खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे हे सर्व वारे आपण भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील रिकाम्या जागा भरण्यापुरतेच राहिल्याने हवा का बदलते याची उत्तरे अनुत्तरित राहतात.
June 15, 2021
काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची तितकीची गुंतागुंतीची पण प्रभावी पटकथा मॅक्लिननेच लिहिली आहे. या संपूर्ण चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. बर्फाच्छादित आल्प्सपर्वताची. जर्मनीचा बवेरिया प्रांत व ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्समध्ये खूप उंचावर असलेल्या श्लॉक अटलर या एका किल्ल्यात यातले बहुतांश कथानक आकार घेते.
December 4, 2021
मनमोहन देसाईं यांनी या चित्रपटात आपला लाॅस्ट ॲण्ड फाऊंड हाच हुकमी फाॅर्मुला वापरला. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई पित्यासह भेटतात, आणि ते खलनायकाचा निप्पातही करतात. ही त्यांची हुकमी थीम या चित्रपटात सर्वधर्मसमभाव पध्दतीने मांडली. या चित्रपटातील तीन भाऊ एकाच वेळेस आपल्या आईला रक्तदान करतात असाही एक हास्यास्पद प्रसंग या चित्रपटात आहे. पण प्रेक्षकांना तेही आवडले.
May 27, 2022
हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता.
June 18, 2022
एखाद्या महिलेचा अभियांत्रिकी दृष्टिकोन चांगला असेल तर तिच्याकडे तुम्हाला कलिंगड किंवा पपईसारखं मोठ्ठ फळ कापण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त लांब पाते असलेली सुरी आढळेल. तसंच त्या सुगृहिणीकडे तुम्हाला पिझ्झा किंवा तत्सम पदार्थ कापण्यासाठी गोल पातं असलेली सुरी आढळेल…
May 15, 2023
टिळक,आगरकर वगैरे प्रभृतींनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी विद्यार्थ्यांना एतद्देशीय पध्दतीने शिक्षण देता यावे म्हणून पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
October 24, 2021
अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.
October 16, 2021
फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत.
May 23, 2023
१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.
January 5, 2019
नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो.
May 11, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti