नाहीच जमलं रे

नाहीच जमलं रे
तुला हलकेच विसरायला
भाव मनातला हळवा
खोडून मिटून टाकायला
नाहीच जमलं रे
मिठीतल्या भावनेला खोडायला
मोह तुझ्या गोड मिठीचा
नाहीच जमला पुसायला
नाहीच जमलं रे
तुझ्यात गुंतून बाहेर यायला
ओढ तुझी अलवार
तुझा विरह अबोल मिटायला
नाहीच जमलं रे
तुझ्यासारखे मला तोडायला
गुंतून गेले तुझ्यात
आल्हाद तुझ्या जाणिवा तुटायला
नाहीच जमलं रे
तुझी आठवण पुसायला
विसरुन जावे कसे भाव
तुझ्यात मोहरल्या भावना
नाहीच जमलं रे
मला दूर अलगद जायला
व्याकुळ होते तुझी आठवण
कळणार न तुला माझ्या वेदना
नाहीच जमलं रे
गुंतले मन तुटायला
मी व्याकुळ आठवणीत तुझ्या
चंद्रासवे एकाकी विरल्या जाणिवा
-- स्वाती ठोंबरे.


नाहीच जमलं रे
तुला हलकेच विसरायला
भाव मनातला हळवा
खोडून मिटून टाकायला
नाहीच जमलं रे
मिठीतल्या भावनेला खोडायला
मोह तुझ्या गोड मिठीचा
नाहीच जमला पुसायला
नाहीच जमलं रे
तुझ्यात गुंतून बाहेर यायला
ओढ तुझी अलवार
तुझा विरह अबोल मिटायला
नाहीच जमलं रे
तुझ्यासारखे मला तोडायला
गुंतून गेले तुझ्यात
आल्हाद तुझ्या जाणिवा तुटायला
नाहीच जमलं रे
तुझी आठवण पुसायला
विसरुन जावे कसे भाव
तुझ्यात मोहरल्या भावना
नाहीच जमलं रे
मला दूर अलगद जायला
व्याकुळ होते तुझी आठवण
कळणार न तुला माझ्या वेदना
नाहीच जमलं रे
गुंतले मन तुटायला
मी व्याकुळ आठवणीत तुझ्या
चंद्रासवे एकाकी विरल्या जाणिवा
— स्वाती ठोंबरे.

Author