वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. ‘ये दुनिया एक सर्कस है’, असं म्हणत राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात सर्कस दाखवली. हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता कि ज्याला दोन मध्यांतर होते. हा चित्रपट एकूण ४ तास ३० मिनिटांचा होता.
February 20, 2019
नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले… सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना?
April 25, 2021
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात.
November 6, 2016
मधुमेह जडलेल्या व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असेल तर मधुमेहींसाठी डॉक्टरांनी नेमून दिलेलाच आहार घेणे आणि त्या आहाराच्या बाबतीतली पथ्ये कसोशीने पाळणे हा एकमेव उपाय असतो. डॉक्टर मंडळी वारंवार ही पथ्ये आणि हा आहार सांगत असतात. ब्लड शुगरची पातळी योग्य राहील असाच हा आहार असतो. असे काही आहार.
मधुमेही व्यक्तीने स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्या. भाज्या प्राधान्याने खाल्ल्या पाहिजेत. त्यात प्रामुख्याने पालक आणि मोड आलेली हिरवी कडधान्ये यांचा समावेश होतो. हे मोड आलेले कडधान्य आहारात मिसळून खाणे जास्त श्रेयस्कर असते.
स्ट्रॉबेरी हे फळ मधुमेहींसाठी सर्वात उत्तम मानावे लागेल. कारण त्यामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असतात आणि पाण्याचे प्रमाण खूप असते. या फळात गोडी भरपूर असली तरी कॅलरीज्चे प्रमाण कमी असते आणि कर्बोदकेही मर्यादित असतात. तेव्हा ब्रेकफास्टच्या वेळी चार स्ट्रॉबेरीज् खाल्ल्या तरी लगेच काही शुगर वाढत नाही.
मधुमेही व्यक्ती चरबीचे प्रमाण कमी असणारे मांसाहरी पदार्थ खाऊ शकतात. उदा. मासे आणि चिकन. मांसाहार करताना मधुमेही व्यक्तीने प्राण्यांच्या शरीराचे विशेष भाग आवर्जून मागितले पाहिजेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 8, 2017
डेल (Dell) ही संगणक क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून तिची स्थापना १९८४ मध्ये मायकल डेल यांनी केली. डेलचे लॅपटॉप आणि डेस्कटॉप त्यांच्या टिकाऊपणा आणि विविध श्रेणींसाठी ओळखले जातात.
April 9, 2026
१९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे 'ठाणे भूषण' आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. 'संडे मिलिटरी स्कूल' चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भारताच्या वेगवेगळ्या दलात कार्यरत आहेत.
भारतीय सेनादलात दरवर्षी हजारो तरुणांना शिपाई ते अधिकारीपदासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत असते. परंतु चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारी मुले सैन्यदलाकडे पाठ फिरवताना दिसतात त्याचे मुख्य कारण काही गैरसमजुती, सैन्यदलाविषयी अपुरी माहिती आणि मृत्यूचे भय, तरुण पिढीला मार्गदर्शनपर माहिती मिळावी म्हणून हा लेखप्रपंच.
सैन्यदलात विविध स्तरांवरील प्रवेश
प्राथमिक स्तर :
इयत्ता सहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सातारा सैनिक स्कूल, बेळगाव मिलिटरी स्कूल, बंगलोर मिलिटरी स्कूल इथे प्रवेश दिला जातो. त्यात मागासवर्गीयांसाठी १० टक्के आरक्षण असते. ऑक्टो. च्या सुमारास ह्या शाळांशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. लेखी परीक्षेत पास ल्यानंतर मुलाखत होते. इथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. नंतर बरीचशी मुले नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी निवडली जातात. वायुदल, नौदल आणि सेनादल ह्यांत ऑफिसर्स म्हणून दाखल होतात.
माध्यमिक स्तर :
सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, सेक्टर एन १२, सिडको, मौलाना आझाद कॉलेजच्या मागे, औरंगाबाद ह्या पत्त्यावर दहावीत असतानाच अर्ज करायचा असतो. शालान्त परीक्षा संपल्यावर चाचणी परीक्षा होते. दुसऱ्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या मुलांची मुलाखतीची चाचणी घेऊन त्यातून उत्तीर्ण झालेल्या मुलांना औरंगाबाद इथे ११ वी, १२वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जातो. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. पालकांनी पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका मागवून मुलांकडून परीक्षेचा सराव केला तर उत्तम.
शालान्त परीक्षेनंतर :
तिन्ही दलांत तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स वगैरे ठिकाणी शिपाईपदावर जाता येते. दहावीत कमीत कमी ४० टक्के मार्क्स असावे लागतात. मागासवर्गीयांसाठी ९वी पास पात्रता चालते. उंची ५ फूट ७ इंच, छाती ३२ इंच व फुगवून ३४ इंच, वजन ५० किलो आणि वय १६ ते २० वर्षे ९ महिने. टेक्निकल पदासाठी १२वी सायन्स, ५० टक्के मार्क्स आवश्यक. क्लार्कसाठी १२ वी पास, टंकलेखन, बेसिक कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. नौदलासाठी उंची कमी चालते. वयोमर्यादा १९ वर्षे, दहावीत ६० टक्के मार्क्स आवश्यक बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., कोस्ट गार्ड त्याचप्रमाणे सी.आर.पी.एफ. साठी उंची जास्त लागते.
ह्या सर्व जागांसाठीच्या सूचना 'एम्प्लॉयमेंट न्यूज' किंवा 'रोजगार समाचार' ह्या भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध होतात.
बारावीत असताना/उत्तीर्ण झाल्यानंतर:
बारावीत प्रवेश घेतल्याबरोबर एन.डी.ए. चा फॉर्म भरावा. वयाची अट १८ वर्षे ६ महिने. बारावीत ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमेटिक्स घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना नेव्हल इंजिनीअरिंग खडकी, पुणे इथे प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. रुपयादेखील खर्च न करता ते इंजिनीअरची पदवी प्राप्त करू शकतात. पुढे इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा नेवल अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन ते ऑफिसर्स होतात.
इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारकांना भारतीय नौदलात आर्टिफिशर ह्या पदावर ज्युनि. कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाता येते. बायोलॉजी हा विषय बारावीत घेतलेला असेल तर आणि वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल तर ऑक्टो. मध्ये आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे अर्ज करावा लागतो. मुलीसुद्धा अर्ज करू शकतात. अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेसाठी आय.सी.एस.सी. व सी.बी.एस.च्या दहावीच्या अभ्यासक्रमाचा सराव आवश्यक असतो. पुढे एकही पैसा खर्च न करता साडेचार वर्षे प्रशिक्षण मिळते. त्यानंतर पुणे विश्वविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते. ३० वर्षांवरील तरुणींना वरील कॉलेजमध्ये नर्सिंग ऑफिसर्सपदासाठी जाता येते.
पदवीधरांसाठी :
दरवर्षी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतली जाते. त्यात परमनंट आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करता येतो. इंडियन मिलिटरी अकॅडमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी इथे यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. पुढे त्यांची नेमणूक लेफ्टनंट ह्या हुद्यावर होते.
इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी :
इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी आणि पदव्युत्तरांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षे. एम.ए.एम.एड., एम.एस.सी. उत्तीर्णांसाठी सैन्यदलात प्राध्यापक तसेच ऑर्डनन्स विभागात शेतकी पदवीधरांना मिलिटरी फार्ममध्ये व पशुविज्ञान शाखेतील पदवीधरांना रिमाऊंड व वेटर्नरी कोअरमध्ये जाता येते. एल.एल.बी. पदवीधारकांना जज्ज, अॅडव्होकेट जनरल बँचमध्ये ऑफिसर होता येते. हवाईदलात अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बँचमध्ये फायटर कंट्रोलर, एअर ट्राफिक कंट्रोलर, मेट्रोलॉजिकल ब्रँचमध्ये प्रवेश घेता येतो. एअर ट्राफिक कंट्रोलर व फायटर कंट्रोलरसाठी प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी, अकाउंट बँचसाठी बी.कॉम. प्रथम श्रेणी किंवा एम.कॉम. व एव्हिएशन व मेट्रोलॉजी बँचसाठी एम.एस.सी.फिजिक्स अप्लाईड मॅथमेटिक्स व मेट्रोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत.
तरुणींसाठी :
दरवर्षी प्रत्येकी १०० तरुणींना सेनादल, नौदल, वायुदल इथे ऑफिसर्स होण्याची संधी असते. वय २० ते २५ वर्षे, उंची १५२ सेंमी., वजन ४२ किलो अपेक्षित असते आणि पायाची लांबी ९९ सें.मी.पेक्षा अधिक असावी लागते. वैमानिक होण्यासाठी पदवीपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणे आवश्यक असते आणि वय २३ वर्षाच्या आत असावे लागते. हवाई व नौदलात जाण्यासाठी फिजिक्स आणि मॅथमेटिक्स घेऊन बी.एस.सी. पदवीधर असणे किंवा बी.ई. होणे आवश्यक असते.
लेखी परीक्षा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची मुलाखत ह्यातून तरुणींनाही जावे लागते. उत्तीर्ण तरुणींना एका वर्षाचे प्रशिक्षण वेगवेगळ्या अकॅडमींमध्ये दिले जाते. त्यांना दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाते. ते वाढवून चौदा वर्षे करता येते. त्यानंतर एका वर्षासाठी सिम्बॉयसिस, पुणे येथून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सरकारी खर्चाने करता येतो. निवृत्त झाल्यानंतरदेखील चांगली नोकरी मिळते. प्रशिक्षणाच्या काळात विवाह मात्र करता येत नाही. ऑफिसर झाल्यावर करता येतो. एम.ए., एम.एस.सी., एम.कॉम., एम.सी.ए., एल.एल.बी. पास झालेल्या तरुणींचे वय २७ वर्षांपर्यंत चालते. सर्व तरुणींनी शारीरिकदृष्ट्या कणखर असावे, तसेच काही तरी खेळ खेळून शारीरिक क्षमता वाढती ठेवावी. आपले सामान्य ज्ञानही वाढवावे.
सैन्यदलातील फायदे :
सैन्यदलातील वेतन कदाचित आकर्षक वाटणार नाही पण त्यासोबत मिळणारे जे इतर फायदे आहेत, ते दामदुपटीने आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तम पौष्टिक आहार, राहायला मोफत घर, कपडे मोफत, वैद्यकीय सेवा मोफत, बायपास सर्जरी/किडनी शस्त्रक्रिया मोफत, प्रवास मोफत. इंडियन एअर लाईन्सच्या प्रवासात निम्मी सवलत. वर्षातून दोन महिने वार्षिक सुट्टी. एक महिना आपत्कालीन सुट्टी. प्रशिक्षण घेतानाही इतर काहीच खर्च नसल्याने जवान भरपूर पैसे घरी पैसे पाठवू शकतो. बटालियन बॉर्डरवर जाते त्यावेळी कुटुंबाला कुठे ठेवावे हा प्रश्न त्याला पडत नाही. मुंबई-पुणे इथे सर्व सोयींनी युक्त आणि सुरक्षित अशी फॅमिली क्वार्टर्स असतात. वीरगती मिळालेल्या व्यक्तीची विम्याची रक्कम जवानाला दहा लाख तर ऑफिसरला पंधरा लाख, इतर डेथ कम ग्रॅट्युइटि वगैरे धरून मृत जवानाच्या कुटुंबीयांना १० ते १२ लाख रु. व ऑफिसरच्या कुटुंबाला १५ ते २० लाख रु. मिळतात शिवाय त्याचे पेन्शन चालू होते. हे आकडे (२००८ सालचे आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे.) मृत जवानाच्या पत्नीने आपल्या लहान मुलाला सांभाळण्यास असमर्थता व्यक्त केली तर त्या मुलाला रेजिमेंटच्या वसतिगृहात प्रवेश देऊन त्याची सर्व जबाबदारी रेजिमेंट घेते. पुढे त्याला सैन्यातच ऑफिसर, डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी तसे शिक्षण रेजिमेंटतर्फे दिले जाते.
मित्रांनो, भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणारे 'एम्प्लॉयमेंट न्यूज', 'रोजगार समाचार' दर शनिवारी विकत घ्या. आपल्यामध्ये राष्ट्राभिमान बाळगा. दुर्घटना, बॉम्बस्फोट घडल्यास पाकिस्तानी झेंडे किंवा त्यांच्या नेत्यांचे पुतळे जाळत बसू नका. देशात 'बंद' पाडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करू नका. शत्रूच्या हजारो सैनिकांना ठार मारण्याची क्षमता ठेवा. अभिमानाने म्हणा, 'देशासाठी घेईन प्राण !'
लक्षात ठेवा, सैन्यात आपण शत्रूला मारायला जातो. मरायला नाही! सैन्यात 'हर गोली पर लिखा है खानेवाले का नाम' हे ब्रीद वाक्य. असते. ज्या गोळीवर तुमचे नाव लिहिलेले असेल तीच तुम्हाला लागेल. इथे जितकी माणसे रोज अपघाताने वगैरे मरतात त्यापेक्षा किती तरी कमी जवान लढाईक्षेत्रात शहीद होतात. मरण कधीही येणारच. इथे काय किंवा सीमेवर काय! आपल्या मृतदेहावर असेल स्वस्तातले पांढरे कापड. पण सैन्यात शहीद होणाऱ्या व्यक्तीच्या मृतदेहावर असतो राष्ट्राचा तिरंगी झेंडा ! अंत्यसंस्काराच्या वेळेस आकाशात रायफल्स किंवा तोफा खणखणतात. म्हणजे यमालासुद्धा वाटते की, कोणी तरी व्हीआयपी स्वर्गात येतो आहे. तोही त्याच्या स्वागतासाठी तयारी करतो.
सर्वधर्मसमभाव ठेवा. संघटित व्हा. देशाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यात दाखल व्हा. आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करा.
संदर्भ: ‘लष्कर’च्या भाकऱ्या चवदार-मेजर सुभाष गावंड, व्यास क्रिएशन, डी ४, सामंत ब्लॉक्स, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे (प), ४००६०२, तिसरी आवृत्ती २०१७.
-मेजर सुभाष गावंड
July 2, 2022
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् ।
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥
आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी.
वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण त्यांनाही आनंद देणारे , आकर्षित करणारे असे आईचे हास्य आहे. किती सहज शब्दात आचार्यश्री आई जगदंबेचे लोकोत्तर स्वरूप वर्णन करीत आहेत. सामान्य माणूस आकर्षित झाला तर आश्चर्य काय? वैराग्य शिरोमणी असणारे भगवान शंकर आपली सहजसमाधी अवस्था सोडून आईच्या हास्याचा आनंद घेतात. वेगळ्या शब्दात आईचे हास्य समाधीच्या आनंदाच्या समतुल्य आहे.
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् - आईने देखील आपल्या, मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्या चंद्राने जिने आपल्या नीलवर्णीय अलकभार म्हणजे केश संभाराला अलंकृत केले आहे केले आहे अशी.
स्निग्ध अर्थात तेल लावलेल्या, काळ्याशार केसांवर अत्यंत तेजस्वी असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला तर त्या काळ्या रंगाच्या ऐवजी तेथे किंचित निळी छटा पसरते. आचार्य श्रींचे हे सूक्ष्म निरीक्षण किती मनोहारी आहे.
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां- इंद्र म्हणजे देवराज इंद्र. उपेंद्र म्हणजे भगवान विष्णू. आदी म्हणजे अन्य सर्व देवतांच्या द्वारे जिच्या चरणकमलांची अर्चना केली जाते अशी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - अशा कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 30, 2020
यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖
मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.
यदा - ज्यावेळी
दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
निश्वसन्- धाप लागली असताना,
नि:सृताव्यक्तवाणिः - अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
तदा- त्यावेळी जह्नुकन्या - राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
जलालंकृतं - तिच्या जलाने अलंकृत झालेले,
ते- आपले
जटामंडलं- जटेचा विस्तार,
मन्मनोमंदिरे स्यात् - माझ्या मंदिरात स्थिर असावा.
अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 1, 2020
सर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश’ या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती.
May 24, 2024
हम आपके है कौन' हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी रिलीझ झाला. काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी ते 'कालचे ' होत नाहीत. ते कायमच 'आजचे ' राहतात.
राजश्री प्रॉडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन ' या कौटुंबिक चित्रपटाबाबत अगदी तसेच झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी २७ वर्षे पूर्ण होत आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हा चित्रपट ट्रेण्ड सेटर ठरला. या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या शहरातील एकमेव थिएटरमध्ये आकर्षक डेकोरेशनसह सिनेमा रिलीज करणे, त्यातच चित्रपटात वापरलेल्या वस्तूच्या प्रतिकृती विक्रीला ठेवणे, सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहण्याजोगे वातावरण निर्माण करणे अशा वैशिष्ट्यांसह हा चित्रपट प्रदर्शित झाला. लग्नाची व्हिडिओ कॅसेट असे म्हटले गेलेला हा चित्रपट देशविदेशात लोकप्रिय ठरला.
मुंबईत लिबर्टी थिएटरमध्ये या चित्रपटाने १०२ आठवड्यांचे यश संपादले. या चित्रपटात चौदा गाणी असल्याने त्याला काहीनी 'छायागीत' असेही म्हटले. पण यातील अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. लो चली मै, हम आपके है कौन, माई नि माई, मौसम का जादू, चॉकलेट लाईम ज्यूस, जुते दे दो पैसे दे दो, पहला पहला प्यार है, धिकताना धिकताना, मुझसे जुदा होकर, वाह वाह रामजी ही गाणी लाऊडस्पीकरपासून आजच्या यु ट्यूब चॅनलपर हिट आहेत.
लता मंगेशकर तसेच एस. पी. बालसुब्रम्हणम, उदीत नारायण, शैलेंद्र सिंग, कुमार शानू इत्यादीनी ही गाणी गायली आहेत. ही गीते देव कोहली आणि रवींद्र रावल यांची असून संगीत राम लक्ष्मण यांचे आहे. या चित्रपटात मोहनिश बहेल, बिंदू, सतिश शहा, दिलीप जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, आलोकनाथ, प्रिया अरुण, अनुपम खेर इत्यादींच्याही भूमिका आहेत. गीत संगीत व नृत्य यातून ही पटकथा घडते, एक प्रकारचा हा वेगळा फाॅर्म या चित्रपटात आहे आणि तोच लोकप्रिय झाला.
अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या यशस्वी चित्रपटात हम आपके है कौनचा समावेश होतो. हाच चित्रपट तेलगू भाषेत डब होऊन प्रदर्शित झाला.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti