पत सांभाळण्या तीर मारिला (सुमंत उवाच – १०७)
Category:
साहित्य - ललितदिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला.