(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक वॉर्ड एक गणपती

    १७ ऑगस्ट २००८ साली माझा हा लेख लोकसत्ता मध्ये आला होता. हायकोर्टाच्या ताज्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मी हा लेख मराठीसृष्टीवर टाकत आहे.

    गणेशोत्सवा चे स्वरूप हे उत्सव साज-या करणा-या कार्यकर्त्यांच्या गुणांवर अवलंबून असते .लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले ,त्यातूनच शिवजयंती ,गणेशोत्सव या सारखे उत्सव करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली.राजकारण आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मानणा-या टिळकांनी सत्वगुणांनी युक्त अशा कार्यकर्त्यांना शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्याची प्रेरणा दिली.समाजाने एकत्र यावे , देवांचे आणि देशाचे गुणगान गावे आणि माणसा-माणसांमध्ये प्रेम,ज्ञान आणि समर्पणाचा संदेश जावा हे गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागील कारण होते.हि भावना जपणारी मंडळे निश्चितच कौतुकास पात्र आहेत.परंतु स्वार्थासाठी उत्सव साजरे करण्यासाठी खटपट करणा-या मंडळीत रजोगुण आणि तमोगुण प्राबल्याने असतात हे उत्सवाचे आजचे स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात येते.

    आजकाल गल्लीबोळात गणेशोत्सव होतात.या गणेशोत्सवाची संख्या इतकी अमाप वाढली आहे की , कधी कधी १०० फुटाच्या अंतरावरही गणेशोत्सवाचे मंडप उभे राहिलेले दिसतात.एखाद्या प्रभागात जेवढे सामाजिक किंवा राजकीय गट तेवढे गणपती , असा प्रकार सुरु आहे. मंडप उभारायचा , त्यासाठी अरुंद रस्ते आडवायचे , दिवसभर कर्कश्य आवाजात ध्वनिवर्धक लावायचे , संध्याकाळी भसाड्या आवाजात होणारी भजने , रात्री रंगलेले पत्याचे डाव आणि जुगाराची रिंगणे हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर हताश झाल्यासारखे वाटते.अनेक मंडळे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करीत नाहीत,पावती पुस्तके छापतात,प्रभागातील नागरिक आणि व्यापा-यांकडून वर्गणी गोळा करतात आणि वर्गणी देण्यास नकार देणा-या लोकांना धमकी देतात.रात्री दारू पिणे आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत बीभत्स हावभाव करीत नाचणे हे प्रकार सर्रास सुरु आहेत.हिंदू म्हणून घेण्यास लाज वाटेल ,अशा प्रकारचे उत्सव पाहिल्यावर "तमोगुणी " कार्यकर्त्यांचे पेव फुटल्याचे जाणवते.

    ठाण्यात हिरानंदानी इस्टेट सारख्या उच्चभ्रू वस्तीत होणारे " Ganapati festival "हा एक विचित्रच प्रकार सुरु झाला आहे.सोसायटीत साजरा होणारा गणेशोत्सव म्हणून कुणीही वर्गणी साठी नाही म्हणत नाही.उत्सव साजरे करणा-या लोकांमध्ये परप्रांतीय अग्रेसर असतात.हि मंडळी गणेशोत्सव साजरा करताना मराठी रूढी , मराठी परंपरा आणि धार्मिक प्रथा पायदळी तुडवतात.दिवसभर ध्वनिवर्धक लावून इंग्रजीतून सूचना देतात. स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजीतून असते .गणपतीची पूजा सोडली तर सर्व व्यवहार इंग्रजीतून होतो.स्थानिक कलाकार म्हणून लहान मुलांना अश्लील हिंदी आणि इंग्रजी गाण्याच्या तालावर नाचवतात.त्यांचे आई -बाबा, नव्हे -नव्हे "मम्मी -पप्पा "जोरात हाऊनाईस ,व्हेरीगुड असे चित्कार टाकत टाळ्या वाजवतात आणि अर्धनग्न पोशाखातील लहान मुलांना उत्तेजन देतात .हे सर्व पाहिल्यावर लोकमान्य टिळकांचा आत्मा काय म्हणत असेल ? या साठीच का त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्याची प्रेरणा दिली ?

    आमच्या लहानपणी आम्ही याच ठाण्यात गणेशोत्सवाच्या काळात गजानन वाटवे , सुधीरफडके ,दशरथ पुजारी वगैरे मंडळींची भावगीते ऐकली ,राष्ट्रीय कीर्तनकार आफळे यांची राष्ट्रपुरुषांवरील कीर्तने ऐकली ,रामभाऊ मराठे , प्रसाद सावकार,प्रभाकर कारेकर यांच्या नाट्यगीते आणि शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकल्या , देशप्रेमाची आणि विद्वान लोकांची भाषणे ऐकली . गणेशोत्सव म्हणजे मनोरंजन आणि ज्ञान यांची मेजवानी असायची आणि त्यात आतताईपणा किंवा बिभत्सपणा नव्हता . असे गणेश उत्सव साजरे करणारी मंडळे हि सत्वगुणी कार्यकर्ते निर्माण करणारे कारखाने होते. याच कार्यकर्त्या तून उत्तुंग नेतृत्व देणारे नेते उदयास आले , परंतु तो आता इतिहास झाला आहे.

    यासाठी तातडीचा उपाय म्हणून मंडळांच्या संख्येवर निर्बंध येणे आवश्यक आहे .म्हणूनच एक गाव एक गणपती या धर्तीवर सर्व प्रथम "एक प्रभाग एक गणपती "हि संकल्पना शहरी भागात रुजवणे गरजेचे आहे.शक्यतो उत्सव रस्त्यावर मंडप टाकून न करता मोकळ्या जागेवरच करावेत. मनोरंजनाचे कार्यक्रम लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणारे असावेत .ध्वनिवर्धक लावताना डीजे चा वापर टाळावा, या गोष्टी आपण सहज करू शकतो .

    माणूस म्हणून सर्व माणसे सारखीच असली तरी प्रत्तेक माणूस आपापल्या परीने वेगळा असतो.जे जे आकारात येते ते त्रिगुणांनी भरलेले असते असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी मांडला होता.माणूसही त्रिगुणात्मक असतो.प्रकाश ,ज्ञान शांती, समाधान , निस्वार्थी प्रेम इत्यादी सत्वगुणांबरोबर येतात.

    वासना ,धडपड , उद्योगीपणा , लढावूवृत्ती इत्यादी रजोगुणांबरोबर येतात. आळस , निद्रा , सुस्ती , जडत्व , मोह इत्यादी तमोगुणांबरोबर येतात.प्रत्तेक माणसामध्ये हे तिन्ही गुण असतातच पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो.या वरचढ गुणांमुळे प्रत्तेक माणूस रजोगुणी , तमोगुणी किंवा सत्वगुणी मनाला जातो.

    राजकारण आणि समाजावर कोणत्या लोकांचे वर्चस्व आहे ,त्यावर त्या देशाचे भवितव्य ठरत असते.हिरोशिमा किंवा नागासकीवर पडलेले अणुबॉम्ब तमोगुणी पुढा-यांच्या वर्चस्वाचा परिणाम होता.माझे नुकसान झाले तरी बेहत्तर पण मी दुस-याचा नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,हि वृत्ती म्हणजेच तमोगुण . याच वृत्ती मूळे युद्धे होतात,रक्तपात होतो,मनुष्यहानी होते संपत्ती चा नाश होतो आणि समाजाचे जीवन असह्य होऊन जाते.तमोगुणी माणसांच्या अट्टाहासामूळे किंवा त्यांच्या इर्षे पुढे समाज हतबल झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि वर्तमानातही दिसून येतात.

    समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये या तिन्ही गुणांचे वर्णन केले आहे.समर्थ म्हणतात 'तमोगुणी माणसात पैसा मिळवावा आणि चैनीत आयुष्य घालवावे असा दृष्टीकोन असतो . तो उघडपणे भोगी वृत्तीचा असतो.तमो गुणी व्यक्तींमध्ये एकाकीपणा , आततायीपणा आणि अघोरीपणा असतो .अमर्याद स्वार्थ आणि आसक्ती हा तमोगुणांचा स्थायीभाव आहे.ज्यास परमावधीचा राग येतो , रागाच्या भरात आपला प्राण द्यावा अथवा दुस-याचा प्राण घ्यावा असे वाटते . स्त्रिया आणि मुले यांवर अत्याचार करणे,किडे ,मुंग्या ,श्वापदे , जनावरे यांना ठार मारणे , सत्ता अथवा संपत्ती मिळण्यासाठी प्रतिस्पर्धी ठार मारणे , पापाचे भय नसणे , भ्रष्टाचार करणे या गोष्टी तमोगुणी माणसात सहजपणे आढळतात .दुस-याच्या दुखः पाहून जो संतोष पावतो ,निर्दयी पणे वागण्याची ज्याला हौस आहे,, लोकांत भांडण लावून द्यावे आणि आपण मजा पाहत राहावे हि द्रुष्टबुद्धी ज्यांच्या अंतर्यामी असते तो तमोगुणी असतो '.

    तमोगुणांपेक्षा थोडासा श्रेष्ठ हा रजोगुण असून , श्री समर्थ रामदास सांगतात की , रजोगुणांमुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावे लागते.रजोगुण हा तमोगुणां एवढा भयंकर नसला तरी रजोगुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते.आई -वडील ,बायको , मुले- मुली ,जावई , सुना , नातवंडे इतक्याच लोकांची जो काळजी करतो तो रजोगुणी असतो.उत्तम खावे , उत्तम वस्त्रे पांघरावी आणि दुस-याकडे जे जे उत्तम आहे त्याची अभिलाषा धरावी हे रजोगुणी माणसाचे विचार असतात.समर्थ म्हणतात ,मी तरुण,मी सुंदर, मी बलाढ्य ,मीच चतुर असे जो समजतो तो रजोगुणी असतो.

    सत्वगुणी माणूस हा सर्व श्रेष्ठ असतो.सत्व गुण हा अत्यंत दुर्लभ आहे.ईश्वरावर प्रेम ,विवेकी वृत्ती ,परमार्थाची आवड , समाजाची निरपेक्ष सेवा हि सत्वगुणांची महत्वाची लक्षणे आहेत.नाना प्रकारची दाने करणे , मंदिरांना मदत करणे , अन्नदान करणे,धर्मशाळा उभ्या करणे , लहान मोठ्या बागांची निर्मिती करणे , लोकांबद्दल सहानुभूती असणे तो सत्व गुण असे रामदास स्वामी दासबोधात सांगतात.

    सत्वगुणी माणसे उत्सवप्रिय असतात .एरव्ही नियमाने ईश्वराची उपासना करणा-या भक्ताला उत्सवामध्ये भगवंताचे विशेष प्रेम दाटून येते.अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते.अशा सत्वगुणी लोकांची स्तुती श्री समर्थांनी दासबोधात केली आहे.
    परंतु आजचे उत्सवाचे स्वरूप पाहिल्यानंतर आम्ही संतांची शिकवण विसरलो , लोकमान्य टिळकांच्या विचारांना पायदळी तुडवले असे जाणवते.

    एकतर बेसुमार गर्दीमुळे शहराला विनाशकाली सूज आलेली असताना जे पुढारी अनधिकृत झोपडपट्ट्या वसवतात , फेरीवाल्यांना रस्त्यावर आणून बसवतात आणि त्यांच्या कडून हप्ते खातात,आधीच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची पावसामुळे दैना होते अशा रस्त्यावरून लोकांना प्रवास करायला भाग पाडून लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतात , त्यांनी पुन्हा असले त्रासदायक ठरतील असे उत्सव साजरे करून जनतेला वेठीला धरावे , हाच या लोकांमध्ये तमोगुण आणि रजोगुण मोठ्या प्रमाणात वाढला आहे याचा पुरावा आहे.

    हे थांबवणे गरजेचे आहे.उत्सव साजरे झाले पाहिजेत पण त्यांचे आजचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे.ज्या ठिकाणी शांतता ,सुचिता, शिस्त , वागण्याची मर्यादा , आपलेपणा असतो त्याच ठिकाणी धर्माचे अधिष्ठान असते हे विसरून चालणार नाही.

    याच साठी एका वार्डात एकाच गणपती असावा हि आमची मागणी आहे.सर्व पक्षीय नगरसेवकांनी या साठी एकत्र येण्याची गरज आहे.जो वार्ड यासाठी जाहीर पुढाकार घेईल त्या वार्डातील गणेशोत्सव मंडळाचा जाहीर सत्कार झाला पाहिजे .आता फक्त राजकीय पाठिबा मिळण्याचा अवकाश पुन्हा माझे ठाणे मोकळा श्वास घेवू लागेल

    चला सर्व जण एकत्र येवून या उत्सवाचे स्वरूप बदलूया -

    -- चिंतामणी कारखानीस

      July 7, 2016


  • मार्शिलँड

    जगण्यासाठी , अस्तित्वासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणाऱ्या तरुण पिढीची , मन सुन्न करणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी ही कहाणी . या कथानकाचा शेवट मी सांगणार नाही , तो वाचायलाच हवा , तेव्हाच आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि आपण किती सावध व्हायला हवंय ते कळेल .

      May 21, 2025


  • बाळक्रीडा अभंग क्र.१२

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 23, 2018


  • देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक संस्थेचा स्थापना दिन.

    आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले .

      July 1, 2021


  • जिथे तिथे रुप तुझे – ओवी

    कार्तिकी एकादशीला… चंद्रभागेच्या तिराला… विटेवरी तू तिष्ठला… तुझ्या भक्त भेटीला…

      November 13, 2019


  • ऑर्किडचे रंगबिरंगी विश्व

    सपुष्प वनस्पतींच्या मध्ये फुलांचे वेगवेगळे आकार, प्रकार, रंग, वास, अधिवास असतात. अगदी टाचणीच्या टोका पासून १-२ मीटर व्यास असणारी रेफ्लेशिया सारखी फुले बघायला मिळतात. त्यामध्ये ऑर्किडच्या फुलांची रंगविविधता, फुलांची आकर्षक रचना, मन मोहित करते. ऑर्किड फुलांची सौंदर्य, जटिलता आणि अविश्वसनीय विविधता वनस्पती जगात अतुलनीय आहे. या विदेशी सुंदरतेमध्ये पृथ्वीवरील फुलांच्या रोपांच्या सर्वात मोठ्या कुटूंबाचा समावेश आहे, त्यामुळे उच्चभ्रू लोकांच्या समारंभांमध्ये आवर्जून भेट देण्यात येणारे पुष्पगुच्छ असोत, पंचतारांकित हॉटेलमधील सजावट असो किंवा घरगुती गणपतींच्या मखरांमध्येही ऑर्किडच्या फुलांचा वापर वाढला आहे.
    आपल्याकडील पश्चिम घाट ऑर्किडने समृद्ध असून, तेथे शंभरहून अधिक जंगली ऑर्किडच्या प्रजाती आढळतात. भारतात सर्वात ज्यास्त संख्येने ऑर्किड्स मेघालय व अरुणाचल प्रदेशात मिळतात.

    सपुष्प वनस्पतींच्या ऑर्किडेसी या कुलातील ऑर्किड (आमर) ही एक वनस्पती आहे. अंटार्क्टिका तसेच वाळवंट सोडून सर्व वनप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात. उष्णकटिबंधात यांच्या अनेक जाती आढळत असून त्या अपिवनस्पती (दुसर्‍या वनस्पतींच्या आधारे वाढणार्‍या वनस्पती) आहेत. मात्र, त्या परजीवी नाहीत. समशीतोष्ण भागात ही वनस्पती जमिनीवर वाढते. काही ऑर्किड मृतोपजीवी असून त्या पर्णबुरशीसारख्या मृत सेंद्रिय पदार्थांवर वाढतात. अपिवनस्पती प्रकारातील या जातीची हवाई मुळे (roots) आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. ऑर्किडच्या जमिनीवर वाढणार्‍या जातींमध्ये आभासी कंद आढळतात. बहुतेक ऑर्किड वनस्पतींना लहान फुले येतात.

    निसर्गाने निर्माण केलेल्या अनेक अद्भूत रहस्यांमध्ये फुलांचे विश्व नेहमीच मन आकर्षून घेते. रंगाने, आकाराने चटकन लक्ष वेधून घेणारी ही फुले म्हणजे निसर्गाचा चत्मकारच आहे. पावसाळ्यानंतर बहरणाऱ्या फुलांच्या ताटव्यांबद्दल लेखक, कवींनी विपुल लेखन केले आहे. अनेक नामवंत चित्रकारांची सुरुवात फुलांच्या चित्रांपासून झाली, अलीकडे हौशी फोटोग्राफरना विविधरंगी फुले म्हणजे हक्काचे ऑब्जेक्ट वाटते. ही मंडळी फुलांसाठी नवनवीन कल्पना लढवतात. पुराण काळापासून फुलांना धार्मिक महत्त्व असून, ती शुभकार्याचे प्रतीक मानली जातात. देशात फुलांच्या बाजारपेठेतील उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यात ऑर्किड फुलांचा फार मोठा वाटा आहे. सध्या यांची निर्यातही करण्यात येते. ही पण मोठी संधी आहे.

    स्थानिक भाषेत ऑर्किडला आमरी म्हणतात. महाराष्ट्र राज्यात ११० पेक्षा जास्त आमरींची नोंद झाली असून, दर काही वर्षांनी नवीन जाती सापडतात. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये वनसंपदेतील प्रचंड वैविध्य पहायला मिळते. सह्याद्रीच्या या पट्ट्यात ९० हून अधिक प्रकारची जंगली ऑर्किड पाहायला मिळतात. महाराष्ट्रात एंडेमिक (दुसरीकडे न आढळणाऱ्या) ४१ प्रजाती ह्या ३० जातीमध्ये विभागलेल्या आहेत. याशिवाय हबेनारिया च्या २० प्रजाती, डेंड्रोबियमच्या ११, प्रजाती आहेत. पावसाळा सुरू झाला की ऑर्किडचा हंगाम सुरू होतो आणि थंडीच्या अखेरपर्यंत ही फुले उपलब्ध होतात.

    पारंपरिक फुलांच्या बरोबरीने गेल्या दहा ते बारा वर्षांत ऑर्किडच्या फुलांनी ग्राहकांच्या मनात घर केले आहे. रंगाने आकर्षक आणि अतिशय नाजूक अशी ही फुले ग्राहकांच्या चटकन नजरेत भरतात. सुरुवातीला ही फुले महाग असल्याने उच्चभ्रू वर्गापर्यंतच मर्यादित होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे ऑर्किडची शेती सुरू झाल्याने फुलांची उपलब्धता वाढली आहे. अलीकडच्या काळात ऑर्किड्स उतिसंवर्धनाने सुद्धा वाढवले जाते. सध्या देशात विक्री होणाऱ्या ऑर्किडमधील सत्तर टक्के फुले थायलंड आणि मलेशियातून येतात. आयात होणाऱ्या ऑर्किडच्या तुलनेत आपल्या कडील ऑर्किडचे उत्पादन अतिशय अत्यल्प आहे. गुजरात सरकारने अलीकडेच ऑर्किड उत्पादनासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, शहरातील इमारतींच्या गच्चीवर आता ऑर्किडची बाग लावण्यात येत आहे. याचाच परिणाम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या बाजारपेठेत बघायला मिळाला. स्थानिक फुलांच्या बरोबरीने ऑर्किडची फुले, त्यांचे हार छोट्या फूलविक्रेत्यांकडेही उपलब्ध होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात केलेल्या मखरांमध्ये ऑर्किडचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आगामी काळात ऑर्किड फूल जरबेरा आणि इतर परदेशी फुलांना मागे टाकेल, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.

    ऑर्किडच्या चाहत्यांची संख्या वाढत असली तरी, सध्या बाजारात मिळणारे फूल हायब्रिड आणि विदेशी जातीचे आहे, हे अनेकांना माहितीच नाही. जगभरात ऑर्किडच्या असंख्य जाती आढळतात. त्यातील काही जातींना बाजारपेठेत स्थान मिळाले असून, अजूनही ९० टक्के ऑर्किडची फुले आजही जंगलातच पाहायला मिळतात.

    या फुलांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतागुंत असून परागीभवन घडून येण्यासाठी विशिष्ट फुलपाखरे किंवा कीटक विशिष्ट प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होतात. ऑर्किडच्या २०० जातींमध्ये स्वयंपरागीभवन घडून येते. मात्र हवा किंवा पाणी यांच्यामार्फत त्यांचे परागीभवन होत नाही. ऑर्किडमध्ये कीटकांद्वारे परागीभवन घडून येते. फुलातील सामान्य व त्यापेक्षा अनेकविध आढळणारी जटिल संरचना परागकणाच्या या खात्रीच्या व काटकसर साधणाऱ्या पद्धतीशी सुसंगत असते. त्यापासून ऑर्किडचा पुढे फार मोठा बीजप्रसार व जातींचा प्रसार घडून आलेला आहे. या कुलातील अनेक वनस्पतींचे शोभेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. मात्र, या कुलातील फक्त व्हॅनिला ही जाती आर्थिक दृष्टया फायद्याची आहे. या जातीपासून मिळणारा व्हॅनिला हा सुंगधी अर्क आइस्क्रीममध्ये मिसळतात. जगभर ऑर्किडची लागवड हा एक हरितगृह उद्योग झालेला आहे. त्यामुळे ऑर्किडचे हजारो संकर निर्माण झाले असून त्याच्या बागा फुलविण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत.

    उष्णकटिबंधात यांचे प्रमाण मोठे असून बहुतेक अपिवनस्पती आहेत. समशीतोष्ण कटिबंधात त्यामानाने प्रमाण कमी असून तेथे त्या भूमीवर वाढणाऱ्या असतात. अपिवनस्पती प्रकारातील जातींची हवाई मुळे आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. तर जमिनीवरच्या जातींत कंद किंवा ग्रंथिक्षोड आढळतात. काही अपिवनस्पतींत आभासी कंद असतात. पाने साधी, जाडसर, लांबीत अधिक, मध्ये पन्हाळी व बहुधा दोन रांगांत असतात; क्वचित त्यांचा ऱ्हास होऊन ती खवल्यांसारखी होतात. व्हॅनिला नावाच्या जातीपासून (व्हॅनिला प्लॅनिफोलिया) मिळणारा व्हॅनिला नावाचा सुगंधी अर्क प्रसिद्ध आहे.

    बर्‍याच वेगवेगळ्या वाढत्या परिस्थितीत फळ देणा ऱ्या ऑर्किडच्या अनेक प्रकारांसह, आपण पुरवू शकणार्‍या परिस्थितीस अनुकूल असलेल्या ऑर्किड शोधणे तुलनेने सोपे आहे – मग ते स्वयंपाकघरातील खिडकी किंवा पूर्ण आकाराचे ग्रीनहाऊस असले तरीही.

    बहुतेक लागवड केलेले ऑर्किड मूळचे उष्णकटिबंधातील आहेत. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ते स्वतःला झाडाची साल किंवा इतर वनस्पतींच्या पृष्ठभागाशी जोडतात. त्यांचे जाड, पांढरे मुळे ओलावा आणि विरघळलेले पोषकद्रव्य शोषण्यासाठी विशेषतः अनुकूलित केले जातात. कारण या उष्णकटिबंधीय ऑर्किड सामान्यत: जंगलाच्या मजल्याऐवजी झाडे उंच वाढतात, परंतु ते चांगल्या हवेच्या अभिसरण आणि भरपूर प्रमाणात प्रकाश मिळवतात. त्यांना संपूर्ण वर्षभर १२-तासांचा दिवस आवडतो, आणि समशीतोष्ण प्रदेशांमधील मिडसमर परिस्थितीसारखेच – जास्त तीव्रतेच्या प्रकाशाची आवश्यकता असते.

    ऑर्किड वाढण्यास कठीण आहे का?

    हो, बऱ्यापैकी कठीण आहे. खरं तर, ऑर्किडचे डझनभर प्रकार आहेत आणि शेकडो संकरित आहेत, जे सनी विंडोसिल वर किंवा दिव्याखाली खाली वाढत आहेत.

    ऑर्किड्स कसे वाढतात?

    ऑर्किड्स सहसा दोन विस्तृत श्रेणींमध्ये विभागल्या जातात ज्या त्यांच्या वाढण्याच्या सवयींचे वैशिष्ट्य दर्शवतात. मोनोपोडियल ऑर्किड्समध्ये एकल, सरळ स्टेम असतो आणि पाने स्टेमच्या बाजूने एकमेकांच्या विरुद्ध अशी व्यवस्था असते. वरच्या पानांच्या पायथ्यापासून फुलांचा काटा दिसतो. या वाढीच्या सवयी असलेल्या ऑर्किडमध्ये फॅलेनोप्सीसचा समावेश आहे.

    या ऑर्किड्स क्षैतिजरित्या वाढतात, जुन्या रायझोम वरून नवीन शूट तयार होते. नवीन शूटच्या शीर्षस्थानी पाने आणि फुलांचे स्केप्स तयार होतात. बर्‍याच सिमोडियल ऑर्किड्स स्यूडोबल्ब बनवतात. या वनस्पती दीर्घकाळापर्यंत दुष्काळापासून बचावासाठी पाणी आणि पोषकद्रव्ये साठवतात. सिम्पोडियल ऑर्किड्समध्ये फोरसिया, सायंबिडियम, ऑन्सीडियम आणि डेंड्रोबियम असतात.

    ऑर्किड्सचे त्यांच्या मूळ वस्तीद्वारे देखील वर्गीकरण केले जाऊ शकते. हे ओर्चीड आढळले म्हणजे त्या भागातील तापमान, आर्द्रता आणि प्रकाश पातळी यांचे संकेत देते. फ्लेनोप्सीस आणि पॅफिओपेडिलम सारख्या आर्द्र उष्णकटिबंधीय मूळ ऑर्किड्स, दिवसाच्या तापमानात ७३°-७५° डिग्री फॅरनहाइट तापमान पसंत करतात, ज्यामध्ये आर्द्रता ८०-९० टक्के असते.

    सिंबिडियम आणि डेन्ड्रोबियमसह उबदार-हवामान ऑर्किड्स सरासरी तापमान ५५°-७०° फॅ. आर्द्रतेचा स्थिर पुरवठा आणि चांगल्या हवेचे अभिसरण दर्शवतात. दक्षिणेकडील विंडोमध्ये ते सामान्यत: आनंदी असतात, तरी त्यांना उन्हाळ्याच्या काळात थोडेसे शेडिंगची आवश्यकता असू शकते. मासदेवॅलिया आणि एपिडेंड्रमसारख्या उच्च उंचीच्या ऑर्किड्स मेघालयाच्या जंगलात वाढतात जिथे सरासरी तापमान ५५°-ते ७०° फॅ असते आणि आर्द्रता खूप जास्त असते. हे ऑर्किड फिल्टर केलेले प्रकाश पसंत करतात जे जास्त तीव्र नसतात.

    ऑर्किडची काळजी कशी घ्याल?

    ऑर्किडच्या 30,000 वेगवेगळ्या प्रजातींसह सामान्य काळजी आणि लागवडीच्या सूचना देणे अशक्य आहे. तथापि, ऑर्किड कसे दिसते ते प्रकाश, पाणी आणि वाढत्या माध्यमासाठी त्याच्या प्राधान्यांचा संकेत देऊ शकतो.

    जर त्या झाडाला काही पाने किंवा चामड्याची पाने (बहुतेक फ्युसिया आणि ऑन्सीडिअम प्रमाणे) असतील तर त्या झाडाला जास्त प्रकाशयुक्त वातावरण हवे असेल. जर पाने मऊ आणि कोमल असतील (काही फॅलेनोप्सीस आणि बहुतेक पेफिओपिडिलम सारखे) तर झाडे बहुधा हलके-संवेदनशील आहेत आणि त्यांना दक्षिणेस तोंड असलेल्या खिडकीवर ठेवू नये.

    जर ऑर्किडमध्ये चरबीयुक्त स्यूडोबल्ब असतील तर ते थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. अशी झाडे लाव्हा (lava) खडकाच्या खडबडीत भागांवर वाढवावे. जर ऑर्किडला स्यूडोबल्ब नसतील तर त्याला वारंवार पाण्याची गरज भासू शकते, किंवा स्फॅग्नम मॉस सारख्या अधिक आर्द्रतेने वाढणार्‍या माती मध्ये पीक घ्यावे.

    प्रकाश:

    सामान्य नियम म्हणून, ऑर्किड हलक्या प्रकाशाच्या सहवासात वाढतात. उत्कृष्ट परिणामांसाठी, त्यांना वर्षाकाठी १२-१४ तासांचा प्रकाश मिळाला पाहिजे. उष्णकटिबंधीय वातावरणात, नैसर्गिक प्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता समशीतोष्ण हवामानात बदलत नाही. या कारणास्तव, हिवाळ्यातील महिन्यांत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम प्रकाश पुरवला पाहिजे.

    दक्षिण-आणि पूर्वेकडे असलेल्या खिडक्या सामान्यत: ऑर्किडसाठी सर्वोत्तम स्थान असतात. पश्चिम खिडक्या खूप गरम असू शकतात आणि उत्तर खिडकी सहसा खूप गडद असतात. आपल्याकडे आपल्या ऑर्किडसाठी विंडोसाठी चांगले स्थान नसल्यास, ते कृत्रिम दिव्याखाली वाढण्यास आनंदी असतील. चार फूट फ्लूरोसंट बल्बच्या संचापासून आर्किड ६ ते ८ इंचा पेक्षा जास्त अंतरावर स्थित असावेत. फक्त पांढरे, कोमट पांढरे आणि फिकट बल्ब वाढविण्याच्या फायद्यांविषयी मतभिन्नता आहे. नवीन पूर्ण-स्पेक्ट्रम बल्ब बहुदा सर्वात चांगली निवड आहे. टेफ्रियल ऑर्किड्स, जसे पेफिओपीडिलम्स आणि काही सिम्बिडीयम्स, मातीमध्ये वाढतात.

    परंतु बहुतेक उष्णकटिबंधीय ऑर्किड्स एपिफाइट्स असतात, याचा अर्थ ते मातीऐवजी हवेत वाढतात. त्यांच्या मांसल मुळांना वेलामेन नावाच्या पांढऱ्या पेशींच्या थराने झाकलेले असते, जे पाणी शोषण्यासाठी स्पंज म्हणून कार्य करते. कोटिंग देखील मुळे उष्णता आणि ओलावा कमी होण्यापासून वाचवते.

    ऑर्किड वाढणार्‍या माध्यमामध्ये हवेचे अभिसरण चांगले असणे आवश्यक आहे आणि पाणी लवकर निथळण्याची सोय आवश्यक आहे. यास मुळांना चिकटून राहण्यासाठी काहीतरी सुरक्षित सोय असावी. ऑर्किडच्या प्रकारानुसार, ते पीट मॉस, त्याचे लाकूड, झाडाची साल, वाळलेल्या फर्न मुळे, स्फॅग्नम मॉस, रॉक लोकर, पेरलाइट, कॉर्क गाळे, दगड, नारळ फायबर, लावा रॉक किंवा या मिश्रणामध्ये बरीच मिश्रित सामग्री तयार करतात. काही एपिफायटीक ऑर्किड्स ट्री फर्न किंवा कॉर्कच्या स्लॅबवर देखील वाढवले जाऊ शकतात.

    पाण्याची व्यवस्था कशी असावी?

    बहुतेक ऑर्किड जास्त प्रमाणात ओलावा सहन करण्यापेक्षा दुष्काळ सहन करतात. ऑर्किडला पाण्याने भांड्यात बसण्यापेक्षा काहीही जलद मारत नाही. पुरेसे हवा अभिसरण न करता, वनस्पती गुदमरल्यासारखे मरेल.

    ऑर्किड्सचा प्रसार:

    बियाण्यापासून ऑर्किडचा प्रचार करणे फार कठीण आहे. इतर वनस्पतींच्या बियासारखे नाही, ऑर्किड बियाण्यांमध्ये पौष्टिक संचय उती नसतात.

    बर्‍याच ऑर्किड वर्षातून एकदा फुलतात, परंतु जर त्यांची नीट निगा घेतली तर अधिक वेळा फुलतील. जर आपल्याला एखाद्या विशिष्ट हंगामात फुलणारी ऑर्किड हवी असेल तर त्या वेळी बहरलेली एखादी वनस्पती खरेदी करणे सर्वात चांगले. जेव्हा ऑर्किड फुलते तेव्हा ते सहसा सहा ते दहा आठवड्यांपर्यंत पूर्ण उमलते.

    प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी पश्चिम घाटातील ऑर्किडची सविस्तर माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल डॉ. पांडे म्हणतात, ‘पश्चिम घाटात ऑर्किडचे वैविध्य मोठे आहे. जमिनीवर येणारी तसेच झाडांवर येणारी दोन्ही प्रकारची फुले आपल्याला तिथे बघायला मिळतात. पुणे परिसरात, लोणावळा, खंडाळा, मुळशी, ताम्हिणी, पुरंदर या भागात उत्तम प्रकारची ऑर्किड फुलतात. तसेच कोल्हापूर भागात गगनबावडा , पाटगाव, आंबोली, फोंडा घाट, आंबा घाट या परिसरातही वैविध्यपूर्ण ऑर्किड सापडतात.
    अशी बहुरंगी ऑर्किड्स कोणाला आवडणार नाहीत बरे?

    संदर्भ:
    मराठी विकिपेडिया - डॉ. वा .द, वर्तक
    गुगल वरील अनेक लेख
    सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

    डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
    मोबा. ९८८१२०४९०४
    इ मेल : dkkul@yahoo.com
    ९.०६. २०२४

    ______________________________________________________

      July 31, 2024


  • श्रवणभक्ती

    विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा

      August 14, 2023


  • वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

    हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.

      February 6, 2019


  • अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ८

    माझा जायचा यायचा रस्ता पूर्व पश्चिम असा आहे. डोंगरातून जाणारा रस्ता असल्यामुळे, काही ठिकाणी रस्ता छोट्या छोट्या खिंडींमधून जातो. त्यामुळे खिंडीची एक भिंत उत्तराभिमुख असते तर दुसरी दक्षिणाभिमुख. हे ठिकाण बरेच उत्तरेला असल्यामुळे हिवाळ्यामधे सूर्य नेहमी दक्षिण दिशेलाच दिसत असतो. त्यामुळे बरेचदा सूर्यप्रकाश पडला, की दक्षिणाभिमुख भिंतीवरचे बर्फ वितळून जाते, तर उत्तराभिमुख भिंतीवर सूर्यकिरणे न पडल्यामुळे, तिथले बर्फ तसेच साचलेले रहाते. त्यामुळे रस्त्यावरून जाताना, खिंडीची एक बाजू बर्फाच्छादित तर दुसरी बाजू उन्हात झळकणार्‍या काळ्या कातळांची, असं मोठं मजेशीर दृश्य दिसतं.

    बर्फाची रूपं देखील वेगवेगळी. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं डोंगरमाथ्यावरचं सोनेरी बर्फ बघितलं, की अमेरिकेत असल्याचा विसर पडतो. हिमालयाशी तुलना करणाचा प्रश्नच नाही, पण कधी काळी भल्या पहाटे उठून बघितलेला हिमालयातला सूर्योदय आठवत रहातो. कैलास पर्वतावर खरोखरच शंकराचं जागृत स्थान असेल की नाही कोणास ठाऊक, पण सकाळच्या किरणांत चमकणारी बर्फाच्छादित शिखरं बघितली की, दैवी सौंदर्याचा साक्षात्कार मात्र होतो - मग ती हिमालयातील असोत की अमेरिकेतली! सकाळच्या कोवळ्या उन्हातली बर्फावरची नारिंगी छटा वेगळी आणि संध्याकाळच्या सरत्या उन्हातली बर्फावरची गुलाबी, किरमिजी छटा वेगळी! लख्ख उजेडातला, उन्हात चमकणारा आणि डोळे दिपवून टाकणारा दिवसाचा बर्फ वेगळा आणि रात्री, चंद्राच्या मंद प्रकाशात, रुपेरी वाळूच्या अथांग किनार्‍यावर उभं असल्याचा भास करणारा बर्फ निराळा !

    हिवाळ्यात ओढे, डबकी, नद्यांची रूपं बदलतात. ओढ्या, नद्यांचं पाणी आपला खळाळता प्रवाह विसरून संथ वहायला लागतं. थंडीच्या वाढत्या कडाक्याबरोबर साचलेल्या तलावांत, रस्त्याकडेच्या डबक्यांतील पाणी थिजून जातं. वहात्या पाण्यात मधे मधे थिजलेल्या पाण्याची बेटं तयार व्हायला लागतात. सस्कुहाना नदीच्या पात्रातून छोटे छोटे हिमनग वहात जाताना दिसतात. तापमान फारच खाली गेलं की नद्या, ओढ्यांची पात्र पूर्णपणे बर्फाच्छादित होऊन जातात. पुढे मग जेंव्हा पाणी पुन्हा वहातं व्हायला लागतं, तेंव्हा पात्राच्या मधला पाण्याचा पट्टा प्रथम वहाता होतो. पाण्यावर साठलेलं बर्फ वहात्या पाण्याच्या प्रवाहामुळे, नदीच्या काठांकडे लोटलं जातं. नदीचं पात्र दोहोकडून अशा बर्फाच्या पांढर्‍या शुभ्र किनारीवाल्या साडी सारखं दिसायला लागतं.

    माझ्या जायच्या यायच्या रस्त्यावर टेकड्यांच्या उतारावर आणि नदीच्या काठाकाठाने अस एक मोठं गॉल्फ कोर्स आहे. हिवाळ्यात ते पूर्णपणे बंद असतं. त्याच्या प्रशस्त उतारावर साचून राहिलेला शुभ्र बर्फ, महिनेन महिने तसाच पडून राहिलेला असतो. ना त्यावर कुणाच्या पाऊलखुणा उमटतात ना कुणी तो इतस्तत: सरकवायचा प्रयत्न करतं. त्या गॉल्फ कोर्सवर अधे मधे लावलेल्या सूचिपर्णी वृक्षांच्या लांबच लांब काळ्या सावल्या तेवढ्या त्या अनाघ्रात बर्फाला साथ देत उभ्या असतात.

    रानावनाला पडलेला बर्फाचा वेढा ३-४ महिने तरी कायम असतो. झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, सुकलेल्या काटक्या, वाळलेली पानं, पिवळं पडलेलं गवत, या सर्वांवर बर्फाने आपली रुपेरी मोहर बसवलेली असते. झाडांच्या फांद्यांवरचं बर्फ अर्धवट वितळून, फांद्यांचा वरचा भाग पांढरा तर खालचा भाग काळसर झालेला असतो. शेतांत, मळ्यांत, सुकलेल्या गवताची आणि मक्याच्या कापलेल्या खुंटांची टोकं बर्फाच्या आवरणाखालून डोकावत असतात. त्यात कधी कधी टर्कीचा थवा किडे वेचताना दिसतो.

    मार्चच्या सुरवातीपासूनच येणार्‍या बदलाची चाहूल लागायला लागते. नद्या ओढ्यांचं पाणी पूर्ववत खळाळतं व्हायला लागतं. अचानक त्या पाण्यात बदकं अवतरतात. हिवाळ्यात कुठे दडून बसलेली असतात कुणास ठाऊक! पण रस्त्याकाठच्या ओढ्यांमधे बदकिणी आणि त्यांची पिल्लं, पाणी वहातं व्हायला लागल्याची जाणीव करून देतात.

    असंच एखाद्या दिवशी आकाशातून दूरवरून ओळखीचा असा गीज (geese) चा आवाज येतो. वर बघावं तर खूप उंचावरून गीज चा थवा आपल्या ठरावीक इंग्रजी ‘V’ अक्षरासारख्या आकारात उडत असतो. स्थलांतर करून हे पक्षी आता आपल्या उत्तरेच्या प्रवासाला लागलेले असतात. पुढचा महिनाभर, दिवसा रात्री, आपल्या आवाजाने लक्ष वेधत आणि निसर्गाचा अचंबित करून टाकणारा एक चमत्कार दाखवत, हे पक्षी ऋतुचक्राचे एक आवर्तन पूर्ण करत असतात.

      August 16, 2015


  • बाळक्रीडा अभंग क्र.७

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 18, 2018