व्यक्ती-परिचय

कवी मधुकर जोशी

Category:

 

संगीतकार दशरथ पुजारी यांनी मधुकर जोशी यांची बरीचशी गीतं एच.एम.व्ही.त रेकॉर्ड केली होती. ती आठवण सांगताना संगीतकार दशरथ पुजारी आपल्या पुस्तकात म्हणतात त्यावेळी काही लोकांचा थोडासा गैरसमज झाला होता की, इतर इतके चांगले कवी असताना तुम्ही मधुकर जोशींचीच गाणी का घेता? त्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं. त्यावेळचे एक नामवंत कवी मला म्हणाले, “पुजारी, तुमचे मधुकर जोशी हे ठरलेले कवी आहेत. तुम्ही दुसर्या कवीला संधी देत नाहीत. हा काय प्रकार आहे? मी एवढंच सागितलं, “प्रकार दुसरा-तिसरा काही नसून मला त्यांची गीतं आवडतात. त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, अर्थाला धरून- दादरा, केरवा, रूपकच्या मीटरमध्ये छान बसवलेले असतात. एका मात्रेचंही कमी-जास्त होत नाही. शिवाय काव्य पाहिल्याबरोबर जेव्हा संगितकाराला चाल चटकन सुचते ते काव्य फार चांगले, असे मी समजतो.” त्यांचं एक काव्य त्यावेळी फार लोकप्रिय होतं.

  April 21, 2022


व्यक्ती-परिचय

गायक आनंद शिंदे

Category:

 

आनंद शिंदे यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी, पंजाबी, उर्दू, तामिळ आणि इतर अशा एकूण आठ भाषांमध्येही गायन केले आहे. होऊ दे जरासा उशीर हे टायटल गाणे असलेल्या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले होते.

  April 21, 2022


व्यक्ती-परिचय

अभिनेत्री सई देवधर

Category:

 

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केलीय. ‘लपंडाव ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता.

  April 21, 2022


साहित्य - ललित

मेरा वो सामान “लौटा “दो !

Category:

 

माणसांची वैश्विक गंमत असते- सुरुवात “मी ” पासून होते. मग वाटेत नातं /नाती येऊन जोडली जातात की शब्द तयार होतो “आपण “. काळाच्या ओघात फक्त काही जिवलग नातीच पैलतीराला जाऊन थांबतात.

  April 21, 2022


साहित्य - ललित

एक छान मैत्रीण हवी

Category:

 

प्रत्येकाला जीवनात, ‘मैत्रीण’ लाभतेच असं नाही.. पूर्वी एकाच वाड्यात, चाळीत अनेक कुटुंबं रहायची.. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणी भरपूर असत, त्यांच्या मैत्रीसंबंधावर पालकांचाही विश्र्वास असायचा.. त्यातूनही शाळा, जर मुला-मुलींची एकत्र असेल तर वर्गातील मैत्रीण घरी आल्यावर तिलाही पालक कुटुंबात सामावून घेत असत. काॅलेजमधील मैत्रिणी हा वर्गात व घरात, चर्चेचा विषय असे. ती जर सहज घरी आली तर तिला घरच्यांकडून, वेगवेगळ्या भूमिकांतून पाहिले जात असे.

  April 21, 2022


दिनविशेष

बरसात चित्रपटाची ७३ वर्षे

Category:

 

बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले. रामानंद सागर यांनी ‘बरसात’ चित्रपटाची पटकथा लिहीली होती. रामानंद सागर यांचा हा पहिला चित्रपट होता. अभिनेते प्रेमनाथ व अभिनेत्री निम्मी रूपेरी पडद्यावर प्रथमच झळकले, लता मंगेशकर यांना खरा ब्रेक मिळाला तो पण बरसात मधील गाण्यांमुळेच. बरसातमुळे राजकपूर यांचे नाव सर्वत्र झाले.

  April 21, 2022


दिनविशेष

सनदी सेवा दिवस

Category:

 

भारतीय प्रशासनाचा पोलादी कणा म्हणून सनदी अधिकारी सुप्रसिद्ध आहेत. अठरापगड भाषासमूहांच्या ह्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी ही पोलादी चौकट देशाच्या स्वातंत्र्यापासूनच तिच्या कामगिरीमुळे महत्त्वाची ठरली होती. देशात घटनादत्त संरक्षण असणारी सेवा म्हणजे सनदी सेवा. तिचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, व योग्य निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी न पडता अधिकाऱ्यांनी आपले काम निष्पक्षपातीपणाने करावे, ह्यासाठी हे संरक्षण दिलेले होते.

  April 21, 2022


लेखसंग्रह

जाऊ तेथे वारी

Category:

 

सामाजिक अभिसरणाचं उत्तम माध्यम असलेली ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव आहे. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण दरवर्षी ठरल्या वेळी धार्मिक स्थळांना भेट देण्याची अशी परंपरा जगात ७-८ हजार वर्षांपासून सुरू आहे… 

  April 21, 2022


कथा

हरवलेल्यांची पंढरी (कथा)

Category:

 

सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई :  मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही.

  April 21, 2022