वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कुणाला अचानक जावे लागते तर कुणी तिकिट काढून बसलेले असतात. आरक्षण झाले आहे. फक्त गाडी यायची आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आलो तसेच जायचे आहे.
February 8, 2022
अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.
शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.
दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
१0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 7, 2017
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात.
August 11, 2023
वाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे..
March 5, 2018
ताणावर उपाय काय?
*अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, वेळेचा अपव्यय टाळा
*ताण आल्यासारखे वाटेल तेव्हा खोल श्वास घ्या
*नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक बाजूला सारून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा
*रोज थोडा वेळ व्यायाम करा
*ताण घालवण्यासाठी थोडा वेळ विनोद किंवा गाणी ऐका
*बागेत फेरफटका मारून या
*मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ गप्पा मागल्यानेही मनावरचा ताण कमी होईल.
या गप्पांत एकमेकांशी तुलना नको.
लक्षणे परीक्षेचा ताण आल्याचे सुचवणारी असू शकतात
*थकवा आल्यासारखे वाटते
*अभ्यासात लक्ष लागत नाही
*सतत मनात नकारात्मक विचार येतात
*केलेला सगळा अभ्यास विसरल्यासारखा वाटतो
*परीक्षेत आपल्याला काहीच आठवणार नाही असे वाटते
*आपण नापास होऊ अशी सारखी चिंता वाटते
*डोके दुखते
*शांत झोप लागत नाही
*लोकांमध्ये मिसळण्यात रस उरत नाही
*एकटे राहावेसे वाटते.
अभ्यासाच्या काळात किंवा परीक्षा काळात हे शक्यतो टाळाच
*रात्री उशिरापर्यंत जागरण
*जागरणासाठी अतिरिक्त
चहा-कॉफीचे सेवन
*सामोसा, वडा असे तेलकट आणि मसालेदार पदार्थ
*पावासारखे बेकरीचे पदार्थ
*खूप वेळ टीव्ही पाहणे
*खूप मोठय़ा आवाजात गाणी ऐकणे
*मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर गेम्स खेळणे
का येतो?
*पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी अशा अनेकांच्या अपेक्षांचे ओझे
*‘पीअर ग्रुप प्रेशर’ म्हणजे समवयस्कांचा/ मित्रमैत्रिणींचा प्रभाव
*‘करिअर’चा ‘टर्निग पॉइंट’चे वर्ष असल्याची जाणीव
*आत्मविश्वासाची कमतरता
*न्यूनगंड बाळगणे
*सततची तुलना
-- दीपक गायकवाड
March 15, 2017
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
December 20, 2016
एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर जोपर्यंत जहाजावर नोकरी करायची आहे तोपर्यंत जहाजावर आणि घरी असताना सुध्दा कोर्सेस करावे लागतील याची फारशी कल्पना नव्हती.
October 16, 2019
महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.
April 7, 2016
मुरेल बेकचा जन्म ८ जून १९१८ रोजी लंडन येथे ज्यू कुटुंबात झाला.त्यांचे कुटुंब १९२३ ला विसबेडन जर्मनी येथे स्थायिक झाले व तिथून ते १९२६ मध्ये फ्रांस येथे गेले.तिचे शिक्षण फ्रांस मध्येच झाले. १९३५ मध्ये तिने लिली विश्वविद्यालयात दाखला घेतला. १९३६ ते १९३८ मध्ये तिने एका कंपनीत सचिव म्हणून काम केले. त्याच बरोबर १९३७ मध्ये गेट थिएटर मध्ये सहायक स्टेज मॅनेजर म्हणूनही काम केले.दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिने रेड क्रॉसमध्ये दाखला घेतला. १९४१ ला ती टोऱ्कयू येथे गेली व असिस्टंट क्लार्क व वॉर्डन चे काम पाहू लागली. १९४२ मध्ये ती वुमन एअर फोर्स मध्ये गेली आणि ड्यूटी क्लार्क चे काम पाहू लागली. नंतर तिचे प्रमोशन सेक्शन ऑफिसर म्हणून झाले.
तिचे फ्रेंच उत्तम होते म्हणून तिला स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव गुप्तहेर संघटनेत १९४३ मध्ये दाखल करून घेण्यात आले.सप्टेंबर १९४३ मध्ये तिचे सूरी येथे प्रशिक्षण सुरू झाले. पुढे तिचे para-military फोर्सचे शिक्षण सुरू झाले. व पुढे वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण घेतले. एसओई मध्ये तिला गुप्तहेरीचे काम देण्यात आले.गुप्तहेराचे सर्व आवश्यक गुण तिच्यात होते. ८ एप्रिल १९४४ रोजी तिला पॅरॅशूटने फ्रांस मध्ये उतरवण्यात आले. तिचे कोडनाव व्हायोलेट ठेवण्यात आले. तिने सालब्रासिस येथे सुरक्षित घर मिळवले. तिने ट्रान्समिशन यंत्र गेरेजच्या शेड मागे लपवले जेथे जर्मन जीप व ट्रक दुरुस्ती साठी येत असत.तिथे तिला संशयित जर्मन सैनिक दिसले . तिने यंत्र दुसरीकडे हलवले.ती पर्शियन सेक्रेटरी बनली. तिथून ती एका लोहाराच्या घरी राहू लागली. खूप वेळ काम केल्यामुळे तिला ताण आला व ती बेशुद्ध झाली. तिला तातडीची वैद्यकीय गरज होती तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिथे meningitis चे निदान झाले व तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले,पण प्रत्येक हॉस्पिटलवर जर्मनांचा पहारा होता. तिला नन्स द्वारा चलवणाऱ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही २५ मे १९४५ रोजी वयाच्या 27 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
December 27, 2022

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात.
December 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti