इस्त्रीवाला (आठवणींची मिसळ २६)
Category:
साहित्य - ललितआता इस्त्रीवालेही मोठे झालेत. एखाद्या मोठ्या खोलीत, एखाद्या मोठ्या दुकानांत आतां दोन ते तीन टेबलांवर इस्त्री चालू असते. बरेच इस्त्रीवाले आता बरोबरीने लाँड्री चालवतात. लाँड्रीचा धंदा कमी झाला तरी त्याची गरज आहेच. हा धंदा हळूहळू इस्त्रीवाले ताब्यात घेतायत. वूलन कपडे, सिल्कचे कपडे इ. चे ड्राय क्लिनींग असते. डिझायनर ड्रेससारखे कपडेही साफ करायला येतात. मुंबईत तरी इस्त्रीवाल्यांनी बहुसंख्यांचे कपड्यांची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे.
September 15, 2022