वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले. दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले, 'मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलेस...
आता मीही बघ कशी मैत्री निभावतो ते.... आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही .. आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो.
आणि खरेच ते पाणी दुधात एकरुप झाल्यामुळे दुधाच्याच मोलाने विकले. नंतर ते पाणीमिश्रीत दुध उकळण्यासाठी शेगडीवर ठेवले जाते.तेव्हा पाणी म्हणते, मित्रा तू माझे मोल वाढवून मैत्री निभावलीस... आता माझी पाळी आहे..
आता मी तुझ्या अगोदर जळणार असे म्हणून पाणी दुधापासून अलग होऊन उडायला लागते. आपला मित्र आपल्यापासून दुरावतोय हे लक्षात आल्यावर दुधाला उकळी येते आणि ते उकळते दुध पातेल्यातून खाली आगीवर पडून आग विझवण्याचा प्रयत्न करते. दुध उकळू लागताच दुध तापवणारी व्यक्ती त्या दुधात थोडे पाणी शिंपडते... ...तेव्हा कुठे ते उकळते दुध शांत होते .!
नात्यांचेही असेच असते ..
नाती दुध आणि पाण्यासारखीच असतात. एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत. पण दुधात लिंबाचे चार जरी थेंब टाकले तर मात्र दुध आणि पाणी एका क्षणात अलग होतात.
नात्यांचेही तसेच असते, थोडासा जरी अविश्वास झाला तर नाती क्षणार्धात तुटून जातात. म्हणून आपल्या माणसांचा विश्वास कधीच तोडू नका.
कारण,
नात्यांचा ताज़महाल,
विश्वासावर उभा असतो ।
संशयाचा छोटासा घावही त्याला
जमीनदोस्त करुन टाकतो ॥
September 18, 2016
हि उग्र वासाची गुल्म वनस्पती आहे.हिचे २-४ सेंमी उंचीचे क्षुप असते.ह्याच्या पानांच्या कडा दंतुर अथवा अखंड असतात.पाने मागच्या बाजुस पांढरी लव युक्त असतात व गुळगुळीत असतात.साधारेण पणे एका वृन्तावर ५-१५ सेंमी लांबीच ३-५ पत्रके असतात.फुले लहान व गुच्छ युक्त पांढरी किंवा निळी असतात.फळ गोल व पिकल्यावर काळे दिसते.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बिया,पंचांग,मुळ.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात.निर्गुण्डी चवीला कडू,तिखट,तुरट असते.हि उष्ण गुंणाची असून हल्की व रूक्ष असते.हि वातकफनाशक व पित्तकर आहे.
चला आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊ:
१)वेदना व सूज असणाऱ्या भागावर निर्गुण्डीची पाने गरम करून बांधतात.
२)घसा दुखणे,तसेच तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्यात निर्गुण्डीच्या काढ्याने गुळण्या करतात.
३)आमवातामध्ये दुखणाऱ्या सांध्यांवर निर्गुण्डीच्या पानांचा रस लावतात.
४)डोकेदुखी,डोके जड होणे,ह्यात निर्गुण्डीच्या पानांची चटणी डोक्यावर बांधतात.
५)निर्गुण्डी केस व डोळ्यांच्यानआरोग्यास उत्तम आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 25, 2017
काल आपण माता दुर्गेच्या नवरात्रींपैकी पहिल्या दिवसाच्या पर्वकालातील माहिती पाहिली.आज या कुलोत्पन्न ऊत्सवाचा दुसरा दिवस.दुसरी माळ.आज गुरुवार.गुरु म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रभाव.आज मातेने पिवळी वस्र परिधान केलेली आहेत अशी श्रध्ददा आहे.दुसर्या माळेला देवी भागवतात अनंत,मोगरा,चमेली,तमर अशा पांढर्या फुलांची माळ घटापर्यंत अर्पण करायची आहे.
जपः-दधाना करपद्माभ्याम् क्षमालाकमण्डलू।
देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।।
या जपाने ब्रह्मचारिणी मातेची आळवणी करुन जी पूजा मांडली आहे त्या पुजास्थानी स्थीर होण्याचं आवाहन करायचं.यशा मिलीतोपचार द्रव्यांसह पुष्पांनी मातेची मनोभावे पुजा करावी.आजच्या दुसर्या दिवशी.
साक्षात महादेव आपणांस पती लाभावेत अशी इच्छा तिने निश्चित केली होती.त्यासाठी म्हणजे महादेवाला प्राप्त करण्याच्या इराद्याने तीने घोर तपश्चर्या केली.म्हणून तीला “तपश्चारिणी”किंवा ब्रह्मचारिणी ” या नामाभिदानाने ओळखले जाते.
अत्यंत कठीण प्रसंगी ब्रह्मचारिणी मातेची आराधना केली तर ती तिच्या भक्तांना ती पावते अशो श्भाविकांची श्रध्दा आहे.तिचे रुप अत्यंत भव्य असून पूर्ण ज्योतिर्मय आहे.डाव्या हातात जपमाला असुन ऊजव्या हातात कमंडलु धारण केले आहे.ज्ञान आणि वैराग्य यांची प्राप्ती ब्रह्मचारिणी च्या पूजेने होते.शरद ऋतुमध्ये हा ऊत्सव सुरु होतो.वसंताच्या सृजना प्रमाणे जसे वृक्षराजी नवीनतम पालवी फुटून नव्याने सृष्टीला सुशोभित करु लागतात त्याच प्रमाणे या ऊत्सवात नेहमीपेक्षा एक हजार पट अधिक प्रमाणात देवी तत्व पृथ्वीवर कार्यरत असते.म्हणून या कालावधीत “श्री दूर्गादेव्यै नमः”हा जप जितका जास्त करता येईल तितका तो सिध्द होत जातो.
पहिल्या माळेला माता स्वरुप हे “कुमारीके”प्रमाणे आसतं.दोन वर्षाच्या कन्येचं आणि मातेचं निरागस रुप...त्याची आराधना ऐश्वर्यप्राप्ती देते तर दुसर्या माळेची मातेची छबी ही तिन वर्षाच्या कन्ये प्रमाणे असते.त्रिमूर्तिनी हे नाव धारण केलेले आहे.तिच्या पूजनाने भोग आणि मोक्ष प्राप्ती होते.
आज पिवळ्या रंगांचे पदार्थ आहारामध्ये असावेत.पिवळ्या रंगांसह पिवळ्याच्या जवळच्या रंगमालेतील सहरंग देखिल याच प्रकारात येतात.
-- गजानन सिताराम शेपाळ
October 14, 2018
६ सप्टेंबर १८८० हा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या आरंभाचा दिवस ठरला. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांच्याकडून या दिवशीच शतक निघावे हा अनोखा योगायोग होता. केनिंग्टन ओवलवरील या कसोटीपूर्वी क्रिकेट जगतात केवळ तीनच कसोट्या खेळल्या गेल्या होत्या…रिचर्ड हटनच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी लेन हटन परलोकवासी झाले ही मात्र नक्कीच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. वाढीचा ठरलेला असा दिवस नसतो पण अर्थ समजावा म्हणून नाईलाजाने असे शब्द वापरावेच लागतात. असो
September 6, 2010
आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
July 26, 2017
ह्ा देश प्रजासत्ताक आहे, याचा अर्थ देशावर कुण्या एका व्यत्त*ीचे नव्हे तर देशातील संपूर्ण जनतेचे राज्य आहे. या देशाची मालक सामान्य जनता आहे. याचा एक अर्थ असाही आहे की सरकारची म्हणून जी तिजोरी आहे ती सरकारची किंवा मंत्रिमंडळाची नसून त्या तिजोरीवर कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे.
October 19, 2008
आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणं ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी दांपत्य’ ह्या सूत्राचा अवलंब करताना एकुलते एक अपत्य सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांग परिपूर्ण असणे गरजेचे आहे. सुप्रजनन हा आयुर्वेदाचा मूळ गाभा आहे.
दर महिन्याच्या मासिक ऋतुचक्रामध्ये रजःप्रवृत्तीपासून १२ ते १६ दिवस गर्भधारणेसाठी योग्य असतात. गर्भशयामध्ये ह्याच काळात बीजाचे रोपण होणे शक्य असते. त्या वेळी रसाधातुचे पोषण होणे आवश्यक आहे. बीज, बीजभागदृष्टि गर्भाच्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुरुषाचे शुक्र हे सुद्धा उत्तम प्रकारचे असणे आवश्यक आहे. जन्मास येणाऱ्या बालकाचे आरोग्य पूर्णत: माता–पित्याच्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते. त्यासाठी आवश्यक शरीरशुद्धी, आहार–विहार व औषधी यांचा गर्भावर होणारा परिणाम यासंबंधी विचार करणे आवश्यक आहे.
सदृढ गर्भधारणेसाठी स्त्रीबीज व पुरुषबीज सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात पहिला उपचार म्हणजे शरीरशुद्धी. यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार म्हणजे ‘पंचकर्म’. गर्भधारणेसाठी इच्छा असणाऱ्या स्त्री–पुरुषाने शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म अर्थात वमन, विरेचन, बस्ति इ. उपचार अवश्य करावेत. ह्या ठिकाणी विरेचन म्हणजे नुसते जुलाब नव्हेत किंवा बस्ति म्हणजे एनिमा नव्हे तर आयुर्वेदीय निर्माण पद्धतीने तयार केलेले व वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप प्रकृती व वय शरीरशक्तीचा विचार करून किमान सात दिवस घ्यावे. शरीरशुद्धीसाठी बाह्यस्नेहन म्हणजेच अभ्यंग, मसाज इ. चा उपयोग करावा. केवळ वरवर पंचकर्म म्हणून शिरोधारा, अंगाला तेल लावणे असे वरवरचे दिखाऊ उपचार करू नयेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने वमन, विरेचन, बस्ती, नस्य, इ. उपचार करून घ्यावेत. स्त्रियांनी गर्भाधानापूर्वी शोधन व बृहण उत्तरबस्ति, योगबस्ती क्रम, योनिघावत–धूपन, इ. उपचार तज्ञ आयुर्वेद स्त्रीरोग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावेत. याबाबतीत “वैद्यराज व्हिजन” ही संस्था मोफत समुपदेशन करू शकते. ह्या सर्व गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधि लागतो. त्यापेक्षा कमी वेळात केलेल्या शॉर्टकट उपचारांचा योग्य फायदा होणे शक्य नाही हे सुप्रजेसाठी इच्छुक दांपत्याने समजून घ्यावे.
पंचकर्म उपचारांनी शरीरसुद्धी होते व त्याबरोबरीने स्त्री व पुरुषबीजशुद्धी पण होते. सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न होते. स्त्री–पुरुषामधील आकर्षण वाढते व पुढे गर्भधारणा होऊन आरोग्यसंपन्न अपत्यप्राप्ती होते. शरीरशुद्धीच्या महत्त्वाच्या टप्प्यानंतर आर्तव व शुक्र वाढण्यासाठी ओजवर्धक औषधी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यात अश्वगंधा, क्रौंचबीज, शतावरी, गोक्षुर, विदारीकंद, बला, कृष्णतीळ, वासा, पिंपळी, पुनर्नवा, गुडूची, आमलकी, सुंठ, श्वेतमुसली, इ. औषधे शुक्र धातूचे सामर्थ्य वाढवितात. ‘तंत्र शुक्र बाहुल्यात् पुमान’ असे वर्णन संहिताकारांनी केले आहे. त्यामुळे निःसंशय सुप्रजानिर्मिती होते. व्यंगविरहित बालक निर्मिती हा ह्यामागील उद्देश आहे. ह्या औषधांमुळे रसाधातुचे उत्तम पोषण होते. सुप्रजननासाठी सार्वदेहिक शुक्र तसेच बीजभूत शुक्र ह्या दोन घटकांची गरज असते. ह्या औषधांमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे सिद्ध झाले आहे. अलीकडे अनेक आहार द्रव्यांमध्ये अशी मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे दिसते. अनादि काळापासून वनस्पतींच्या रूपाने आयुर्वेदामध्ये ह्यांचा वापर करण्यात येतो.
| १) | क्रौंचबीजामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॅान वाढते. त्यामुळे लिबिडो म्हणजे कामशक्ती वाढते. |
| २) | वासा व गुडुची - ह्या द्रव्यांमुळे शुक्रदुष्टी दुर होते व त्याप्रमाणे शुक्रामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती रहात होत नाही. |
| ३) | शतावरी, अश्वगंधा, कृष्ण्तीळ ह्या द्रव्यांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते व शुक्रबीज निर्मिती होते. ही सर्व औषध योजना करण्यामागे संहिताकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. माझ्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये मी ह्याचा वापर अनेक दांपत्यांवर केला असून त्याचे उत्तम परिणाम झालेले अनुभवास येतात. ह्यासाठी “शुक्रजीवक व अश्वमाह” ही औषधे मी वापरतो. दूध व तुपाबरोबर घेतल्याने ह्या औषधांमुळे उत्तम शुक्रवर्धन होते असा माझा अनुभव आहे. |
| ४) | विदारीकंद या द्रव्यात मॅग्नेशियम व ‘अ’ जीवनसत्व असून शुक्रपोषणासाठी ह्याची मदत होते. आमलकीमध्ये जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘के’, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. त्यामुळे पेशींमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही. आमलकीमध्ये आठ ते दहा मिलिग्रॅम जीवनसत्व ‘सी’ असून हे पेशींचा विनाश होऊ देत नाही. |
| ५) | अंनतमूळ आणि गोक्षुर हे स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना उत्पन्न करतात. ह्यामध्ये शुक्रबीज निर्मितीची शक्ती आहे. |
| ६) | पिप्पली व पुनर्नवा हे अॅन्टिफंगल व शोथनाशक आहे. |
पुढे औषधाइतकीच आहार योजना देखील महत्वाची आहे. त्यापूर्वी स्त्रियांना सुप्रजननासाठी देण्यात येणाऱ्या औषध योजनेबाबत थोडक्यात विचार करूया. स्त्रियांसाठी पुत्रजीवक, शिवलिंगी, शरपुंखा ही औषधे सुप्रजननासाठी परिणामकारक ठरलेली आहेत. यात शतावरी कल्पाचा वापरही महत्वाचा आहे. सुप्रजनन तर दूरच पण काही मातांना वारंवार गर्भस्त्राव व गर्भपात होतात. अनेक स्त्रियांचे प्रसव अकाली होऊन बालक मृत्यू पावते. काही स्त्रियांमध्ये तर सातत्याने पाच पेक्षा जास्त वेळा अकाली प्रसूती होऊन गर्भ मृत झाल्याचे दिसते. अशा स्त्रिया मातृत्व सुखापासून वंचित राहतात. आयुर्वेदात अशा स्त्रियांसाठी ‘क्षेत्रचिकित्सा’ वर्णन केली आहे. या चिकित्सेमुळे गर्भपात टाळता येतो. अकाली प्रसव व अलीकडे अनेक स्त्रियांमध्ये होणारे टॉर्च इन्फेक्शन ह्यावर चिकित्सा करता येते. आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा अकाल प्रसव, गर्भस्त्राव, गर्भपात ह्यावर निश्चित अशी चिकित्सा नसल्याचे मत अनेक स्त्रीरोगतज्ञ वेगवगळ्या परिसंवादापासून व्यक्त करीत असल्याचे माझ्या माहितीत आहे.
सुप्रजननासाठी आयुर्वेदात उपलब्ध औषधे :-
यष्टिमधु, क्षीरकाकोली, तीळ, पिंपळी, शतावरी, गुडूची, कष्ठकारी, बृहति, गोक्षुर, भृंगराज, विदारीकंद, शृंगाटक, रिंगणी, डोरली, सारिवा, अंनता, उशीर, मंजिष्ठा, आमलकी, शतावरी, बला, पिठवण, चिकणा, शेवगा, बिल्व, कवठ, शिंगाडा, कमलतंतु, द्राक्ष, नागरमोथा ही सर्व औषधे सुप्रजननासाठी उपयुक्त असून ह्यांत सूक्ष्मपोषक तत्वे आहेत. आधुनिक शास्त्रानुसार मॅक्रो व मायक्रोन्युट्रियंट्स ह्यामध्ये समाविष्ट असून ते गर्भशयातील बाळाची वाढ उत्तम प्रकारे करतात. या औषधांमध्ये ग्लूटॅमिक अॅसिड, मेथीअॅनिन आणि आर्जिनीन यांसारखी दहापेक्षा जास्त अमाईनो अॅसिड असल्याचे डॉ. के. एस. अय्यर, परेल, मुंबई यांनी सिद्ध केले आहे.
यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ह्यांसारखी घटकद्रव्ये उपलब्ध आहेत. मुंबई येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. एच. एस. पालेप ह्यांनी मार्च १९९९ मध्ये या संदर्भातील आपला शोधनिबंध मुंबई स्त्रीरोगतज्ञ प्रसूतिशास्त्र परिषदेपुढे सादर केला. वरील औषधांचा उपयोग गर्भिणीपांडू, रक्तक्षय ह्या विकारांमध्येसुद्धा होतो. मुंबई येथील पोदार रुग्णालयात ह्या औषधांचा उपयोग ‘मासानुमास-काढे’ या स्वरूपामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून होत आहे.
स्त्रियांसाठी आहार :-
सुप्रजनानासाठी स्त्रियांनी रोजच्या आहाराशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त बनणारे पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजिर, द्राक्ष, कलिंगड, बाजरी, तीळ, उडीद, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, ज्वारी, इ.
पुरुषांसाठी आहार:-
ताजी फळे, दुध, लसूण, मुळा, बटाटे, तुप, उडीदडाळ, साखर, फरसबी, बीट, गाजर, इ.
हा वेगवेगळा आहार स्त्री-पुरुषांनी का घ्यावा?
वरील आहारामध्ये शुक्र व आर्तव यांना कार्यक्षम करण्याची क्षमता असते. अपत्यपयाध्ये शुक्रनिवडीची क्षमता असते. अपत्यपय, गर्भाशयमुख, गर्भाशय यांच्यामध्ये शुक्रनिवड व भृणरूजूकरण अवलंबून असते. वरील प्रकारचा आहार सुप्रजननासाठी आवश्यक ठरतो. शरीरशुद्धी, औषधीद्रव्ये आणि आहार यांचा विचार केल्यानंतर आता आपण वातावरणाचा गर्भावर काही परिणाम होतो काय ह्या विषयावर उहापोह करू या.
आपला आहार-विहार जीवनपद्धती या बाबी कशा असाव्यात हे आपण ठरूवू शकतो. ह्यात काही चुकीचे सेवन केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम गर्भावर होऊ शकतो. ओझोन व कार्बन मोनोक्साईड या वायूचे हवेमधील प्रमाण ज्या भागांमध्ये जास्त आहे, त्या भागातील गरोदर बायकांची मुले सदोष हृदय घेऊन जन्माला येण्याची शक्यता असते. हृदयाबरोबरच फुफ्फुसावरसुद्धा प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यामध्ये हृदयामध्ये व फुफ्फुसामध्ये दोष निर्माण झालेले असतात. ही महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा अभ्यास कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. ह्यासाठी योग्य पद्धतीने व तज्ञ मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे हितकर ठरू शकते.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
August 1, 2015
जगात सगळीकडे बदलाचे वारे वाहताना दिसतात. खेडोपाडी वागण्या बोलण्यात अगदी खाण्या पिण्यातही शहरीकरणाचा प्रभाव होताना दिसत आहे. सध्या लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तळकट पदार्थ, साखर आणि साखरेचे पदार्थ, मीठ/मीठाचे पदार्थ खाण्याकडे कल वाढलेला दिसतो तसेच फळ व भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. ह्या सर्वांनाचा परिणाम म्हणून आहारातून तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी होताना दिसतोय. ह्या सर्व जीवन पद्धतीचा एकत्रित परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतोय. मधुमेह, ह्रदय रोग, हाइपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर, आणि ह्या मुख्यत्वे करून लठ्ठपणा वाढवताना दिसतोय. ह्या सर्वांवर मात करण्यासाठी बहुतेकदा कमी कॅलरीज घेण्याचा सल्ला दिला जातो. कुपोषण (malnutrition) न होता केलेले कमी कॅलरीजचे सेवन दिर्घायुष्य लाभण्यास आणि आरोग्य तारुण्यातच राखण्यात मदत करताना दिसतात, पण आयुष्य किती काळ वाढवू शकेल ह्याचा मात्र निश्चित अंदाज बांधता येत नाही.
कॅलरी रिसट्रीकशन ही अशी खाण्याची पद्धत आहे कि ज्यात आहारातील कॅलरीजचे सेवन कमी केले जाते. कॅलरीज किती कमी करायच्या हे मात्र त्या व्यक्तीच्या पूर्वीच्या कॅलरीजच्या सेवनावर किंवा त्या व्यक्ती सारख्या इतर व्यक्तीच्या सरासरी कॅलरीजच्या सेवनावर अवलंबून असते.
Calorie Restriction with Optimal Nutrition (CRON) हा आहार कॅलरीज मध्ये कमी असूनही इतर अन्नघटकांनी समृद्ध असतो. नुसत्या कॅलरीज रिसट्रीकशन आहारापेक्षा CRON आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्य दिर्घकाळ सुस्थितीत राखण्यात मदत करताना दिसतात. ह्यामुळेच अशी व्यक्ती आपले आयुष्य दिर्घकाळ सुंदररित्या जागताना दिसतात.
CRON आहाराचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम
- लठ्ठपणा टाळण्यास व वजन कमी करण्यासाठी मदत
- मधुमेह, हाइपरटेंशन, कॅन्सर टाळण्यास/आटोक्यात आणण्यासाठी मदत
- ह्रदयरोग व रक्तवाहिन्यावरील ताठरपणा कमी करण्यास तसेच ह्रदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतात. ह्रदय व इतर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, ह्या गोष्टीं ह्रदयरोगाशी निगडित आहेत आणि ह्या अपायकारक गोष्टींवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने CRON आहार महत्वाचे ठरतात.
- CRP, triglycerides, Low Density Lipoprotein (LDL), high density lipoprotein (HDL) आणि रिकाम्या पोटीची रक्तातील साखरेवर नियंत्रण सुधारल्याने इतर रोगांचा धोका कमी करण्यात मदत.
- कॅन्सरचा धोका निर्माण करण्याशी निगडीत असलेले विविध मेटाबॉलिक घटक आणि हार्मोन्स कमी करण्यात यश त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत
- शरीरातील आणि मुख्यत्वे करून पोटात आढळणाऱ्या चरबी मध्ये घट
Circulating insulin, testosterone, estradiol and inflammatory cytokines ह्या सारखे घटक जे कॅन्सरशी निगडित आहेत त्यामध्ये घट
- Insulin like growth factor I आणि IGFBP -3 मध्ये घट परंतु जर प्रथिनांचे सेवन गरजेपेक्षा (dietary reference intake) जास्त केल्यास मात्र हा फायदा मिळताना दिसत नाही.
कमी कॅलरीजचे सेवन अयोग्य पद्धतीने केल्यास होणारे दुष्परिणाम
- कुपोषणास निमंत्रण
- रक्तक्षय, पायाच्या तळव्यावर सूज येणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, सुस्ती येणे, डिप्रेशन मध्ये जाणे ह्या सारख्या परिणामांना तोंड द्यावे लागते
- माणसांवरील काही छोट्या प्रयोगात असे आढळले आहे कि मसल मास, स्ट्रेंथ (ताकद) कमी होणे, bone mineral density कमी होणे; middle aged आणि वृद्ध व्यक्तींमधे मृत्युच्या प्रमाणात वाढ होताना दिसते
- कोल्ड सेन्सिटिव्हीटी चा धोका वाढतो
- आठवड्याला 1/2 ते 1 किलो पेक्षा जास्त वजन घटवल्यास पित्ताशयात खडे निर्माण होणे, किंवा रक्तातील इलेकट्रोलाईट मधील संतुलन बिघडणे ह्या सारखे धोके वाढतात
- 21 वर्षाखालील मुलामुलींनी, लहान मुलांनी खूप कमी कॅलरीजचे सेवन करून वजन घटवू नये कारण त्यांची शारीरिक वाढ खुंटते, मानसिक वाढीवर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. किशोर वयातील मुलांच्या मेंदूत भौतिक (physical) बदल घडून येऊ शकतात.
- Underweight मातांमध्ये दिवस भरण्यासाठी अगोदरच प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी असणे ह्या सारखे धोके वाढतात म्हणूनच गरोदरपणात स्त्रियांनी अतिशय कमी कॅलरीज असलेला आहार घेणे टाळा.
- एखादी स्त्री गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर आशा स्त्रीने सुद्धा असा कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये कारण बीएम्आय आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास इनफरटीलिटीचा (वंध्यत्व) धोका वाढतो, मासिकपाळी वेळच्या वेळी न येणे, तसेच हार्मोन्समधे बदल होणे ह्या सारखे धोके वाढतात.
- जसे गरोदर स्त्रियांना त्रास होतो तसाच त्रास स्तनपान करणार्या स्त्रीला ही होतो. जो पर्यंत स्त्री स्तनपान करत असेल तो पर्यंत त्या स्त्रीने कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये, तर स्तनपान बंद केल्यावरच कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये. आयुष्याच्या सुरवातीलाच म्हणजे बाळाच्या जन्मापासूनच त्याला मिळणारा आहार हेल्दी असावा. बाळाच्या योग्य वाढीसाठी, cognitive development सुधारण्यासाठी आईचा आहार हेल्दी असावा. कारण पहिले काही महिने बाळाला सर्व अन्नघटक आईच्या दूधातूनच मिळत असतात. तसेच स्तनपानाचा दिर्घकाळ होणारा फायदा म्हणजे त्या बाळाच्या पुढील आयुष्यात लठ्ठपणा किंवा स्थूलता न वाढणे, आणि Non Communicable Disease (NCD) चा धोका ही कमी होतो.
आयुष्यभर हेल्दी आहार घेतल्यास वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषण तर थांबवतेच आणि त्या बरोबर मधुमेह, ह्रदयरोग, स्ट्रोक आणि कॅन्सर सारख्या NCD रोगांपासूनही बचाव करण्यासाठी मदत करतात.
हे फायदे मिळवण्यासाठी काही उपयुक्त टीप्स
- जेवढ्या कॅलरीज खाल तेवढ्या खर्च केल्यास वजन नियंत्रणात राहते
- वजन वाढू न देण्यासाठी एकूण कॅलरीजच्या 30% पेक्षा कमी कॅलरीज फॅटस (स्निग्ध पदार्थ) मधून घ्याव्यात.
- साखर शक्यतो कमी प्रमाणातच घ्या. एकूण कॅलरीजच्या 10% पेक्षा कमी कॅलरीज साखरेतून घ्याव्यात. आरोग्य आणखीन सुधारण्यासाठी फक्त एकूण 5% कॅलरीज साखरेतून घेतल्यास उत्तम.
- प्रौढ व्यक्तिंनी 5 ग्रॅम पेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये. मीठाचे सेवन कमी झाल्यास हाइपरटेंशन टाळण्यास किंवा ते उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे ह्रदयरोग आणि स्ट्रोक चा धोका ही कमी होऊ शकतो.
ह्या सर्व फायद्यांसाठी कमी कॅलरीजचे सेवन करावयाचे असल्यास CRON (Calories Restriction with Optimal Nutrition) आहाराचे सेवन करा.
June 8, 2015
जेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे.
March 20, 2022
सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते.
April 29, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti