लेखसंग्रह

मी का लिहितो?

Category:

 

मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, ‘एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?’ विषय ‘मी का लिहितो?’ मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, ‘तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?’ ‘लिहिणं’ ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे.

साहित्य - ललित

स्वाभिमान

Category:

 

स्वाभिमान हा माणसाचा एक जन्मजात गुण आहे. प्रत्येकात असतोच. आणि असावाही. पण अतिरेक झाला की ते फारच असह्य होते. आणि जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा खूप खूप वाईट वाटते अशावेळी सयंम ठेवावा लागतो नाही तर भयंकर वाईट प्रसंग येतात. तर कधी कधी आपल्यालाच मनाला मुरड घालून गप्प बसावे लागते.

लेखसंग्रह

रम्य ते बालपण : मुरलीधर नाले

Category:

 

बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.

साहित्य - ललित

दाद द्या आणि शुद्ध व्हा – आरती प्रभू !

Category:

 

एकाच प्रसंगाच्या आसपास दोन सुंदर रचना ऐकायला मिळाल्या. पूर्वापार ऐकत आलोय तरीही तू-नळीच्या कृपेने एकीचा चक्क भावपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला. प्रसंग समांतर भावनांना वेढून उरलेला आणि दोन्ही गायिका, दोन्ही गीतकार,दोन्ही संगीतकार एकाच तोलामोलाचे आहेत म्हणून की काय उन्नीस-बीस करायला मन धजावत नाही.

लेखसंग्रह

खिद्रापूर !

Category:

 

आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला मुंबईत काही महिने शिक्षकाची नोकरी करताना इंग्रजी, गणित, संस्कृत विषय शिकविले. नंतर पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून १८ वर्षे काम केले. तसेच पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींसाठी आगरकर हायस्कूलची स्थापना केली. १९३७ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग काॅलेज काढले. प्राथमिक शाळेसाठी, नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरूण वाचनमाला, अशी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली.

साहित्य - ललित

ते रवी, मी साधा तारा

Category:

 

सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक.

कथा

पुस्तक

Category:

 

मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली.