वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाहि. जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनालोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपारिक कॉम्पुटर मध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेट वरील साईट आपल्या कॉम्पुटर ला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले. जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाहि. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्पुटर च्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पुटर सुरक्षित राहतो.जावा मध्ये एप्लेट प्रमानेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM
May 23, 2022
वेदकालीन शिल्पकार समाज शोधण्यासाठी वैदिक वाङमयाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. सिंधू संस्कृतीचा कालखंडही साधारण वैदिक काळाच्या जवळपासचाच गृहित धरल्या जातो. त्यामुळे उत्खननातील पुरावेही शिल्पकारांची माहिती पुरवितात परंतु उत्खननातून उपलब्ध झालेली माहिती वैदिक समाजजिवनाचीच आहे, याबाबत निर्णायक मत अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलेले नाही. काही समान तथ्यांचा केवळ आधार घेतला जातो. प्रस्तुत लेखकाने प्रचलीत धारणांचाच आधार घेऊन वेदकालीन विश्वकर्मा समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
February 4, 2026
पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती
July 18, 2011
केळकर संग्रहालय पाहण्यासाठी तास-दोन तासांची सवड काढूनच जावे लागते. तेथे दिवे, अडकित्ते, वस्त्रप्रावरणे, दौती-कलमदाने, दरवाजे, स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने, वाद्ये, शस्त्रास्त्रे, धातूंची भांडी, बैठे खेळ, पेटिंग्ज, कातडी बाहुल्या, लाकडी कोरीवकाम अशा पारंपरिक वस्तूंचा मोठा संग्रह आहे. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून, तेथील पंधरा दालनांमध्ये त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत.
March 19, 2022
२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती.
कालांतराने १९५२ मध्ये प्रभात कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 29, 2017
कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…
December 12, 2017
यानंतर आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या वक्षस्थळा वर विराजमान असणाऱ्या कौस्तुभ रत्नाचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
January 2, 2021
२१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो . अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो.
संपूर्ण जीवशास्त्रामध्ये मान्य झालेला ‘युज इट ऑर लूझ इट’ हा अलिखित कायदाही सर्वसामान्यांनानाही चांगलाच ज्ञात आहे. त्यानुसार आपल्या शरीरातील अवयवबाह्य तसेच अंतर्गतही पुरेपूर वापरात गेला नाही तर हळूहळू दुर्बल होऊ लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होऊन तो विकृत होऊ लागतो. या कारणानेच व आपली संपूर्ण शरीर प्रकृती उत्तम, निकोप राहावी यासाठी नित्य नियमित व्यायामाचे महत्त्व वैद्यकीय, आरोग्यतज्ज्ञ आपणास विशद करतात त्याबद्दल आग्रह करतात. योग्य व नियमित व्यायाम, योगासने, प्राणायामाने आपण खूपच निरोगी राहातो इतकेच नाही तर विकृत झालेले अवयव पण पुन्हा प्राकृत होऊ लागतात असा अनुभव येऊ लागतो. स्थूलता, मधुमेह, हृद्रोग यासारख्या दुर्धर कष्टसाध्य आजारातपण हाच अनुभव घेता येतो. आपला मेंदू हा पण एक अत्यंत महत्त्वाचा अंतर्गत अवयवच आहे. ‘युज इट ऑर लूझ इट’ हा सिद्घांत याबाबत लागू होतो. योग्य, अचूक व्यायामाच्या अभावामुळे मेंदूमधील चेतापेशींची कार्यक्षमता कालांतराने कमी होते व अंतिमत: त्या अकार्यक्षम, निकामी होतात. हे आता शास्त्रसंगत आहे.
अल्झायमर विकारातील चेतातंतूची स्थिती:
अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती व विसराळूपणा येतो. रुग्ण तोच तो प्रश्न विचारत राहतो, नेहमीचा रस्ताही विसरतो. स्थितिज्ञान जाते. हळूहळू भूतकाळ हरवतो. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू र्हासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. प्रतिकारशक्तीही हळूहळू क्षीण होते. बहुधा न्यूमोनियाने या रुग्णाचा अंत होतो.
अल्झायमर रुग्णांचे शवविच्छेदन केले असता पुढील बाबी आढळल्या आहेत: रुग्णाच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी कमी होतात. चेतापेशीच्या बाहेर अपसामान्य प्रथिने असतात आणि चेतापेशींमध्येही या प्रथिनांचे तंतू आढळतात. त्यात ए-६८/टाऊ नावाचे प्रथिन आढळते. हिप्पोकॅंपस व प्रमस्तिष्काचे बाह्यक यांत चेतापेशींचा र्हास जास्त झालेला आढळतो. बाह्यकातील अनेक प्रथिने कमी होतात, तसेच अॅसेटिल कोलीन हा चेताप्रक्षेपक कमी होतो. चेतापेशींच्या र्हासाबरोबरच चेतापेशींपासून निघणार्या अक्षतंतूंभोवती पिष्ठाभर्हास (अॅमिलॉइडर्हास) दिसतो. या र्हासात बीटा-अॅमिलॉइड प्रथिनांचा थर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर व अक्षतंतूंभोवती आढळतो. सामान्य वृद्धांत ही अॅमिलॉइड प्रथिने आढळत नाहीत.
अल्झायमर रोगाचे सुरुवातीस निदान करणे कठिण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चालताना पाय अडखळतात. स्नायूंचा ताठरपणा इतर हालचालींत अडथळा आणतो. वार्धक्य व आनुवंशिकता यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते. चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (एम्.आर्.आय्. - मॅग्नेटिक रेझोनन्स इमेंजिंग) व सी. टी. स्कॅन (कॉम्प्युटरराइज्ड टोमोग्राफी) या तपासण्यांमध्ये मेंदूच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा र्हास दिसतो. पी.ई.टी. (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) चाचणीत मेंदूच्या दोन्ही बाजूंचा र्हास दिसतो.
लक्षणे:
आत्यंतिक भोळेपणा, सहज गोंधळून जाणे, अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहाणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नाविन्याबद्दल अनास्था वाटणे, ताज्या घटनांची विस्मृती होणे, स्वत:च्या विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने वारंवार अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते. अशा अवस्थेमधील रुग्णाची शुश्रुषा करणे किती कठीण असेल याची कल्पनाही येत नाही! एकदा जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे आणि अजून तरी हा रोग असाध्य आहे.
या रोगावर उपचाराचे खास परिणामकारक औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या कुटुंबियांना या रोगाची माहिती देणे आवश्यक असते. अशा रुग्णांची काळजी नीट घ्यावी लागते. हे काम कठिण व धीराचे असते. सध्या तरी टॅक्रीन हे एकच औषध या रोगावर आहे. ते सुरुवातीला दिल्यास रुग्णात परिणाम होऊ शकतो. यासोबत पूरक म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात.
या सर्व क्लेषकारक वर्णनास एक आश्वासक, सुखद किनार अशी आहे की प्रतिबंधक उपचारांनी या आजारापासून बचाव करून राहाणे शक्य आहे व ते उपाय पूर्णत: निर्धोक, सहज अवलंबनीय व विनामूल्य आहेत. म्हणून ते सर्वानी म्हणजे किमान वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींनी आचरणांत आणावेत असे वाटते. नित्य नवे विषय, मुद्दे समजून घेणे, समजलेले स्मरण, चिंतन करणे, दुसऱ्यास समजावून देणे, पाठांतर करणे- याविषयी माझा विशेष, व्यक्तीगत आग्रह आहे कारण भगवत्गीता, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी हे जगमान्य ग्रंथ सहज घरोघरी उपलब्ध असतातच, त्यांचा वापर करता येतो- मित्र परिवारांत गप्पा-टप्पा मारण्यासाठी अवश्य सहभागी होणे. हास्यक्लबमध्ये जाणे, सहलीस जाणे, कोडी सोडविणे, विश्वासू व्यक्तीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करणे असे विविध उपचार करण्याने आपल्या मेंदूमधील संबंधित चेता पेशींना चांगला व्यायाम घडून त्या कार्यक्षम राहतात.
सध्या जगभर माणसाची सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे ८५ वर्षांवरील सु. ५० % वृद्ध अल्झायमरग्रस्त आढळून येतात. विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थांकडून अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : शशिकांत प्रधान kumar vishvkosh, डॉ. रमाकांत गोवंडे - लोकप्रभा
January 6, 2017
कांजिण्या: प्रत्यक्ष लागण झाल्यापासून दहा ते सतरा दिवसांत होणारा हा विषाणूजन्य आजार आपल्या ओळखीचा आहे. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसणारा हा आजार मोठेपणीही होऊ शकतो; पण एकदा होऊन गेला असेल तर सहसा पुन्हा होत नाही. हवेतून, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे किंवा हाताळलेल्या वस्तूंद्वारे विषाणू पसरतात. एखादा दिवस ताप, भूक मंदावणे, सर्दी अशी |लक्षणे दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाण्यासारखे फोड छाती-पोटावर आणि इतरही अंगावर उठू लागतात
April 25, 2023
“पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात..” फुलं साठवणं सोपं असतं, पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही…
August 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti