वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
माझे वडील डॉक्टर होते तसेच काँग्रेसचे पुढारीही होते. काही काळ त्यांनी आमदारकीही भूषवली. मीही डॉक्टर होऊन त्यांची जागा घ्यावी आणि आपल्याला शांत मनाने निवृत्त होता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकाची आवड असूनही शाळेत कधी अभिनय केला नाही.
May 5, 2024
भगवान गणेशांचा आवडता रंग लाल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे.पण लालच का असे म्हटले तर?
January 15, 2020
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे.
August 6, 2020
भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात.
मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व आहे. ही गाडी १७०० कि.मी.चं अंतर ४६ तासांत आपल्या धीम्या गतीनं पार करते. या मार्गावरील सर्वांत महत्त्वाचं धार्मिक स्थान हरिद्वार. त्यामुळे या गाडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही गाडी दिवसा पॅसेंजर आणि रात्री एक्सप्रेस असते. या गाडीच्या प्रवासात जितकी विविधता अनुभवता येते, तेवढी अन्यत्र कुठेच अनुभवता येत नाही.
जुन्या दिल्ली स्टेशनवर ही गाडी चांगली तासभर थांबते, प्लॅटफॉर्मवर मोठ्या कढईत गरमागरम तळल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या व बरोबर झमझमित बटाट्याचा रस्सा! आरामात उभं राहून खात बसावं. गाडी सुटण्याची घाई नसतेच. एकदा मी एकटाच प्रवास करत होतो. गाडीकडे पाठ करून आरामात मस्तपणे पुरी रश्श्याचा फडशा पाडत होतो, आणि मागे वळून पाहतो तो डेहराडून गाडी नाहीशी झालेली व रुळांवर कोणतीच गाडी नव्हती. ते रिकामे रूळ पाहून माझी गाळणच उडाली. कावराबावरा झालो. सर्व सामान आणि तिकिटं गाडीतच. खाण्यापायी गाडी घालविली. मी पुढे पळण्यास सुरुवात करणार, तोच पुरी तळणारा माणूस देवदूतासारखा शांतपणे म्हणाला, 'घबराना नही, साहब. यहाँके प्लॅटफॉर्म इतनेऽ लंबे होते है! आपका डब्बा आगे खडा है। आप आरामसे नाश्ता कर लेना।' जिवात जीव आला, पुढे बरंच अंतर चालत गेल्यावर माझा प्रिय डबा माझ्या प्रतीक्षेत उभा होता, संपूर्ण डब्यात मी एकमेव प्रवासी होतो. असा आनंद क्वचितच आणि तोही बहुधा डेहराडून गाडीच देत असेल.
दिल्ली सुटल्यावर मेरठ जवळच्या एका लहान स्टेशनवर अनेक दूधवाले आपले मोठाले कडीवाले अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन उभे असायचे आणि या नंतरचं दृश्य तर अफलातून दिसायचं. डब्याच्या दोन्ही बाजूंनी विजेच्या दिव्यांच्या माळा लावाव्या तसे दिसणारे खिडकीच्या बाहेर लटकणारे सर्व कॅन आणि दूधवाले 'आत' आरामात बसलेले! याचा उत्तम फोटो एकदा नॅशनल जिओग्रॉफिक मासिकात आलेला होता. या मार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन स्टेशन आहे सहाणपूर. येथे गाडी एका बाजूनं आत शिरते व बाहेर पडताना इंजिन विरुद्ध बाजूस लागतं, त्यामुळे गाडी दुसऱ्या मार्गाने बाहेर पडते. प्रथम प्रवास करताना मी चक्रावूनच गेलो. असाच प्रकार पुढे गजरोला स्टेशनशी होतो. ह्याचं कारण, गंगा नदीच्या अनेक उपप्रवाहांनी इथली जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे तो भुसभुशीत परिसर टाळून हे रेल्वेमार्ग भक्कम जमिनीवरून टाकलेले आहेत. ही गाडी या भागात आपल्या लोकलसारखी असल्यामुळे मधून मधून अनेक प्रवाशांची चढ-उतार चालू असते. त्यांची गडबड व डब्याभोवती कचो-या, ब्रेड, भजी, विकणारे विक्रेते. या सर्व माहौलाला एक लय आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूंचा प्रदेश हिरवागार गहू, तांदूळ, कडधान्य यांनी सजलेला असतो. शेती, ऊसाचे मळे, ट्रॅक्टर्स, गाई-बैल, विटांची छोटी घरं, मध्येच पाण्याचे छोटे प्रवाह, या सर्वांतून या भागाची नैसर्गिक सुबत्ता प्रतीत होते.
-डॉ. अविनाश वैद्य
June 26, 2022
सरकारी शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांविना ओस पडत आहेत आणि खासगी शिकवणी वर्ग दुथडी भरून वाहताना दिसतात, हा विरोधाभास नाही का?
भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या देशाचा विकास इतका का रखडला किंवा आपण अजूनही विकसनशील अवस्थेतच का आहोत, हा प्रश्न खरोखरच रहस्यमय म्हणावा लागेल. या संदर्भात भारताची तुलना नेहमीच चीनसोबत केली जाते आणि ती स्वाभाविकही आहे.
November 15, 2009
अनेक ऍलर्जीकारक घटक, ते वातावरणात समाविष्ट असतात, जसे, फुलांचे परागकण, धूळ, धूर, त्याचप्रमाणे विविध अन्नघटक, धातू, कीटकदंश, निरनिराळ्या प्रकारची औषधे ही त्वचेची तसेच श्वाचसनलिकेची संवेदनशीलता वाढवू शकतात, तेव्हा असे ऍलर्जीन्स किंवा ऍलर्जीक सूक्ष्मकण आपल्या शरीरातील IGE अँटीबॉडीस‘शी संयोग पावतात, तेव्हा हिस्टॅमिन नावाच्या रसायनाचे रक्तातले प्रमाण वाढते आणि त्याचे पर्यवसान निरनिराळ्या ऍलर्जीक त्रासांमध्ये होते. प्रामुख्याने दिसून येणाऱ्या निरनिराळ्या ऍलर्जीस कोणत्या व त्या कशा प्रकारची लक्षणे निर्माण करतात याविषयी आपण थोडी माहिती.
ऍलर्जीक सर्दी व सायनुसायटीस - ऍलर्जीक विकारांमध्ये सर्वांत जास्त आढळून येणारा हा विकार आहे. सध्याचे वाढते प्रदूषण हेही या विकाराच्या प्रमाणामध्ये भर टाकत आहे. ही ऍलर्जीक सर्दी, हवेतील घटकांमुळे होते. हवेतील धूळ, धूर, परागकण आणि इतर काही सूक्ष्मकण यांच्यामुळे नाकातील पटलाला सूज येते- त्यामुळे नाकातून वारंवार पाणी येणे, साधारणतः 10 ते 20 किंवा कधी कधी जास्तच शिंका येणे, नाक चोंदणे, नाकात व टाळ्याला खाज येणे, डोळ्यालाही खाज येऊन डोळे लाल होणे, नाकातून पाण्याची धार लागणे या प्रकारच्या लक्षणांनी रुग्ण बेजार होतो. ही लक्षणे विशिष्ट ऋतूत तर काही व्यक्तींमध्ये वर्षभर त्रास देत राहतात. वेळीच या त्रासावर उपाय केले गेले नाहीत, तर या त्रासाचे रूपांतर सायनुसायटीस, नाकातील पॉलिप्स किंवा कानाच्या विकारातही होऊ शकते. या सर्दीला गंभीर व्याधीचे स्वरूप बिलकूल नसूनही सततच्या शिंका, वाहते नाक, डोळ्यांची खाण यामुळे व्यक्तीची कामातली तत्परता, उत्साह खरोखरच कमी होते आणि व्यक्ती संत्रस्त बनते.
ऍलर्जीक दमा बऱ्याच व्यक्ती, या ऍलर्जी सर्दीने त्रस्तत असतात, त्यांच्यामध्ये ऍलर्जीक दम्याचेही प्रमाण अनेक वेळा दिसून येते. ऍलर्जीक सर्दी आणि ऍलर्जिक दमा ते एकमेकांबरोबरच बऱ्याच वेळा आढळून येतात. थोडासा धूर, धूळ, अत्तरांचे सुगंध, फुलांचे गंध या आणि अशा प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः वासातून संपर्क आला, की छाती जड वाटणे, भरून येणे दम लागणे, श्वाशस घ्यायला त्रास होणे, थोडाफार खोकला येणे अशी लक्षणे दिसायला लागतात आणि ही लक्षणे ठराविक ऋतूत जास्त तीव्र होतात.
अर्टिकॅरिआ किंवा अंगावर गांधी उठणे (अंगावर पित्त उठणे)
अनेक प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः खाण्यातून संपर्क आला की अंगावर पुरळ, चट्टे उठणे, मोठ्या गांधी येऊन खाज येणे यालाच वैद्यकीय भाषेत अर्टिकॅरिआ असे म्हटले जाते. अशा प्रकारची त्वचेची तक्रार अंडी, मासे, सागरी खाद्ये, ठराविक भाज्या यांच्या सेवनाशी निगडित असते. कधी कधी काहीच न खाताही पित्त उठू शकते. लक्षणांची सुरवात अंगावर छोटे पूरळ उठण्याने होते. थोड्या वेळाने हे पूरळ मोठे होतात, त्यांचे चट्टे बनतात व खाज येऊ लागते. या चट्ट्यांचे प्रमाण पोटावर, पाठीवर, हातापायांवर मानेवर, कधी कधी चेहऱ्यावरही जास्त असते. त्वचेची ऍलर्जी कशामुळे यावी याला तसा काहीच नियम नाही. कोणाला गवारीच्या भाजीमुळे तर कोणाला कोबीच्या भाजीमुळे पित्त उठते. सालीसकट खाल्ली जाणारी फळेही जंतुनाशक फवारा मारल्यामुळे जर स्वच्छ धुतली गेली नाहीत, तर ऍलर्जीचे चट्टे उठू शकतात.
ऍलर्जीक इसब (अटोपिक दाह किंवा अटोपिक डरमॅटायरीस) ऍलर्जीमुळे होणारा त्वचेचा दाह यालाच वैद्यकीय भाषेत अटोपिक डरमॅटायरीस (Atopic dermatitis) असे म्हटले जाते. बऱ्याच वेळा ऍलर्जीक सर्दी, ऍलर्जीक दमा आणि त्वचेचा ऍलर्जीक दाह हे एकत्रच दिसतात. यांना "ऍलर्जीचा त्रिकोण‘ असेही म्हणतात. ही तक्रार शक्यहतो लहान वयातच सुरू होते. यामध्ये त्वचा रुक्ष व कोरडी बनते. त्वचेला लाली, सून येऊन खाज येते. व कात्रेही पडतात. लहान मुलांमध्ये अंगावर कोठेही तर जसजसे वय वाढेल तसतसे त्वचेचे हे चट्टे गुडघ्याच्या मागे, कोपरावर येत राहतात. ऍलर्जीचा हा प्रकार अत्यंत चिवट आहे. तो आपली उपस्थिती परत परत दाखवतो- वेळप्रसंगी होमिओपॅथिक औषधांच्या मात्रा बदलून त्याला शह देत राहावे लागते.
त्वचेचा संपर्कदाह (contact dermatitis) त्वचेचा जो भाग काही प्रकारच्या ऍलर्जीक घटकांच्या संपर्कात येतो, तो लाल होणे, खाज उठणे, पूरळ येणे यालाच वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्टट डरमॅटायरीस म्हणतात, काही साबणे, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, खोटे दागिने यांच्या वापरानंतर अशा प्रकारचा त्वचेचा दाह सामान्यतः दिसून येतो. हाही ऍलर्जीचाच एक प्रकार आहे.
अशा सर्व ऍलर्जीक व्याधींमध्ये ऍलर्जिन्सचा संपर्क टाळणे हा जरी उपाय असला तरी तो व्यावहारिक खचितच नाही. अशा वेळेला अशा तक्रारींवर ऍटीऍलर्जीक (ऍन्टीहिस्टॅमिनिक्सट- Antihistaminics) औषधे घेऊन ती ऍलर्जी सतत दाबून टाकायचा प्रयत्न करणे याखेरीज यावर उपाय काय असा प्रश्नत पडणे अगदी साहजिकच आहे. या प्रश्नातला होमिओपॅथी अगदी समर्पक उत्तर देऊ शकते. वर नमूद केलेल्या ऍलर्जीक खेरीज ऍलर्जीचे अनेक प्रकार आहेत; परंतु वरील प्रकारच्या ऍलर्जीमध्ये होमिओपॅथी अत्यंत गुणकारी ठरते, असे अनुभवाप्रमाणे दिसून येते. होमिओपॅथीत अतिसंवेदनशील ते वर अनेक परिणामकारक औषधे आहेत जी सर्दी, दमा, त्वचेचा दाह, पित्ताच्या गांधी यासारखी लक्षणे तर कमी करतातच; पण त्वचेची अतिसंवेदनशीलताही मर्यादित करतात. त्यामुळे नेहमी त्रास देणारे वातावरणातले घटक, खाद्यपदार्थ हेसुद्धा तितकेसे त्रासदायक ठरत नाहीत. होमिओपॅथीत ऍलर्जीक दमा, सर्दी यावर ऍलियम सेपा, अर्सिनिक अलव, नक्सयहोमिका ही आणि अशी अनेक गुणकारी औषधे आहेत, तसेच त्वचेच्या दाहावर कोपायव्हा, एपिसमेल, आर्टिकायुरेन्स यासारखे रामबाण उपाय आहेत, जी प्रकृतीसाधर्म्यानुसार, तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य शक्तींमध्ये घेतली तर ऍलर्जीकारक प्रवृत्ती, ऍलर्जीक लक्षणे कमी करतातच याशिवाय प्रतिकारशक्तीही वाढवतात आणि त्या पदार्थाप्रति असणारी अतिसंवेदनशीलताही कमी करतात.
एकतर लक्षात ठेवले पाहिजे, की ऍलर्जी ही मुळात खोलवर रुजलेली, जुनी प्रवृत्ती आहे. कधी कधी तर ती आनुवंशिकही आहे, त्यामुळे पेशंटने दाखवलेला "पेशन्स‘ डॉक्टृरची आपल्या पेशावरची आणि उपचारपद्धतीवरची निष्ण, होमिओपॅथीक शास्त्राची नवीन युगातही पुरून उरणारी व्यापकता या साऱ्यांचा संगम झाला तर वैद्यकशास्त्रातील अनेक अवघड समस्यांची उत्तरे निश्चि तच उलगडत जातील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२२३०१७३३
संदर्भ. डॉ. अपर्णा पित्रे
October 23, 2016
दोन दिवस अबमदाबादेत जाऊन आलो. माझ्या मुलीला तिच्या नोकरीचं पहीलं पोस्टींग अमदाबादेत मिळालं, तिला सोडायला गेलो होतो.. तिला कंपनीतर्फे रुमशेअरींग पद्धतीने क्वार्टर मिळाली होती, ती ताब्यात घ्यायची होती.
September 27, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ?
क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच म्हणू शकतो, " जा, तुला क्षमा केली ! "
क्षमा याचना कधी केली जाते ? जेव्हा आपली चुक आपल्याला उमजते तेव्हाच. माझी चुकच नाही तर मी क्षमा कशाला मागू ? आणि क्षमा मीच का मागू ? हा प्रचंड अहंकार पाठी लागतो. एकदा का अहंकाराची कीड आत गेली तर तिला बाहेर काढणे खूप कठीण होते. म्हणून वेळीच सावध होऊन मनाला आवरावे.
I am sorry.
हे तीन शब्द मोठमोठ्या चुका माफ करून जातात. व्यवहारात अशी परिस्थिती अनेक वेळा येत असते. एक शब्दाचा कमीपणा स्विकारायला आपण तयार नसतो आणि काट्याचा नायटा होतो. ठिणगीचे रूपांतर आगीत, आणि आगीचे रुपांतर फुफाट्यात होते. जेव्हा समजते तेव्हा खूप काही गमावलेले असते. परस्परांवरील विश्वास ! मन दुखावते, माणसे दुरावतात. यासाठी हे तीन शब्द उपयोगी पडतात, आय अॅम साॅरी.
जर मनात असूनही हे शब्द जर वेळीच ओठात आले नाहीत, तर वेळ निघून जाते. गैरसमज वाढत जातात. ताण निर्माण होतो. आणि अनेकानेक व्याधी जन्माला येतात.
ज्याची क्षमा त्याच्याकडेच मागावी. तर ती माफ होते. आणि विनाअट मागावी. अट ठेवून माफी मागणे याला क्षमा म्हणत नाहीत, "जर माझ्या शब्दाने, कृतीने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागत आहे" ही अशी सशर्त क्षमा मागणे फक्त राजकारण्यांना जमू शकते. तो आपला प्रान्त नाही.
आज व्यवहारात त्याचे परिणाम देखील दिसतात. साध्या पोटदुखीपासून जाडी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, पॅरालेसीस, कॅन्सर, हे शारिरीक. नैराश्य, चंचलता, निद्रानाश, चिडचिड इ. मानसिक तर खोटे बोलणे, चोरी करणे, पापकर्म करणे, व्यसन जडणे, असे आध्यात्मिक व्याधी जन्माला येतात.
क्षमा करणारा मोठा असतोच, पण क्षमा मागायला सुद्धा दिलदारपणा असावा लागतो. मन तेवढं मोठ्ठं असावं लागतं. पण आपल्या मनात नसताना, पटलेलं नसताना, कधीही दुसऱ्याची क्षमा मागू नका, कारण जर मनाला पटलेले नाही आणि पटल्याचे नाटक जर करीत राहिलात तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण स्वतःला नाही.
यातून तणाव जन्माला येतो. म्हणजेच ताण आणि तणाव वाढण्याचे कारण सत्पात्री क्षमा न मागणे आणि कुपात्री क्षमा मागणे हे आहे.
षड्रिपू पैकी सर्वात मोठा जो अहंकार, याचा शत्रू क्षमा आहे. म्हणजेच अहंकाराचा नाश क्षमेने होतो. तेथे सुद्धा भेदभाव नको. समानता हवी.
तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात,
क्षमा करणे जे पुत्रांसी,
तेची दासा आणि दासी ।
याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे.
"तुला म्हणून साॅरी म्हणतो, नायतर...." ही वृत्ती नको, जी क्षमा असमानता दाखवते.
अहो, साधं वाॅटसप गटात जे नियम अॅडमिननी केलेले असतात, ते चुकुन मोडले तर शिक्षा भोगावीच लागते ना ! आणि "साॅरी... चुकुन... " या दोनच शब्दात माफी देखील मिळते, हे तर आपण दररोज पाहातोच. तरीदेखील क्षमा मागायला आपल्याला कमीपणा वाटतो.
वाढत्या रोगांची संख्या लक्षात घेतली तर फक्त तीन शब्दात ती निश्चितपणे कमी करता येईल.
बस्स म्हणायचे.
"आय अॅम साॅरी."
"गलती मेरी है, मुझे माफ करो."
"हं, जरा चुकलंच तेव्हा ! "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०२.०८.२०१७
August 2, 2017
आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत .
February 6, 2018
ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी शोधायलाच हवे.एकेकाळी या दोन्ही कंपन्या ''उत्तम'' या सदरात मोडत होत्या.पण या कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण लक्षणीय घसरण्याचे कारण काय ? सरकारी अनास्था आणि खासगी कंपन्यांचे भले करण्याची मागील सरकारची परंपरा पुढे चालत राहणार असेल तर संपूर्ण देशाचेच खासगीकरण होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असेच म्हणावे लागेल.एकेकाळी या देशात ऐअर इंडिया हि कंपनी अत्यंत अभिमानाची कंपनी होती.सरकारनी हि कंपनी चालवायला घेतली आणि या कंपनीचा पद्धतशीर ऱ्हास सुरु झाला.ऐअर इंडिया कधीही बंद पडेल अशी परिस्थिती कोणी आणली ? सरकारी कंपन्यां वर संचालकांची नेमणूक कशी होते हे नव्याने सांगायला नको.
ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका आणलेल्या रशिया मध्ये याच openness आणि restructuring चा परिणाम चांगला झाला हे सर्वांना माहित आहेच पण कुठलीही गोष्ट देशात लागू करताना लोकांच्या फायद्या पेक्षा संधी साधू लोकांचा फायदा आधीक होतो यासाठी राजकीय आत्मबल फार महत्वाचे आहे.मोदी सरकारने हे आत्मबल जनतेला दाखवून देणे गरजेचे आहे.नाहीतर भा ज पा चे नुकसान होईलच पण देशात न भूतो न भविष्यति इतका गोंधळ उडेल.
विरोधी पक्षांचा वकूब चांगला नसेल तर त्यांना चागल्या कामात खीळ घालायला आवडते पण चागले काम करून दाखवता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.मेक इन इंडिया करताना ग्रामीण भागापासून सुरवात करावी हि मागणी लावून धरली पाहिजे.
ग्रामीण रोजगार , शेती, ग्रामीण भागातील infrastructure हे कमालीचे मागासलेले असताना मेक इन इंडिया मध्ये ग्रामीण भागाकडे खूप मोठा निधी वळवला पाहिजे स्थलांतर थाबले तर प्रश्न कमी होतात हे जागतिक सत्य आहे.ग्रामीण भागातून स्थलांतर थाबले नाही तर उद्या आकाशात जरी शहरे बांधली तरी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत .
मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी ची सुरवात ग्रामीण विकासा पासून करा अख्खा देश "स्मार्ट" बनेल .
-- चिंतामणी कारखानीस
January 24, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti