(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तू कहॉ ये बता इस नशीली रातमे

    तू कहॉ ये बता इस नशीली रातमे

    परमेश्वराची लिला अगाध आहे. त्याने नेमून दिलेलं काम रात्रंदिन करत रहायचं, एवढंच आपल्या हाती आहे का? दिवस सारा धकाधकीत जातो.पण,रात्र……….. तीचं काय करायचं?”रात्र” सोबतीने फुलवायची की, पार ताणून द्यायचं,ते आपल्या भावावस्थेवर अवलंबून असतं. रंजक स्वप्न आणि सत्य हा निव्वळ काल्पनिक दृष्यमाध्यमांचा लपंडाव असतो.

      July 15, 2026


  • सिक्कीम मधील चांगु लेक

    १२३१० फूट उंचीवर पांढऱ्या शुभ्र दगडासारख्या घट्ट बर्फाचा समुद्र पसरलेला होता. ३ ते ५ किमी व्यास असलेल्या सरोवरात पाणी म्हणून दिसत नव्हते. आकाश ढगाळलेले. सूर्य डोकावत होता आणि सरोवराचा काही बर्फ चकाकत होता. सरोवराचा परिसर हिरवागार,पाणी इतके नितळ आणि निळे,त्यात बाजूच्या निसर्गाचे रम्य प्रतिबिंब पडते. शेकडो वर्षापूर्वी लामा गुरु पाण्याचा नितळ पणा व आकाशातील विविध रंगछटावरून वरून पुढील काळाचे भविष्य सांगत.

      May 21, 2019


  • प्रमोद साळुंखे – आपुलकीने वागणारा फिरस्ता..

    प्रमोद माझा चुलत भाऊ. गांवाकडेच राहिलेला, शिकलेला. लहानपणी माझं गांवाकडे फारसं जाणं झालं नसल्यानं, मला माझा गांव आणि गावातले नातेवाईक तसे फारसे समजले नाहीत. परतु मी जरी गांवी जात नसलो तरी माझ्या गांववाल्यांचं मुंबईतल्यी माझ्या घरी येणं होत असायचं, म्हणून मला त्यातले काही माहित.

      August 20, 2018


  • जागतीक केळे दिवस

    केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात सामिल केल्याने फायदे होतात. दररोज केळं खाल्याने हार्ट ॲ‍टॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याशिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. अति पिकलेल्या केळ्याचे अनेक फायदे आहेत.

      April 20, 2022


  • बांगलादेशात दहशतवादी हल्ला व त्याचा भारतावर परिणाम

    मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.

      July 11, 2016


  • सुनीताबाई – सौदामिनी !

    सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !

      April 30, 2021


  • सुप्त मनाची अफाट शक्ति

    सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात. एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.

    हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. ते अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे, नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे अस्तित्व नष्ट करू शकतात का?

    तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.
    लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या (subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन केले आहे.

    सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.
    दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो. पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.

    जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious) केवळ सावली असते.
    सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर (emotion) आघात करतात. झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.
    काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.

    त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात. याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात. तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.

    म्हणूनच मी सुखी आहे, मी सर्व गुणसंपन्न आहे, माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा समाज, असे सर्वांगीण सुख स्मृद्धाने परिपुर्ण जीवन मी जगत. जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे, असेच विचार मनात सतत असू द्या. हाच समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

      June 7, 2017


  • मराठी आडनाव – भुरचंडी

    माधव महादेव भुरचंडी, हे नाव, माझे मित्र श्री. ठोंबरे यांनी, सप्टेंबर 1982 मधे मला सांगितलं. त्याच बरोबर, भुरचंडी या आडनावाची कुळकथाही सांगितली. माझ्या आडनावकोशात अशी नोंद आहे.

    माणसाच्या स्वभावाच्या किंवा शरीराच्या गुणवगुणावरून अनेक आडनावं रूढ झालेली आढळतात. लंगडे, बहिरे, बहिरट, ताठरे, वाचासुंदर, मोठेराव, आळशी वगैरे.

    भुरचंडी हे आडनाव, मूळचं भृशूंडी असं होतं. यांच्या पूर्वजांपैकी कुणाला तरी, कपाळावर, दोन भिवयांमध्ये, सोंडेसारखा दिसणारा भला मोठा मस होता. भिवया म्हणजे भृ आणि सोंड म्हणजे शूंडी … म्हणून त्या व्यक्तीचं भृशूंडी असं नाव पडलं. पुढे हे, त्या कुटुंबाचं आडनावच झालं.

    अुच्चारतांना, कानाला कठोर वाटणार्‍या किंवा लिहायला कठीण असणार्‍या शब्दांचा अपभ्रंश, अुच्चारायला सोप्या, कानाला गोड वाटणार्‍या किंवा लिहायला सोप्या असणार्‍या शब्दांकडे होतो. म्हणून भृशूंडी या आडनावाचा प्रवास …. भुरशूंडी ..भुरशंडी … भुरचंडी असा झाला. (प्रसिध्दी : अमृत : फेब्रुवारी 1989)

    -- गजानन वामनाचार्य
    सोमवार 7 सप्टेंबर 2015.

      April 19, 2016


  • काश्मीर एक जाणीव – भाग दोन

    काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .

      April 30, 2023


  • स्पर्धा परिक्षेतील डोकेबाज प्रश्नोत्तरे

    स्पर्धात्मक परिक्षांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणार्‍या मुलाखत फेरीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अप्रतिम आणि डोकेबाज उत्तरे

      November 21, 2012