(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दीर्घायु’चे रहस्य…आयुर्वेद !!

    कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; 'शतायुषी व्हा' असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे?

    भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार सरासरी ६० वर्षे हे आम्हा भारतीयांचे आयुर्मान आहे. राज्यवार अभ्यासल्यास हे आयुर्मान केरळ या राज्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ७४.९ वर्षे इतके आहे. केरळ; ज्याला God's own country असंही म्हटलं जातं....हे राज्य आयुर्मानाच्या आणि एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आजवर कायम आघाडीवर राहिलं आहे. यामागची कारणंदेखील महत्वाची आहेत. शिक्षणाचे अधिक प्रमाण, दरडोई उत्पन्न उत्तम असणे आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा ही काही प्रमुख कारणं. मात्र या सगळ्यांच्या पलिकडे असलेले आणि हे सर्वकाही व्यापून उरलेले आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे 'आयुर्वेद'.

    आयुर्वेदाच्या क्षेत्रात पंचकर्म हा शब्द ऐकला-वाचला की दुसरा जो शब्द लगेच आपल्या मनात येतो तो म्हणजे केरळ! केरळाने छोट्या छोट्या गोष्टींत आयुर्वेद जपला आहे. भगवान परशुरामांनी निर्माण केलेली गौरवशाली अष्टवैद्य परंपरा जपली ती याच राज्याने. आपल्याकडे 'आजीबाईचा बटवा' असतो तसाच केरळात 'उट्टमूली' असतात. उट्टमूलीमध्ये एखाद्या रोगावरील एक किंवा फारतर दोन वनस्पतींचे मिश्रण वापरण्याची पद्धत आहे. आपल्याकडचा 'आजीबाईचा बटवा' हा आज भरकटत जाऊन जणूकाही घरगुती औषधे म्हणजेच आयुर्वेद अशा पायरीवर जाऊन पोहचला आहे. उट्टमूलीमध्ये मात्र आयुर्वेदातील सिद्धांतांवर आधारित एकल द्रव्य चिकित्साच प्रामुख्याने दिसते. सहस्रयोग वा चिकित्सामंजिरी यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदीय ग्रन्थ जन्मले ते याच देवभूमीत. संस्कृत भाषेव्यतिरिक्त अन्य कुठल्या भाषेतील ग्रन्थ असूनही अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याने आयुर्वेदाच्या महत्वाच्या संहिता/ निघण्टु ग्रंथांच्या मांदियाळीत या मल्याळम् ग्रंथांना आदराचे स्थान आहे. असे अन्य उदाहरण विरळाच.

    दैनंदिन आयुष्यातही केरळाने आयुर्वेद आजही जपलाय. कळरीपायट्टपासून ते अगदी रोजच्या खाण्यासोबत घेतल्या जाणाऱ्या 'चुक्कु वेल्लम्' किंवा 'पथीमुकम् वेल्लम्' पर्यंत मल्याळी बांधव आयुर्वेद 'जगत' असतात. (या दोन्हीवर स्वतंत्रपणे लिहीनच; तूर्त वेल्लम् म्हणजे पाणी; आणि हे दोन्ही प्रकार म्हणजे आयुर्वेदीय औषधींनी सिद्ध केलेले पाणी इतकेच लक्षात ठेवलेत तरी पुरे. असे पाणी केरळात जेवणासह घेण्याची प्रथा आहे.)

    सुश्रुतसंहितेत स्पष्टपणे म्हटले आहे;

    'आयुरस्मिन् विद्यते, अनेन वाऽऽयुर्विन्दन्ति इत्यायुर्वेदः।' (वेदोत्पत्त्यध्याये।)

    अर्थात्; ज्यात आयु आहे किंवा ज्यामुळे आयुर्प्राप्ती होते तो म्हणजे आयुर्वेद. केरळ हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे. आम्ही वैद्यगण आमच्या ग्रंथाबाबत 'पोथीनिष्ठ' आहोत असे काहीजण कुत्सितपणे म्हणत असतात. हो; आम्ही पोथीनिष्ठच आहोत. कारण; त्या ग्रंथांतील शब्दन् शब्द आम्हाला प्रत्यक्षात अवतरलेले सतत दिसतात. हा सूर्य हा जयद्रथ!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

    https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/2016/10/30/आयुष्मान-केरळ/

      November 4, 2016


  • सत्य ठरलेलं स्वप्न -कोकण रेल्वे – भाग दोन

    रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची 'रो रो वाहतूक सर्व्हिस' हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात व १८ ते २० तासांच्या प्रवासानंतर सुरतकल आणि अंकोला येथे ते उतरतात. पुढे इच्छित स्थळी पोहचतात. नाशवंत माल (फुले, फळे, भाज्या) लवकर आणि कमी पैशांत पोहचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. २००७-२००८ या वर्षामध्ये कोकण रेल्वेच्या माल वाहतुकीतून २६९ कोटी रुपये, तर प्रवासी वाहतुकीतून २३२ कोटी रुपये उत्पन्न जमा झालं. १९९१ सालाच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५ वर्षांतील उत्पन्नातून भरून निघाला आहे. रोज जवळजवळ ५० प्रवासी गाड्या या मार्गावर धावत असतात. एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेल्या या कोकण रेल्वेची एकूण कर्मचारी संख्या ४१५१ इतकी कमी असून, १ कि.मी. रेल्वे अंतराला हे प्रमाण ४.६१ इतकं आहे; तर संपूर्ण भारतीय रेल्वेवर हेच प्रमाण १२.८७ इतकं आहे.

    कोकण रेल्वेच्या मार्ग बांधणीमुळे दोन शहरांतील अंतर किती कमी झालं आहे याचा तक्ता अभ्यासनीय आहे.

    मार्ग पूर्वीचा मार्ग (अंतर) कोकण रेल्वे (अंतर) बचत
    १. मंगलोर-मुंबई २०४१ कि.मी. ९१४ कि.मी. ११२७ कि.मी.
    २. मंगलोर-दिल्ली ३०३० कि.मी.

    २२४९ कि.मी. ७८१ कि.मी.
    ३. कोचिन-मुंबई १८४९ कि.मी. १३३६ कि.मी. ५१३ कि.मी.

    प्रवासाला लागणारा वेळ (तासांत)

    मार्ग पूर्वीचा मार्ग कोकण मार्ग बचत (तासांत)

    १. मुंबई-मंगलोर ४१ तास १५ तास २६ तास

    २. मुंबई-कोचिन ३६ तास २४ तास १२ तास

    ३. मुंबई-गोवा २० तास १० तास १० तास

    महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील कणकवलीच्या स्टेशनमास्तर म्हणून त्याच गावातील एक महिला श्रीमती माया पाटोळे या काम बघत असत. बारीक-सारीक तक्रारींचं निवारण करणं व बराच वेळ निर्मनुष्य स्टेशनावर देखरेख ठेवण्याचं चोख काम त्या कसोशीने करीत. आपल्या गावाचं रेल्वेमुळे भलं झालं आहे, या भावनेमुळे त्यांना स्टेशन सांभाळण्यात भरपूर आनंद मिळाला आहे.

    गोव्यातून कर्नाटकातील उडपी रेल्वेमार्ग सुरू झाला आणि गोव्यातील काणकोण स्टेशनजवळील दारूच्या गुत्त्याचं नशीबही फळफळलं. दुपारी उडपीहून निघणाऱ्या गाडीतून मद्यशौकीन या स्टेशनपर्यंत येत. कारण, कर्नाटकपेक्षा इथे दारू बरीच स्वस्त होती. संध्याकाळी मद्यप्राशन करून रात्रीच्या गाडीने ही मंडळी आपापल्या घरी मुक्कामास परतत.

    या मार्गावरील एका खेड्यातील आजीबाईंनी रेल्वे कधीच पाहिली नव्हती. लग्न होऊन दुसऱ्या गावात राहण्यास गेलेल्या आपल्या मुलीच्या घरापर्यंत रुळांवरून धावणारी ही गाडी जाते हे ऐकून त्या अचंबितच झाल्या. एरवी तिच्या गावाला जाण्याचा रस्ता चांगला ४ ते ५ तासांचा होता. खाच-खळग्यांच्या रस्त्यानं सर्व्हिस मोटारने जाणं क्रमप्राप्त असे. पावसाळ्यात तर हाल विचारूच नका. आता मात्र कोकण रेल्वेमुळे मुलगी १ तासाच्या प्रवासाएवढी जवळ असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला.

    कोकणी माणसांना, कोकणातील प्रदेशांना, अन्य जणांच्या जवळ आणणाऱ्या कोकण रेल्वेनं प्रवास करणं ही एक अक्षरशः वेगळीच अनुभूती असते. त्यातही पावसाळा संपता संपता कोकण रेल्वेचा प्रवास करणं म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची नुसती उधळण वेचून घेऊन प्रवास करणं असतं. हिरव्यागार भातशेतीच्या खाचरांमधून साचलेलं मातकट पाणी, भुरभुरत्या पावसात डोक्यावर कांबळ (इरली) घेऊन काम करणारा शेतकरी, दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, हा सर्व आनंद लुटायचा असेल तर डब्याच्या दाराजवळ उभं राहावं, गार वारा पीत हा खेळ पाहावा. या क्षणांची मजा काही और आहे. मुंबईहून रत्नागिरीकडे जाताना चिपळूण सुटलं, की निसर्गाचं रूप एकदम पालटतं. लाल माती व कातळीचे डोंगर थेट रेल्वे लाईनला भिडलेले. खळाळत वाहणारे छोटे-मोठे ओहोळ, दूरवर छोट्या खेड्यांत जाणाऱ्या तांबड्या मातीच्या पाऊलवाटा, अगदी रेल्वेरुळांना चिकटलेली हिरवी रोपटी, हे सर्व कापत अकराळ-विकराळ, तांबूस, पिंगट, काळपट अशा विविध रंगछटांच्या डोंगर-कपारीतून मार्ग काढत गाडी भोकेवाडीच्या बोगद्यात शिरते. काळ्यामिट्ट अंधारात डोंगर-कपारींच्या कडा डब्यावर चाल करून येतात. गाडीचा रुळांवरील घनगर्जनेचा घुमणारा आवाज छातीचे ठोके चुकवितो. मध्येच इंजिनाच्या जोरदार शिटीचा आवाज त्यात मिसळल्यावर आपला प्रवास कुठे चालला आहे हेच क्षणभर कळेनासं होतं. दहा मिनिटं अंधार आपला सोबती असतो, पण तो हवाहवासा वाटतो, आपला प्रवास असाच चालू राहावा असं वाटू लागतं आणि गाडी बघता बघता रत्नागिरी स्टेशनात शिरते. कोकणातील सर्वच स्टेशन चकाचक, स्वच्छ आहेत. तुरळक माणसांच्या स्वस्थ हालचालींची जाग असलेली ही स्टेशनं वातावरणामुळे मनाला समाधान देतात, पुन:पुन्हा येण्यासाठी आमंत्रण देत राहतात.

    या कोकण रेल्वेचा प्रवास म्हटलं, की आजही एक आठवण मनात हमखास जागी होते. मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत कुडाळ रेल्वे स्टेशनावर आम्ही आठ जण उभे होतो. दिवस पावसाळ्याचे होते, पण आकाश निरभ्र होतं. गाडी सव्वीस डब्यांची असणार होती आणि प्रत्येक क्रमांकाचा डबा कुठच्या जागी येणार याचे इंडिकेटर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर नीट लावलेले होते. आम्ही वाट बघत होतो. काही मिनिटांतच अनपेक्षितपणे आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हा हा म्हणता सरीच्या सरी कोसळू लागल्या आणि आम्ही सर्वजण बॅगांसह नखशिखांत ओलेचिंब झालो. गाडी काही येता येत नव्हती. आम्ही हैराण... आणि एकदाचं इंजिन दिसलं, आम्ही डब्यात शिरलो... जवळजवळ संपूर्ण डबा रिकामा होता. जणू तो आमचाच राखीव डबा होता. ओलेचिंब कपडे वाळविण्यासाठी जागाच जागा होती. भिजलेले असूनही आम्ही सुखावलो. जरा विसवतो, तो खानपानाचा मारा सुरू झाला. मांडवी एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांइतके विविध पदार्थ भारतातील कोणत्याच गाडीत बघितले नव्हते. पोहे, भजी, उपम्यापासून मटण, चिकन ते मसाला दूध अशा तब्बल बावन्न पदार्थांनी दहा तासांत हजेरी लावली होती.

    स्टेशनवर पावसानं केलेली फजिती अलगद मागे पडली होती आणि सुरू झाला होता जिव्हासुख देणारा आणि नेत्रसुखद कोकण रेल्वेचा प्रवास! कोकण रेल्वेच्या 'घडण्याचा प्रवास मनात आठवत हा रेल्वेप्रवास करणं हे तर आणखीनच सुखद असतं.

    -डॉ. अविनाश वैद्य

      June 22, 2022


  • रथसप्तमी

    माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची आराधना केल्यास सर्व रोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच सूर्याची आराधना केली जाते. रथसप्तमी याचा अर्थ सूर्याचा सारथी "आरुणी‘ सात घोडे असणाऱ्या रथाचे सारथ्य करीत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्य हा तीळ तीळ वाढत जातो. रथसप्तमीनंतर संक्रांतीची समाप्ती मानली जाते.

    रथसप्तमीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ अंगणात सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी पाटावर रांगोळीने सूर्याची प्रतिमा किंवा काही ठिकाणी सूर्याची मंडळे काढली जातात. बारा आणि सात मंडळांचा गोलक असतो. ही संख्या शुभ मानली जाते. यावर विड्याची पाने, सुपारी ठेवून तांबडे गंध, तांबडी फुले वाहिली जातात. या दिवशी नैवद्याच्या खिरीला अत्यंत महत्त्व असते. मातीच्या सुगड्यात दूध, तांदूळ घालून ते भांडे अंगणात गोवऱ्या पेटवून दूध ऊतू जाईपर्यंत तापवितात. त्याचा प्रसाद कुटुंबीय ग्रहण करतात. यालाच "पायस‘ असे म्हणतात. या दिवशी नैवेद्याकरिता गुळाची पोळीदेखील करण्याची परंपरा आहे.

    सकाळी सूर्याला सूर्यफूल टाकून अर्घ्य वाहिले जाते. "तुझ्याप्रमाणे माझे जीवन तेजोमय होऊ दे‘, अशी प्रार्थना सूर्याची 12 नावे घेऊन केली जाते. मात्र, ही पूजा सूर्याच्या साक्षीने अंगणातच करण्याचा दंडक आहे. सूर्याची उपासना आपल्याकडे हजारो वर्षांपासून रथसप्तमीच्या निमित्ताने करण्याचा प्रघात आहे. या दिवशी हळदीकुंकू वाटले जाते व सायंकाळी देवळात जाऊन संपूर्ण दिवस आनंदात घालविला जातो.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 9, 2017


  • विकासा’ची व्याख्या

    आपल्याकडे गेली अनेक वर्षे विकास या शब्दाची चर्चा आहे. हल्ली तर विकास सुसाट सुटलाय ते विकास वेडा झालाय इथपर्यंत चर्चा आहे. देशातील इतर शहरांचं माहित नाही, परंतू मुंबई गेली काही वर्ष ‘विकास’ चाललेला ‘दिसतो’ आहे. विकास हा शब्द नेत्यांपासून ते एखाद्या कंगाल माणसापर्यंत सर्वच लोकांच्या मुखात असतो. परंतू प्रत्येकाच्या विकासाची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे असं वाटतं. हे म्हणजे विकासाच्या रथाला चहूबाजूने घोडे, ते ही शहरातलं धष्टपुष्ट अरबी ते गांवाकडचं एखादं मरतुकडं घोडं, अशा वेगवेगळ्या ताकदीचे जोडले आणि त्यांना त्यावरील, पोट भरलेला नेता ते पोटभरू कामगार अशा, स्वारांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेने जोरात पळण्यासाठी टांच मारली, तर त्या विकासाच्या रथाचं जे काही होईल, तसं आपल्या विकासाचं झालंय असं मला वाटतं..हे असं होण्याचं एकमेंव कारण म्हणजे विकासाची नेमकी व्याख्या काय आणि तो कोणासाठी करायचा हे ठरलेलं नसणं.

      October 16, 2017


  • दादर चा जन्म आणि बारसं..!!

    मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतलं आजचं सर्वात महत्वाचं ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही.

      August 7, 2018


  • वूली मॅमथचा दूरसंचार!

    वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं.

      November 19, 2021


  • रिअल ब्रेड वीक

    ब्रेड हा आज अनेकांच्या रोजच्या आहारातील पदार्थ झाला आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रिअल ब्रेड वीक’ म्हणजेच भेसळमुक्त पाव आठवडा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ रिअल ब्रेड वीक साजरा केला जात आहे.

    जे नैसर्गिक पद्धतीने ब्रेड बनवतात, अशांसाठी हा आठवडा खास साजरा केला जातो.

    नैसर्गिक पद्धतीने ब्रेड म्हणजे ज्या ब्रेडसाठी खाण्याचा सोडा, ॲ‍कस्कॉर्बिक ॲ‍सिड, चव वाढवणारी द्रव्ये यांपकी काहीही वापरलं जात नाही तो

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      February 24, 2022


  • गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग एक )

    धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित

      April 4, 2016


  • वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग

    जर आपण लठ्ठपणाचा त्रास घेत असाल तर तुम्हाला वजन कमी करण्याचा निरोगी मार्ग शोधणे आवश्यक आहे. शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न पोहोचवता वजन कमी कसे करावे हे बरेच मार्ग आहेत. यात नियमित व्यायाम, आहार घेणे आणि काटेकोरपणे त्याचे अनुसरण करणे समाविष्ट आहे. पौष्टिकतेसाठी भरपूर पाणी पिणे आणि फळे आणि भाज्या खाणे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण वापरत असलेल्या पोषणाची काळजी घ्यावी लागेल. आपण चरबीयुक्त आहार घेऊ शकत नाही आणि आहार पूर्णपणे चरबी मुक्त असणे आवश्यक आहे.

    जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

    सुडौल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे आणि वाढते वजनचं अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. पण वाढलेले वजन कमी करणे मोठे आव्हान ठरत आहे. स्थुलता, वाढलेले पोट ही आजच्या तरुणाईची समस्या आहे. त्यासाठी अनेकजण जीम लावतात, व्यायाम करतात, महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण अनेकदा त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही. किंवा त्यात सातत्य राखणे अनेकांना जमत नाही. पण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल..

    https://www.youtube.com/watch?v=jGbRtb8j_Ow

      January 23, 2020


  • मंगलमूर्ती श्री गणेशा विषयी अमंगल गैरसमज !

    कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे.

      August 8, 2018