वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जड पाणी हे नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंचं संयुग आहे. साध्या पाण्यातील हायड्रोजनच्या अणूंमध्ये न्यूट्रॉनचा अभाव असतो. पण जड पाणी घडविणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंमध्ये प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो.
August 9, 2023
लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची शक्यता वाढते.
August 15, 2019
उच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत.
January 7, 2014
वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते.
जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन,
पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे होते. पुनः तो गरम होण्यासाठी जास्ती अग्निची आवश्यकता पडते. तसेच, पचन पूर्ण होण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. त्यावेळी त्यावर पाणी ओतून चुलीतील पेटलेला अग्नि विझवण्याचे पाप करू नका. असे केल्याने अन्न पोटात तसेच पडून रहाते आणि जाडी वाढते.
आणि जेवता जेवता पाणी पिल्याने शरीर संघटन जसे आहे, तसेच राहाते. मिक्सरमध्ये नारळ वाटता वाटता जर पाणी घातले तर नारळाचा उत्तम रस निघतो. तसे आहे. वाग्भटाचार्यांच्या ग्रंथातील सूत्रस्थान 5-14 या श्लोकामधून ही माहिती मिळते.
पाणी कमी करण्यासाठी, आर्द्रता कमी. होण्यासाठी, अग्निची आवश्यकता असते.
पाणी आणि अग्नि एकमेकाचे पिढीजात शत्रू. जिथे पाणी वापरले जाते, तेथील अग्नि नाहीसा होतो, या व्यावहारिक सत्याला आरसा कशाला हवा ?
एकदा एका लमाणी माणसांच्या तांड्याशी संवाद साधण्याची संधी शोधली. एका सकाळी 9 वाजता घरातील (घर कुठले, तंबूच ) सर्व आवरून, घरातील सर्व माणसासकट, ही मंडळी आमच्याच घराच्या बाजूला एका स्लॅब घालायच्या कामाला आली. पहिलं काम केलं ते डबे खाण्याचं. त्यांच्या डब्यावर माझं लक्ष होतं. जसं शिंप्याचं लक्ष कपड्याच्या डिझाईनवर, बूट पाॅलिश करणाऱ्याचं लक्ष बूटावर, केशकर्तनकाराचं लक्ष केसांच्या स्टाईलवर असतं, तसं माझं लक्ष खाण्याच्या डब्यावर !
डब्यात डाळ भात भाकरी आणि लसणाची सुकी चटणी. कापडात गुंडाळून ठेवलेल्या भाकऱ्यांची चवड. त्याच्यावरच लसणाचा लालभडक गोळा. मी त्यांना विचारलं, एवढ्या भाकऱ्या भाजायला सकाळी कधी वेळ मिळाला ? त्यावर त्या लेकुरवाळ्या माऊलीने उत्तर दिलं. "आज नाही भाजल्या, बुधवारी सुटी असते, तेव्हाच भाजून ठेवल्या." मी उलटे दिवस मोजायला सुरवात केली. तो वार होता सोमवार. म्हणजे बुधवार ते सोमवार तब्बल सहा दिवसापूर्वी भाजलेल्या भाकऱ्या ती आत्ता खात होती. मी भाकरी हातात घेऊन बघीतली. कडकडीत पापडच जसा ! मी विचारले, एवढे दिवस या भाकऱ्या टिकल्या कश्या ? ती आपल्या भाषेत म्हणाली, "ते मला माहिती नाही, पण आमच्या भाकरी खाऊन झाल्या की उरलेल्या भाकऱ्या आम्ही सूर्याला दाखवतो."
कानाखाली झणकन मारल्यासारखे तिचे शब्द कानात घुसले. विज्ञानातले एक व्यावहारिक सत्य त्या अशिक्षित, निरक्षर माऊलीने सहजपणे मला उलगडून दाखवले होते.
भाकरी सूर्याला दाखवतो, सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. दगडाच्या राशीवर भाकऱ्या पसरून ठेवतो, म्हणजे सूर्य त्यातील पाणी आपल्या उष्णतेने शोषून घेतो आणि त्या टिकवतो. ज्या पदार्थात पाणी कमी तो पदार्थ जास्त दिवस टिकतो, हे व्यावहारिक, त्रिकालाबाधीत, वैश्विक सत्य तिच्याकडून मला शिकायला मिळाले होते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.12.2016
December 19, 2016
हिंदू परंपरेत, केवळ गंमत किंवा मजा (एन्जॉयमेंट) म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्यापाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.
October 28, 2016
अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात दोन हजाराच्या वर प्रयोग केले होते.
June 19, 2022
डोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता.
October 14, 2019
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कृषिक्षेत्राच्या, कृषकांच्या समस्या, त्यांच्या निराकरणाचे मार्ग या विषयावर चर्चेला पेव फुटले आहे. भारताचा शेतकरी प्रचंड हलाखीत जगतो आहे, शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे, यावर झाडून साऱ्यांचे एकमत असते; परंतु शेतकरी दरिद्री का आहेत, यावर फारशा गांभीर्याने कोणी चिंतन करताना दिसत नाही. गॅट करारामुळे जागतिक व्यापार खुला झाला.
February 27, 2005
भावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचदृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
January 3, 2019
पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल
August 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti