(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कर्दळीवन परिक्रमा : एक प्रत्येकाने घेण्यासारखा अनुभव

    प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे..

      December 3, 2015


  • प्रेरणादायी हलधर नाग

    जन्मापासून पायात नाही घातली चप्पल, तिसरीतून ड्रॉप आऊट. हलधर नाग या कवीवर पाच Ph.D जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात आपण कसं स्वतःला उमलऊ शकू याचा विचार आपण करायला हवा. अंध मूकबधिर अपंग यांनी हार न मानता अनेक विक्रम केले आहेत जे धडधाकट माणसालाही लाजवतील.काही ही संसाधने नसतांना अनेकांनी यशश्री खेचून आणली आहे. अनेकांनी रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला आहे. काही जणांना शाळेत जाण्यासाठी नदी पोहून पार करावी लागत होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा उघडण्यासाठी फू्लें‌ दांपत्याने अंगावर शेण झेलत‌ लोकांचा रोष पत्करून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

      July 15, 2026


  • स्ट्रिंग सिद्धांत

    इथे particles ला string म्हणावे लागेल याच string पासून हे सर्व विश्व निर्माण झालेले आहे . म्हणून ‘string theory’ ला ‘theory of Everything’  सुद्धा म्हणतात.

      June 6, 2024


  • डिझेल व पेट्रोलमधील फरक

    डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.

      February 27, 2023


  • शिरीष

    ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.

    ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न अाहे.

    चला आता आपण शिरीषाचे औषधी गुणधर्म जाणून घेऊयात:

    १)सुज आलेल्या भागावर शिरीष बी चा लेप करावा.

    २)दातांच्या रोगामध्ये शिरीषाचा सालीचा काढा गुळण्या करायला उपयुक्त आहे.

    ३)दम्याच्या रोगात शिरीष फुलांचा रस मध व पिंपळी चुर्ण घालून देतात.

    ४)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना शिरीष सालीचे चुर्ण समभाग गाईच्या तुपामधून देतात.

    ५)शिरिष सालीचा काढा त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 16, 2017


  • कोकण, नारळ आणि कोकम

    कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच.

      February 7, 2023


  • विरह, दोन दिवसांचा

    माझ्या बायकोने काढले. कसे काढले तिलाच माहित. खूऽऽऽप खूऽऽऽप त्रास होत होता तिला, लक्ष कशा कशात लागत नव्हतं, जीवन असार आहे असं वाटू लागलं होतं. तसा मी(आयुष्याचा साथीदार)आणि आमचा लेक घरातच होतो जवळच तिच्या, म्हणजे काही जास्त त्रास झाला तर काळजी घ्यायला. लग्नाचा नवरा, पोटचा पोर पण त्याची कमतरता का कुठे आमच्यामुळे भरून येणारय??? आणि आमच्याकडे, आमच्या आजूबाजूला तो सतत तिला दिसत होता, त्यामुळे अपमान, असूया, डोक्याची आग, विरहाचं दुःख आणखीनच वाढत होतं.

      September 18, 2022


  • वेळ हीच खरी संपत्त्ती !

    विसाव्या शतकात बदलाचा वेग झपाट्याने वाढला. आता 21 व्या शतकात तर हा वेग आपल्या अत्युच्च पातळीवर पोहोचला आहे. इथे ‘बदल’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरलेला आहे.

      August 28, 2005


  • धनुष्यबाण’, ‘नारायणास्त्र’ ते ‘वज्रस्त्र’ !

    गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसार माध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला. एक “स्वाभिमान” दुखावलेला कोकणातील नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी काल आपली नवीन दिशा जाहीर केली. राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नाव जाहीर केले.

      October 2, 2017


  • पर्यावरणचा र्‍हास, आवळत आहे मृत्यूचा पाश !

    पाण्याचे व प्रदुषणाचे संकट आज आपल्याला मोठे वाटत नसले, तरी त्याची तीव्रता क्षणोक्षणी वाढत आहे. यासंदर्भातला निष्काळजीपणा मानवजातीच्या विनाशापर्यंत नेऊ शकते.सजीवांच्या अस्तित्वासाठी शुद्ध व निर्मळ पाण्याची गरज आहे. पाण्यात विरघळलेल्या आक्सिजनचे प्रमाण प्रतिलिटर ८ मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रदूषित होते, हेच प्रमाण प्रतिलिटर ४ मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास सजीव नष्ट होतात.

    गरजेच्या प्रमाणात पाणी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.याबाबतचे अमरावती जिल्ह्यातील 'चारगड' प्रकरण फार बोलके आहे. पाण्याचे संकट, घातक रसायनांचा भरणा, हरितगृह वायूंचे संकट, हिमपर्वतांचे वितळणे, पृथ्वीच्या तापमानातील वाढ, सजीवांचे नैसर्गिक चक्र नष्ट होणे ह्या सर्व बाबी माणसाची मती गुंग करणाऱ्याच आहेत.

    " पाण्यात मिसळले जाणारे घातक रसायने व त्यापासून शरीरावर होणारे अनिष्ट परिणाम "

    घातक पदार्थ शरीरावर परिणाम रसायनांचा उगम

    १) आर्सेनिक - कातडी व रक्ताचा कर्करोग - भूगर्भ, कीटकनाशके, रिफायनरी

    २) काडमियम - मुत्रसंस्था - भूगर्भ, कागद व ब्याटरी कारखाने, गल्बनाइजनळ

    ३) तांबे - पचनसंस्था - भूगर्भ, रासायनिक द्रव्य

    ४) सायनाइड - मज्जसंस्था, थायराइड - प्लास्टिक व धातुंचे कारखाने, खाते, कीटकनाशके

    ५) फ्लोराइड - हाडे व दात - भूगर्भ, खाते व अल्युमिनियम कारखाने

    ६) शिसे - लहान मुले,किडनी,रक्तदाब - भूगर्भ,पिण्याच्या पाण्याचे नळ

    ७) पारा - किडनी - भूगर्भ, कारखाने

    ८) नायट्रेट - गर्भावर - ड्रेनेजद्वारे, नैसर्गिक

    ९) सेलेनियम - नखे व हातपाय बधिर होने - रिफायनरी, नैसर्गिक

    -- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

      March 15, 2011