जखम इतकी खोल होती, हासलो तरी जळालो मी,
फूल म्हणता लोक सारे, काट्यांतूनच फुललो मी.
वादळांनी नाव माझे वाळूतून पुसून टाकले,
लाट बनुनी त्या किनाऱ्यावर पुन्हा पुन्हा आदळलो मी.
सावल्यांनी साथ दिली, ऊन जेव्हा दगा देत होते,
रात्र माझी होत गेली, चांदण्यातही करपलो मी.
एक तुझ्या नकाराने मोडले नव्हते फक्त नाते,
विश्व माझे कोसळावे, त्या ढिगाऱ्यात उरलो मी.
आरशाला रोज विचारू, "चेहरा हा कुणाचा आहे?"
उत्तरांच्या गर्दीमध्ये प्रश्न होऊन राहिलो मी.
कोण मोजी वेदनांना? कोण देई किंमत अश्रूंना?
शब्द माझे विकले नाहीत, भुकेशीही भिडलो मी.
जिंकणाऱ्यांच्या मिरवणुका रस्त्यांवरून निघत राहिल्या,
हारणाऱ्यांच्या डोळ्यांतील शेवटचा विश्वास झालो मी.
आग माझ्या रक्तामधली विझवणारा जन्मला नाही,
राख दिसली फक्त जगाला आत धगधगत राहिलो मी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
जखम इतकी खोल होती, हासलो तरी जळालो मी,
फूल म्हणता लोक सारे, काट्यांतूनच फुललो मी.
वादळांनी नाव माझे वाळूतून पुसून टाकले,
लाट बनुनी त्या किनाऱ्यावर पुन्हा पुन्हा आदळलो मी.
सावल्यांनी साथ दिली, ऊन जेव्हा दगा देत होते,
रात्र माझी होत गेली, चांदण्यातही करपलो मी.
एक तुझ्या नकाराने मोडले नव्हते फक्त नाते,
विश्व माझे कोसळावे, त्या ढिगाऱ्यात उरलो मी.
आरशाला रोज विचारू, “चेहरा हा कुणाचा आहे?”

Post Views: 1