजरेत भरतात. सुरुवातीला ही फुले महाग असल्याने उच्चभ्रू वर्गापर्यंतच मर्यादित होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे ऑर्किडची शेती सुरू झाल्याने फुलांची उपलब्धता वाढली आहे. अलीकडच्या काळात ऑर्किड्स उतिसंवर्धनाने सुद्धा वाढवले जाते. सध्या देशात विक्री होणाऱ्या ऑर्किडमधील सत्तर टक्के फुले थायलंड आणि मलेशियातून येतात. आयात होणाऱ्या ऑर्किडच्या तुलनेत आपल्या कडील ऑर्किडचे उत्पादन अतिशय अत्यल्प आहे. गुजरात सरकारने अलीकडेच ऑर्किड उत्पादनासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, शहरातील इमारतींच्या गच्चीवर आता ऑर्किडची बाग लावण्यात येत आहे. याचाच परिणाम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या बाजारपेठेत बघायला मिळाला. स्थानिक फुलांच्या बरोबरीने ऑर्किडची फुले, त्यांचे हार छोट्या फूलविक्रेत्यांकडेही उपलब्ध होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात केलेल्या मखरांमध्ये ऑर्किडचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आगामी काळात ऑर्किड फूल जरबेरा आणि इतर परदेशी फुलांना मागे टाकेल, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.
ऑर्किडच्या चाहत्यांची संख्या वाढत असली तरी, सध्या बाजारात मिळणारे फूल हायब्रिड आणि विदेशी जातीचे आहे, हे अनेकांना माहितीच नाही. जगभरात ऑर्किडच्या असंख्य जाती आढळतात. त्यातील काही जातींना बाजारपेठेत स्थान मिळाले असून, अजूनही ९० टक्के ऑर्किडची फुले आजही जंगलातच पाहायला मिळतात.
या फुलांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतागुंत असून परागीभवन घडून येण्यासाठी विशिष्ट फुलपाखरे किंवा कीटक विशिष्ट प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होतात. ऑर्किडच्या २०० जातींमध्ये स्वयंपरागीभवन घडून येते. मात्र हवा किंवा पाणी यांच्यामार्फत त्यांचे परागीभवन होत नाही. ऑर्किडमध्ये कीटकांद्वारे परागीभवन घडून येते. फुलातील सामान्य व त्यापेक्षा अनेकविध आढळणारी जटिल संरचना परागकणाच्या या खात्रीच्या व काटकसर साधणाऱ्या पद्धतीशी सुसंगत असते. त्यापासून ऑर्किडचा पुढे फार मोठा बीजप्रसार व जातींचा प्रसार घडून आलेला आहे. या कुलातील अनेक वनस्पतींचे शोभेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. मात्र, या कुलातील फक्त व्हॅनिला ही जाती आर्थिक दृष्टया फायद्याची आहे. या जातीपासून मिळणारा व्हॅनिला हा सुंगधी अर्क आइस्क्रीममध्ये मिसळतात. जगभर ऑर्किडची लागवड हा एक हरितगृह उद्योग झालेला आहे. त्यामुळे ऑर्किडचे हजारो संकर निर्माण झाले असून त्याच्या बागा फुलविण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत.
उष्णकटिबंधात यांचे प्रमाण मोठे असून बहुतेक अपिवनस्पती आहेत. समशीतोष्ण कटिबंधात त्यामानाने प्रमाण कमी असून तेथे त्या भूमीवर वाढणाऱ्या असतात. अपिवनस्पती प्रकारातील जातींची हवाई मुळे आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. तर जमिनीवरच्या जातींत कंद किंवा ग्रंथिक्षोड आढळतात. काही अपिवनस्पतींत आभासी कंद असतात. पाने साधी, जाडसर, लांबीत अधिक, मध्ये पन्हाळी व बहुधा दोन रांगांत असतात; क्वचित त्यांचा ऱ्हास होऊन ती खवल्यांसारखी होतात. व्हॅनिला नावाच्या जातीपासून (व्हॅनिला प्लॅनिफोलिया) मिळणारा व्हॅनिला नावाचा सुगंधी अर्क प्रसिद्ध आहे.
बर्याच वेगवेगळ्या वाढत्या परिस्थितीत फळ देणा ऱ्या ऑर्किडच्या अनेक प्रकारांसह, आपण पुरवू शकणार्या परिस्थितीस अनुकूल असलेल्या ऑर्किड शोधणे तुलनेने सोपे आहे – मग ते स्वयंपाकघरातील खिडकी किंवा पूर्ण आकाराचे ग्रीनहाऊस असले तरीही.
बहुतेक लागवड केलेले ऑर्किड मूळचे उष्णकटिबंधातील आहेत. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ते स्वतःला झाडाची साल किंवा इतर वनस्पतींच्या पृष्ठभागाशी जोडतात. त्यांचे जाड, पांढरे मुळे ओलावा आणि विरघळलेले पोषकद्रव्य शोषण्यासाठी विशेषतः अनुकूलित केले जातात. कारण या उष्णकटिबंधीय ऑर्किड सामान्यत: जंगलाच्या मजल्याऐवजी झाडे उंच वाढतात, परंतु ते चांगल्या हवेच्या अभिसरण आणि भरपूर प्रमाणात प्रकाश मिळवतात. त्यांना संपूर्ण वर्षभर १२-तासांचा दिवस आवडतो, आणि समशीतोष्ण प्रदेशांमधील मिडसमर परिस्थितीसारखेच – जास्त तीव्रतेच्या प्रकाशाची आवश्यकता असते.
ऑर्किड वाढण्यास कठीण आहे का?
हो, बऱ्यापैकी कठीण आहे. खरं तर, ऑर्किडचे डझनभर प्रकार आहेत आणि शेकडो संकरित आहेत, जे सनी विंडोसिल वर किंवा दिव्याखाली खाली वाढत आहेत.
ऑर्किड्स कसे वाढतात?
ऑर्किड्स सहसा दोन विस्तृत श्रेणींमध्ये विभागल्या जातात ज्या त्यांच्या वाढण्याच्या सवयींचे वैशिष्ट्य दर्शवतात. मोनोपोडियल ऑर्किड्समध्ये एकल, सरळ स्टेम असतो आणि पाने स्टेमच्या बाजूने एकमेकांच्या विरुद्ध अशी व्यवस्था असते. वरच्या पानांच्या पायथ्यापासून फुलांचा काटा दिसतो. या वाढीच्या सवयी असलेल्या ऑर्किडमध्ये फॅलेनोप्सीसचा समावेश आहे.
या ऑर्किड्स क्षैतिजरित्या वाढतात, जुन्या रायझोम वरून नवीन शूट तयार होते. नवीन शूटच्या शीर्षस्थानी पाने आणि फुलांचे स्केप्स तयार होतात. बर्याच सिमोडियल ऑर्किड्स स्यूडोबल्ब बनवतात. या वनस्पती दीर्घकाळापर्यंत दुष्काळापासून बचावासाठी पाणी आणि पोषकद्रव्ये साठवतात. सिम्पोडियल ऑर्किड्समध्ये फोरसिया, सायंबिडियम, ऑन्सीडियम आणि डेंड्रोबियम असतात.
ऑर्किड्सचे त्यांच्या मूळ वस्तीद्वारे देखील वर्गीकरण केले जाऊ शकते. हे ओर्चीड आढळले म्हणजे त्या भागातील तापमान, आर्द्रता आणि प्रकाश पातळी यांचे संकेत देते. फ्लेनोप्सीस आणि पॅफिओपेडिलम सारख्या आर्द्र उष्णकटिबंधीय मूळ ऑर्किड्स, दिवसाच्या तापमानात ७३°-७५° डिग्री फॅरनहाइट तापमान पसंत करतात, ज्यामध्ये आर्द्रता ८०-९० टक्के असते.
सिंबिडियम आणि डेन्ड्रोबियमसह उबदार-हवामान ऑर्किड्स सरासरी तापमान ५५°-७०° फॅ. आर्द्रतेचा स्थिर पुरवठा आणि चांगल्या हवेचे अभिसरण दर्शवतात. दक्षिणेकडील विंडोमध्ये ते सामान्यत: आनंदी असतात, तरी त्यांना उन्हाळ्याच्या काळात थोडेसे शेडिंगची आवश्यकता असू शकते. मासदेवॅलिया आणि एपिडेंड्रमसारख्या उच्च उंचीच्या ऑर्किड्स मेघालयाच्या जंगलात वाढतात जिथे सरासरी तापमान ५५°-ते ७०° फॅ असते आणि आर्द्रता खूप जास्त असते. हे ऑर्किड फिल्टर केलेले प्रकाश पसंत करतात जे जास्त तीव्र नसतात.
ऑर्किडची काळजी कशी घ्याल?
ऑर्किडच्या 30,000 वेगवेगळ्या प्रजातींसह सामान्य काळजी आणि लागवडीच्या सूचना देणे अशक्य आहे. तथापि, ऑर्किड कसे दिसते ते प्रकाश, पाणी आणि वाढत्या माध्यमासाठी त्याच्या प्राधान्यांचा संकेत देऊ शकतो.
जर त्या झाडाला काही पाने किंवा चामड्याची पाने (बहुतेक फ्युसिया आणि ऑन्सीडिअम प्रमाणे) असतील तर त्या झाडाला जास्त प्रकाशयुक्त वातावरण हवे असेल. जर पाने मऊ आणि कोमल असतील (काही फॅलेनोप्सीस आणि बहुतेक पेफिओपिडिलम सारखे) तर झाडे बहुधा हलके-संवेदनशील आहेत आणि त्यांना दक्षिणेस तोंड असलेल्या खिडकीवर ठेवू नये.
जर ऑर्किडमध्ये चरबीयुक्त स्यूडोबल्ब असतील तर ते थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. अशी झाडे लाव्हा (lava) खडकाच्या खडबडीत भागांवर वाढवावे. जर ऑर्किडला स्यूडोबल्ब नसतील तर त्याला वारंवार पाण्याची गरज भासू शकते, किंवा स्फॅग्नम मॉस सारख्या अधिक आर्द्रतेने वाढणार्या माती मध्ये पीक घ्यावे.
प्रकाश:
सामान्य नियम म्हणून, ऑर्किड हलक्या प्रकाशाच्या सहवासात वाढतात. उत्कृष्ट परिणामांसाठी, त्यांना वर्षाकाठी १२-१४ तासांचा प्रकाश मिळाला पाहिजे. उष्णकटिबंधीय वातावरणात, नैसर्गिक प्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता समशीतोष्ण हवामानात बदलत नाही. या कारणास्तव, हिवाळ्यातील महिन्यांत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम प्रकाश पुरवला पाहिजे.
दक्षिण-आणि पूर्वेकडे असलेल्या खिडक्या सामान्यत: ऑर्किडसाठी सर्वोत्तम स्थान असतात. पश्चिम खिडक्या खूप गरम असू शकतात आणि उत्तर खिडकी सहसा खूप गडद असतात. आपल्याकडे आपल्या ऑर्किडसाठी विंडोसाठी चांगले स्थान नसल्यास, ते कृत्रिम दिव्याखाली वाढण्यास आनंदी असतील. चार फूट फ्लूरोसंट बल्बच्या संचापासून आर्किड ६ ते ८ इंचा पेक्षा जास्त अंतरावर स्थित असावेत. फक्त पांढरे, कोमट पांढरे आणि फिकट बल्ब वाढविण्याच्या फायद्यांविषयी मतभिन्नता आहे. नवीन पूर्ण-स्पेक्ट्रम बल्ब बहुदा सर्वात चांगली निवड आहे. टेफ्रियल ऑर्किड्स, जसे पेफिओपीडिलम्स आणि काही सिम्बिडीयम्स, मातीमध्ये वाढतात.
परंतु बहुतेक उष्णकटिबंधीय ऑर्किड्स एपिफाइट्स असतात, याचा अर्थ ते मातीऐवजी हवेत वाढतात. त्यांच्या मांसल मुळांना वेलामेन नावाच्या पांढऱ्या पेशींच्या थराने झाकलेले असते, जे पाणी शोषण्यासाठी स्पंज म्हणून कार्य करते. कोटिंग देखील मुळे उष्णता आणि ओलावा कमी होण्यापासून वाचवते.
ऑर्किड वाढणार्या माध्यमामध्ये हवेचे अभिसरण चांगले असणे आवश्यक आहे आणि पाणी लवकर निथळण्याची सोय आवश्यक आहे. यास मुळांना चिकटून राहण्यासाठी काहीतरी सुरक्षित सोय असावी. ऑर्किडच्या प्रकारानुसार, ते पीट मॉस, त्याचे लाकूड, झाडाची साल, वाळलेल्या फर्न मुळे, स्फॅग्नम मॉस, रॉक लोकर, पेरलाइट, कॉर्क गाळे, दगड, नारळ फायबर, लावा रॉक किंवा या मिश्रणामध्ये बरीच मिश्रित सामग्री तयार करतात. काही एपिफायटीक ऑर्किड्स ट्री फर्न किंवा कॉर्कच्या स्लॅबवर देखील वाढवले जाऊ शकतात.
पाण्याची व्यवस्था कशी असावी?
बहुतेक ऑर्किड जास्त प्रमाणात ओलावा सहन करण्यापेक्षा दुष्काळ सहन करतात. ऑर्किडला पाण्याने भांड्यात बसण्यापेक्षा काहीही जलद मारत नाही. पुरेसे हवा अभिसरण न करता, वनस्पती गुदमरल्यासारखे मरेल.
ऑर्किड्सचा प्रसार:
बियाण्यापासून ऑर्किडचा प्रचार करणे फार कठीण आहे. इतर वनस्पतींच्या बियासारखे नाही, ऑर्किड बियाण्यांमध्ये पौष्टिक संचय उती नसतात.
बर्याच ऑर्किड वर्षातून एकदा फुलतात, परंतु जर त्यांची नीट निगा घेतली तर अधिक वेळा फुलतील. जर आपल्याला एखाद्या विशिष्ट हंगामात फुलणारी ऑर्किड हवी असेल तर त्या वेळी बहरलेली एखादी वनस्पती खरेदी करणे सर्वात चांगले. जेव्हा ऑर्किड फुलते तेव्हा ते सहसा सहा ते दहा आठवड्यांपर्यंत पूर्ण उमलते.
प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी पश्चिम घाटातील ऑर्किडची सविस्तर माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल डॉ. पांडे म्हणतात, ‘पश्चिम घाटात ऑर्किडचे वैविध्य मोठे आहे. जमिनीवर येणारी तसेच झाडांवर येणारी दोन्ही प्रकारची फुले आपल्याला तिथे बघायला मिळतात. पुणे परिसरात, लोणावळा, खंडाळा, मुळशी, ताम्हिणी, पुरंदर या भागात उत्तम प्रकारची ऑर्किड फुलतात. तसेच कोल्हापूर भागात गगनबावडा , पाटगाव, आंबोली, फोंडा घाट, आंबा घाट या परिसरातही वैविध्यपूर्ण ऑर्किड सापडतात.
अशी बहुरंगी ऑर्किड्स कोणाला आवडणार नाहीत बरे?
संदर्भ:
मराठी विकिपेडिया - डॉ. वा .द, वर्तक
गुगल वरील अनेक लेख
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
९.०६. २०२४
______________________________________________________
July 31, 2024
जागतिक मांजर दिवस हा २००२ पासून इंटरनॅशनल अनिमल वेलफेअर या संस्थेने साजरा करण्यास सुरवात केली. युरोप मध्ये १७ फेब्रुवारी व रशिया मध्ये १ मार्चला मांजर दिवस साजरा केला जातो.
कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर. प्रत्येकालाच लहानपणापासून प्राणी-पक्षिजगताची जाणीवदीक्षा दिली जाते ती चिऊ, काऊ आणि अखेरीस माऊच्या ओळखीने. पूर्वी वाडे, चाळी, बंगले संस्कृतीमध्ये अनेक दारांआड तरी या वाघाच्या ‘पाळीव’ मावशीचा वावर असायचा. अन् अनेक घरांचा तिच्यावर मौखिक दावा असायचा.
गंमत म्हणजे हा दावा असणारे मांजर मालक असल्याच्या भ्रमात राहणाऱ्या प्रत्येक घराला चकवा देत ऐटीत बागडायचे. चार घरांतील स्वयंपाकघरात आवश्यक पदार्थाची हक्कवसुली, सात उंबऱ्यांमध्ये फिरवत त्या घरांत पिल्लांना दाखवत गुपचुप गुडूप होण्याची कसरत करणारी मांजरे प्रत्येकाच्या स्मृतिकोशात दडली असतील. खाणे हवे असले, लाड करून हवे असले की जवळ येणारे आणि एरवी जगातल्या कोणालाही फुकटचा भाव न देता आपल्या जागेवर पहुडणे हे या प्राण्याचे सार्वत्रिक वैशिष्टय़.
मांजर पाळीव असले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य आणि आब राखून असते. पाळीव असूनही मांजरांचा अनेक उंबऱ्यांवरचा भटका शिरस्ता आजही गाव आणि शहरांत सारखाच आहे. मात्र फ्लॅट संस्कृतीमुळे शहरी-निमशहरी भागांमध्ये कुत्र्याप्रमाणेच घरामध्ये जाणीवपूर्वक मांजर बाळगले जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. चार घरी फिरणाऱ्या मांजरींचे चित्र एकाच घरात २४ तास विसावणाऱ्या मांजरामध्ये परावर्तित झाले आहे. लोकांमध्ये मांजराच्या बाबतीत अनेकदा टोकाच्या भूमिका दिसतात.
मांजर अत्यंत आवडते असल्यास पाहताक्षणी तिच्या डोक्यावर कुरवाळण्यास हात पुढे होतो. तर नावडते असल्यास तिच्या कोणत्याही वर्तवणुकीबाबत हातातली वस्तू फेकून मारावी इतका संताप येतो. घरा, वाडय़ांमध्ये आगंतुक येणारे मांजर उंच इमारतींमधील फ्लॅटमध्ये दुरापास्त बनल्यानंतर आज मांजर विकत घेऊन पाळण्याचे प्रमाण वाढत आहे.
आपल्याकडे स्थानिक प्रजातीच्या मांजरात बरेच वैविध्य पाहायला मिळते. रंग, केस, आकार, गुणवैशिष्टय़े असे वैविध्य असूनही त्याच्या नेमक्या प्रजातींची किंवा वंशावळीची नोंद करण्यातच आलेली नाही. त्यामुळे गावठी किंवा देशी मांजर आणि परदेशी प्रजाती अशी ढोबळ वर्गवारी केली जाते.
स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद असलेल्या मांजरांमध्ये आपल्याकडे मिळणाऱ्या मांजरांची गुणवैशिष्टय़े दिसत असली, तरीही त्याची भारतीय प्रजाती म्हणून नोंद नाही. पाळीव मांजरातील स्वतंत्र प्रजाती म्हणून साधारण ७३ प्रजातींची नोंद जगात वेगवेगळ्या संस्थांनी केली आहे. त्यामध्ये अमेरिकन प्रजातींचा वरचष्मा आहे. नोंद झालेल्यापैकी जवळपास ४० प्रजाती या अमेरिकन आहेत. त्यामध्ये नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच ‘हायब्रिड आणि मिक्स ब्रिड प्रजातींचाही समावेश आहे.
हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांचे मुद्दाम ब्रिडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे मुद्दाम न ठरवता ब्रिडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वेगळी गुणवैशिष्टय़े दिसली, तर त्याची नोंद मिक्स ब्रिड म्हणून केली जाते.
भारतातील परदेशी मांजरांचे वेड वाढवण्यात हॉलीवूडपटांनी मोठा वाटा उचलला आहे. ‘स्टुअर्ट लिटिल’ या चित्रपटानंतर पर्शिअन, बॉबटेल या प्रजातींच्या मांजराची मागणी वाढली. ‘प्रिन्सेस डायरी’ या चित्रपटानंतर पांढरे अंग आणि काळे तोंड असणारे रॅग डॉल मांजर आपल्याकडे पसंतीस उतरले. आता हळूहळू इतरही अनेक वंशावळीची मांजरे भारतात आपले बस्तान बसवू लागली आहेत. येथेच त्यांचे ब्रिडिंगही होऊ लागले आहे. देशी मांजराशी ब्रिडिंग होऊन काही नव्या प्रजातीही जन्माला येत आहेत. घरी मांजर ठेवणे या पलिकडे जाऊन त्याच्यासाठी तयार खाणे, कपडे, शाम्पू, पावडर अशी उत्पादने आणि पार्लर, हॉस्टेल अशा सेवांनी भारतीय बाजारात जम बसवला आहे.
साधारणत: गेल्या दोन दशकांपासून आपल्याकडे परदेशी मांजरे मार्जारप्रेमींच्या घरी लाडोबा झाली आहेत. पर्शियन ही मूळ इराणमधील प्रजाती, तुर्किश अंगोरा ही तुर्कस्तानात मूळ असलेली प्रजाती, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, माइन कून, रॅग डॉल या अमेरिकन प्रजाती, सयामी ही थायलंडमधील प्रजाती पाळण्याकडे सध्या प्राणिप्रेमींचा कल आहे. बहुतेक घरात ‘बेंगाल’ या प्रजातीची मांजरे असतात.
ही मांजरे बहुतेकदा आपल्या कबऱ्या, ठिपकेवाल्या देशी मांजरांशी साधम्र्य असलेली असतात. त्याचप्रमाणे पूर्ण काळी कुळकुळीत आणि हिरवे डोळे असलेली ‘बॉम्बे’ या प्रजातीशी साधम्र्य असलेली मांजरेही दिसतात. मात्र बेंगाल किंवा बॉम्बे अशी नावे असली, तरी याची नोंद अमेरिकन प्रजाती म्हणून आहे. साधारणपणे किमान ५ हजार ते कमाल ८० हजार या अशा किमतीत ही मांजरे मिळतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता.
August 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti