Articles by sachingadkari
जागतिक अन्न सुरक्षा दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान७ जून २०१९ रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे.
रशियन टेनिस स्टार अॅना कुर्निकोव्हा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअॅना कुर्निकोव्हाची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच तिचे लाखो चाहते आहेत. एकही सिंगल्स किताब जिंकू न शकलेली अॅना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत होती. अर्थात डबल्सची दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत.
अमेरिकी गायक, अभिनेता व हास्य अभिनेता डीन मार्टिन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडीन मार्टिन हे एक प्रसिद्ध अमेरिकी गायक, अभिनेता व हास्य अभिनेता होते. डीन मार्टिन यांना “द किंग ऑफ कूल” असेही म्हणत असत.
कभी कभी’… असंच कधीतरी, काहीबाही !
Category:
साहित्य - ललितसोलापूरच्या उमा चित्रगृहाच्या बाहेर भलं थोरलं पोस्टर ! “जंजीर ” आणि “दिवार ” मधील अंगार ओकणारा अमिताभ वेगळ्याच वेशभूषेत ! त्याने घातले होते, त्याला ” पॉलीनेक ” म्हणतात हे कालांतराने वालचंदला असताना समजले. हिंदी चित्रपटसृष्टीतील यच्चयावत “हूज हू ” मंडळी एका पडद्यावर !
अटॅचमेन्ट
Category:
साहित्य - ललितलहानपणी मांडव्याला गेल्यावर मांडवा ते रेवस रस्त्यावर सारळ पूला पर्यंत सायकल घेऊन फिरायला खूप मजा यायची. मांडवा जेट्टी आणि किनाऱ्यावर सायकल घेऊन तासन तास फिरताना कोणीच अडवायचे नाही. रस्त्यावर तेव्हा फारशी रहदारी नसल्याने सायकल दोन्ही हात सोडून चालवणे, उतरण असलेल्या रस्त्यावर हॅन्डलवर हाता ऐवजी दोन्ही पाय ठेवून चालवणे अशा करामती केल्या जायच्या.
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले. काही वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली. गोविंदराव टेंबे उत्कृष्ठ टेनिसपटु होते व त्यानी सर्कसचे मॅनेजर म्हणूनहि काम केले होते!
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १४)
Category:
साहित्य - ललितही सगळीच माणसे सर्वार्थांनच धार्मिक ! साहित्यिक ! राजकीय ! सामाजिक ! न्यायिक ! शैक्षणिक ! उद्योजक ! बैंकिंग !
अशा क्षेत्रातील मोठ्ठी ! विद्वान ! उच्च पदस्थ असून किती निर्मोही होती !… किती सन्यस्त वृत्तिची होती !…. किती लाघवी आणी अत्यंत साधी रहाणीमान असणारी होती !… किती परोपकारी होती…याची आज प्रकर्षाने जाणीव होते ..अशा आदर्श व्यक्ती आज खुपच दुर्मिळ झाल्या आहेत. हे मात्र खरे . यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला..हे माझे पूर्वकर्म …एवढेच मी म्हणेन !
चिऊताई, चिऊताई
Category:
कथा साहित्य - ललितगेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चिऊताईच्या घरट्यासमोर कोरोना नावाचा परदेशी कावळा येऊन उभा राहिला. आपल्या बाळांच्या जीवाला आता धोका आहे, हे समजून चिऊताई घाबरुन गेली. कावळा बाहेरुन चिऊताईला सारखा ‘दार उघड, दार उघड’ म्हणून सतावत राहिला. त्याचा असा समज झाला की, मागील गोप्टीप्रमाणे चिऊताई बाळांना आंघोळ घालेल, पावडर, काजळ लावेल आणि नंतर दार उघडेल…पण तसं घडलं नाही…
विश्वचषकातील पहिला सामना – ७ जून १९७५
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान७ जून १९७५ रोजी पहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स येथे सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला. ७ जून ते २१ जून १९७५ दरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या मालिकेला मुळात नाव ‘प्रुडेन्शियल कप’ असे देण्यात आले होते. या पहिल्यावहिल्या विश्वचषकात केवळ आठ संघांचा समावेश होता.