(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दहशतवादी आत्मसर्मपण आणि पुनर्वसन धोरण :समन्वयाचा अभाव

    घातपाताचा कट रचल्याप्रकरणी ‘हिज्ब-उल-मुजाहदीन’चा अतिरेकी लियाकत अली शाह याला दिल्ली पोलिसांनी अटक

    केल्याच्या मुद्द्यावर जम्मू-काश्मीर विधिमंडळ सभागृहात चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेल्या तहकुबीच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली.

      March 29, 2013


  • गोकर्ण/विष्णूक्रांता

    ।। विघ्नराजाय नम: विष्णूक्रांतापत्रं समर्पयामि।।

    गोकर्णाचा बहूवर्षायु वेल असतो.ह्याला जांभळी अथवा पांढऱ्या रंगाची फुले फुलतात.ह्याच्या शेवगा बोटभर लांब असतात.

    गोकर्ण चवीला कडू,गुणाने कोरडी व थंड असते.

    आता आपण गोकर्णाचे उपयोग जाणून घेऊयात:

    १)कोडावर गोकर्णाच्या मुळाचा लेप करतात.

    २)अर्धशिशिवर गोकर्णाच्या बिया व मुळ एकत्र वाटून लेप लावावा.

    ३)काना जवळ आलेली सुजेवर गोकर्णाची पाने व सैंधव मीठ एकत्र वाटून लेप लावावा.

    ४)कफरोगात गोकर्णाचे मुळ गाईच्या निरशा दुधासेबत देतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 13, 2017


  • सांगायचं राहूनच गेलं

    आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी बारीक होत चाललीय. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्यायत , इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुढगे टेकून शरण येत चाललो आहोत.

      December 23, 2021


  • सॅबोटाज ,सबव्हर्जन आयएसआयची नवी रणनिती

    पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या छुप्या युद्धाचा आणखी एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटाकडून समोर आलेला आहे. देशाविषयीची संवेदनशील माहिती शत्रूपर्यंत जायला नको (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे.

      February 5, 2017


  • अ’ ची चौदाखडी 

    अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे....क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही स्वरचिन्हं स्वीकारावी.

    आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.

    हाच विचार मी पुढे नेला आहे. क ला काना लावला तर ‘का’ होतो तसाच अ ला काना लावून ‘आ’ होतो आणि तो आपण स्वीकारला आहे.

    क ला ओकार लावला तर ‘को’ होतो, तसाच अ ला ओकार लावला तर ‘ओ’ होतो. हा ही आपण स्वीकारला आहे.

    क ला औकार लावला तर ‘कौ’ होतो, तसाच अ ला औकार लावला तर ‘औ’ होतो...तोही आपण स्वीकारला आहे.

    क वर अनुस्वार दिला तर ‘कं’ होतो, तसाच अ वर अनुस्वार दिला तर ‘अं’ होतो, तो ही आपण स्वीकारलाच आहे.

    क ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘क:’ होतो, तसाच अ ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘अ:’ होतो..तोही आपण स्वीकारला आहे.

    जर, आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. तर मग....अि अी अु अू अे अै लाच का स्वीकारू नये?

    खरं म्हणजे अै आणि हे मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि म्हणजे (अ अु)

    आद्य लिपीकारांना हेच विचार सुचले असते तर ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.

    अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. ऑगस्ट, ऑक्टोबर, डॉक्टर, बँक, बॅरिस्टर, अॅक्ट,अॅडव्होकेट वगैरे शब्द मराठीत लिहीतांना अर्धचंद्राच्या सहाय्यानं हे अुच्चार लिहिले यातच मराठी लिपीकारांची प्रतिभा दिसून येते. कौतुकास्पद आहे. नाहीतर हे शब्द आगस्ट, आक्टोबर डाक्टर, आडव्होकेट ब्यांक, ब्यारिस्टर, असे लिहावे लागले असते. पूर्वी ते तसे लिहिलेही गेले आहेत.

    हिंदीत हेच शब्द बैंक,अैक्ट असे लिहीतात. गुजराथी बांधव ऑ चा अुच्चार ओ असा करतात. ते बॉम्ब ला बोम्ब आणि हॉलला होल म्हणतात. अेकदा, बँकेत, अेक अिसम, लोकर पाहिजे … असं म्हणत होता. बँकेत पैसे असतात, याला लोकर कशी मिळणार? नंतर लक्षात आलं. त्याला बँकेचा लॉकर हवा होता.

    पारंपारिक स्वरमालेत ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ) आणि लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) हे स्वर समजले आहेत. पण ते स्वरांची व्याख्या पूर्ण करू शकत नाहीत. स्वराचा अुच्चार करतांना, ओठ. दात, टाळू आणि जीभ यांचा अेकमेकांशी स्पर्श व्हावयास नको. नाद केवळ घशातूनच यावयास हवा. स्वरांचा दीर्घ अुच्चार करीत राहता येतो. अऽऽऽऽऽऽ किंवा आऽऽऽऽऽऽ. अीऽऽऽऽऽऽऽ अूऽऽऽऽऽऽऽ.

    अै आणि हे शुध्द स्वर नाहीत, मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि म्हणजे (अ अु). अैऽऽऽऽऽऽ आणि औऽऽऽऽऽऽऽऽ.

    अॅऽऽऽऽऽऽ आणि ऑऽऽऽऽऽऽऽ. म्हणूनच अॅ आणि ऑ हे स्वर समजले जातात.

    तसं व्यंजनांच्या बाबतीत होत नाही. कऽऽऽऽऽ.

    ऋ आणि लृ अुच्चारतांनाही तसं होत नाही. यास्तव ही अक्षरचिन्हं, स्वर नाहीत म्हणून त्यांचा स्वरमालेत समावेश करता येत नाही. ऋऽऽऽऽऽऽऽ. लृऽऽऽऽऽऽऽऽ

    वरील विवेचनानुसार अ ची चौदाखडी येणेप्रमाणे स्वीकारावी ::

    अॅ अि अी अु अू अे अै अं :

    महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, ६ नोव्हेंबर २००९ रोजी अेका अध्यादेशानं, मराठीचे स्वर आणि व्यंजनं स्वीकारली. त्यात पारंपारिक स्वरांबरोबरच अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले पण अ ची बाराखडी मात्र स्वीकारली नाही, ती आता स्वीकारावी असं वाटतं.

    पण जनताजनार्दनानं हे स्वर कित्येक वर्ष आधीच स्वीकारले आहेत. १९७६ साली प्रकाशित झालेल्या प्रा. देशपांडे यांच्या अिंग्रजी-मराठी शब्दकोशात, ऑगस्ट, ऑक्टोबर, बँक,बॅरिस्टर हे शब्द असेच छापले आहेत.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९३० ते १९३७ या कालखंडात १७ विज्ञाननिष्ठ निबंध आणि २ काव्यं लिहीली आणि हे सर्व साहित्य किर्लोस्कर मासिकानं प्रसिध्द केलं. या सर्व साहित्यात अ ची बाराखडीच वापरली आहे. मीही ही बाराखडीगेल्या ४०-५० वर्षांपासून माझ्या सर्व लिखाणात वापरतो आहे. सावरकरांची ही दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत...त्यांचा संदर्भ, मी नेहमी घेतो. ही पुस्तकं, दादरच्या शिवाजी अुद्यानाजवळ असलेल्या सावरकर स्मारकात विक्रीस ठेवलीआहेत.

    मराठी विज्ञान परिषद, मुंबअी आणि विज्ञान प्रसार, दिल्ली यांच्या सहकार्यानं, अेप्रिल २०११ मध्ये, मराठीतील विज्ञान विषयक लेखन....कालखंड १८३० ते १९५० हा ग्रंथ, दोन खंडात प्रसिध्द केला. या कालखंडात, मराठीतून प्रसिध्द झालेले ९८१ लेख, खूप परिश्रमानं संकलीत करण्यात आले होते. आर्थिक मर्यादा असल्यामुळं, फक्त २० टक्केच लेख निवडावे असं ठरलं. यापैकी वैचारिक लेखांची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. तेव्हा माझ्याअसं लक्षात आलं की, सुमारे १९३० ते १९४० या कालखंडात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि काही अितरही नामवंत लेखकांनी अ ची बाराखडी वापरली आहे. त्या काळी संगणक नव्हते. परंतू त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असं वाटतं. पण आता ती कुणीच वापरतांना आढळत नाही. असं का व्हावं कळत नाही.

    आता ही अ ची चौदाखडी सर्व मराठी प्रेमीजनांनी हट्टानं वापरावी अशी माझी नम्र सूचना आहे. महाराष्ट्र शासन, वृत्तपत्रं, मासिकं, मराठी जाहिरातदार, मराठी शाळा वगैरेंनी ही चौदाखडी वापरावी. असं करण्यानं होणार आहे... मराठी लिपीसमृध्दी.

    डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते. आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.

    ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......

    अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....अिंडिया.

    मुंबअी, आअी, अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, अीशान, अीशा ....

    अुत्तर, अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....

    अून, अूब, अूर, अूस ....

    अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण, अेकवीरा .....

    अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक ....

    हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.

    -- गजानन वामनाचार्य

      December 22, 2018


  • कोरफड

    एक अत्यंत आयुर्वेदिक औषध म्हणजेच कोरफड. कोरफडला संस्कृतात घेकूनवार असे म्हणतात. कोरफड ही औषधी असून आजच्या युगात कोरफडला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदी साबणाकरिता किंवा आपल्या तोडांवरी पुटकुळ्या अथवा तोंडावर कांती मऊ व मुलायम होण्याकरिता कोरफड सर्वत्र वापरतात.

      December 24, 2023


  • डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्युनिअर) – ‘हार्ट-लंग’ मशीनचे जनक

    ‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या विकासामुळे ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेची गरज अधिकांशाने पूर्ण झाली. डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्‍युनिअर) यांच्‍याकडे या प्रणालीच्‍या विकासाचे जनकत्‍व जाते. दि. ६ मे १९५३ रोजी डॉ. गिबन यांनी ‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या सहाय्याने शस्‍त्रक्रिया केली. यशस्‍वीपणे पार पडलेली ही पहिली ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया मानली जाते.

      February 20, 2019


  • रेल्वेगाड्यांची आकर्षक नावं

    बऱ्याच गाड्यांना अतिशय आकर्षक नावं दिली जातात. यासाठी जनतेकडून अपेक्षित नावं मागवली जातात. जनतेकडून नावं आल्यावर त्यावर रेल्वे बोर्ड विचार करतं आणि त्यानंतर गाडीचं नाव पक्कं केलं जातं. गाडी स्टेशनवरून निघताना व स्टेशनात शिरताना त्या नावाची घोषणा झाली, की गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. एखाद्या प्रदेशातील ते प्रचलित वैशिष्ट्यपूर्ण नावही असू शकते.

      June 5, 2022


  • आहाररहस्य ७

    थोडं विषयांतर होईल पण सांगतो, आजकाल फळांचे भारीच फ्याड आले आहे.त्यात सगळ्यात जास्ती उड्या पडतात त्या नारळाच्या पाण्यावर ! नऊ महिने नऊ दिवस आणि बाळंत झाल्यानंतरदेखील नऊ महिने, पुढे अगदी फर्स्ट केजी पर्यत नारळाचे पाणी म्हणजे जणु काही अमृतच असे समजून प्याले जाते.

      August 18, 2016


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३८

    प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूंचा कपोल प्रदेशाचे अर्थात गालाच्यावर असणाऱ्या उंचवट्याचे वर्णन करीत आहेत.

      January 10, 2021