(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…

    सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

    टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.

    बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.

    पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.

    काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.

    साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.

    व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.

    याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 13, 2016


  • बाळक्रीडा अभंग क्र.३

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 14, 2018


  • कल्पकता: चौकटी बाहेर जाऊन विचार

    साधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.

      June 23, 2026


  • मन निरोगी तर शरीर निरोगी..

    आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

      July 26, 2017


  • “अ‍ॅशेस”ची जन्मकहाणी

    … मेलबर्नमधील काही महिलांनी इंग्लिश कर्णधाराला टेराकोटापासून (तांबड्या रंगाची भाजलेली माती) बनविलेले एक रक्षापात्र भेट दिले. याच्यात नेमके काय होते हे मात्र अजूनही ‘रक्षापात्रा’तच आहे! (तो गुलदस्ता नव्हताच.) ती एक बॅट जाळल्यानंतर निर्माण झालेली राख होती, एक विटी जाळल्यानंतर झालेली राख होती इथपासून ते एका महिलेने आपले एक खास अब्रूझाकू वस्त्र जाळल्याने तयार झालेली राख होती असे अनेक उल्लेख आढळतात.

      August 29, 2010


  • एकाला 10 बळी आणि पाचही दिवस फलंदाजी

    …सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद.

      September 2, 2010


  • मधुमेहींसाठीचा आहार

    मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे स्वीकारण्यास वेळ लागतो. कारण त्यांचे स्वादुपिंड इन्सुनिलची निर्मिती करणे थांबवते. शरीरात केवळ ग्लुकोज (शर्करा) तयार होत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. आपण या लक्षणांना मधुमेह असे म्हणतो. मूळात स्वादुपिंडामधून होणारा स्त्राव हा यकृतातर्फे नियंत्रित केला जातो, म्हणूनच मधुमेह हा यकृताचा विकार आहे. असे काही पदार्थ आहेत, जे यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणतात. कडीपत्त्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात. दिवसातून तीनवेळा कडीपत्त्याची ४-५ पाने खाल्ली तर यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. सकाळी उठल्यावर अर्धा चमचा तुळशीच्या बिया, मोड आलेली कडधान्ये, दही आणि तूप खाल्याने यकृत अधिक कार्यक्षम होते. मधुमेहींनी साखर, दूध, प्रिझर्व्हेटिव्हज (पदार्थ नासू नयेत, यासाठी घालण्याचा पदार्थ) आणि अधिक मेद असलेले पदार्थ टाळावेत. मधुमेही भात, बटाटा आणि केळे इत्यादी खाऊ शकतात, असे शेकडो गैरसमज मधुमेहींच्या आहाराबद्दल आहेत. पण हे पदार्थ योग्यवेळी आणि योग्य संयोगासह खाल्ले तरच चालू शकतात. सुमारे तीन तासांची भूक भागेल, असा आरोग्यदायी न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आहार मधुमेहींनी घ्यावा. क्रॅशन डाएट (लवकर परिणाम मिळविण्यासाठी केलेले आहार नियोजन) करू नका, कारण ते जास्त अपायकारक ठरू शकेल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मधुमेहींसाठी पाककृती
    गव्हाच्या दलियाचा उपमा
    साहित्य- २ वाट्या दलिया, १ वाटी खोवलेला नारळ, मीठ, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टी. स्पू. गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसणाच्या पाकळ्या आणि १ टी. स्पू. साखर.
    कृती - हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवावी. दलियामध्ये चार वाट्या पाणी, मीठ-मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला आणि साखर घालावी. हा दलिया कुकरमध्ये शिजवून घ्यावा. शिजल्यावर दलियात खोवलेलं नारळ आणि थोडं पाणी टाकून तो वाफवून घ्यावा. दलियाचा उपमा वाढताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मशरूम बार्ली रिसोटो
    साहित्य- १ कप भिजवेलेली बार्ली, १ टीस्पून ऑलिव्ह तेल,१ चिरलेला कांदा,१/२ कप चिरलेली लीक (कांद्यासारखी फळभाजी), १ लवंग, बारीक तुकडे केलेली लसूण,काही स्प्रिग्स रोसमेरी पाने,काही स्प्रिग्स थीम पाने, ३ कप भाज्यांचे स्टॉक (पनीर पाणी), १ टीस्पून चिली फ्लेक्स,टोबॅस्को सॉसचा एक डॅश, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पावडर.
    कृती:- जाड तळ असलेल्या कढईत ऑलिव्ह तेल तापत ठेवा. त्यात कांदा, लसूण, लिक्स घालून परतवा. त्यानंतर त्यात मशरूम घालून व्यवस्थित परतवा. आता त्यात बार्ली आणि स्टॉक घालून व्यवस्थित मिश्रण करा. कढई झाकून ठेवून हे मिश्रण सुमारे १० मिनिटे शिजू द्या. अधूनमधून पळी फिरवा. आवश्यकता असल्यास थोडा अजून स्टॉक घाला. बार्ली शिजल्यावर त्यात टोबॅस्को, परमेसन (एक प्रकारचे पनीर), चिली फ्लेक्स, रोझमेरी, थाइम, मीठ आणि काळी मिरी घाला. त्याचे व्यवस्थित मिश्रण करा आणि त्यावर लसणाची पात घालून वाढा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    लिंबू आणि कोथिंबीरीचे सूप
    साहित्य- स्टॉकसाठी लेमन ग्रासचे दोन तीन धुतलेले तुकडे, उभ्या चिरलेल्या 1-2 लाल मिरच्या, इतर घटक- १/४ कप गाजराचे काप, १/४ कप मशरूमचे काप, १/४ कप बारीक चिरलेला कोबी, २ चिरलेल्या कांद्याच्या पाती,मीठ आणि काळी मिरी पावडर स्वादानुसार.
    कृती:- लेमन ग्रास आणि मिरच्या ३ कप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळू द्या. हे मिश्रण गाळून बाजूला ठेवून द्या. थोडेसे पाणी घालून कांद्याची पात परतवून घ्या. त्यात कोबी, मशरूम आणि गाजर घालून 2 मिनिटे शिजवा. त्यात स्टॉक ओतून भाज्या मऊ होईपर्यंत उकळा. त्याच्यासोबत मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबू देऊन कोमट स्थितीत वाढा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    कोबीचे रोल
    साहित्य- कोबीची ५-६ पाने,एक कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फरस्बी, फ्लॉवर, मटार),अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप टोमॅटोची ग्रेव्ही, २५ ग्रॅम पनीर/ मोड आलेली कडधान्ये, २ टीस्पून तेल,मीठ आणि मिरी पावडर स्वादानुसार.
    कृती:- पाण्यात मीठ टाकून कोबीची पाने १ मिनिटापर्यंत शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका.
    तेल तापवा. काही सेकंद कांदा परतवा. त्यात हिरव्या मिरच्या घालून पुन्हा एकदा काही सेकंद परतवा. त्यात भाज्या, मोड आलेली कडधान्ये, मीठ आणि मिरी पावडर घाला. भाज्यांचे हे मिश्रण कोबीच्या कोबीच्या प्रत्येक पानावर ठेवा, वरून थोडीशी टोमॅटोची ग्रेव्ही घाला. प्रत्येक पान गुंडाळून घ्या आणि ते तूप लावलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. शिल्लक राहिलेली टोमॅटो ग्रेव्ही उकळून घ्या आणि ती रोल्सवर ओता.. ओव्हनमध्ये 225 अंश सेल्सिअस तापमानावर 10 मिनिटे ठेवा आणि गरगरम खायला द्या.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    राजगिरा डोसा
    घटक - रात्रभर भिजवून ठेवलेला 1/2 कप राजगिरा, १/२ कप चणा डाळ ४-६ तास भिजवलेली, १-२ हिरव्या मिरच्या, बारीक तुकडे केलेल्या (आवश्यकता असल्यास) स्वादानुसार मीठ, दीड टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,शिजविण्यासाठी तेल.
    कृती:- राजगिरा, चणाडाळ, हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करून त्याचे मिक्सरमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. ते बाऊलमध्ये काढून त्यात कोथिंबीर घालावी आणि व्यवस्थित मिसळून घेऊन, डोसा घालण्यासाठी योग्य असे मिश्रण तयार करावे.
    नॉन स्टिक तव्यावर पातळ डोसे घालावेत. हिरवी चटणी आणि सांबार यांच्यासह ते खायला द्यावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      May 5, 2017


  • सत्यनारायण नको जनता जनार्दन प्रसन्न करा

    हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे.

      January 22, 2017


  • छत्रपतींच्या काळातील गुप्तहेर खाते

    छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे हेर खाते कसे काम करत होते ते खालील ओव्या दर्शवतात .सदर माहिती मला श्री नरेंद्र नाडकर्णी यांच्या ई मेल वरून मिळाली.

    अफझलखान स्वराज्या वर चाल करून येत आहे हे महाराजांना कळवण्य साठी हि युक्ती वापरली होती. रामदास स्वामींचे शिष्य स्वराज्यात किती महत्वाचे काम करीत होते हे यावरून लक्षांत येते.

    अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

    वि वेके करावे कार्य साधन ।
    जा णार नरतनु हे जाणोन ।
    पू ढील भविष्यार्थी मन ।
    र हातोची नये ।।१।।

    चा लू नये असन्मार्गि ।
    स त्यता बाणल्या अंगी ।
    र घुवीर कृपा ते प्रसंगी ।
    दा समहात्म्य वाढवी ।।२।।

    र जनीनाथ आणि दिनकर ।
    नि त्य करिती संचार ।
    घा लिताती येरझार ।
    ला विले भ्रमण जगदिशे ।।३।।

    आ दिमाया मूळभवानी ।
    हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
    येकांती विवेक करोनी ।
    इष्ट योजना करावी ।।४।।

    पत्राच्या प्रत्येक ओवीचरण अद्दाक्षर घेतल्यास 'विजापूरचा सरदार निघाला आहे' ही सूचना मिळते.

    Communication च्या अनेक पद्धती त्याकाळात वापरल्या जात होत्या. बहुजन समाजाचे अनेक कलाकार त्यात वाकबगार होते. संबळ,मशालीच्या हालचाली,बोटांनी केलेल्या खुणा,कसरतीच्या प्रकारातून message देणे इत्यादी अनेक प्रकार होते.

    अफजलखान निघाला आहे हेच जर गुप्त हेरांना शिवरायांना सांगायचे असेल तर ? त्याकाळात वासुदेव,गोंधळी,बहुरूपी , रामदासी अशा अनेक प्रकारच्या लोकांना महाराज हेरगिरी करायला सांगायचे.आजही हि मंडळी आपले कार्यक्रम सदर करतात आणि message पाठवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात.

    श्री समर्थ रामदास स्वामींना शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे महत्व पटले असल्याने आणि त्यांचे शिष्य सतत भ्रमण करीत असल्याने त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी हेरगिरी करण्यासाठी त्यांच्या शिष्यांना प्रोत्साहन दिले असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय समर्थ स्वतः स्वसंरक्षणासाठी गुप्ती बाळगत असत आणि त्यांचे शिष्य सुद्धा बाळगत असत.पण या गोष्टींचे त्यांनी प्रदर्शन केले नाही.

    मला मिळालेल्या माहिती नुसार समर्थांचे शिष्य ज्या सत्ताधीशांच्या सरदार ,जमीनदार यांच्या घरी माधुकरी मागायला जात त्या ठिकाणी ते राजकीय निरोप देत असत .

    -- चिंतामणी कारखानीस

      March 25, 2016


  • लोकसत्ताकारांची वैचारिक दिवाळखोरी….

    लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला - "कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो." - म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच कुणी समजावून दिले असते तर आज बिचाऱ्यांमध्ये इतकी कटुता नसती!

    कुबेरांना एकच सांगतो.
    की सव्वा वर्ष रिकामटेकडा राहून फक्त अभिमानगीत करत राहिलो

    - म्हणून रत्नागिरीत ८००० मुलं ते एका सुरात गायली.

    -म्हणून अमेरिकेत जन्माला आलेल्या मराठी घरातल्या मुलांना, ‘आपण हे गीत बसवून आपल्या आईवडिलांना एक सुखद धक्का देऊया’ असं वाटलं.

    - रिकामटेकडा राहून हे गीत केलं म्हणून मुंबईच्या खासगी रेडियो वाहिन्यांवर मराठी गाणी लागू लागली आणि व्होडाफोनचे लोक मराठीतून सेवा देऊ लागले

    - म्हणूनच चीनमध्ये राहाणाऱ्या Chu San Quek या चायनीज माणसाला वाटलं की भारतात येऊन महाराष्ट्र काय ते पहायला हवं.

    - म्हणूनच बिवरली हिल्सच्या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शेखर रहाटे यांनी ऑस्कर ॲवॉर्डपूर्व संध्येला हॉलिवुडच्या मॉडेल्सना घेऊन मराठी अभिमानगीतावर फॅशन शो केला.

    - म्हणून अमिताभ बच्चन यांना वाटलं की या गाण्यात मीही गायला हवं होतं.

    - म्हणून हे गाणं ऐकून श्रीनिवास खळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

    - आणि म्हणूनच या रिकामटेकड्या संगीतकाराच्या कलात्मक खटपटीची तुमच्या जगविख्यात वर्तमानपत्राला पहिल्या पानावर दखल घ्यावी लागली

    कुबेर, अशा अनेक कथा आहेत. कधी रिकामा वेळ मिळाला तर या. ऐकवेन. आणखी एक गोष्ट. माझ्या रिकामटेकडेपणात अनेकांना आनंद देण्याची क्षमता आहे जी तुमच्या ‘कार्यग्रस्ततेत’ जराही नाही.

    तुम्हाला तुमच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित एक गोष्ट लक्षात आली नसेल ती सांगतो आणि थांबतो.

    उद्या तुमचा हा ‘व्यग्रलेख’ रद्दीत जाणार आहे आणि या रिकामटेकड्याने केलेलं गाणं लहान लहान मुलं पुढची शंभर वर्ष गात रहाणार आहेत.

    आपला विनीत
    कौशल इनामदार

      March 9, 2016