वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हजारो वर्षापूर्वी परदेशात सुद्धा खाणीच्या उत्खननात, मुझियममध्ये आणि अन्य बर्याच ठिकाणी श्री.गणपतींच्या मूर्ती, शिलालेख, कोरीवकाम याच्यातून बरीच माहिती उपलब्ध झाल्याने आपल्या ज्ञानात भर पडत गेली. परदेशीय मंडळी जवळ आली त्यांची भाषा, संस्कृती समजायला लागली आणि गैरसमज दूर होण्यास मदत झाली. देशादेशांतील संबंध घट्ट व दृढ होत गेले. अश्याच एका परदेशातील गणपतीची माहिती आपण पाहणार आहोत त्या देशाचे नाव आहे. जावा.
January 30, 2012
एवढी प्रचंड स्त्रीची ओळख असतांनाही अजूनही स्त्री जन्मा हीच तूझी कहानी ह्वदयी अमृत नयनी पाणी या विचाराप्रमाणे जिवन जगत आहे. प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मीबाई आहे. परंतु आजचे दुष्य बघीतले तर तीची दषा लग्नापुर्वी ’राणी‘ लग्नानंतर ’लक्ष्मी‘ आणि मुल झाली की ’बाई‘ अशी झाली आहे. भारतीय स्त्रीचे जीवन यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत आहे.
August 13, 2011
१९५७ साली मुंबईत घडलेली ही गोष्ट आहे. आई वडील व मुलगा असं तिघांचं छोटं कुटुंब. वडील हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करणारे प्रख्यात कवी. एके दिवशी सकाळीच बापलेकात किरकोळ कारणावरून वाद झाले.
June 29, 2023
सौभाग्य अलंकारातील सुवासिनी स्त्रियांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दागिना म्हणजे “मंगळसूत्र”.
March 2, 2024
सरसिजनिलये सरोज हस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे।भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।१५।।
आई जगदंबेला प्रसन्नतेची प्रार्थना करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री तिचे गुण वैभव वर्णन करीत आहेत.
ते म्हणतात हे आई जगदंबे! तू कशी आहेस ? तर,
सरसिजनिलये- सरसिज म्हणजे कमळ तर निलये म्हणजे निवास करणारी. आई जगदंबा कमळात निवास करते. इथे केवळ एका फुलाचा विचार नाही. ते प्रतीक आहे.
कमळ जसे चिखलात जन्माला येते, त्यानंतर पाण्यात वर चढते, पाण्याने स्वतःवरील चिखल काढते. त्यानंतर वर हवेत येते आणि सूर्याच्या दिशेने झेपावते. तशी ज्या साधकाची वृत्ती पार्थिवापासून तेजापर्यंत विकसित होत जाते, त्या साधकाच्या मनात निवास करणारी ती खऱ्या अर्थाने सरसिजनिलया.
सरोज हस्ते- हातात कमल धारण करणारी. अर्थात अशा वृत्तीने युक्त असणार्या साधकांना उन्नसाठी हात देणारी.
धवलतमांशुक- धवल म्हणजे पांढरे. त्याला तम प्रत्यय लावला. ज्यावेळी अनेक गोष्टीत तुलना करून ह्यापैकी सर्वश्रेष्ठ असे वर्णन करायचे असते त्यावेळी तम प्रत्यय लावतात.अर्थात धवलतम म्हणजे अत्यंत पांढरेशुभ्र, अंशुक म्हणजे रेशमी वस्त्र.
गन्धमाल्यशोभे- गंध म्हणजे चंदनतिलक. माल्य म्हणजे मोत्यांच्या माळा. या सगळ्यांनी शोभून दिसणारी.
भगवति- भग म्हणजे तेज, ऐश्वर्य. त्याने युक्त असणारी ती भगवती.
हरिवल्लभे- भगवान श्रीहरींची वल्लभा म्हणजे प्रियतमा.
मनोज्ञे- अत्यंत मनोहारी असणारी. भक्तांच्या मनात निवास करणारी. त्यांचे मन हरण करणारी. त्रिभुवनभूतिकरि- संपूर्ण त्रिभुवनाचे भूती म्हणजे कल्याण करणारी.
ती आई महालक्ष्मी,
प्रसीद मह्यम्- माझ्यावर प्रसन्न होवो. मला सर्व ऐश्वर्यदायक गोष्टी प्रदान करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 24, 2020
कोलेस्टेरॉलचे प्रमाण मधुमेहात वाढते आणि कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयरोग व अर्धांग यासारखे रोग होतात. कोलेस्टेरॉल साधारणतः २०० पेक्षा कमी असावे. यात ३४४ प्रकार असून, त्यातील एच. डी. प्रकार ५० च्या वरती असावा. यकृताच्या आजारात म्हणजे काविळीमध्ये यकृताच्या पेशींना सूज येते व दाह होतो त्यामुळे रक्तातील पित्ताचे (बाइलचे) प्रमाण वाढते काही एन्झाइम्स पण वाढतात. दुसऱ्या म्हणजे सिहासिसमध्ये रक्तातील अलब्युमिन कमी होते मग पायावर सूज, जलोदर वगैरे होण्याची शक्यता असते. किडनीच्या आजारात मूत्रांतून प्रथिने जातात. म्हणून रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
April 11, 2023
श्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत.
September 6, 2019
घामणगांव ( जिल्हा –अचलपूर-महाराष्ट्र) येथे २५० वर्ष जूनी गढी (मातीचा किल्ला) आहे. या गढीची माती सिमेंटपेक्षा उत्तम काम देते. ३५ वर्षांपूर्वी दगड व ही माती वापरून बांधलेल्या गांवातील विहिरी अजूनही इतक्या मजबून आहेत की छिन्नी हतोडयाने फुटत नाही.
August 9, 2023
मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.
‘‘चाँद मिलता नही - सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’
खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.
ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. - थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला - 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.
नेपोलियन समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
‘‘ कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत.’’
-- डॉ. दत्ता कोहिनकर यांचा हा लेख फेसबुकवरुन फॉरवर्ड केला आहे.
November 5, 2016
भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले.
October 5, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti