(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भक्त ध्रुव (अढळ ध्रुवतारा)

    वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ,
    मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।।

    असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक,
    हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।।

    प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ,
    श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।।

    ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा,
    समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।।

    खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा,
    खेळाचे चक्र फिरे सर्वदा, अवितरपणे ।।५।।

    प्रत्येकाचे आयुष्यमान, कमी जास्त असून,
    जीवन मर्यादा पडून, काल क्रमणा होई ।।६।।

    कुणी राही क्षणभर, कुणाचे आयुष्य शंभर,
    कांहीं जगती वर्षे सहस्त्र, हीच निसर्गाची विविधता ।।७।।

    लाखो वर्षे राही तारे, इंद्रादी देवही जाती सारे,
    सर्वांच्या मर्यादा ठरे, प्रभू शक्तिमुळे ।।८।।

    उदाहरण अपवादात्मक, अढळ पदाचे प्रतिक
    ध्रुव तारा एक, होई या ब्रह्मांडी ।।९।।

    ध्रुव कथा मनोहर, भक्ति तपसिद्धी आधार,
    इंद्र शक्तिची माघार, होई ध्रुवभक्तिपुढे ।।१०।।

    उत्तानपाद राजा आसूर, दोन राण्यांचा संसार,
    राज्य करी प्रजेवर, प्रेमळपणे ।।११।।

    सुरुचि राणी आवडती, उत्तम तिचा मुलगा होता,
    सुनीती ठरे नावडती, ध्रुव बाळाची आई ।।१२।।

    ध्रुव एके दिनी दरबारी, चढूनी सिंहासनावरी,
    राज्याच्या मांडीवरी, आनंदाने बसला ।।१३।।

    हे न पटले सुरुचीला, खेचले खालती ध्रुवाला,
    आहे तो मान उत्तमाला, असूनी तिचा मुलगा मोठा ।।१४।।

    ध्रुव जाई रडत, आईसी दु:ख सांगत,
    कुणी न मजसी खेळत, राग करी सारे ।।१५।।

    नावडता म्हणून, न देई कुणी स्थान
    हकलून देती सारेजण, प्रत्येक स्थानाहुनी ।।१६।।

    माता सुनिती, हतबल होती,
    न देखे दु:ख ती, ध्रुवाच्या ।।१७।।

    आई करी ध्रुवाचे सांत्वन, प्रभूची महीमा महान,
    त्यास प्राप्त करून, जीवन होई सुखी ।।१८।।

    न सांगता कुणाला, ध्रुव जाई वनाला
    शोधी परमेश्वराला, सर्व ठीकाणी ।। १९।।

    भयाण जंगलात, प्रभू नामे टाहो फोडीत,
    भाव भक्तिचे मनात, ठेवून बोलावती प्रभूला ।।२०।।

    नारद भेटले ध्रुवासी, बघूनी भाव भक्तीसी
    आशीर्वाद देई त्यासी, यश मिळण्याबाळा ।।२१।।

    उपदेश नारद करी, श्रद्धा ठेवावी प्रभूवरी,
    तोच सर्वांचा तारण हरी, त्यास करावे पावन ।।२२।।

    प्रसन्न करावे प्रभूला, अर्पूनी भक्ती त्याला
    त्याच्या इच्छे जाई फळाला, जीवनातील सर्व गोष्टी ।।२३।।

    ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत राहाय
    तोच तुझा आधार होय,प्रभू मिळे पर्यंत ।।२४।।

    प्रभू मिळणे नाही सोपे, प्रयत्न करावे बहूत तपे
    श्रद्धेने त्याचे नाम जपे तेव्हाची पान होई ।।२५।।

    ऐकूनी नारदाचा उपदेश, मनी बिंबला ईश,
    पावन करण्याची आस, ध्रुवास लागली ।।२६।।

    नारदाचा आशिर्वाद घेवूनी, ध्रुव जाई वनी,
    आसन झाडाखाली मांडूनी, तप करण्या बसला ।। २७।।

    बालक ते लहान, मनी विश्वास महान
    विसरोनी भूक तहान, मंत्राचा जप करी ।।२८।।

    असे जेथे श्रद्धा प्रभू सदा,
    मिळेल त्याच्या आशिर्वादा जीवनातील समाधान ।।२९।।

    मंत्रोपचारास लागली वाणी, तरंगे त्याची बनूनी
    चक्रगती त्यास मिळूनी, फिरू लागली देहा भवती ।।३०।।

    मंत्र ऊर्जा मिळून, चेतना जागृत ठेवून
    देह जिवंत राहून तप करी बहूत काळ ।।३१।।

    मंत्र चक्र गती, ऊर्जा निर्माण करती
    त्याचे तेजोलय बनती, देहा प्रकाशी ।।३२।।

    मंत्र लहरी तेजोवलय, दिव्यती वाढत जाय
    जैसे तप महान होय, बाळ ध्रुवाचे ।।३३।।

    तपसिद्धीची शक्ती, प्रभूसी जागृत करती
    चित्त त्याचे ओढती ध्रुव बाळाकडे ।।३४।।

    इंद्र सर्व देवा संगे, ध्रुवचे तपसामर्थ्य बघे
    निरनिराळ्या शक्ति सोडून अंगे, ध्रुव बाळाच्या ।।३५।।

    अग्रीच्या ज्वाळा, वायूच्या वादळा
    वरूणाचा पावसाळा, निष्प्रभ ठरली ध्रुवापुढे ।।३६।।

    इंद्र शक्तीचा मारा, न तोडी तेजोलय चक्रा
    रक्षण कवचाची धुरा मजबूत असे ध्रुवा भोवती ।।३७।।

    संपता इंद्र शक्ती प्रदर्शन, प्रभू देई दर्शन
    बाळ ध्रुवासी उठवूनी जवळ घेई त्याला ।।३८।।

    प्रभू विचारी ध्रुवाला ,का शीनविसी बाल देहाला
    सांग तपाचे कारण मला, देईन तुज मी ते ।।३९।।

    निश्चीत नाही मज स्थान, सारेजण करी अपमान
    उठविती सर्व पदाहून, ध्रुव सांगे प्रभूला ।। ४०।।

    दूर घ्यावा निवारा, गगनातील एक तारा
    मिळोनी प्रभूचा सहारा, कुणी न हलवावे मला ।। ४१।।

    'वर'दिला प्रभूनी, अस्थिरता जाई निघूनी
    पद ध्रुवाचे अढळ होवूनी कुणी न घेई त्यासी ।। ४२।।

    कुणी न राही एके जागी, फिरत असे सदा मार्गी
    स्थिरता फक्त ध्रुवतारा अंगी या विश्वमंडळामध्ये ।। ४३ ।।

    ।। शुभं भवतू ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १५- २७११८३

      January 15, 2018


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री वैजनाथ

    देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ रत्नांबरोबर धन्वंतरी व अमृत ही दोन रत्नेही त्यातच होती. अमृत पिण्यासाठी राक्षस प्यायले. पण भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला या शिवलिंगात गुप्तपणे लपविले.

      August 13, 2013


  • अध्यात्मिक संकल्पनांची विज्ञानीय स्पष्टीकरणे

    पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्‍यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.

      March 12, 2012


  • बाळक्रीडा अभंग क्र.३६

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 16, 2018


  • राब

    केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते.

      July 13, 2019


  • चिरा गल्ली गणेशोत्सव मंडळ, भुसावळ

    भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).

      September 6, 2022


  • राईट टू डिस्कनेक्ट !

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्वाचे विधेयक लोकसभेत मांडले .हे एक खासगी विधेयक होते .त्या विधेयकाचे नाव होते Right to disconnect.या विधेयकावर सोशल मिडीयावर फार चर्चा झाली नाही आणि बातम्यांमध्ये सुद्धा हे विधेयक जरा दुर्लक्षित राहीले .खरेतर या विधेयकावर दूरदर्शन वर विशेष चर्चा व्हायला हवी होती पण ती झाली नाही.

      February 14, 2019


  • अखंड खंड

    पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते.

      September 27, 2023


  • करेल तोच मरेल!

    राज्य विद्युत वितरण कंपनीने सुचविलेली 43 टक्क्यांची दरवाढ फेटाळून विद्युत नियामक आयोगाने सुधारित दरवाढीस मंजुरी दिली. वीज ठााहकांना ही बाब दिलासादायक वाटत असली तरी विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या आणि 1 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या दरवाढीचा छुपा अजेंडा लक्षात घेतल्यास हे सगळे नाटक एकाने मारल्यासारखे करणे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे दाखविणे या प्रकारातच मोडणारे आहे. विद्युत वितरण कंपनी आपल्या ठााहकांचे कंबरडे मोडायला निघाली होती; परंतु नियामक आयोगाने जनतेचे हित लक्षात घेऊन असह्य ठरू पाहणारी वीज दरवाढ रोखली, हा वरकरणी देखावा अगदी उत्तम प्रकारे वठविण्यात आला आहे.

      October 15, 2006


  • रम्य ते बालपण : मोहन वर्दे

    आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.

      June 28, 2022