(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “ओबामा”क्रांती आम्हीही करू शकतो

    अमेरिकेत इतिहास घडला. अमेरिकन जनतेने तो घडविला. बराक ओबामा त्या इतिहासाचे महानायक ठरले.

      January 25, 2009


  • भाऊबिज..

    आज भाऊबिज. भावाला बहिणीने ओवाळायचा दिवस. आपल्या हिन्दू संस्कृतीत प्रत्येक नात्याची पूजा बांधली आहे..बाकी सर्व सोडा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘धद्या’ची पूजा करून ‘गल्ल्या’चीही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून.

      November 1, 2016


  • मानवता

    अज्ञान आणि मूर्खपणा यामधील फरक- अज्ञानी लोकांना योग्य माहिती,आकडेवारी इ माहीत नसते. मूर्खांकडे ती असते,तरीही ते चुका करतात. दुनियेत बहुधा अज्ञान अधिक आहे-रोजच ते झोंबते. हे दृश्य बदलायला पाहिजे.

      November 26, 2022


  • ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’

    ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.

    जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं.

    हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.

    पित्त प्रकृती
    ‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.

    पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.

    काय टाळावं-
    यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.

    वात प्रकृती
    ‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.

    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.

    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.

    कफ प्रकृती
    ‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.

    कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.

    काय टाळावं-
    पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- वैद्य राहुल सराफ

      January 6, 2017


  • इस्राईल व हिंदुस्थान

    १९७२ च्या म्युनिक आॅलिंपिक्स मधे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंना क्रूरपणे मारलं. इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यांनी आपल्या दुःखाचं,संतापाचं जाहीर प्रदर्शन न करता मोस्साद ला फक्त हुकूम दिले. पुढे या हत्याकांडाशी संबंधित असलेली एक-एक व्यक्ती मारली गेली. हे प्रतिशोध सत्र एक दोन नाही, तर वीस वर्षं सुरू होतं...वीस वर्षं ! याला म्हणतात राष्ट्राने घेतलेला बदला!!

    इस्रायली जनतेने आपल्या पंतप्रधानांना हे कधीही विचारलं नाही, की मोस्साद ने गोळ्या कुठल्या वापरल्या?, या कामासाठी कुणाला नेमलं?, त्यांच्यावर खर्च किती केला?, मारण्याऐवजी खटला का भरला नाही?......नेशन वाँटस् टु नो ऽ... वगैरे!! .त्यांनी त्यांच्या पंतप्रधानावर विश्वास ठेवला होता!

    राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, तेव्हा पंतप्रधान भारताचे असतात...भाजप चे किंवा काँग्रेसचे नसतात हे समजायला देशाला आणखी किती किंमत चुकवावी लागणार आहे?

    उमर, कन्हैय्या सारखे हलकट विद्यार्थी, बरखा दत्त सारखे वचकट पत्रकार आणि प्रकाश बाळांसारखे कुजकट बुद्धिवादी,सलमान शहारुख सारखे हरामखोर कलावंत, इस्रायलच्या नशिबी नव्हते, आणि भारतमातेच्या नशिबी आहेत....काय करणार?

    २०१६ च्या हत्याकांडाचा बदला भारत कसा घेणार आहे, हे काळालाच माहीत....

    मला उगीचच ' गाॅडफादर' कादंबरीतलं एक वाक्य आठवलं - " सूड ही एक अशी डिश् आहे, जी थंड करून खाल्ली तरच चांगली लागते ! "

    -- WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेले एक पोस्ट

      October 22, 2016


  • गौरीदशकम् – ११

    प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना-
    द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः ।
    वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं
    तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥

    या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,

    प्रातःकाले - या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे.

    भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव ठेवून पठन करावे. तो शुद्ध भाव आपण उठल्या उठल्या अधिक प्रबल असतो.

    त्यामुळेच सर्व व्रतवैकल्ये, प्रार्थना प्रभातकाली करण्यास सांगितलेल्या आहेत.

    प्रणिधानाद्- परिपूर्ण तन्मय होऊन. अर्थात मनामध्ये आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार नसतांना.

    भक्त्या- परिपूर्ण भक्तीने युक्त अशा अवस्थेत.

    नित्यं जल्पति गौरिदशकं यः - जो या गौरी दशकं स्तोत्राचे नित्य पठण करतो,

    त्याला काय काय प्राप्त होते हे सांगताना उत्तरार्धामध्ये आचार्यश्री म्हणतात,

    वाचां सिद्धिं- मनात येणारा प्रत्येक संकल्प मनातल्या मनात बोलल्याबरोबर देखील परिपूर्ण करणारी दिव्यशक्ती.
    व्यवहारात देखील जे बोलेल ते पूर्ण होण्याची शक्ती.

    सम्पदमग्र्यां- अग्र म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती. अध्यात्मशास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना षट्संपत्ती असे म्हणतात. आई जगदंबेच्या कृपेने ही संपत्ती साधकाला प्राप्त होते.

    शिवभक्तिं- भगवंताची परमभक्ती. शुद्ध मंगल भक्ती.
    तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति- पर्वतपुत्री अर्थात आई जगदंबा गौरी त्याला अवश्य प्रदान करते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 9, 2020


  • बिहार दिन

    स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता.

      March 22, 2022


  • द्रौपदीची साडी

    महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे

      January 18, 2024


  • किचन क्लिनीक – तिरफळ

    किचन क्लिनीक – तिरफळ

    साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते.
    ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच
    जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये फार वापर होतो असे देखील नाही पण गोवा कोकण प्रांतामधील लोक ह्याचा थोडाफार वापर आपल्या काही विशिष्ट खास व्यंजनांमध्ये आवर्जुन करतात.

    प्रामुख्याने ह्याचा उपयोग माशाच्या जेवणामध्ये केला जातो.कर्ली,बांगडे ह्या माशांची आमटी करताना अथवा शाकाहारी पदार्थ म्हणजे गोव्यात बनविले जाणारे भाज्यांचे खतखते ह्यामध्ये तिरफळे वापरली जातात.कारण माशांच्या आमटी मध्ये वापरण्याने मासे पंचायला सुलभ होतात.आणि त्या पासून अजीर्ण होत नाही.तसेच ह्याच्या विशिष्ट वासाने माशांचा विशिष्ट गंध कमी होतो(मी दुर्गंध म्हणणार नाही कारण आमचे शरीर ह्या माशांवरच पोसलेले आहे.

    तिरफळे चवीला तिखट,कडू असतात आणी ती ब-यापैकी उष्ण असतात.त्यामुळे ती शरीरातला वात व कफ दोष कमी करतात व पित्तदोष वाढवतात.

    जसे ह्याचा उपयोग भोजनात होतो तसाच ह्याचा उपयोग काही घरगुती उपचारांमध्ये देखील केला जातो बरे का!
    चला मग पाहूयात तिरफळाचे औषधी उपयोग:

    १)वातामुळे अंगात कळा येत असतील तर १/४ चमचा तिरफळ चुर्ण मधातून घ्यावे.

    २)अजीर्ण झाले असल्यास तिरफळ चुर्ण गूळामध्ये मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या तूपासोबत घ्याव्यात.

    ३)पोटात गॅस झाला असल्यास १/४ तिरफळ चूर्ण+२ चिमूट हिंग+१ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण घ्यावे गॅस कमी होतो.

    ४)जुन्या आमवाता मध्ये १/४ चमचा तिरफळ + १चमचा एरंडेल हे मिश्रण रात्री झोपताना ४२ दिवस घ्यावे ह्याने पुष्कळ फरक पडतो.

    ५)पोटात दुखून उचक्या येत असल्यास १/२ चमचा तिरफळ चुर्ण+२ चमचे मध+१ चमचा साजुक तूप हे मिश्रण वारंवार चाटावे.पण एॅसीडीटी असणा-यांनी हा उपाय करू नये.

    अतिप्रमाणात ह्याचे सेवन केल्याने एॅसीडीटी,व तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्या तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 9, 2016


  • II समर्थांची प्रार्थना II

    समर्थ रामदासा ,
    प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत !
    मला शक्ती दे, सामर्थ्य दे !
    मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे !

      October 28, 2022