हिवताप एक अत्यंत जुनाट रोग जो सबंध भारतामध्ये पसरलेला आहे. भारतापासून ते थेट आशिया खंडातही तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एवढेच नव्हे तर चीन, युरोपमध्येही मलेरियाचा प्रभाव जास्त आहे. अनेक देशात मलेरियाला औषध सापडत नव्हते. अनेक शास्त्रज्ञांनी बरेच फिरून मलेरियाचा शोध लावण्याकरीता प्रयत्न केले. तसेच साधारण १७व्या शतकात पेरू या देशात एक झाडाचे साल सापडले. यावर प्रक्रिया करताना साल पाण्यात उकळून त्याचा रस पिण्याकरिता रोग्याला दिल्यास नक्कीच आराम वाटतो. पण ते फारच कडू असते. पेरूची व्हाईसरॉयची पत्नी ही हिवतापाने अत्यंत पछाडली होती, तिला हा अर्क प्यायला दिल्यामुळे आराम पडला होता. याला पेरूव्हियन पार्क असे व्हाईसरॉयच्या पत्नीने नाव ठेवले. नंतर ही सिफोना बार्क व त्याची मुळे साफ करून त्यात अर्क बनवत असत. तरी पण ते फारच कडू असले तरी त्याला दुष्परिणाम खूप होते. म्हणून आयुर्वेदात लोकांना थोडं दूर लक्ष केले. भारतीय शास्त्रज्ञ भारतात परत आले तेव्हा संहितेचा आधार घेऊन मलेरियाचा बिमोड केला. साधारणपणे
(इ.स. पूर्व ३४०) अनेक औषधे तयार केली ती म्हणजे
सुदर्शन चूर्ण
महासुदर्शन चूर्ण
सुदर्शन ग्यान वटी
सप्तमयग्याग वटी
निंबादी चूर्ण
गुरूची घन सत्त्व गुटी
अमृतारिष्ट
ही सर्व औषधे पूर्णपणे सुरक्षित होती. अथवा कोणत्याही वाईट परिणाम होत नाही. विशेष म्हणजे ही औषधे अनेक वर्षांपासून प्रचलित आहेत व अनेक आयुर्वेदिक वैद्य वापरत आहेत. आजही वापरत आहेत. सिंकोना बार्क मात्र अतिशय कडू असते. तसेच त्याचे चक्कर येणे, वांती अथवा ओकारी होणे वगैरे दुष्परिणाम होत असल्यामुळे रुग्ण औषधांचा तिटकारा करत. शुश्रूत संहितेमध्ये एक गोष्ट निश्चित झाली ती म्हणजे डास हा प्रकार आपल्या हिवतापाला कारणीभूत होतो. एवढेच नाहीतर वैद्य लोक यांच्या लक्षात आले की, हे डास प्रथम आपल्या शरीरातील रक्त शोषून घेतो व नंतर दुसऱ्या व्यक्तीला चावून त्याची लागण होते. डास हेच सूक्ष्जंतू असतात. हा रोग आयुर्वेदिक वैद्यांना फार मोलाचा वाटला.
इ.स.पूर्व ३४० सालात चीनी शास्त्रज्ञाने हिवतापाबरोबर बरेच संशोधन केले. या चीनी लोकांना सुश्रुत संहितेचाही बराच वापर केला व त्याच्या औषधाप्रमाणे गुणही भरपूर येऊ लागले. चीनी लोकांनी मात्र दुसऱ्या शतकात एकंदर ५२ प्रकारची औषधे व ती पूर्णपणे सुरक्षित होती. ही औषधे अमेरिकन शास्त्रज्ञाचे चीन येथे साधारण इ.स.पूर्व ३४०मध्ये वापरण्यात त्यांना बराच फायदा झाला.
डॉ. अल्फांसो लावेरान यांनी मलेरियावर कधीच काम केले नव्हते. डॉ. लवेरान यांचा जन्म १८ जून १८४५ रोजी झाला. डॉक्टर लवेरान हे त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी होती. त्यांचे वडील तसेच आजोबा हे डॉक्टरच होते आणि ते दोघे जणही मिलीटरी ऑफिसर म्हणून काम केले. डॉ. लवेरान यांनी आपले शिक्षण संपवून पॅरिस येथे सेंट मेडिकल कॉलेज येथे नोकरी धरली. १८९४ साली आपली नोकरी संपवून ते चिफ मेडिकल ऑफिसर म्हणून लष्करात आले.
डॉ. लावेरान हे आपल्या घरच्या गावाला नायजेरीया येथे राहावयास आले. नायजेरियाला जाताना त्याला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे नायजेरियात प्रचंड डासांचा उपद्रव सुरू झाला आणि सर्वांची झोपच उडाली होती. आता डॉ. लावेरान याने डास शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. गोष्ट होती साधारण नोव्हेंबर १८८० साली. आपल्या प्रयोगशाळेत डॉ. लवेरान यांना आपल्या प्रयोगशाळेत एक अति महत्त्वाचा शोध लागला तो म्हणजे डासाचे रक्त तपासताना मायक्रोस्कोप येथे काही परजीव (पॅरासाईट)चे जंतू आहेत. हे दोन प्रकारचे आहेत आणि त्यांना मेरोझाईट असे नाव दिले. तसेच हे परजीवी जंतू यांचा प्रभाव इतका जोरदार होता की, ते आपल्या मेंदूवर पोहोचत असत. हे परजीवी जंतूमुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो व रोगी निधन पावतो. ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्यामुळे डॉ. लवेरान यांना १९०७ साली नोबेल पारितोषिक दिले.
साधारण १९२२ साली डॉ. विल्यम वॉटसन यांनी परत पी ओवेल हा मलेरियाचा यांना जंतू रोगांचा डॉ. ब्रिजमोहन दासगुप्ता यांनी हे जंतू यांचा बिमोड करण्याकरिता आहारशास्त्र आपला पेपर वाचला व त्यांना फेलो ऑफ रॉयल सोसायटी हा बहुमोल असा किताब मिळाला.
साधारण १७व्या शतकाची चीनी शास्त्रज्ञाबरोबर संशोधन केले. एक नवीन औषध तयार केले याला नाव ठेवले अरेटमिसीया. या औषधाचा अर्क तयार करून ते खूपच प्रभावी ठरले व अल्जेरियात राहणारे शास्त्रज्ञ (अलवेरान) यांनी सिंकोना बर्क काढून तो पिण्यास दिला आणि याला क्विनीन असे नाव दिले. अशा प्रकारे मलेरिया विरुद्धचा शोध लावल्यामुळे डॉक्टर अलवेरान यांना १९०७ साली परत नोबेल पारितोषिक देण्यात आले. आता १९०७ साली सर्वत्र ठिकाणी क्विनीन मिळत असे व ते भारतीय सरकारने सरकारी पोस्ट ऑफिसात फुकट देत असत. मात्र हे औषध अत्यंत कडवट व त्याचा काही गंभीर परिणाम ही होत असे. याने उलटी होणे, भूक न लागणे अथवा कळमळणे असे विकार होत असत. परंतु ते सर्व रोगी निमुटपणाने सहन करीत असत.
मात्र १८९७ साली एक अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. विल्यम वेल्स यांच्या लक्षात आले की, डॉ. संशोधन करण्याकरिता काही सूक्ष्मजंतू परजीवी असतात ते जंतू थेट मज्जातंतूमुळे पसरतात व रोग्याचा तात्काळ मृत्यू ओढवतो. अशा जंतूला त्याने नाव ठेविले पॉल्सीफोरम. मात्र या संशोधनाची जणू स्पर्धाच लागली. पण पास्मोडीयम पॉल्सीफोरम परिचित झाले. भारतामध्येही हा शोध सुरूच होता. डॉ. निरज मोहन दासगुप्ता यांनी तशाच प्रकारचा शोध लावला.
डॉ. रोनाल्ड रॉस हे प्रथम भारतात जन्मले. ते एक वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १८५७ साली अल्मोडा येथे झाला. ते ब्रिटिश नागरिक होते. या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली व हे उडणारे डास आपले परजीवी जंतू सतत एकमेकांत मिसळत असतात. त्याला डॉ. रोजने नाव ठेवले ॲनोफ्लीस अथवा उडते पक्षी (डॉपल विंग्ज). हे सर्व पेपर्स देत असताना १९०२ साली डॉ. सर डोनाल्ड रोज यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर डॉ. सर डोनाल्ड रोज यांचे सहकारी यांनी सतत मदत केली व या त्यांच्या कर्तृत्वाबद्दल डॉ. किशोरी मोहन बंडोपाध्याय यांना सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रोज परत लंडनला गेले. लिव्हरपूल ऑफ ट्रॉपिकल मेडीसीन येथे प्राध्यापकाची नोकरी पत्करली. १९७१ साली डॉ. रोज यांना फेलो ऑफ रॉयल सोसायटी येथे १९११ ते १९१३ देण्यात आले व १९११साली यांना नाईट हूड (सर) हा किताब देण्यात आला. डॉ. रोज नुसते महान शास्त्रज्ञ नव्हते तर कवी, नाटककार, संगीत वगैरेंचे चाहते होते. डॉ. रोज यांचा १८८९ साली विवाह झाला व १९३२ रोजी त्यांना तीव्र दम्याचा अटॅक आल्याने निधन झाले. डॉ. रोज मात्र सर्वजण अत्यंत आदरपूर्वक वागत असत. कारण मलेरिया सारखा असाध्य रोग यांनीच बरा करून दिला व लाखो लोकांचे दुवा मिळाले. तसेच डॉ. रोज हे भारतीय असल्याने ते अनेक डॉक्टर रोजचे परिचयाचे होते. अनेक कॉलेज, हॉस्टेल्सना डॉ. रोज यांना देण्यात आले.
मलेरियाचा अभ्यास करताना डॉ. लावेरान यांनी आणखीन महत्त्वाचा शोध लावला तो म्हणजे मलेरियाचे डास यांचे जीवनचक्र हा अभ्यास केला. त्यांच्या मते मलेरिया एकंदर चार स्थितीतून पार होतो. ते म्हणजे अंडी, लारव्हा पुपा आणि प्रौढ (अंडस्टर) एवढेच नव्हे तर जेव्हा डॉ. रोज यांनी अॅनोफेलीसचा शोध लावला त्याच्या लक्षात आले की, असे मलेरियाचे जंतू नर व मादी असे असतात. नर अंडे कधीच घालत नाही. मात्र मादी नेहमी अंडे घालते. हा डास अतिशय घाणेरड्या पाण्यात पसरत असतात. झाड, बाग अशा ठिकाणी अंडे घालत असतात. ही अंडी साधारणपणे ५ ते १४ दिवसात उबवतात. मग उबवल्यावर त्याचे लारव्हे तयार होतात आणि नंतर मग पुपा तयार होतात व त्या पाण्यावर तरंगत असतात. व नंतर ते ४ ते ८ आठवड्यात उडणारे डास तयार होतात. आता नर व मादी दोन्ही मिळून तयार होतात. लारव्हा, पुपा वगैरे अंडी सारखे पदार्थ या लारव्हाना थोडे भोक पाडतात व त्यावर पक्षी व लारव्हे आपापले शोधावे लागतात. कधी कधी हे जणू गरज पडल्यास बागेतील फुलांचे रस पिऊ शकतात. हे दोन्ही जंतू थोडे मोठे झाले म्हणजे मनुष्य प्राण्यांना चावत असतात व ते दुसऱ्या रोग्याला आपले रक्त शोषक असतात व त्यामुळे एकमेकावर फैलावतात व त्यामुळे रोग्याचा धोका आणखीन वाढतो.
आता मलेरिया आटोक्यात कसा आणावा हा फार मोठा प्रश्न उभा राहिला. सिंकोना बार्क याचे मूळ साफ करून रोगी बरे होत होते व त्याला त्यांनी क्विनीन असे नाव ही ठेवले. पण हे काही सर्वोत्तम उपाय नव्हता. कारण ते फारच कडू असते व त्याला घातक परिणामही होत असत. त्याला दुसरा पर्याय म्हणजे बाहेर असलेले सांडपाणी. त्यावर काही जंतूनाशक औषधांचा फवारा मारावा. त्यामुळे डासांची अंडी नष्ट होत असा तो तात्काळ होता. जिवंत मासे पाळून ते मासे डासाचे अंडी खात असत. पण तेही अगदी थोडे. सरतेशेवटी पाणी उकळून पिणे एकच सर्वोत्तम औषध असे. आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाने ठरविले. मात्र एक जर्मन विद्यार्थ्यांने १९३९ साली एक नवीन औषध शोधून काढले. याचे नाव डॉ. मॅक्स म्युलर हे स्विर्झर्लंड येथे राहत होते. त्याने शेवटी डायक्लोरा डायफिनाईल ट्रायक्विरो इथेन म्हणजे डी.डी.टी. असे औषध तयार केले. याचे डासावर अत्यंत प्रभावी असे औषध ठरले व डॉ. म्युलर याला नोबेल पारितोषिक मिळाले. अमेरिका सरकारने तर आपल्या मिलीटरी कँपमध्ये ठिकठिकाणी जाऊन डी. डी. टी स्प्रे करून मलेरिया काबूत आणला. त्यानंतर १९४० साली डॉ. लुईस लावल विल्स या संशोधकाने एक औषध तयार केले. ते म्हणजे कम्युनिकेबल डिसीन सेंटर (सी.डी.सी.) हे औषध अत्यंत प्रभावी ठरले. डब्ल्यू.एच.ओ. यांनी समस्त जगात ओरडून सांगितले की, प्रत्येकाने आपली फवारे ठिकठिकाणी मारावे व त्याने डासाचा नायनाट होतो. त्यानंतर १९५५ सालापासून मलेरियाचा धोका टळला, असे जागतिक आरोग्य खात्याने सांगितले. तसेच नवीन औषधे पुढे आली क्विनीन आणि त्याचे डेरीव्हेटीव्ह याचा भरपूर प्रभाव पडला आणि आज डासाचा संपूर्ण नायनाट करता येतो.
-श्री. मदन देशपांडे