(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्मोक रूम

    एका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने अलार्म च्या आवाजाने तो गोंधळून गेला.

      October 26, 2019


  • “मृत्युदंड” प्रक्रियेमधील एक दिलासा !

    नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली. एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या.

      October 17, 2012


  • बिनतारी विश्वस्तता ऊर्फ WiFi

    एकविसाव्या शतकातल्या नवनवीन शोधांनी अापण खरंच चक्रावून जातो….. संगणक…मग मोबाईल …. मग फेसबुक …. मग WiFi…..

    पण हि बिनतारी विश्वस्तता म्हणजेच WiFi हा काहि एकविसाव्या शतकातला शोध नाहिये तर तो युगानुयुगांपूर्वीपासूनचा शोध अाहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हि मला वेड्यात काढाल…..सांगतो , ऐका अापला जन्म अाईच्या उदरांत ९ महिने ९ दिवस पोसलं गेल्यावर होतो , अापण जन्माला अाल्यावर ज्या नळीतून अाईच्या शरीरातील अन्न पोटांत असताना अापल्या निर्माण अवस्थेत पोचवलं जातं , ती नळी — म्हणजेच नाळ हल्ली डाॅक्टर व पूर्वी सुईणी कापून टाकत असंत.सिंधूताई सपकाळांना तर हे काम लेकीच्या जन्मानंतर स्वत:च करावं लागलं…..

      July 12, 2017


  • रोजचा आहार अधिक पौष्टिक करण्यासाठी काही उपयुक्त सूचना

    गोडा मसाला बनवताना सुके खोबरे व तीळ हे स्निग्ध पदार्थ टाळून अथवा अत्यल्प प्रमाणात घेऊन, धने-जीरे, लवंग - दालचिनी, तमालपत्र, लालसुकी मिरची वगैरे पदार्थ तेलाशिवाय कोरडे भाजून दळून मसाला बनवावा.

    मैद्याऐवजी नेहमी गव्हाचे पीठ म्हणजे कणीक वापरावी. चवीत काहीही फरक पडत नाही. रोजच्या पोळीच्या कणकेत थोडे सोयाबीनचे पीठ मिसळून ठेवावे. ज्वारी - बाजरीच्या पिठात थोडे नाचणीचे पीठ मिसळून ठेवावे म्हणजे रोजचीच पोळी - भाकरी अधिक पौष्टिक बनेल.
    कॅलरीज कमी करण्यासाठी स्किम्ड दुधाचा वापर करावा. दोन वेळा दुधावरची मलई काढून टाकल्यावर ते दूध "लो फॅट स्किम्ड मिल्क' बनेल. ह्या दुधाचे दही, ताक सर्व बनवता येते. शक्य तर गाईचे दूध वापरावे.

    डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. तुरीची, मुगाची, मसुरीची उडदाची अशा सर्व प्रकारच्या डाळी आपण वापरतो. डाळ शिजवतानाच त्यात आवडीप्रमाणे कांदा - लसूण - टोमॅटो - हिरवी मिरची घालावी. म्हणजे नंतर चमचाभर तेलाची फोडणी पुरेल. बदल म्हणून डाळ शिजतानाच त्यात मेथी, पालक, शेपू अशी कोणतीही पालेभाजी घालून शिजवावे. म्हणजे प्रथिनांबरोबर पालेभाजीतील "लोह' व "अ' जीवनसत्व मिळेल.

    डाळींप्रमाणे कडधान्ये म्हणजे प्रथिनांचे स्रोत मानतात. कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी, गाजर, मुळा बीटरूट अशा कोणत्याही कोशिंबीरीत मोड आलेले कोणतेही कडधान्य कच्चेच घालावे. फोडणी देणे टाळावे. म्हणजे रोजचीच कोशिंबीर अधिक पौष्टिक बनेल.
    प्रेशर कुकर, ओव्हन, नॉनस्टिक तवा, पॅन, कढई यांचा वापर केल्यास कमीत कमी तेलात अनेक पदार्थ बनवता येतील.

    साखरेऐवजी शक्ये तेथे गूळ वापरावा, मधाचा उपयोग करावा.
    ताजी फळे खाणे उत्तम! सुकामेव्यापैकी आक्रोड, खजूर, काळ्या मनुका, सुके अंजीर सर्वांत पौष्टिक असतात. वजन कमी करण्याचा प्रश्न् नसेल तर रोज दोन बदाम खावेत.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. उमाशशी भालेराव

      December 25, 2016


  • विडा घ्या हो नारायणा – भाग १

    देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.

      July 2, 2017


  • जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

    भाग २ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे.

      December 28, 2019


  • बंदिस्त नेत्यांचा बंद!

    विदर्भाचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न दाखविणे सोपे आहे; परंतु लोकांना तुमची कुवत माहित असल्याने विदर्भाचा रेगिस्तान होण्यापेक्षा सध्या आहे तेच बरे, असे वाटत असेल, तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. कारण स्पष्ट आहे. उद्या विदर्भ राज्य झालेच, तर आमदार-खासदार कोण होतील?

      January 24, 2010


  • आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

    हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात पहा कोणते आहेत हे घटक…

    १) पालक -

    पालकचा तुमच्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमुळे रक्तातील ‘आयन’ (लोह) वाढवण्यास मदत करते . सुप्स , भाजी ,पालक वडे , आमटी किंवा सलाड अशा कोणत्याही स्वरूपात पालक खाणे हितावह आहे. पालकवर लिंबू पिळल्याने त्यातील आयन (लोह) अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण होते.

    २) संत्र -

    संत्र्यामधील व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी ६ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते . रोज किमान २ ग्लास संत्र्याचा रस प्या मात्र त्यात साखर टाकू नका.

    3) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ -

    आहारात नियमित किमान ग्लासभर दुध व दुग्धजन्य पदार्थ असणं फार महत्त्वाचे आहे. दुधात शरीराला पूरक अनेक ‘मिनरल्स’( खनिजं )व ‘व्हिटामिन्स’ असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

    4) खजूर

    काळा आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध आहे. खजूर हे आयन (लोह) प्रमाणेच ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता .

    5) गूळ -

    भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो .आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. गूळ लोह्वर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि त्वरित उर्जा मिळते . दररोजच्या जेवणात साखरेऐवजी गूळ वापरणे अधिक हितावह आहे.

    6) डाळींब -

    शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच सौदर्य खुलवण्यासाठी डाळींबाचा प्रामुख्याने आहारात वापर केला जातो. डाळींबातील लोह्वर्धक व मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी चे प्रमाण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. आठवड्यातून तीन ते चार वेळेस डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल .

    7) फरसबी

    प्रोटीन, कॅल्शियम, आयन (लोह), सल्फर (गंधक), फॉस्फरस तसंच व्हिटामिन ‘ए’ असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामधील फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. फरसबीची भाजी अथवा कोशिंबिरीत फरसबीचा वापर आठवड्यातून दोनदा केल्याने तुमचे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहील.

    8) मांसाहार -

    शाकाहाराबरोबरीने मांसाहारानेदेखील तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते . चिकन , मटण , अंडी , मासे यामधील व्हिटामिन ‘बी १२’ व व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. मात्र मांसाहार करताना ते योग्य प्रकारे शिजवा व योग्य प्रमाणात खा .

    9) पिस्ता -

    सुक्या मेव्यात व्हिटामिन ‘बी ६’ चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषतः ‘पिस्ता’ सर्वाधिक प्रमाणात शरीराला व्हिटामिन पुरवते. त्यामुळे लाडू , शिरा ,हलवा खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर वाढवा. पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.

    10) गरम मसाला -

    भारतीय खाद्यसंस्कृतीचे खरे वैभव आहे यामध्ये वापरले जाणारे ‘मसाले’ ! तुमच्या जेवणात तमालपत्र , कोथिंबीर , पुदिना , तुळशीची पाने यांचा योग्य वापर ठेवा . हे मसाले आहारातील ‘लोह’ योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.

    -आरोग्य धनसंपदा

      March 16, 2017


  • हसण्यावारी नेऊ नका

    आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्‍याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो.

      March 26, 2021


  • सकारात्मकता : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

    सकारात्मक राहू या, असे म्हणले की सगळेच, हो हो चला सकारात्मक राहू या, असे म्हणतात. पण सकारात्मक राहायचे म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हो हो करत पळ काढायचा आणि म्हणायचे मी सकारात्मक विचार केला हो, असे नसते ना.

      October 2, 2024