वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’.
August 3, 2021
ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.
January 28, 2011
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या.. त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या…
January 26, 2023
आई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत.
February 27, 2020
भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या.
November 11, 2015
प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना-
द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः ।
वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥
या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
प्रातःकाले - या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे.
भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव ठेवून पठन करावे. तो शुद्ध भाव आपण उठल्या उठल्या अधिक प्रबल असतो.
त्यामुळेच सर्व व्रतवैकल्ये, प्रार्थना प्रभातकाली करण्यास सांगितलेल्या आहेत.
प्रणिधानाद्- परिपूर्ण तन्मय होऊन. अर्थात मनामध्ये आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार नसतांना.
भक्त्या- परिपूर्ण भक्तीने युक्त अशा अवस्थेत.
नित्यं जल्पति गौरिदशकं यः - जो या गौरी दशकं स्तोत्राचे नित्य पठण करतो,
त्याला काय काय प्राप्त होते हे सांगताना उत्तरार्धामध्ये आचार्यश्री म्हणतात,
वाचां सिद्धिं- मनात येणारा प्रत्येक संकल्प मनातल्या मनात बोलल्याबरोबर देखील परिपूर्ण करणारी दिव्यशक्ती.
व्यवहारात देखील जे बोलेल ते पूर्ण होण्याची शक्ती.
सम्पदमग्र्यां- अग्र म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती. अध्यात्मशास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना षट्संपत्ती असे म्हणतात. आई जगदंबेच्या कृपेने ही संपत्ती साधकाला प्राप्त होते.
शिवभक्तिं- भगवंताची परमभक्ती. शुद्ध मंगल भक्ती.
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति- पर्वतपुत्री अर्थात आई जगदंबा गौरी त्याला अवश्य प्रदान करते.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 9, 2020
छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.
August 12, 2026
दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.
खरे तर प्रत्येकाने स्वास्थ टिकविणे ही आज काळाची गरज आहे. आपले सगळे सण वार त्याला जोडुन असणारे रिवाज, सणांना करण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नितीनियम गाठोड्यात बांधुन वरच्या माळ्यावर टाकले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपल्याला समजत नाही.
वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा - आपुलकी पणा टिकवितात.
दिवाळी म्हणजे मुक्त हस्ताने तेजाची उधळण करणारा सण. दिवाळीत असते दिव्याच्या पंक्तीचे तेज, दारात लटकणारया आकाशदिव्याचे तेज, अंगणात मांडलेल्या रांगोळीचे तेज, श्रीलक्ष्मीच्या आराधनेमुळे आलेल्या मांगल्याचे तेज. एकंदरीत दिवाळी हा सण तेजाची लयलुट करणारा आहे, जीवनास तेजोमय बनविणारा आहे.
सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन घ्यायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणारयांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणारयांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणारयांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणारयांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.
सर्व साधारण ३० ते ४० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते, त्वचेचा टोन सुधारतो, त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्र्व्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण स्नेहाच्या मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नश्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. आयुर्वेदानुसार आठ वेळा तुप खाण्यापेक्शा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. नियमित व तात्रिक दॄष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते.
अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या स्नायुंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.
अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा.
करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग
प्रफुल्लीत मन उत्साही सर्वांग
तारूण्य टिकेल आयुष्य भर
न दुखणार गुडघा अन् कंबर
तेजोमय दिवाळी, सुवर्ण मयी काया
हिच खरी अभ्यंगाची किमया.......
अभ्यंगासाठी तिळाचे तेल सर्वात चांगले आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये गंगा कंपनीचे वनौषधींबरोबर प्रक्रिया केलेले तिळाचे तेल मिळते किंवा डाबर कंपनीचे भारीचे धान्वंतर तेल मिळते ते तेल आपण अभ्यंगासाठी वापरु शकतो. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकित्सा. अगदी दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.
काही शंका असेल तर ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप वर मॅसेज करा( कृपया फोन करु नका..इतर मॅसेज पाठवु नका.)
-- डॉ.कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपामागे, बार्शी रोड, लातूर
फोन ०२३८२ २२१३६४ , ०९३२६५११६८१
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
October 20, 2016
अत्रि – अनुसूयानंदन प्रभू श्रीदत्तात्रेय महाराजांनी जगदुध्दारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभू आणि अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ असे चार अवतार धारण केले. ‘विश्वगुरु’ म्हणून उपनिषदकारांनी गौरविलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या महान संप्रदायाचे प्राचीनकालापासून चालत आलेले लोकोदाराचे व वैदिक धर्मरक्षणाचे कार्य ज्या चार दत्तावतारांनी पुढे चालविले, त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण दत्तसंप्रदायाची थोडक्यात माहिती करून घेऊ.
June 30, 2025
माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत.
April 24, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti