पुस्तकांनी काय शिकवलं
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनतुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली. पुस्तकांच्या परंपरेचा हा आढावा घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी!
June 14, 2026