(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री वैजनाथ

    बारा ज्योतिर्लिंगे – श्री वैजनाथ

    देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ रत्नांबरोबर धन्वंतरी व अमृत ही दोन रत्नेही त्यातच होती. अमृत पिण्यासाठी राक्षस प्यायले. पण भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला या शिवलिंगात गुप्तपणे लपविले.

      August 13, 2013


  • आगरातला बळी राजा

    देशावर किंवा घाटावर जशा एकेक शेतकऱ्याच्या 20 एकर 50 एकर जमिनी असतात तशा आमच्या ठाणे जिल्ह्यात फारशा लोकांच्या नाहीत. आता कोणी राजकारणी लोकांनी घेतल्यात शेकडो एकर पण आम्हा सर्वसाधारण आगरी शेतकऱ्यांच्या जमिनी या जेमतेम चार एकर पासून जास्तीत जास्त आठ ते दहा एकर पर्यंतच. आता आमच्या पिढीच्या वाटणीला एखादा एकर आली तरी खूप जमीन आहे असे वाटावे.

      November 18, 2019


  • हृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे

    आज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण!३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली.

      February 21, 2018


  • मुंबईतील ‘ताज हॉटेल’ चा वाढदिवस

    मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं.

      October 16, 2021


  • अर्थव्यवस्थेसाठी हिंदू मंदिरे का महत्त्वाची आहेत?

    भारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे.

      May 3, 2024


  • देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….

    माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.

      August 24, 2010


  • श्रावण मासातील वार विशेष

    रविवार - श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे असेही शास्त्रात सांगितले आहे.

    सोमवार - श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुष्ठि नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा -

    'नम : शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
    शृङ्गभङ्गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे । ।'

    पहिल्या सोमवारी - तांदूळ, दुसऱ्या - तीळ, तिसऱ्या - मूग, चौथ्या - जवस, पाचव्या - सातू या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात.

    मंगळवार - श्रावणातील प्रत्येक मंगळवारी 'मंगलागौरी ' यांचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर ५ किंवा ७ वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचेबरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा -
    'पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले । अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते । । '
    पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.

    बुधवार - महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध - बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध - बृहस्पतीचे (गुरु) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.

    गुरुवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरु) आहे.

    शुक्रवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे -

    'जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि ।
    रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते । ।'

    जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात. व देवीची प्रार्थना करतात - ' अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत् । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!' हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर.

    आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवी सुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे .

    शनिवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी, व पंचामृती पूजा करावी; शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस,आंबिल, पुऱ्या यांचा नेवैद्य अर्पण करावा.

    या व्रताचा पर्याय - प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी. मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी - नृसिंहाप्रीत्यर्थं ब्राम्हण - सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रीत्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात.

    -- विद्याधर करंदीकर

      August 3, 2016


  • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र

    २००४ साली झालेली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक ठरली. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने मतपेटी कालबाहय ठरविली. आगामी सर्वच निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर सर्वत्र केला जाणार आहे. या यंत्रामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक जलद विश्वासार्ह होण्याबरोबरच मतदारांना मतदानासाठी लागणार्‍या वेळात बचत झाली आहे. मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करणार्‍या या यंत्राबाबात माहिती …..

      December 5, 2020


  • गुडघ्याचे प्रतिरोपण केव्हा ?

    आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात.

      June 16, 2023


  • ।। श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर ||

    गुरुतत्त्व मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या जीवनचरीत्रावर आहे. महाराजांचे जीवन हे अलौकीक आहे. आपल्याला वाचनातुन लक्षात येईलच. गुरुतत्त्वाचे हे ३० वे पूष्प महाराजांच्या चरणी समर्पीत करीत आहे.

    श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातोश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके १७७७ म्हणजे दि. ३/९/१८५५ रोजी रोहिणी या नक्षत्रावर, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी गावी झाला. हा गाव घटप्रभा नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मधे वसलेला असून दत्ता पंतांच्या आयुष्याचा बराच काळ या गावांशी निगडीत आहे. दत्तांपंतांचे वडिल हे बेळगावनजीक बाळेकुंद्री या गावच्या कुलकर्णी घराण्यापैकी होत. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बेळगाला झाले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांना आपले शिक्षण पूर्ण केले.

    श्री महाराजांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच अध्यात्म-विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच होते. त्यांना महाराजांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधन मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत. महाराज्यांच्या मातोश्रींचे आजोबा अंबाजीपंत हे एक महान गृहस्थाश्रमी सत्पुरुष होऊन गेले. श्रीनृसिंहवाडीत अनुष्ठानरस बसणाऱ्या मंडळींना दड्डीस जाऊन अंबाजीपंताचे दर्शन घ्या म्हणजे तुमचे काम होईल. असा दृष्टांत होत असे. त्यांचे चिरंजीव नरसिंहपंत हे ही सात्त्विक आचारसंपन्न पण अत्यंत व्यवहारदक्ष व करारी होते. ते अंबाजी पंतांच्या हयातीतच वारल्यामुळे त्यांच्या तीन मुली व मुलगा श्रीपाद यांचा भार त्यांचेवरच पडला पण श्रीपादपंत दहा वर्षाचे असतानाच अंबाजीपंतांनी देह ठेवला. त्याचे आतच आपल्या तिन्ही नातींची लग्ने त्यांनी उरकली होती. महराजांचे पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण" असे ठेवले होते. पुढे दृष्टांत होऊन “दत्तात्रय” असे दुसरे नाव ठेवण्यात आले. वडीलमाणसे त्याला प्रेमाने “दत्तू" म्हणून हाक मारीत. घरात प्रथम जन्मास आलेले अपत्य म्हणून दत्तूवर सर्वांचे विशेष प्रेम जडले.

    बालपणीच, दड्डीचे जंगल, नदी, डोंगर व निसर्गाशोभा यांचा दत्तूचे मनावर फार अनुकूल परिणाम झाला असला पाहिजे, दत्तूचा वर्गात पहिला नंबर असे, कधीही कसलीही चूक न करणारा, खेळकर, मनमिळाऊ व आज्ञाधारक असा त्याचा विद्यार्थीदशेत लौकिक होता. इकडे श्रीपादपंतांनी त्यांचेकडून कर्म व उपासनेचे कडक आवरण करून घ्यावयाचे, अक्षर वळविण्यासाठसुध्दा “विदुरनीती" अशी प्रकरणे शिकवायचे. त्यांच्या फुरसतीच्या वेळी त्याला आपल्या हाताखाली घ्यावयाचे, याप्रमाणेच चोख गृहशिक्षणातून पार पडून तो इंग्रजी शिक्षणासाठी बेळगावास इ. स. १८७२ साली जाऊन राहिला. क्रमाने एकेक बंधू आपले प्राथमिक शिक्षण दड्डीस संपताच बेळगावास दत्तूच्या बिऱ्हाडी जाऊन राहू लागले. बेळगावास इंग्रजी शिक्षण चालू असताना पंताचा मावसभाऊ गणू मारीहाळास आपल्या गावी रहात होता. हे गाव बाळेकुंद्रीच्या पूर्वेस ४/५ मैलांवर आहे. तेथून एक मैल पूर्वेस कर्डेगुद्दी हे गाव आहे. त्या ठिकाणी श्रीबालमुकुंदाची स्वारी पार्शवाडहून येऊन राहिली होती. त्यांचे मूळचे नाव बाळाजी अनंत कुलकर्णी असे होते. ते परमार्थातील असामान्य योग्यातेचे तपस्वी व महायोगी असून परमहंस पदवीस पोचलेले होते. त्यांचा अनुग्रह पंताचे मावस भाऊ गणपतराव यांजवर होऊन त्यांनी दत्तूस त्यांचे दर्शनास येण्याबद्दल पत्र धाडले. त्यास दत्तूने उत्तर पाठविले ते असे की, "बाह्मणांना गायत्रीमंत्र व उपदेश याविना अन्य मंत्राची अगर गुरुची आवश्यकता काय? तू आपला उद्योग सोडून कोण भोंदू, बैराग्याचे नादी लागला आहेस. ताबडतोब शध्दीवर ये व आपल्या प्रपंचाकडे लक्ष दे हे दत्तूचे उत्तर बाळाप्पास समजताच त्यांनी " हे पत्र लिहिणाऱ्याला धक्का पोचून तो लवकरच मरतो बघ" असे उद्गार गणू व इतर शिष्यमंडळींपुढे काढले. ते ऐकून गणू रडू लागल्याचे पाहून बाळप्पा हसून म्हणाले की “तो इकडे येईलच. त्यानंतर पुढे काय होत ते पहा." त्यावेळी दत्तू दड्डीस होता. त्याला एकाएकी विषमज्वर येऊ लागला व त्यातच सान्निपात झाला. त्या भ्रमात "बाळप्पा, बाळप्पा” असे तो बडबडु लागला.

    घरची सर्व मंडळी घाबरली व त्यांनी देवास नवस मागितला की, दत्तू बरा होताच त्याला बाळप्पांकडे पाठवून देऊ. या दुखण्यातून कृपा करून त्याला बरा कर. दत्तूस लवकरच आराम पडला व त्यानंतर त्याची व बाळप्पांची गाठ पडून त्यांची त्याजवर पूर्ण कृपा झाली.

    श्रीबालमुकुंदाचा अनुग्रह होताच दत्तूचा पुनर्जन्म होऊन तो श्रीपंत बनला, त्यांचा सहवास पंतांना फार तर दोन-तीन वर्षे लाभला असेल पण तेवढ्या अवधीत इंग्रजी शाळेतील अभ्यास चोख करून बेळगाव येथील आपल्या प्रपंच खर्चासाठी मदत म्हणून काही शिकवाण्या धरून व बालमुकुंदाच्या कृपाछत्राखाली गुरुगृहीचे खेळ खेळताच त्यांनी सर्व प्रकारची योगसिध्दी मिळविली ही अत्यंत नवलाची गोष्ट होय. कर्डेगुद्दीपासून ४/५ मैल पूर्वेस देसनूर येथे श्रीबालमुकुंदाचे वास्तव्य काही काल असताना येथील एका देवालयात ते योगाभ्यासा साठी बसत असत. ती जागा अद्याप दाखविली जाते. कर्डेगुद्दीच्या डोंगरावर अय्यन फडी या देवस्थानासन्निधही त्यांचेकडून बाळप्पांनी तप करविले. एकदा तीन दिवस अहोरात्र अखंड गुरुध्यान करीत बसण्याची व बिलकूल निद्रावश न होण्याची श्रीबालमुकुंदांनी आपल्या शिष्यमंडळींना आज्ञा केली. त्यात कोणी जेवताना झोपले तर कोणी स्नान करताना गुंगी येऊन खाली पडले. एकटे पंत तेवढे अखेरपर्यंत टिकून राहिले इ. स. १८५५ ते १८७७ अखेर, एवढाच काल काय तो बाळप्पांचा सहवास मिळाला. शके १७९९ च्या कार्तिक महिन्यात बाळप्पांचा श्रीशैल्ययात्रेस जाण्याचा निश्चय ठरला. त्यांचे अगोदर थोडे दिवस त्यांनी पंतांना गुरुमार्ग चालविण्याची आज्ञा केली होती. महाराजांनी त्याबाबत पुष्कळ आढेवेढे घेतले. पण बाप्पांनी निक्षून सांगितले की, “हे काम तुला केलेच पाहिजे, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. अपात्रता वगैरे तुझी काही सबब चालणर नाही. तुला माझे पूर्ण वरदान आहे!" महाराजांनी ती आज्ञा स्वीकारणे भाग पडले. व श्रीबालमुकुंद ठरल्याप्रमाणे श्रीशैल्याकडे निघून गेले. ते पुन्हा काही परत आले नाहीत. यावेळी पंत मॅट्रीकची परीक्षा पास झाले नव्हते. परंतु अशा सर्व प्रकारे अडचणीत असताना त्यांचेवर गुरुमार्ग चालविण्याचा भार पडला. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२/२३ वर्षाचे असेल. बाळप्पाच्या आज्ञेप्रमाणे गुरुबंधूंना सहजमार्गदर्शन करणे व गुरुमार्ग चालविणे हेच तेव्हापासून त्यांचे आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसले.

    सन १८८० च्या नोव्हेंबरमध्ये पंत मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढील वर्षीच आपला बंधू गोपाळ व मामेबुधू नाना यांना इंग्रजी शिकवण्याकरिता बेळगावास आणून ठेविले व आपण शाळामास्तरची नोकरी पत्करली आणि कसाबसा बेळगाव येथील संसार चालवू लागले. त्या स्वरूपात त्यांचेकडून अखंड सद्गुरुसेवाच घडली. प्रत्येक बाबतीत इतरांना आदर्शभूत असा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरून दाखविला. क्रमाने एकेक बंधु व आप्तेष्टांची मुले व गरीब विद्यार्थी त्यांचेकडे शिक्षणासाठी येऊन राहू लागले. त्या सर्वांवर कडक नजर ठेवून, त्यांचेकडून उत्तम अभ्यास व नीतिनियमांचे परिपालन कटाक्षाने करविले. अखेरपर्यंत त्यांनी उत्तम शिक्षक असे नाव मिळविले. संसार व परमार्थ या दोन्ही बाबतीत त्यांनी अनेकांना अनेक बाबतीत साहय्य दिले. इतके असून कधीही ते द्रव्यास शिवले नाहीत. पगार हाती येताच ते आपल्या बंधूपैकी जो व्यवस्थापक असेल त्याचे हवाली करणे, हा त्यांचा प्रघात असे. शाळेतून येताच ते आपल्या कोचावर बसून, वेदांचे ग्रंथाचे वाचन, चर्चा व मुमुक्षूजनांचे समाधान करणे यात निमग्न असत. सकाळ संध्याकाळा नियमाने भजनपूजन व येणाऱ्या जाणाऱ्याचे अतिथ्य घडत असे.

    सन १८९७ ते १९०३ पर्यंत दरसाल बेळगावात प्लेगने कहर करून सोडायचा. प्रेत टाकून लोक पळून जात होते. अशा वेळी पंतबंधूनी प्रेतवाहकाचे कामी पुढाकार घ्यावयाचा. सुट्टीत परगावी उड्डीकडे वगैरे गेल्यावेळी पाणी वाहून आणण्याचे काम अनायासे होईल म्हणून लग्नकार्य करण्याच्या लोकांनी यांच्या येण्याची वाट पाहत बसण्याचे कारण यांचेबरोबर भक्तमेळा असावयाचा व तो केव्हाही परोपकारी असणारच, असा अनुभव असे पंतांचे बंधू, कोणी वकील, कोणी मन्सफ, कोणी चिटणीस, कोणी प्रांतसाहेब वगैरे हुद्यापर्यंत चढले तरी त्यांनी आपापल्या परी सदाचार व परोपकाराचा लौकिक वाढविला.

    मार्गदर्शन: - भक्तियोग, राजयोग व ज्ञानयोग हे त्यांच्या नखशिखांत भरले असून तदनुसार आचरण त्यांनी आपल्या भक्तांकडून घडविण्याचा सतत प्रयत्न केला. योगसाधना व मुद्रा लावणे हे ज्यांना करावेसे वाटे त्यांचेकडून करवीत असत. वेदांतचर्चा व इतरांचे शंकासमाधान ते निरलसपणे करीत. तथापि त्यांचा कटाक्ष भक्तियुक्त कर्ममार्गावरच असे. वर्षातून त्यांच्या दड्डीतेक तीन खेपा व्हावयाच्या. त्या त्या वेळी दड्डीच्या जंगलात नदीकाठी व गावातील दत्तमंदिरात त्यांचे भजन टिपऱ्या खेळणे वगैरे पारमार्थिक खेळ अव्याहत चालत. तयांतही मंडळी धन्य होतच पण प्रेक्षकजनही देहभान विसरून भक्तिप्रेमाने अत्यंत सुखवत. सन १८८३ पासून वृत्ती योग्याभ्यासावरून भक्तिकडे वळली. मन भजनात रंगू लागले. सहज काव्य-स्फुर्ति होऊ लागली. त्यांचे काव्य नानाविध रसांनी व भावनानी ओथंबलेले आणि त्याबरोबर तत्त्वज्ञानाने रसरसलेले असे आहे. सन १८८३ पासून १८८५ चा काल संचार, प्रबोधन वसंप्रदाय प्रचार यात महाराजांनी घालविला व शिष्यशाखा जोडली. भजन-पुजन, अध्यात्म चर्चा व हसत-खेळत उपदेश हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम यात बालमुकुंदाचे स्मरण व पुनर्भेटीची तळमळ ही सतत अनुस्यूत होती.

    सन १८८५ अखेर अंतर्मुख अवस्थेत त्यांना बाळप्पांचे निर्माण झाल्याचे कळून आले व जबाबदारीची जाणीव तीव्र झाली. त्यांनी बालमुकुंदांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यांसारखे उत्सव चालू केले. सन १८८९ पर्यंतच्या काळात अशा रीतीने पंथ-प्रचारकार्याला चालना दिली. त्या वर्षाअखेर एक दत्तमंदिर बांधण्याचे कार्य त्यांनी पुर्ण केले.

    पुष्कळ वेळा तिसऱ्या घातीत भजन करीत असताना त्यांचे देहभान नष्ट होऊन
    त्यांच्या सवंगड्याची पंचाईत होई. ज्यांनी त्यात भाग घेऊन नाचत असत व तीच
    अवस्था त्यांच्या सवंगडयंची होई. ज्यांनी त्यात भाग घेतला असेल अगर नुसते पाहिले असेल, ते धन्य होत.

    सन १९०६ पासून श्रीक्षेत्र बाळेगुंद्री येथे दरसाल जे पूर्णपणे वाणलेली असत. अहंकारावर त्यांचा प्रहार झाला नाही असे एकही पद आढळावयाचे नाही व तो शिष्यांचे ठायी निर्मूलन करणारा पंतांसारखाच समर्थ सद्गुरु प्राप्त होणे कठीण आहे. हे स्वानुभवाने व कृतकृत्येने मला म्हणावेसे वाटते. सद्गुरु कसा असावा.
    सद्गुरु तोचि करावा । वेदोदित अनुभवी असावा ।। धृ ॥
    शिष्याची जो न घे सेवा । उपदेशिता मानी देवा ।। १ ।।
    गुरुत्वाचा अभिमान नाही । बोधी धरी नम्रभावा ।। २ ।।
    साधन शीण न लावी दासा । अभयवचने पंतबंधु कै. गोपाळरावजी हे हुक्केरीस मामलेदार असताना फिरतीवर एका तल्लख घोड्यावर बसून गेले असता, घोड्यावरून खाली पडता पडता साहजिकपणे “दत्ता, दत्ता” असे त्यांचे तोंडून शब्द बाहेर पडले. तोच इकडे पंतांना ती तार पोचली व त्यांचे दर्शन गोपाळरावांस होऊन आलेले संकट निभावले. विद्यार्थी दशेत अनेक चमत्कार घडलेले पाहिले आहेत. पण आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत अशी भावना शिष्यांच्या ठिकाणी ते वसू देत नसत. आम्हा सुशिक्षित म्हणविणाऱ्या मंडळींना ते सांगत की, निसर्गात अनैसर्गिक काही असणेच शक्य नाही. त्याचे समोर कोणीही आला तरी त्याचे विचार त्यांना अवगत होऊन भाषणाचे ओघात, त्याच्या शंकांचे निरसन होऊन जाई हा तर रोजचाच अनुभव असे.

    त्यांचे खेळ मुख्यत्वे शिष्यांच्या अंतःकरणातील द्वैतबुध्दी व तज्जनित भीती घालविण्याकरता व त्यांना यथेच्छ प्रेमसुख मिळावे म्हणून खेळले जात शिष्य होणारा इसम कोणत्याही जातीचा, धर्माचा पावून धन्य झलेले आहेत. शिष्यांकडून त्यांनी प्रेमाशिवाय अन्य कशचीही इच्छा केली नाही. त्यांना त्यांची आज्ञा फक्त “सद्गुरुभक्ती, बंधूप्रीती व अखंड शांती” ही ठेवण्याबद्दल असे. कुळधर्म, कुलाचार व सद्वर्तन न पाळणाऱ्यांची त्यांनी कधीही गय केली नाही.

    श्रीपंतांच्या सद्गुरुभक्तीचे पूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. असा प्रेमळ गुरुभक्त सहसा पाहावयास मिळत नाही. श्रीदत्त प्रेमलहरी कोणतेही पद उघडावे, त्यांत गुरुभक्तीचा गौरव झाला नाही असे व्हावयाचे नाही.

    हृत्कमलकर्णिकेमाजर | सद्गुरु बैसविला || पेमानंदे तो पुजिला || धृ ।।
    अहपणचे अर्घ्य देतां । अधिष्ठानी शोभला । भावातीत गुरु लाभला ।। १ ।।
    प्रेमामृतस्नान घालिता। आंत बाहेर भिजला ।।भक्तभजनी पेमे सजाला ।। २ ।।
    आत्मार्पण नैवेद्याने। दत्त तृप्त जाहला । नित्य भजनी डुलू लागला ।। ३ ।।

    श्रीपंत अत्यंत प्रेमळ म्हणून काही त्यांनी गुरुआज्ञा भंग करणाऱ्यांची किंवा नीतिबाह्य वर्तन करणाऱ्यांची कधीही गय केली नाही. स्वकर्तव्यात कोणी चुकले असे पाहताच ते लगेच “हुशार!” म्हणून गंभीर सावधगिरी देत. गुरुआज्ञेविरुध्द वागणाऱ्यास ते सहसा क्षमा करीत नसत. ते देवासमोर आसनावर बसत तेव्हा किंवा उत्सवासाठी खोलीतून बाहेर पडत तेव्हा ते माझे आप्त किंवा स्वकीय नव्हेत तर साक्षात श्रीदत्तमूर्ती आहेत असा सर्वांना बरेच वेळा भास होई नामांकित शास्त्री किंवा पंडित त्यांच्याशी वेदान्त चर्चा करण्याकरिता, केव्हा केव्हा येत असत. त्यांच्या शंका किंवा भिन्न मते, पंत आसनस्थ असताना त्यांना पाहताक्षणीच नाहीशा होत ते पंतांची क्षमा मागत. याप्रमाणे ते “मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास! कठीण वज्रास भेदु ऐसे।" या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे अक्षरशः होते.

    पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच आध्यात्म - विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच. त्यांना पंतांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीसच स्वतःचे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व गुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत.

    इ. स. १९०३ पासून पंतांची प्रकृती ठीक राहिनाशी झाली. त्यांनी शिक्षकीपेशाचा राजीनामा देऊन, अखंड अवधूत चरण सेवेला भरपूर सवड काढली व ते भजन प्रवचनात रंगून राहू लागले. गुरुबद्दल नितांत प्रेम हे त्यांचे एकमेव सुत्र. गुरु भक्तीने ते बेभान होत असत. पंतांची भक्ती प्रमस्वरूप व स्वरूपानुसंधान करणारी होती. त्यांनी ज्ञानभक्तीचे महत्त्व गायिले आहे.

    ती. सौ. यमनाक्का दि. ८ मार्च १९०४ रोजी निवर्तली! त्यानंतर दीड वर्षानी श्रीपंतांनी इहलोकीची आपलीही यात्रा संपविली. आपले अवतारकार्य संपले, आता आपण लवकरच जाणार असे ते आप्त स्वकियांजवळ, यमनाक्काचे निधनानंतर १-२ वेळा म्हणाले होते. मुलगी अंबी, फार लहान होती म्हणून तिचेकरिता वर्ष दीड वर्ष राहिले असावेत. आपल्या प्रिय पत्नीस त्यांनी जो बालमुकुंदाचा सुंदर थाटविला होता त्याची निरवानिरव जणूचालली होती. अनेक ठिकाणचे अनेक भक्त येऊन गेले. आता वेदांतचर्चा ओसरून तिची जागा मधून मधून होणाऱ्या “शिवाय नम ॐ शिवाय नम:” या घोषाने घेतली जात होती. नित्याप्रमाणे घरी सर्व व्यवहार व नियमित भजनपूजन ही सर्व चालत पण पंतांची एकांतप्रियता वाढत जाऊन त्यांनी आतील आपली खोलीच धरली. रोज भजनाचे वेळी आपल्या बाहेरील कोचावर येऊन बसत.

    बाळाप्पांना पंतांच्या रुपाने आपला अवधूत संप्रदाय चालविणारा अधिकारी मिळाला. त्यांनी पंतांच्याकडून योगाभ्यास योगाभ्यास करवून योजनेप्रमाणे ज्ञानदान केले. पंतांचा संपूर्ण निवृत्तीकडे कल दिसून येताच बाबहप्पांनी त्यांना परोपरीने उपदेश करून प्रवृत्तीचा व निवृत्तीचा समन्वय पटवून देऊन, त्या सांप्रदायिक भूमिकेवर पंतांना स्थिर केले. बाळप्पांना, पंत "बालमुकुंद” किंवा “बालावधूत" असे आपल्या साहित्यात संबोधितात.

    पंतांचे निर्याण: - अश्विन वद्य ३ शके १८२७ हा पंतांच्या ऐहिक जीवनातील शेवटचा दिवस. त्या दिवशी आप्त-स्वकीयांच्या सान्निध्यांत ॐ नमः शिवाय चा गजर करीत त्यांनी आपला देह ठेवला. पंतांची समाधी “बाळेकुंद्री” येथे आहे. या स्थानाला आता क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तो गाव आता पत-बाळेकुंद्री म्हणून ओळखला जातो. पंतांच्या पुण्यातिथीनिमित्त दरसाल तीन दिवस उत्सव होतो व मोठी यात्रा जमते. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्दछायेत अत्यंत रम्य असे आहे. पंतांचे तत्त्वज्ञान संपूर्ण अद्वैतवादी, प्रवृत्ती - निवृत्तीचा समन्वय घालणारे असे आहे. त्यांनी प्रथम योगाभ्यास पुष्कळच केला पण भक्तीची ओढ अनावर ठरून, अवधूतमार्गातील साधनेत पराभक्तीची भर घातली.

    पंतांचे वाडमय बरेच आहे. ते पद्यमय व गद्यमयही असून “श्रीदत्तपेमलहरी" या पुष्प- मालेतून प्रसिध्द झाले आहे. त्यात मानवी जवीनाचे ध्येय, तत्प्रीत्यर्थ साधना, भोगावा व त्यागाचा समनवय, अशा बोधप्रद विषयांचे सुगम विवरण वाचावयास मिळते. त्यांचे पद्य-वाडमय म्हणजे भक्तिरसाची प्रेमगंगा! त्यातील नादमाधुर्य अवर्णनीय आहे, अशा रीतीने का फेडित पापताप ! पोसवीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप ।। पंतांनी आपली जीवनगंगा सद्गुरूंच्या विशाल प्रेमोदधीत विलीन केली. पंत महाराज म्हणत, "भक्तांचे दुःखच माझे दुःख ः भक्तांचे सुखच माझे सुख. पाहिले ते कर, पण मला विसरू नको. तुझ्या योगक्षेमचा भार मजवर घालून निश्चित राहा. तुझे सर्वस्वाची काळजी मला ओह. परमर्थसिध्दर्थ विनाकारण कष्ट नको. निष्काम भजनी रम. ज्यास त्याचेप्रमाणे वागत जा. मोक्ष - पंथ ध्वज उभारू नको. बसल्या ठिकाणी सर्वकाही प्रवृत्ती निवृत्ती वैभव पुरवून देतो."

    श्रीपंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम: -

    १) सामाजिक नीतिविरुध्द आचार कदापि करू नये.

    २) देशाचार, कुळाचार, वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे.
    ३) कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये.

    ४) भक्तीची कास सोडू नये.

    ५) सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी.

    ६) मनाविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावी.

    ७) केव्हाहि स्वानुभवसिध्द गोष्टींवर विशेष लक्ष असावे.

    ८) कोणाचीही भक्ती खंडू नये.

    ९) निर्गुण-सगुण-ऐक्य-भावाने भजनक्रम चालवावा.

    १०) सावधगिरीने समर्थ-वाचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत, शांत चित्ताने समर्थचरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असावे.

    -– श्री संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ६ वा, (अंक ३०)

      September 22, 2022