(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गण्याच्या करामती

    शिवापूर गांव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला.वळणा वळणाच्या रस्त्यानी वेढलेल्या या गांवचा सौंदर्य काय सांगायचा. मनोहर मनसंतोष गड, रांगणा गड या सारख्या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या छोटयाश्या गांवात गणेश नार्वेकर नांवाचो व्यक्ती रहायचो. घर तसा मातयेचाच. पण नळयांनी शाकारलेला. लोक आवडीन त्येका गणो नार्वेकार म्हणान ओळखत. घरात आवशी बापाशी सोबत गणो – हवा.

      October 17, 2020


  • स्वदेशी आत्मनिर्भरता

    लॉकडाऊनच्या काळातील एका भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच ‘स्वदेशी’ व आत्मनिर्भरता म्हणजे ‘स्वावलंबन’ याविषयी मार्गदर्शन केले ते अत्यंत योग्य होते. भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले ते योग्य पाऊल आहे असे मी समजतो.

      June 27, 2022


  • नरेंद्र मोदींनी ५०० व २००० च्या नोटा का चालू ठेवल्या असाव्यात…

    देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. विशेषतः सामन्यांसाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या ट्रेन मध्ये, रस्त्यावर फिरताना प्रवासी, रिक्षा-टॅक्सीवाले, किरकोळ भाजी विक्रेते यांच्याकडून ऐकायला येत आहेत.

      November 10, 2016


  • सकारात्मक विचारसरणी

    एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

    काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

    वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण ल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,
    राजा शेजारीच उभा होता.

    त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.

    त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

    ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

    जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..

    आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!

      July 26, 2017


  • लढा सीमेचा ! लढा अस्मितेचा !! (भाग १०)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी माणसाने सर्वकांही केले. साम, दाम, दंड भोगला. बलिदान दिले, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, कारावास भोगला. तेंव्हा कुठे दिल्लीश्वरांच्या मनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा कांहीसा विचार येऊन गेला. त्यादृष्टीने कांही हालचाली होतात न होतात तोच प्रत्येक वेळी राष्ट्रीय आपत्ती आली नि सीमाप्रश्न मागे पडला.

      January 2, 2022


  • प्री सी ट्रेनिंग

    बाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा दरारा इतर कुठल्याही युनिफॉर्मला अजूनपर्यंत तरी बघायला मिळाला नाही. बाबांसारखे खांद्यावर तीन तीन चंदेरी स्टार नाही मिळाले पण बाबां सारखा खाकी युनिफॉर्म आणि खांद्यावर तीन सोनेरी पट्ट्या मात्र मिळाल्या.

      October 18, 2019


  • हिमयुगातलं तापमान

    हवेत आढळणाऱ्या ऑक्सिजन वायूतले बहुतेक रेणू हे, हायड्रोजनच्या अणूपेक्षा सोळापट जड असणाऱ्या ऑक्सिजनच्या अणूंपासून बनलेले असतात. मात्र ऑक्सिजनच्या या रेणूंबरोबरच, हायड्रोजनच्या अणूपेक्षा अठरापट जड असणाऱ्या ऑक्सिजनच्या अणूंपासून बनलेले रेणूही ऑक्सिजन वायूत आढळतात. या जड ऑक्सिजनची निर्मिती दहा-अकरा किलोमीटर उंचीवर नैसर्गिकरीत्या होत असते. हवा जितकी अधिक थंड, तितकी या जड ऑक्सिजनची निर्मिती अधिक. हवेच्या वरच्या थरात निर्माण झालेले हे जड ऑक्सिजनचे रेणू त्यानंतर खालच्या हवेत मिसळतात व सर्वत्र पसरतात. आजच्या हवेतलं या जड रेणूंचं प्रमाण, ऑक्सिजनच्या एकूण दहा लाख रेणूंत चार, इतकं आहे. हिमयुगाच्या कमाल शीतावस्थेच्या काळात संपूर्ण पृथ्वी अतिशय गारठलेली असल्यानं, त्याकाळी हवेतल्या ऑक्सिजनच्या जड रेणूंची निर्मिती अधिक प्रमाणात झाली असावी व त्यामुळे हवेतलं या रेणूंचं प्रमाणही तेव्हा अधिक असावं. जड ऑक्सिजनच्या निर्मितीचा तापमानाशी असलेला संबंध पूर्वीच अभ्यासला गेला आहे. तेव्हा जर प्राचीन काळातल्या हवेचा नमुना मिळाला, तर त्यातील जड रेणूंच्या प्रमाणावरून, त्या काळातलं हवेच्या वरच्या थरातलं तापमान कळू शकेल. हिमयुगातल्या कमाल शीत काळात हवेच्या वरच्या थरांचं तापमान किती होतं, ते जाणून घेण्यासाठी अस्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हवेतील ऑक्सिजनच्या याच जड रेणूंची मदत घेतली.

    • पृथ्वीवरचं हवामान थंड झाल्यावर ध्रुवीय प्रदेशांत, पूर्वीच्या बर्फाच्या थरांवरच नव्या बर्फाचे थर जमा होऊ लागतात. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातल्या बर्फाच्या थरांपैकी, वरचे थर हे नव्या बर्फाचे असतात तर, खालचे थर हे जुन्या बर्फाचे असतात. या थरांपैकी अगदी खालचे थर तर प्राचीन काळातल्या बर्फाचे असतात. बर्फाचे हे थर निर्माण होताना, या सर्व थरांत त्यात्या काळातली हवासुद्धा अल्पप्रमाणात अडकून बसलेली असते. अस्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही हवा गोळा करण्यासाठी, उत्तर ध्रुवाजवळील ग्रीनलँड आइस शीट या हिमस्तरातील सुमारे अडीच किलोमीटर खोलीवरच्या, आणि दक्षिण ध्रुवाजवळील वेस्टर्न अंटार्क्टिका आइस शीट या अंटार्क्टिकावरच्या हिमस्तरातील सुमारे दोन किलोमीटर खोलीवरच्या नमुन्यांचा वापर केला. (पूर्वीच्या प्रकल्पांमध्ये गोळा केलेले हे बर्फाचे नमुने अमेरिकेतल्या नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेत जतन करून ठेवले होते.) संशोधकांनी या बर्फाचे सुमारे शंभर-शंभर ग्रॅम वजनाचे, एकूण सुमारे शंभर भाग करून प्रत्येक भाग वितळवला व त्यातून मोकळी झालेली हवा काळजीपूर्वकरीत्या गोळा केली. प्रत्येक तुकड्यातून गोळा झालेल्या हवेतील नायट्रोजन, अर्‌गॉनसारखे इतर सर्व वायू वेगळे केले आणि उर्वरित हवेचं म्हणजे ऑक्सिजन वायूचं विश्लेषण करून त्यातील जड ऑक्सिजनचं प्रमाण काढलं.

    या विश्लेषणानंतर या संशोधकांनी प्रचलित प्रारूपांद्वारे, वेगवेगळ्या अक्षांशांवरील उंचावरच्या हवेत त्यावेळी किती जड ऑक्सिजन असावा, त्याचं गणित केलं. त्या प्राचीन हवेतल्या जड ऑक्सिजनच्या प्रमाणाची आजच्या हवेतील जड ऑक्सिजनच्या प्रमाणाशी तुलना केली. या तुलनेनुसार त्या काळातल्या हवेतलं जड ऑक्सिजनचं प्रमाण, ध्रुवीय प्रदेशांवरच्या हवेत सुमारे आठ टक्के, मधल्या अक्षांशांच्या म्हणजे चाळीस-पन्नास अंश अक्षांशांच्या प्रदेशांवरच्या हवेत सुमारे चाळीस टक्के आणि उष्णकटिबंधीय म्हणजे विषुववृत्ताजवळच्या प्रदेशावरच्या हवेत सुमारे पन्नास टक्के अधिक असल्याचं दिसून आलं. या संशोधकांनी त्यानंतर या वेगवेगळ्या अक्षांशावरील हवेतल्या जड ऑक्सिजनच्या प्रमाणावरून, त्यात्या ठिकाणच्या उंचीवरच्या हवेतल्या तापमानाचं गणित मांडलं. आजच्या तापमानाशी तुलना करता, दहा ते अकरा किलोमीटर उंचीवरील हवेचं त्या काळातलं हे तापमान (अक्षांशानुसार) सहा ते नऊ अंश सेल्सिअस कमी असल्याचं स्पष्ट झालं. अक्षांशानुसार आढळलेले उंचावरच्या हवेतल्या तापमानातील हे बदल त्याकाळी झालेल्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तापमानातील बदलांशी सुसंगत होते. पृथ्वीवरच्या सरासरी तापमानातील एक अंशाचा फरकसुद्धा पृथ्वीवरच्या हवामानात लक्षणीय बदल घडवून आणतो. त्यामुळे इतक्या अंशांचा हा बदल पृथ्वीवरच्या हवामानात मोठे बदल घडवून आणण्यास पुरेसा ठरला होता.

    प्राचीन काळातल्या पृष्ठभागावरच्या तापमानाचे निर्देशक म्हणून, जड ऑक्सिजनच्या रेणूंचा या अगोदरच इतर काही पद्धतींद्वारे वापर केला गेला आहे. परंतु, प्राचीन काळातल्या उंचावरच्या हवेचं तापमान शोधण्यासाठी केला गेलेला हा वापर अभिनव आहे. अस्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनावरून सुमारे एकवीस हजार वर्षांपूर्वी, सुमारे अकरा किलोमीटर उंचीवर वेगवेगळ्या ठिकाणी तापमान किती होतं, याचं स्पष्ट चित्र उभं राहिलं आहे. ही पद्धत आता (पूर्वीच्या) इतर काळातील, हवेच्या वरच्या थरांचं तापमान जाणून घेण्यासाठीही वापरता येईल. त्यासाठी त्यात्या काळात जमा झालेल्या बर्फाचे नमुने वापरले जातील. अशा माहितीमुळे पृथ्वीच्या तापमानात विविध काळात झालेल्या बदलांचा अभ्यास अधिक तपशीलवारपणे होणार आहे. आणि यामुळेच भविष्यातील नैसर्गिक हवामान बदलांचं भाकीत करण्यासाठी वापरली जाणारी प्रारूपं आता अधिक अचूक बनणार आहेत!

    -छायाचित्र सौजन्य :
    (National Ice Core Lab / Zurich University of Applied Science / NASA)

      November 15, 2022


  • थकवा

    सर्वसामान्य जनतेत "थकवा‘ ही तक्रार वारंवार आढळते. डॉक्टारां‘कडे येणाऱ्या रुग्णांपैकी दहा टक्के लोकांची ""थकवा जाणवतो आहे‘‘ ही तक्रार असते. सर्व रुग्णांत एकवीस टक्के थकवा जाणवतो. थोड्या काळापुरता आणि नव्याने जाणवला जाणारा थकवा ही अनेक रुग्णांची तक्रार असते. दीर्घकाळ रेंगाळणारा थकवा हा विकार त्यामानाने क्वचितच आढळणारा आजार असतो. पौगंडावस्थेत जाणवणारा थकवा हा बऱ्याच वेळा खिन्नतेचे (डिप्रेशनचे) लक्षण असते. अशा व्यक्ती एका टोकाला आपले आयुष्य आळसात आणि निष्क्रियतेत घालवीत असतात, तर दुसऱ्या टोकाला अतिरेकी धडपड आणि प्रमाणाबाहेर हालचाल करीत असतात. ६५ वर्षांवरच्या स्त्रियांना थकवा जास्त प्रमाणात जाणवताना आढळतो. स्त्री-पुरुषांत या वयात मधुमेह, रक्तक्षय (ऍनिमिया) आणि आर्थिक ताण ही कारणे असू शकतात. कौटुंबिक कलह हेदेखील एक महत्त्वाचे कारण असू शकते. विविध जंतू-संसर्गदेखील या वयात होतात. शारीरिक हालचाल कमी असणे, झोप पुरेशी न मिळणे आणि मानसिक तणाव यामुळे थकवा रेंगाळतो. याचा अर्थ नियमाने व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक प्रकृती नीट राखणे याबाबत दक्ष राहणे प्रत्येक व्यक्तीला आवश्यरक आहे.
    थकवा आलेल्या व्यक्तीला ""बरे वाटत नसल्याची‘‘ तक्रार असते. कोठे ना कोठे शरीरात अस्वास्थ्य जाणवत राहते. दैनंदिन व्यवहारदेखील नकोशी वाटतात. व्यायाम आणि आंघोळ करणे टाळले जाते. तात्पुरता थकवा तापासारख्या आजाराने किंवा अतिश्रमाने येतो. थोड्या दिवसांच्या विश्रांतीने किंवा "हवा पालटा‘ने तो जातोही. दीर्घकाळ टिकणारा थकवा एका महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतो आणि क्रॉनिक फटीग सिंड्रोम सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रेंगाळतो.
    ""अशक्तपणा,‘‘ ""निरुत्साह‘‘ आणि ""थकवा‘‘ हे तीन शब्द वेगवेगळ्या स्थितींचे निदर्शक आहेत. "अशक्तपणा‘ म्हणजे शक्ती कमी झाल्याचे जाणवणे. वजन उचलणे किंवा पायी चालणे अशा क्रियांना शक्ती लागते. जी व्यक्ती वीस पौंड वजन उचलू शकत होती, ती आता तेवढे वजन उचलू शकत नाही. किंवा जी व्यक्ती एका तासात तीन किलोमीटर्स अंतर पायी चालू शकत होती, ती आता तेव्हढे चालू शकत नाही, तर शक्ती कमी झाली आहे, "अशक्तपणा‘ आला आहे, अशी स्थिती शारीरिक आजारामुळे येते. "निरुत्साह‘ म्हणजे काम करण्याची इच्छा नसणे. अशी स्थिती शारीरिक किंवा मानसिक समस्यांचा परिणाम असू शकते. उदाहरणार्थ, हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला चालल्यानंतर धाप लागणे किंवा छाती भरून येऊन छातीत, गळ्यात किंवा पाठीत दुखण्याचा अनुभव येत असला तर हे श्रम करू नयेत असे वाटते. या तक्रारीला "अर्गो - फोबिया‘ म्हणतात. "ग्रीक शब्द‘ "अर्गॉन‘ म्हणजे काम किंवा श्रम, आणि दुसरा ग्रीक शब्द "फोबॉस‘ म्हणजे भय, भीती,आपल्या शरीरातील शक्ती वापरण्यात व्यत्यय येणे आणि विश्रांती किंवा झोप घेण्याची प्रबळ इच्छा होणे या स्थितीला "थकवा‘ म्हटले जाते. थकवा येण्यामागे दोन महत्त्वाच्या प्रतिसादांचा भाग असतो. पहिला म्हणजे ""युद्ध अथवा पलायनाचा‘‘ प्रतिसाद - आणि दुसरा म्हणजे ""संरक्षण - माघार‘‘ प्रतिसाद. युद्ध अथवा पलायनाचा प्रतिसाद प्राणिमात्रांना संकटांना तोंड देण्यास, प्रसंगी आक्रमक होण्याची व स्वतःला इजा झाल्यास त्याच्या तयारीची तरतूद करतो. या करता विविध मज्जा केंद्रे, अनैच्छिक मज्जासंस्था व विविध संप्रेरके (हॉर्मोन्स) कार्यान्वित केली जातात. यश मिळाल्यावर किंवा जीव वाचण्याची खात्री झाल्यावर हा प्रतिसाद शमतो. ""संरक्षण-माघार‘‘ प्रतिसादीत आगामी शक्तीच्या निचऱ्याची सूचना मिळताच सर्व हालचाल थांबवून सर्व संवेदना अधिक तीव्रतेने जाणविल्या जाण्याची स्थिती निर्माण केली जाते. हा प्रतिसाद विश्रांती किंवा झोपेनंतर शमतो. या संरक्षण - माघार प्रतिसादामुळे ऊर्जा वाचवली जाते. "युद्ध अथवा पलायन‘ या प्रतिसादामुळे ऊर्जा खर्च करण्याची तयारी होते व प्रत्यक्षात ऊर्जा खर्चही होते. युद्ध अथवा - पलायनाचा प्रतिसाद शमल्यावर संरक्षण आणि माघार हा प्रतिसाद सुरू करता येतो. म्हणजे, खर्च झालेली ऊर्जा आता भरून काढता येते.

    "युद्ध अथवा पलायन,‘ "संरक्षण आणि आधार‘ किंवा "उपस्थित राहून मैत्री वाढविणे‘ यापैकी कोणती स्थिती आपण जोपावयाची हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात्‌ त्या करता आत्मपरीक्षणाने आपल्या मनाचे व्यवहार जाणणे ही पहिली पायरी आहे. ऊर्जा खर्च करणे अथवा ती आपल्या दैनंदिन कामकाजात उपलब्ध नसणे म्हणजेच थकव्याला निमंत्रित करणे होय, हे स्पष्टच आहे. आपल्या उपरनिर्दिष्ट सर्व भावनांचे मूळ आपल्या अहंकारात आहे हे समजणे ही दुसरी पायरी होय. अहंकार समजणे म्हणजेच "अहम्‌‘ला जाणणे. आत्मज्ञान होणे. खरोखरी आत्मज्ञानी व्यक्ती थोड्याच असतील. आपले ऋषी, संत आणि महात्मे यांना तसे झालेले होते. सर्वसामान्यांना तशी स्थिती येणे सोपे नाही. ज्यांना थकवा जाणवतो, त्यांनी सुरवात आपल्या शारीरिक प्रकृती तपासण्यापासून सुरवात करणे इष्ट आहे. रक्तक्षय, मधुमेह, क्षयरोगासारखा संसर्ग, चुकीची जीवनशैली इकडे लक्ष पुरवून ते आधी दुरुस्त करावे. थॉयरॉईड ग्रंथीचे विकार ओळखणे व त्यावर योग्य उपचार करणे हे आता सोपे झालेले आहे. कोणताही शारीरिक विकार नसल्यास चिंतातुरता किंवा खिन्नता हे मानसिक विकार नाहीत ना, याची खात्री तज्ज्ञ आणि अनुभवी मानसोपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावी. याच्या जोडीला स्वतः आपल्या मनाचे व्यवहार पहावेत. सुप्त मनात डोकावण्याचा प्रयत्न करावा, येथे एखाद्या समुपदेशकाची मदत निश्चिचत उपयोगी पडेल. थकवा माणसाच्या इतर अनेक गुणांना झाकतो आणि आयुष्यात यशस्वी होऊ देत नाही. थकवा जाणलाच पाहिजे आणि योग्य उपचारांनी थकवा या स्थितीवर मात केलीच पाहिजे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- डॉ. ह. वि. सरदेसाई /सकाळ

      September 16, 2016


  • अहंकार हा जोड मित्र मनाचा (सुमंत उवाच – ५४)

    सुमंत जयंत परचुरे. 

    अहंकार हा शब्द केवळ शब्द म्हणून मनात ठेवला तर त्याची बाधा होत नाही.

      October 15, 2021


  • डिजिटल कचरा

    कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते.  प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.

      November 29, 2018