वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
समोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भ्रर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहचण्यास बर्फाच्या पायऱ्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थपणे १० मिनिटे उभा होतो. मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच.
May 23, 2019
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार यांनी लिहिलेला हा लेख
महाराष्ट्रात श्री विठ्ठल भक्तीच्या स्नेहाने चंद्रभागेत सुस्नात होऊन जीवन कृतार्थ करण्याचा राजमार्ग दाखविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणून गौरविलेले संतश्रेष्ठ म्हणजे तुकाराम महाराज होत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा वैचारिक पाया ज्ञानेशांनी घातला. अनुभवामृत, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी उत्तुंग असे चिविलासाचे व प्रेमबोधाचे तत्त्वचिंतन पुरविले. नामदेवांनी आपल्या स्कंधावर भगवी पताका घेऊन पंढरपूर ते पंजाबपर्यंत 'नाचू किर्तनाचे रंगी | ज्ञानदिप लावू जगी ।।' म्हणत अध्यात्माचा रंग उधळला. एकनाथ महाराजांनी बहुजन समाजास समजेल अशा सुबोध वाणीत भागवत, रामायण कथा बरोबरच भारुडे, गवळणी इत्यादी कवने रचून लोकरंजन करीत करीत भक्तिप्रेमाचे गोड घास चारले. त्यानंतर संत तुकाराम अवतरले. त्यांनी वारकरी संप्रदायाची देवता 'श्री विठ्ठल' यांचा सगुण व निर्गुण दोन्ही रूपांचा साक्षात्कार केवळ एका नामस्मरण, भजन, किर्तन या मार्गानेच जाऊन घेतला. त्यांच्या मुखातून स्त्रवलेल्या अमृतरुपी अभंगवाणीने लोकमानसाच्या हृदयात भक्ती प्रेमाचा अनमोल ठेवा निर्माण केला.
संत तुकाराम महाराजांच्या प्रापंचिक जीवनाच्या अनेक कथा-व्यथा होत्या. जीवाभावाच्या माणसांचं निधन, दुष्काळाचे थैमान, अठरा विश्व दारिद्र्य, दुसऱ्या पत्नीने सतत केलेली अवहेलना, आयुष्यात उभी राहिलेली आव्हाने, पणाला लावलेली जिद्द, कर्तव्यबुद्धी, मनाचे मालिन्य काढून टाकण्यासाठी आत्मशोधावर केंद्रीत झालेले लक्ष्य. त्यातून दिसणारे हाती लागणारे सत्य, परमेश्वराकडे परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू झालेली अलौकिक वाटचाल हे सगळे भाव त्यांच्या अभंगातून व्यक्त होत राहतात. संसाराचा गाडा ओढताना ऐहिकाकडून सुरू झालेली वाटचाल अगदी सहज अलौकिकाकडे जाऊन पोहोचते.
देहू येथील मोऱ्यांच्या कुळात, सधन व धर्मनिष्ठ आंबिले घराण्यात तुकारामांचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अंगावर पडलेला दुकानदारीचा व्यवसाय आणि दोन बायकांचा संसार ही गृहस्थाश्रमाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडण्यामध्ये तुकारामांच्या वयाची सतरा वर्षे सुरवात व समाधानात गेली, पण त्यांना तर दुष्काळामध्ये झालेले प्रियजनाचे मृत्यू, व्यापारात झालेला तोटा, संसारात सततची आपत्ती यामुळे प्रपंचाला वैतागलेल्या संत तुकाराम महाराजांनी भक्तीमार्गाची कास धरली. दुष्काळाने हैदोस घातला. घरात अन्नाचा दाणा नाही. संत तुकाराम महाराजांची पहिली बायको गेली, आई गेली, मुलगा गेला, सावजीची बायको गेली, सावजीगृहत्याग करून निघून गेला. जिजाबाई भरपूर वैतागली. ती संत तुकारामांना अपमानीत करू लागली, बोलू लागली. पण संत तुकारामांच्या मनी मानसी विठ्ठलाचा छंद लागल्यामुळे ते देवाला म्हणाले - देवा नको हा प्रपंच. मी आता फक्त तुझाच होईन. वैतागून त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते म्हणाले,
'पोर मेली बरे झाले । देवे मायाविरहित केले ।
माता मेली मज देखता । तुका म्हणे हरी चिंता ।।
'संत तुकारामांच्या सडेताड आत्मनिवेदनाने मन थक्क होते.
ज्ञानदेवांनी भागवत (वारकरी संप्रदायातून सुरू केलेली 'विठ्ठल भक्ती' व 'पंढरीची वारी', संत तुकारामांनी घातलेल्या सकस खत-पाण्याने आणखी तेजस्वी व दृढ झाली. ज्ञानदेवांप्रमाणेच संत तुकारामांचीही विठ्ठल भक्तीची वडीलार्जित मिरास होती. आठ पिढ्यांची विठ्ठल भक्ती, एकादशीचा उपवास व पारणे यांचा 'दारवंटा' म्हणजे नियम होता आणि पंढरीची वारी हे फार मोठे पूर्व संचित होते.
'पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ।।१।।
व्रत एकादशी करीन उपवासी ।
गाईन अहर्निशी मुखी नाम ||२||
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतीचे तुका म्हणे ||३||
संत तुकारामांसाठी "विठ्ठल' हे गुरु तर 'पंढरी' हे माहेर होते. संवेदनशील अंतःकरणाच्या संत तुकाराम महाराजांना व्यक्तिगत जीवनात, जीवघेण्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. त्यातून त्यांना जाणवले की, जीवन हे नश्वर आहे. 'जन हे दिल्या घेतल्याचे ।' हे सत्य वास्तवात अनुभवल्यामुळे ते प्रपंचातून एकांतात गेले. त्यातून पंढरी-चंद्रभागा-पुंडलिक व विठ्ठलाचे वडिलोपार्जित नाते आणखी घट्ट झाले.
'माझ्या वडिलांची गा मिरासी गा देवा ।
तुझी चरणसेवा पांडुरंगा ||१||
उपवास पारणी राखिला दरवंटा ।
केला भोगवटा आम्हालागी ।।
संत तुकारामांनी ईश्वर भक्तीचा मार्ग अंगिकारला. आपण स्विकारलेला आत्मानुभवाचा मार्ग म्हणजे सतीचे वाण आहे याची जाणीव त्यांना होतीच. रात्रंदिवस स्वतःच्या मनाशी व बाह्य जगाशी खऱ्या ध्येय निष्ठेने ते झगडले. एक क्षणभरही गाफील न राहता मन काबूत आणण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. परमार्थ साधनेत गुरुपदेश आवश्यक असतो. तो संत तुकाराम महाराजांना स्वप्नातच लाभला. ज्ञानदेवांवर निवृत्तीनाथांचे कृपाछत्र होते. एकनाथांवरही जनार्दन स्वामींच्या मायेची पाखर होती. पण संत तुकाराम महाराजांना कोणाही थोर पुरुषाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अखेरपर्यंत स्वतःवरच त्यांना विसंबून राहावे लागले. वेळोवेळी निराशेचे प्रसंग येत. 'प्रपंच आणि परमार्थ' हे दोन्ही गमावून शेवटी जगात आपले हसे तर होणार नाही ना, अशी कधी धास्ती वाटे. पण या साऱ्या दिव्यातून ते सही सलामत पार पडले आणि केवळ निश्चयाच्या बळावर 'कासया उदास असो देहावरी । अमृतसागरी बुडोनिया ।।' अशा जीवनमुक्त दशेला पोहोचले.
तुकोबांच्या पारमार्थिक जीवनात त्यांनी पूर्णपणे देवाची शरणागती पत्करल्यावर भामगिरीवर जाऊन देवांच्या नामस्मरणाचीच तपश्चर्या केली. ज्ञानेशादि पूर्व सूरींवर त्यांची अनन्य भक्ती होती आणि त्या संतांनी सांगितलेल्या हरिनाम स्मरणाच्या मार्गानेच ते चालू लागले. नामाने सर्व साध्य होते ही त्यांची निष्ठा होती. 'न भेटे ते भेटो येईल ते उगले । नामे या विठ्ठले एकाचिया । न कळे ते कळो येईल उगले । नाम या विठ्ठल एका चिया ।।' अशी त्यांची संतवचनावर आत्यंतिक दृढ श्रद्धा होती. त्यामुळे भामगिरीवर नामानेच त्यांना विठ्ठलाचा निर्गुण साक्षात्कार झाला व तो अंतःकरणी पचवून सगुण भक्तीत रंगले. संत वचनावर विश्वास ठेवून इतर साधनांच्या कडे गेले नाहीत. इतर साधने म्हणजे ते छांदिष्टपणाचेच होते. 'तुका म्हणे छंद आम्हा वासा निंद्य ।' असे म्हणाले. निर्गुण साक्षात्कारानंतर सद्गुरु स्वप्नी भेटले त्यांनी आवडता मंत्र- वारकरी संप्रदायाचा 'रामकृण हरी' हाच सांगितला. यानंतर संत नामदेव, श्री. पांडुरंग यांची स्वप्नी भेट झाली. 'नामदेव केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येवोनिया ।।' सांगितलेले काम करावे कवित्व । वाऊगे निमित्य बोलो नको ।।' ही देवाची भेट झाल्यानंतर त्यांची सर्व अभंग रचना निर्माण झाली आहे.
मायेचे भाषिक अस्तित्व मान्य करूनही संत तुकाराम महाराजांनी 'ब्रह्मवादा'चा अद्वैत सिद्धान्त अनुभवांती उचलून धरला होता. 'सरते माझे तुझे। तरी हे उतरते ओझे ।। न लगे सांडावे मांडावे । आहे शुद्धाचे स्वभावे ।।’ द्वैत भावामुळे मायेचे ओझे जीवाला सांभाळावे लागते. काल्पनिक मायाजाल दूर झाले की, 'ब्रह्मतत्त्व' सत स्वरूपात शुद्ध रूपात जीव स्वतःमध्येच अनुभवू शकतो. त्याकरिता 'सांडावे-मांडावे' असे काही करावे लागत नाही. 'तुका म्हणे चेता । होणे ते तूंच आइता ।।' जीव माया मोहाच्या निद्रेतून जागा झाला की, चैतन्य रूपात आयता स्वतः सिद्धपणे विलसू लागतो. हीच तुकोबांना जाणवलेली 'अद्वैत दृष्टी' होय. ज्ञानेश्वरी परंपरेने तुकारामांपर्यंत आलेला 'ब्रह्मवाद' तो हाच. पारिभाषिक शब्दांचे अवडंबर न माजविता संत तुकाराम महाराज स्वतःला जाणवलेले सत्य बोल भाव भाषेत सोपे करून सांगतात, त्याचे हे एक उदाहरण आहे. 'आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू । शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोका । तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्दे चि गौरव पूजा करू ।।' शब्द हेच मौल्यवान धन, शब्द हेच शस्त्र, शब्द हे जीवन सर्वस्व, शब्द हाच देव, शब्द हेच पूजा द्रव्य, अशी ही तुकारामांची निखळ शब्द निष्ठा आहे. पण तुकारामही महाराजांची अक्षरसाधना देवासाठी आहे. केली आटा आटी अक्षरांची देवा साठी विश्वंभवराची पूजा हे या शब्दाचे ध्येय आहे. 'शब्दाचि रत्ने करुनि अलंकार । तेणे विश्वंभर पूजियेला ।' या पूजनाबरोबरच 'आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी ।' 'उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ।', 'बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणवुनि ।' या प्रकारच्या धर्मरक्षणासाठी आणि लोकरक्षणासाठीही या संत कवीने आपले शब्द भांडार उधळले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून विठ्ठलभक्तीचे विविध आविष्कार व्यक्त होतात. सगुण निर्गुणातील सीमारेषेपलीकडील वारकऱ्यांची अद्वैतानुभवाची भक्ती, संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व्यक्त होते. वारकऱ्याची संकल्पना संत तुकाराम महाराज निश्चित करतात. जे सदैव पंढरी पाहतात, पदोपदी वाचेने 'विठ्ठल' म्हणतात, सर्वसंसार सोडून प्रेमभराने वाळवंटी नाचतात, कपाळी गोपीचंदन लावतात, गळ्यात तुळशीच्या माळा घालतात, ते 'पंढरीचे वारकरी होत. असे वारकरी विठ्ठलभक्ती करणे पसंत करतात. कारण या भक्तीपुढे धनसंपदा, मुक्ती देखील गौण आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत असणारी मुक्तीची संकल्पना त्याज्य मानून, 'तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।' अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतात. कारण विठ्ठलाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ व जन्माचे सार्थक करणारी आहे, याची संत तुकाराम महाराजांना खात्री झाली होती.
संत तुकाराम महाराज हे शूद्र असल्यामुळे त्यांना हे वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. तेव्हा त्यांनी संत वचनाच्या श्रवणाने, वाचनाने व मननानेच विचारधन जोडले आणि अनुभवाच्या आगीतून तावून सुलाखून घेतले. या दृष्टीने त्यांचे मोठेपण हे स्वयंनिर्मित आहे आणि म्हणूनच त्यांच्या ठिकाणी 'धन्य म्हणवीन येह लोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।' असा जबर आत्मविश्वास निर्माण होऊ शकला. संत तुकाराम महाराज म्हणजे सात्विकतेची मूर्ती, दया क्षमा शांतीचा पुतळा. व्यवहार पराङ्गमुखतेची परिसीमा अशी सार्वत्रिक समजूत आहे. त्यांच बाह्य वेषावरून त्यांच्यावर भोळसटपणाचाही छाप कायमचा बसला आहे. परंतु तुकारामांचा जीवनक्रम पाहिला, वाङ्मय तपासले तर त्यात भाबडेपणाचा किंवा एककल्ली पणाचा लेशही नाही याबद्दल ताबडतोब खात्री पटते. 'वेष धरावा बावळा । अंतरी नाना कळा हे समर्थ वचन संत तुकोबांना तरी तंतोतंत लागू पडते.
समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दिव्य अलौकिक भेटी. विठ्ठलाच्या भेटीसाठी आर्त झालेले मन, इंद्रायणीतून कोरडी निघालेली गाथा, समाजाची कथा आणि तुकोबांची व्यथा, साडेचार हजार अमृताचे रूप लाभलेली अभंग संपदा, तुका सदेहची वैकुंठासी जाणे. 'आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा ।' इतक्या धिरोदात्तपणे जगाचा निरोप घेणे हे अलौकिक कार्य संत तुकाराम महाराजांनी या भूलोकी करून दाखविले. म्हणूनच जनता जनार्दनाच्या मुखातून नामोचार झाला 'तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा.
-प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
September 11, 2022
मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे सहाय्य, तसेच इतरही मार्गातून पैसे मिळत असताना पाच लाख रुपयाच्या थेट प्रक्षेपणासाठी सरकारची पुन्हा मनधरणी करणे योग्य आहे का?
March 15, 2015
वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो. या आसनं मुळे नेहमीच वजन कमी करण्यात मदत होत असते. ही आसने करताना योगशिक्षकांची मार्गदर्शन घेऊनच करावीत.
वक्रासन
पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा. दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा. श्वाचस घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्व सन संथ चालू ठेवा.
फायदे
आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो. त्यामुळे पाठीचा कणाही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो. त्याच्या अगदी नेमकी उलट अवस्था या आसनात होते. त्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला या आसनाचा निश्चिलत उपयोग होतो. पोटाचे, मांड्यांचे, पोटर्यां चे स्नायू कार्यक्षम होतात.
दक्षता
पाठीच्या कण्याचे विकार असणार्याक रुग्णांनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करू नये.
भुजंगासान
जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा. दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या. हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत. एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात. आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा. लक्षात ठेवा: तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यात पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.
लक्षात ठेवा: तुमचे कान तुमच्या खांद्यांपासून दूर आहेत का? खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.
तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा. आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या.
श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.
फायदा:- खांदा व मानेला मोकळे करते. पोट पुष्ट करते. संपूर्ण पाठ व खांदे सशक्त बनवते. पाठीच्या मधल्या व वरील भागांना लवचिक बनवते. छाती विस्तारते. रक्ताभिसरण सुधारते. थकवा व तणाव कमी करते. श्वसनमार्गाचे विकार जसे दमा असलेल्या लोकांना फारच उपयुक्त. (परंतू खोकल्याची उबळ आली असता हे आसन करू नये).
भुजंगासन केंव्हा करू नये
गरोदरपणात, छातीचे अथवा मनगटाचे हाड मोडल्यास, किंवा नुकतीच एखादी पोटाची शस्त्रक्रिया, जशी हर्निया, झाली असल्यास हे आसन करू नये. तुम्हाला कार्पेल टनेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर भुजंगासन करू नका. जुन्या आजारात किंवा पाठीच्या कण्याच्या विकारात हे आसन फक्त योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
धनुरासन
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात.
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. पाठीला किंवा कण्याला गंभीर विकार झाले असतील तर हे आसन करू नये. अल्सर, कोलायटीससारखे पोटांचे विकार असलेल्यांनी हे आसन टाळावं. छातीवर झोपावं. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत आणि सहा ते सात इंच एकमेकांपासून दूर करावेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोटयाजवळ पकडावं. आता श्वास घ्यावा आणि हातांनी पाय व पायांनी हात ओढून वर उचला. संपूर्ण शरीर वर उचला आणि ताणलं जाऊ द्या.
पाय वर उचलताना पोटऱ्या मांडयापासून लांब नेण्याचा प्रयत्न करा. शरीराची आकृती ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत किमान १० ते ३० सेकंद राहा. श्वास संथगतीने सुरू राहू द्या.
या स्थितीत असताना हाताची पकड जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच शरीराचा सगळा भार पोटावर येईल. पूर्वावस्थेत येताना, श्वास सोडत सोडत, गुडघे, खांदे, हनुवटी हळूहळू जमिनीवर टेकवा. गुडघ्यात पाय हळूहळू सरळ करा, गुडघे सरळ केल्यावर पूर्वस्थितीला या. थोडया वेळ शरीर शिथिल करा.
फायदा:- या आसनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. तसंच पाठीचा मणका विशेषत: कुठल्याही दिनचर्येच्या कामात धनुष्याप्रमाणे असा ताणला जात नाही, तो या आसनामुळे ताणला जातो. म्हणून मणक्याची गादी सरकणं, मणके झिजणं आणि कमरेचे स्नायू जखडणं या व्याधींवर अत्यंत लाभदायी म्हणजे हा आसन प्रकार आहे.
पश्चिमोत्तानासन
पश्चिम या शब्दाचा अर्थ पाठीकडची बाजू असाही होतो. या आसनात पायाच्या घोट्यापासून मस्तकापर्यंतचा पाठीचा भाग ताणला जातो. म्हणून याला ‘पश्चिमोत्तानासन’ असं सार्थ नाव दिलेलं आहे.
सपाट जमिनीवर पाय पसरून बसावं. पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवावेत. मान सरळ आणि समोर असावी. कमरेत वाकून हात पावलांकडे न्यावेत. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे.
कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे. संथ श्वास चालू ठेवावा.
थोडा वेळ याच स्थितीत बसावं. हळूहळू हाताची पकड सोडत पूर्वस्थितीत यावं.
फायदे
शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात. खुरटलेली उंची वाढवण्यास या आसनाचा उपयोग होतो.
पोटावर, विशेषत: ओटीपोटावर घनदाब निर्माण झाल्याने तेथील मेद कमी होतो. तरुण वयात निर्माण होणारे वीर्यदोष व तरुण स्त्रियांना जाणवणारा मासिक पाळीच्या अतिरिक्त स्त्रावाचा त्रास या आसनाच्या सरावानं नाहीसा होतो. सायटिका, पाठीची व कमरेची इतर दुखणी या आसनाच्या योग्य व नित्य अभ्यासाने दूर होतात. पचनक्षमता सुधारते.
चक्कीभ चलनासन
योगचं हे आसन पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते. पहिल्यांदा जमीनवर तुम्ही आरामत बसा, या दरम्यान तुमचे पाय सरळ पसरवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून असले पाहिजेत, याचं भान ठेवा आणि गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात फिरवा. दहा वेळेस या आसनाला घड्याळ्याच्या दिशेने फिरवा आणि काही वेळाने घड्याळ्याच्या विरूद्ध दिशेने फिरवा, आणि नंतर सोडून द्या.'
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 23, 2016
ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते.
June 23, 2020
‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो.
August 21, 2019
हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच "पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड".
ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.
पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा.
पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)पोटात जळजळ,घसा कोरडा पडणे,हात,पाय,डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.
२)चालल्यावर थकवा येणे,पोटऱ्या दुखणे,घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.
३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.
४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.
५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा.
पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
श्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?!
August 25, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 12
वस्त्र अलंकार झाल्यावर तिलक धारण केला जातो. देवाला भ्रूमध्य स्थानी चंदनतिलक केला जातो.भ्रूमध्य हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. या चक्राला तिलक लावणे म्हणजे आज्ञाचक्राला संरक्षण देणे होय. जणुकाही फिल्टरच ! जे योग्य असतील तेवढीच सकारात्मक स्पंदने आत पाठवणे आणि नको असतील ती नकारात्मक स्पंदने बाहेर ठेवणे, अशी दोन कामे हा मंगल तिलक करत असतो. दक्षिण भारतात तर तिलक लावल्याशिवाय पुरूषदेखील घराबाहेर पडत नाहीत.
उगाळलेले चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, केशर, कुंकू, हळद, गोपीचंदन इ. लेप या आज्ञाचक्रावर लावले जातात. देवतांना चंदनतिलक लावताना अनामिकेने, म्हणजे करंगळीजवळच्या मरंगळीने लावावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला लावताना मधल्या बोटाने भ्रूमध्यावर लावावे.
भ्रूमध्य हेच स्थान आत्म्याचे स्थान सांगितले जाते. म्हणजे इथे लावलेले लेप ही एक प्रकारची प्रत्यक्ष स्वपूजा किंवा आत्मपूजाच आहे.
मी हिंदु आहे, हे न सांगताच समजले पाहिजे, हे ओळखण्यासाठी हा तिलक काम करत असतो. इतर कोणत्याही धर्मात असा मंगल तिलक दररोज लावला जात नाही. पण आज सर्व धर्मसमभावाच्या गोंडस संस्कारांनी, "मी हिंदु आहे" असे अभिमानाने सांगायची पण लाज वाटू लागली आहे.
भारतीय सौभाग्यवती महिलांचे "मांग मे सिंदूर भरना" अगदी अनिवार्यच असते. आता तर सिरीयल्स पाहून महाराष्ट्रीयन भगिनीदेखील मांग मे सिंदूर भरने लगी है ।
प्रश्न नवयुवतींचा आणि समस्त पुरूष वर्गाचा आहे. पुरूषांना कपाळी केशरी गंध आणि महिलांना हळदीकुंकु लावणे म्हणजे मागासलेपणाचे आणि बुरसटपणाचे वाटते. काही वर्षांपूर्वी टिकली तर टिकली होती, आता तीपण टिकत नाही. त्याचे शास्त्र आणि त्यामागील भारतीय दृष्टीकोन वेळीच न समजल्याचे हे दुष्परिणाम आहेत. आता तरी जागे होऊया. संस्कृतीचे पालन करूया.
देवासाठी "चंदनं समर्पयामी" आणि देवीसाठी "हरिद्राकुंकुमम् सौभाग्यद्रव्यम समर्पयामी" हे जसे सांगितले आहे तसेच आपल्या देहासाठीदेखील आहे, हे दोघांनीही लक्षात ठेवूया. पालकांनी आपली थोडी कडक भूमिका आपल्या घरातील देव आणि देवींना, समजावून सांगितली तर षटचक्र दूषित झाल्यामुळे बिघडलेले काम क्रोध आदि रिपु सहजपणे जिंकता येतील.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.06.2017
June 5, 2017
‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.
November 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti