वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दरवर्षी मुंबईत ७ ऑगस्ट हा दिवस बेस्ट-दिन म्हणून साजरा केला जातो. उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली 'बेस्ट' सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७४ वर्षे पूर्ण झाली. मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही कंपनी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली म्हणून 'बेस्ट दिन' म्हणून साजरा केला जातो.
मुंबईत बेस्टने शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. गेल्या दिडशे वर्षांमध्ये मुंबईने ही गतीमान प्रगती केली आहे.
खरंतर मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामची कल्पना एका अमेरिकन कंपनीने १८६५ साली मांडली होती. त्या कंपनीला त्याचा परवानाही मिळाला होता. मात्र ती योजना प्रत्यक्षात आली नाही. बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, 'स्टर्न्स अँड किटरेज' कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. मुंबई प्रांतासाठी बॉम्बे ट्रामवेज अॅ क्ट १८७४ संमत करुन त्यानुसार बॉम्बे ट्रामवे कंपनीला ट्राम चालवण्याचे हक्क देण्यात आले. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले मात्र कोणतेही छापिल तिकीट तेव्हा देण्यात आले नाही. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते. नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापण्यात आली. स्टर्न्स अँड किटरेज कंपनीने ट्रामसाठी ९०० घोडे पाळल्याचे सांगण्यात येते.
इंग्लंडच्या 'ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनी'ने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी 'ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनी'ने एजंट म्हणून काम पाहिले. 'बॉम्बे ट्रामवे कंपनी', 'मुंबई महानगरपालिका', 'ब्रश कंपनी' यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५मध्ये बेस्ट म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी'ची स्थापना करण्यात आली. १९०७ साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर १९२६ साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १५ जुलै १९२६ साली शहरात पहिली बस अपगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. १९४७ साली कंपनीते नाव 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट' (BEST) असे करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
देशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…!
November 24, 2019
भगवान श्रीविष्णूंच्या विशाल बाहूंचे, स्कंधांचे वर्णन केल्यानंतर आता पूज्यपाद आचार्य श्री भगवंताच्या दिव्य कंठाचे वर्णन करीत आहेत.
January 6, 2021
आपण आहार का घेतो ?
…..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी.
कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ?
…..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी.
कशाला हवी धारणक्षमता ?
……निरोगी रहाण्यासाठी
August 30, 2016
पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.
March 22, 2022
जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत.
October 6, 2010
प्राण्यांचे मांस मिळवणे आणि खाणे एवढीच ही इंडस्ट्री नाही. तर याही पुढे जात पुढील मनीमेकींग सुरू झाले. भारतीय संदर्भ, भारतीय जीवनपद्धती, भारतीय संस्कार, भारतीय ग्रामीण मानसिकता यांच्यावर आघात करणारे आक्रमण घाऊक मांस उत्पादकांनी सुरू केले. निव्वळ मांसाच्या किंवा अंड्यांच्या विक्रीतून आवश्यक तो फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर बायप्राॅडक्टस कसे तयार करता येतील, याची विक्री योजना तयार झाली.
पशुहत्येतून मिळणारे रक्त वायाच जात होते. त्यापासून रक्त वाढणारी टाॅनिक तयार केली जाऊ लागली. नव्हे ती गरज बनली. आज बाजारात अनेक कट्टर शाकाहारी रूग्णांना, अनेक कट्टर शाकाहारी डाॅक्टर ही रक्तवाढीची टाॅनिक लिहून देत आहेत. दोघांनाही माहीत नाही आपण काय करतोय !
जनावरांची चरबी वायाच जाते. तिच्यापासून अनेक नामवंत साबण बनवले जात आहेत आणि आम्ही मारे अंगाची खोलवर स्वच्छता, तंदुरुस्ती की रक्षा करने के लिए, निंबुयुक्त, अश्या विशेषणांना भुलुन, असले कचरा साबण बिनधास्त वापरत आहोत.
( वेळीच लक्षात आल्यामुळे गेली वीस वर्षे मी स्वतः कोणत्याही कंपनीचा कोणताही साबण आंघोळीला वापरत नाही. एकदम हॅप्पी. उटणे वापरतो. वर्षभर दिवाळी ! प्रत्येक दिवस हा आनंददायी वाटत असेल तर निशीदिन आम्हा दसरा दिवाळी. )
या चरबीपासूनच मेणबत्या, काही सौंदर्य प्रसाधने, तयार केली जातात. मध्यंतरी महाराष्ट्रामधेच या चरबीपासून वनस्पती तूप तयार करणाऱ्या एका छुप्या कारखान्याचा पर्दापाश केला गेला होता.
गेल्या दशकातील अॅनिमल टेलो आयात प्रकरण हातोहात दडपले गेले आणि परदेशातील चरबी निर्यातदार सुरक्षित राहीले हा इतिहास आहे.
पण आपण सोयीस्कर पणे विसरून जातो. आणि अगदी सत्यनारायणपूजेसाठी सुद्धा असले वनस्पती तूप/ डालडा वापरलेला प्रसाद खातो. ( प्रबोधन केल्यामुळे आमच्या गावातील हित जाणणाऱ्या काही पुरोहितानी, सत्यनारायणाच्या पुजेतील साहीत्यामधे प्रसादाकरीता, गावठी गाईचे तूप नसल्यास पूजा केली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. आणि गावात आरोग्यदायी प्रसाद मिळू लागला. ठरवलं तर आपण काहीही बदल घडवू शकतो, याचं हे छोटसं उदाहरण )
हत्येनंतर शिल्लक राहिलेल्या हाडकांपासून कॅल्शियम फाॅस्फरस वेगळे काढून, किंवा काहीवेळा हाडकांच्या राखेचा वापर फोलगेट सारख्या नामवंत टूथपेस्ट बनवताना बेस म्हणून केला जाऊ लागला. आणि दातांची स्वच्छता करण्यासाठी ही हाडांची राख उपवासाच्या दिवशीसुद्धा तोंडात रगडू लागलो.
यातून तयार केलेले जिलेटीन हे आणखीनच एक द्रव्य. आज सर्रासपणे चाॅकलेट, टाॅफीज, आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरले जाते.
पशुंच्या लिव्हर किंवा अन्य अवयवांपासून मिळवलेली, बनवलेली काही एन्झाइम्स आज मेडीकल मार्केट मधे धडल्ले से बेची जा रही है !
पण लक्षात घेतो कोण ?
चलता है यार असं स्टाईलवर म्हणून या पापात सहभागी होत जातो. एका बाजूने पापपुण्य असलं काही नसतंच. असं ठामपणे पटवून देणारी बुद्धिमान माणसं तयार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सगळी मेंढरं. कुणीही हाका........ कुठेही जायला तयार !
किती ठिकाणी, कोणत्या रस्त्यावरून, कुठे जात, कसलं सीमोल्लंघन करायचंय, हे ठरवण्याचा आजचा दिवस.
याचा फक्त एक तासभर विचार करायचा. आणि पुनः पुढील वर्षी दसऱ्याच्या शुभेच्छा म्हणेपर्यंत विसरून जायचं. झालं.... !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
11.10.2016
October 11, 2016
…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात.
April 29, 2024
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.
October 24, 2011
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांनी परवा एका पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्रात मराठी टक्का घसरतोय अशी खंत बोलून दाखविली. पूर्वी केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीच नावे अमराठी होती, आता तर चक्क मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यादेखील अमराठी आडनावाने सजू लागल्या आहेत, असे काहीसे ते बोलले.
April 17, 2005
Copyright © 2025 | Marathisrushti