(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ४

    अनेक अवतार घेऊन शिवसुत म्हणविल्या जाणाऱ्या त्या भगवान गणाधीशांचे मी वंदन करतो.

      January 16, 2020


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४२

    भगवान श्रीविष्णूंच्या भुवयांचे वर्णन करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,

      January 14, 2021


  • पितृदिन

    पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं.

      June 19, 2022


  • शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी का लादली असावी ?

    शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच.

      July 29, 2016


  • ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्याभिमानी

    सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला.

      October 2, 2022


  • शीतलक व ब्रेकतेले.

    एका पेट्रोलियम कंपनीच्या गोदामाला अचानक आग लागली. सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यतत्पर असलेल्या तिथल्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण कळेना. त्या दुर्घटनेची ‘रुट कॉज अॅनालिसिस’ करण्यात आली. अखेरीस त्यांना ते कारण सापडले. त्या गोदामात पोटॅशियम परमॅग्नेट या रसायनाच्या गोणी साठवून ठेवल्या होत्या. त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या कक्षात शीतलकाची पिंपे उभी केलेली होती. शीतलक हे मुख्यतः एथिलिन ग्लायकोल या रसायनाने बनलेले असते. जमिनीवर ठेवलेल्या एका पिंपातून शीतलकाची गळती झाली होती.

      February 14, 2023


  • मेजर गोपाळ मित्रा आणि मिनी : दोघांचं अलौकिक आणि प्रेरणा देणारं प्रेम

    उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती त्रासदायक असतं हे तर सांगायलाच नको.

      August 10, 2016


  • अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग १

    भारतात असताना, शाळा कॉलेजच्या लॅब्जमधे गाणी ऐकण्यासाठी रेडिओ, टेपरेकॉर्डर वगैरे गोष्टी स्वप्नात देखील येणं शक्य नव्हतं. पुढे NDDB च्या गुजराथमधील फार्मवर, गायींमधे भृणप्रत्यारोपण (Embryo Transfer) च्या लॅबमधे काम करताना आम्ही “साब” झालो होतो. त्यामुळे सायबासारखं वागणं भाग होतं. “साब” लोक बिहारपासून राजस्थानपर्यंत आणि पंजाबपासून केरळापर्यंत वेगवेगळ्या राज्यातले होते. त्यामुळे गाण्याची आवड निवड जुळणं अवघड होतं. नवरात्रीच्या दोन तीन आठवडे आधीपासून, फार्मच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर, चहाच्या टपरीवर, गरब्याची गाणी तारस्वरात ऐकू येऊ लागत, ती पार नवरात्र संपेपर्यंत चालू राहत. तेवढाच काय तो लॅबचा आणि संगीताचा ओढून ताणून संबंध.

    कनेक्टिकटला UCONN (युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट) च्या लॅबमधे आलो तो जणू बीजींग किंवा शांघायला गेल्यासारखं वाटायला लागलं. माझे Ph. D. चे गाईड डॉ. यॅंग हे स्वत: चायनीज. त्यांची चायनीज पत्नी आमच्याच डिपार्टमेंटमधे असोसिएट प्रोफेसर. डॉ. यॅंगच्या लॅबमधे M.S., Ph.D., Post Doc students मिळून १४-१५ जणांचा ग्रूप होता. त्यातले दहाजण चायनीज. त्यामुळे लॅबमधे First Language चायनीज आहे की काय असा प्रश्न पडायचा. त्यात भर म्हणून पार्श्वभूमीवर कायम चायनीज संगीत चाललेलं. एकही शब्द समजण्या़चा प्रश्नच नव्हता. नुसतं शांत, एकसुरी संगीत कानावर पडत रहायचं.
    सहा महिन्यांनी, आयोवा राज्यातल्या Trans Ova Genetics ह्या कंपनीमधे माझ्या संशोधन प्रकल्पावर काम करायला येऊन दाखल झालो. येथे लॅबमधे सगळे गोरे अमेरिकन्स. काम भरपूर आणि कामाचा उरकही चांगला. इथेदेखील दिवसभर लॅब्ज, ऑफिस, कॅंटीन वगैरे सर्व ठिकाणी एखादं रेडिओ स्टेशन चालूच असायचं. ते बंद करायची पद्धतच नाही. त्यामुळे कधी संध्याकाळी, रात्री कामासाठी लॅबमधे, ऑफिसमधे जायचं असलं की दार उघडलं की अंधारात एकदम हे संगीतच कानावर पडून दचकायला व्हायचं. पुढे मग त्याची सवय झाली. एकूणच अमेरिकन लोकांना काम करताना शांततेचं वावडं असावं.

    माझा आणि इंग्लिश संगीताचा संपर्क जुजबी म्हणण्याइतपत देखील नव्हता. लहानपणी दुपारी ११ ते ११॥ वाजता रेडिओवर मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम असायचा. आजी घरातली कामं करता करता रेडिओ ऐकायची. शाळेची तयारी करता करता गाणी कानावर पडत रहायची. पुढे रात्रीच्या वेळचे, “बिनाका गीतमाला”, “बेला के फूल”, हे कार्यक्रम, त्यातल्या जुन्या सुंदर गाण्यांमुळे आवडीचे झाले होते. गाण्यातली माझी आवड जुन्या वळणाची. मराठीतली जीवाची माणसं म्हणजे सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, अरूण दाते, माणिक वर्मा आणि सुमन कल्याणपुर. गजाननराव वाटवे, मालती पांडे आणि ज्योत्स्ना भोळेंचं नाव खूप ऐकून होतो, पण प्रत्यक्ष त्यांची गाणी फारशी ऐकायला मिळाली नाहीत. नाट्यसंगीतातलं कळत फारसं नाही पण ऐकायला मात्र आवडतं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर ही दिग्गज मंडळी आवडीची. हिंदीमधे १९५० -१९६० ची दशके म्हणजे संगीताचा सुवर्णकाळ. मुकेश, तलत मेहमुद, हेमंत कुमार, महमद रफी, मन्ना डे, किशोर कुमार, लता, आशा, गीता दत्त हे गायक, गायिका आणि शंकर जयकिशन, सचिन दा, नौशाद, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, ओ.पी.नय्यर, सलील चौधरी, रोशन, खय्याम हे संगीतकार जीवाचे. त्यामुळे अमेरिकेला येताना मी मराठी आणि हिंदी जुन्या गाण्यांच्या कॅसेट्सचा मोठा खजिनाच बरोबर आणला होता. वेळ मिळेल तेंव्हा या चायनीज आणि अमेरिकन संगीताच्या तावडीतून सुटून एखादं मुकेश किंवा सुधीर फडक्यांचं गाणं ऐकलं की मन भूतकाळांत जायचं. या सार्‍या पार्श्वभूमीवर मी कंट्री म्युझिक कान देऊन ऐकायला लागीन आणि हळूहळू त्याची गोडी लागून मी त्याच्या प्रेमात पडेन असं कधीच वाटलं नव्हतं.

    -- डॉ. संजीव चौबळ

      July 5, 2016


  • जगातील पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण

    ६०वर्षांपूर्वी मायकल वुडरफ यांनी ब्रिटनच्या हॉस्पीटलमध्ये जिवंत व्यक्तिवर किडनी प्रत्यारोपण केलं होतं. याआधी १९५४ ला अमेरिकाचे डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी पहिल्यांदा प्रत्यारोपण केलं होतं. पण ते मृत व्यक्तीवर केलं होतं.

      October 30, 2021


  • मी प्रसवलेला ‘सिद्धांत’

    डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला..
    मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..!

      August 3, 2016