(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोवा मुक्तीदिनाची सुरुवात

    १९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता.

      June 18, 2022


  • आँधी  चित्रपट

    आँधी चित्रपट

    ” आंधी” चित्रपट भारतभर व मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये गर्दीत सुरु असतानाच देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली, त्यात या चित्रपटांवर बंदी आणली गेली. हा बहुचर्चित चित्रपट काही महिन्यांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला आणि मग पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. संजीव कुमार व सुचित्रा सेन यांचे यातील काम अप्रतिम. कोशीश आणि आंधी सारखे खास चित्रपट गुलझार यांनी संजीव कुमार यांना करण्यास दिले, आणि दोन्ही चित्रपटा साठी संजीव कुमार यांनी बेस्ट कलाकाराची बक्षीसे मिळवली. आंधी हा चित्रपट म्हणून तर अप्रतिम आहेच पण यात आहेत आर डी बर्मन यांची गाणी. ” आंधी ” चित्रपट म्हणजे राजकारणाच्या पाश्वभूमीवरील संवेदनशील प्रेम कथा. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. जे के (संजीव कुमार) हा हॉटेल मॅनेजर असतो, त्याच्या प्रेमात आरती (सुचित्रा सेन) ही एका राजकीय पुढाऱ्याची मुलगी पडते. लग्नानंतर काही वर्षांनी काही अपरिहार्य कारणांमुळे आरती राजकारणात प्रवेश करते. कालांतरानं आरतीची आरती देवी होते. जे के आणि आरती देवी दोघं एकमेकांपासून वेगळे होतात. अनेक वर्षांनी पुन्हा दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा दोघांना जाणवतं की एकमेकांवरचं प्रेम अजूनही तेवढंच आहे. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ.
    या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाद देखील थेट हृदयाला भिडणारे आहेत. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस् आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो 'थोडा पतला हो गया हुं'. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते.

    ह्या चित्रपटातील ३ गाणी मंत्रमुग्ध करून टाकतात.

    https://www.youtube.com/watch?v=9ezj1yuRmIc

    १) तुम आ गये हो नूर आ गया हैं
    २) इस मोड से जाते हैं
    ३) तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं

    https://www.youtube.com/watch?v=wBYMGrThxkI

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      February 14, 2022


  • बॉम्बे’ ते मुंबई – २६ वर्षे

    ४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.

      May 5, 2021


  • जागतिक कुस्ती दिवस

    कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते.

      May 23, 2022


  • जागतिक टपाल दिन

    भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय.

      October 9, 2021


  • वाऱ्यावरची वरात’ नाटकाची ४९ वर्षे

    हे नाटक माहिती नसलेला मराठी रसिक विरळाच. आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगीतकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे.यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक.

      September 16, 2021


  • जागतिक छायाचित्रण दिन

    चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत.

      August 19, 2021


  • दैनिक नवाकाळचा स्थापना दिवस

    नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले.

      March 7, 2022


  • सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग

    नाटकाचा विषय असलेला बाइंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाइंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो ‘खरा’ होता, म्हणून.

      March 10, 2022


  • मुंबई अग्निशमन दलाचा वाढदिवस

    हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.

      April 1, 2022