वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट.
भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे.
कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची.
गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती. लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवाशी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते.
यावेळी मात्र आपण मतदान करणारच !!!!
बदल घडवायची ताकद.. तुझ्या मतात आहे…
नभाचे नभाला प्रस्तुत हे खास गाणे… तरुणाईला मतदानाकरिता साद घालण्यासाठी..
शब्दरचना आणि संगीतकारः विशाल आणि समीर
गायकः विशाल राणे
नभाचे नभाला – विशाल, समीर, सई, ऋषिकेष आणि सागर
व्हिडिओ एडिटिंगः पूजा प्रधान
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ द्वारे जनहितार्थ प्रकाशित
‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल.
निद्रानाश असल्यास पेरू, सफरचंद़ आणि गाजर किंवा बटाट्याचा रस पालक रसाबरोबर सायंकाळच्या पूर्वी घ्यावा.
झोपण्या पूर्वी सोसवेल ईतक्या गरम पाण्यात १०/१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.
रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल चोळून जिरवावे. तळहातावरही ते लावून जिरवावे. तळपाय काशाच्या वाटीने घासावेत, गुण खात्रीने येतो. मात्र या गोष्टीत सातत्य आवश्यक आहे.
गरम दुधात दोन चमचे मध घेऊन झोपावे
गाईचे तूप व जायफळाची पावडर हातापायांना व कपाळावर घासल्याने उष्णता कमी होऊन शांत झोप लागते.
डोके व पाय यांना खोबरेल तेल किंवा गाईचे तूप काशाच्या वाटीने घासावे.
रोज रात्री खुरासनी ओव्याची पावडर चिमुटभर तोंडात टाकून त्यावर भांडेभर पाणी प्यावे त्यामुळे झोप चांगली येते. खुरासनी ओवा काष्टौपधीच्या दुकानात मिळतो. या उपायाने मानेतील आखडलेल्या शिराही मोकळ्या होतात.
शुद्ध माक्याचे ब्राह्मी तेल झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करावे
साजूक लोणकडे तूप चमच्यात घेऊन गरम करून झोपताना ३/४ थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडावे.
नैवेद्याच्या अर्धी वाटी दुधात जेष्टमध उगाळून गंधासारखे दाट करावे व त्यात तितकेच खोबरेल तेल घालून हे तयार केलेले तेल झोपण्यापूर्वी डोक्यास लावावे.
दुधी भोपळ्याचा रस तीळाच्या तेलात मिसळून डोक्यास मसाज करावा.
सॅलड पत्यांचा रस गुलाब तेलात म्सळून कपाळावर चोळल्यास शांत व चांगली झोप येते.
भरपूर दही खावे व डोक्यात चोळावे. ......रात्री मात्र दही खाऊ नये.
दिर्घ श्वसन करावे त्यामुळे देखिल झोप शांत लागते.
वरील सर्व कारणांमुळे झोप लागेल अर्थात वरील सर्व उपाय सर्व प्रकारच्या तब्बेतीच्या लोकांना उपयोगी पडतीलच असे नाही. कारण प्रत्येक औषधाचे परिणाम प्रकृति-प्रकृतीनुसार बदलत असतात. अर्थात वरील पैकी कोणत्यातरी एकाद् दोन उपायांनी गुण निश्चित येईल.
झोप न येणे हे जसे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तसेच झोप जास्त येणे हे देखिल अपायकारक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगणकाचे हार्डवेअर म्हणजे संगणकाचे विविध भाग. हे विविध भाग संगणकाचे अवयवच असतात. मानवी शरीराच्या अवयवांप्रमाणेच संगणकाचे हे अवयव विशिष्ट कामे पार, पाडत असतात. कालानुरूप या हार्डवेअरच्या स्वरूपात बदल होत गेले असले, तरी त्यांचे कार्य तेच राहिले आहे. संगणकाची ओळख करून घ्यायची तर संगणकाच्या या हार्डवेअरची माहिती हवीच…
सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे.
काही जीर्ण-शीर्ण पण तग धरून राहिलेली , काही बऱ्या अवस्थेत ! एकेकाळी आमच्या उभयतांच्या प्रकाशित साहित्याच्या कात्रणांचे अल्बम मी केले होते, पण नंतर संख्या वाढत गेल्याने तो नाद सोडून दिला आणि ते सरळ फाईलबद्ध करायला सुरुवात केलीय.
Copyright © 2025 | Marathisrushti