रणथंबोरच्या रानात – प्रवासवर्णन नव्हे
Category:
अवर्गिकृतदीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते.
January 25, 2010