वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां -
पूर्णेन्दुवक्त्र प्रभां
शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् ।
सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥
आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी.
आईच्या मस्तकावर असणाऱ्या रत्नजडित सुवर्ण मुकुटाला मोत्यांचे हार लटकत आहेत. त्याने मुकुटाचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. अशा मुकुटाने आई अधिकच सुंदर दिसत आहे.
पूर्णेन्दुवक्त्र प्रभां- पूर्ण विकसित पौर्णिमेचा चंद्रबिंबा प्रमाणे अत्यंत सुंदर मुखाची आभा सर्वत्र विलसत आहे अशी.
शिञ्जन्नूपुर- जिच्या चरणातील नूपुर अर्थात पैंजणांचा अत्यंत सुंदर ध्वनी सर्वत्र गुंजत आहे अशी.
किंकिणिमणिधरां- जिच्या कंबर पट्ट्यात, वस्त्रात तथा अन्य अलंकारात लावलेले छोटी-छोटी घुंगरू किन् किन् असा सुंदर आवाज करीत आहेत अशी.
पद्मप्रभाभासुराम् - कमळाच्या सौंदर्या प्रमाणे तेजस्वी असणारी. परम आकर्षक असणारी. भक्तगणांच्या चित्ताला मोहीत करणारी.
सर्वाभीष्टफलप्रदां- साधकांना सुयोग्य अशी सकल फले प्रदान करणारी. गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. सकल पर्वतांचा राजा हिमालय. त्याच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली . वाणीरमासेवितां- वाणी अर्थात देवी सरस्वती आणि रमा अर्थात देवी लक्ष्मी यांच्याद्वारे, अर्थात समस्त ईश्वरी शक्तींच्या द्वारे सेवा केली जात आहे अशी.
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् -
कारुण्याचा जणू काही सागर असणाऱ्या देवी मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 11, 2020
अगदी हिमालय, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेथी सर्वत्र आढळते. तसेच ते श्रीलंकेपासून ते मध्य आशिया खंड, युरोप आणि अनेक आफ्रिकन खंडात हे प्रचलित आहे. आयुर्वेदात जरी हे मान्य केले तरी आज अनेक देशात मेथीचे बाबतीत संशोधन चालूच आहे. तरीही आयुर्वेदात मेथीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मेथीमुळे मधुमेह व रक्तदाब यांना अटकाव होतो, असा शोध आयुर्वेदात लावला होता. तसेच मेथी हे नुसते भाजी नसून ते अत्यंत महत्त्वाचे औषधही आहे.
January 9, 2024

फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका ही फुलाला जन्म देणारी सर्वांत पुरातन वनस्पती ठरली आहे. भविष्यात फ्लॉरिजर्मिनिस जुरासिकापेक्षा अधिक जुन्या सपुष्प वनस्पतींचे जीवाश्म कदाचित सापडतीलही. तरीही फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका या वनस्पतीचं स्थान वेगळ्या दृष्टीनं अढळ राहणार आहे.
February 22, 2022
नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….
August 1, 2017
मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.
October 2, 2019
आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते.
January 12, 2023
सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !
June 10, 2011
जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.
September 16, 2016
एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात.
August 5, 2022
पशुपती व्रत
January 13, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti